AirTel Broadband Vs You Broadband पुण्यात कोणते चांगले?

Submitted by atuldpatil on 9 March, 2016 - 00:49

मागची अनेक वर्षे BSNL Broadband वापरत आहे. पण गेल्या काही महिन्यात प्लान प्रमाणे स्पीड मिळत नाही. (विशेषकरून यू-ट्यूब किंवा फेसबुक व्हिडीओज तसेच इतर डाउनलोड्स) शिवाय मी घेतलेला प्लान पूर्ण आउटडेटेड झाला आहे (इतर सर्विस प्रोव्हायडर च्या तितक्याच किमतीतील स्पीड आणि डाऊनलोड लिमिट तुलनेत) व पैसे उगीचच जास्त मोजावे लागत आहेत असे लक्षात आले आहे.

मित्रांनी AirTel Broadband आणि You Broadband असे दोन पर्याय सुचवले आहेत. BSNL च्या तुलनेत त्यांचे त्याच किमतीतील प्लान खूपच फास्ट दिसत आहेत:

http://www.airtel.in/broadband-and-fixed-line/broadband

http://www.youbroadband.in/broadbandplans/pune.php

पण दोन्हीमध्ये कोणते चांगले हे कळत नाही. कुणाला अनुभव असेल (सर्विस, स्पीड, डाऊन टाईम इत्यादी) तर कृपया निर्णय घेण्यास मदत करा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही कुठल्या एरिया मधे राहता? मी बावधान मधे एका लोकल केबल internet वाल्या कडून connection घेतले आहे, स्पीड छान आहे, आधी मी पण ऐरटेल broadbad वापरात होतो.. स्पीड एवढी खास नव्हती..

मलापण ही माहिती हवी आहे
सिंह्गड रोड्वर कुठल चांगल नेट आहे. Tata photon फुलटू गंड्लेल आहे....... स्पीड काहीच नाही.

मी गेली 7 वर्षे you broadband वापरतो आहे.
मेजर असा काही प्रॉब्लेम कधीच आला नाही. स्टाफ चांगला आहे. काही अडचण असेल तर लगेच मदत करतात. 10mbps चा प्लॅन असून पण टोरंट वगैरे वरून काही डाउनलोड मारताना 2mbps वगैरे मिळतो. का ते माहीत नाही. विचारून पाहायला पाहिजे.

त्यांचे ड्युअल स्पीड चे प्लॅन चांगले आहेत.

पण you broadband वाले पेमेंट च्या बाबतीत काटेकोर आहेत. प्लॅनची मुदत/ जीबी संपले कि लगेच दुसर्यादिवशी नेट बंद करतात आणि रिचार्ज साठी 1760 फोन करतात

धन्यवाद सर्वांचे.
@चिनूक्स: Hathway अजून एक ऑप्शन Happy माझ्या एरिया मध्ये त्यांची सर्विस आहे का विचारतो.
@फोतोग्राफेर२४३: भारती विद्यापीठ भागात. हो एअरटेल ब्रॉडबॅंडचा अजून एक फीडबॅक फारसा चांगला मिळाला नाही.
@सुम: धन्यवाद. Tata photon कटाप.
@अतरंगी: राहतो त्या भागात you broadband च आहे. तुमचा फीडबॅक नक्कीच महत्वपूर्ण. खूप खूप धन्यवाद.

४००- ५०० रुपयात अनलिमिटेड हे अनेक ग्राहक गमवल्यानंतर बी एस एन एल ला सुचलेल शहाणपण आहे.

माझ्याच बिल्डींगमधे ते लोक वापरतात. स्पीड ३जी पेक्षा जास्त आहे असे क्लेम करतात. मी मात्र सध्या एअरटेल वापरतो आहे. सुरवातीला स्पीड उत्तम होता आता तो वाटत नाही.