दुचाकी बद्दल काही विचारायचं होत.

Submitted by मया on 10 February, 2016 - 07:47

माझ्या कडे Honda - Duster हि दुचाकी आहे नुकतीच घेतली आहे मी तिला first time service मध्ये गेलेलो नंतर मित्रांनी सांगितलं तिकडे जाऊ नको लोकल वाल्याकडेच काही झाल तर घेऊन जात जा म्हणून मी यावेळी लोकल वाल्याकडे घेऊन गेलो त्याने सांगितलं थोडी हार्ड वाटत आहे चालवताना नवीन CLUCH PLATE टाकूया मी बोललो टाक नवीनच आहे जे आहे ते टाक २५०० रुपये घेतले पुन्हा २ ते ३ दिवसांनी तोच प्रोब्लेम झाला आहे म्हणून मला कळत काय काय प्रोब्लेम आहे.
महत्वाच्या मुद्यावर येतो आमच्या इथ्ये एक चढण आहे ते सगळे जण पटापट चढतात मलाच येत नाही तस ते खूपच कठीण पण आहे मी एकदा दोनदा चढलो सुधा गाडी घेऊन पण त्यावेळी इत्तर गाड्या न्हावत्या एकदा एकाला विचारलं कि कुठल्या गेअर गाडी वरती नेऊ तो बोलला मित्र ३ वर घ्ये आणि मध्ये बंद पडली तर १ वर चालव मी पण तेच केल बोललो काही करून मला हा चढ इतरान सारखा चढायला यायलाच हवा आणि काल पुन्हा CLUCH PLATE खराब झाली तो बोलला २५०० पुन्हा खर्च येणार. काय मला चालवता येत नाही कि काही solution द्याल.

Repair वाल्याला विचारलं तो बोलला कि तू cluch दाबून गाडी चालवतो म्हणून तसे होतंय काय तरी मार्ग सुचव.

मुलीना एक प्रश्न तुम्ही scooty चालवताना पाय प्लेन landing करतात तसे कसे का करतात

Group content visibility: 
Public - accessible to all site users

असा कितीसा मोठा चढ आहे की 'नवीन' गाडीची क्लच प्लेट पहिल्या सर्वीसला गेली? Uhoh
क्लच प्लेट नक्कीच एवढ्या लवकर खराब होत नाही.

मुलीना एक प्रश्न तुम्ही scooty चालवताना पाय प्लेन landing करतात तसे कसे का करतात >> बहुतेकवेळेला बॅलन्स करता करतात.

योकु :तू बोलतो आहेस ते बरोबर आहे मला चालवता येत नसेल नीट चांगला सल्ला दे कशी चालू किंवा कितव्या gair वर चालवू जेणे करून असे होणार नाही

रेपैर वाला बोलत आहे तू Cluch दाबून गाडी चालवत असशील होत असेल पण खर कि खोट काय माहित नाही शिकलं तर पाहिजे

kapoche : तुम्हाला explain नाही करू शकत कारण तुम्हाला त्यातलं काही माहित नसेल तरीही सांगतो duster हे होंडा च एक मोडेल आहे

एअर फिल्टर बघा. त्यात प्रॉब्लेम झाला असेल तर गाडी चढावावर दम टाकते.

किती किमी चाललीय? नवीन गाडीच क्लच इतक्या लवकर जायला नको. वारंटीमध्ये असेल तर लगेच सर्व्हिस सेंटरला न्या आणि नव्या गाड्या कधीच लोकल पब्लिक कडे नेत नका जाऊ.

तरीपण, होंडा डस्टर कधीच मॉडेल आहे? कधी ऐकल्याच आठवत नाही.

तुम्हाला त्यातलं काही माहित नसेल तरीही सांगतो duster हे होंडा च एक मोडेल आहे >>>> Lol
मया- तो रिपेअरवाला बरोबर बोलत आहे. जास्त चढणीच्या ठिकाणी शक्यतो गाडीवर जास्त ताण देऊ नका, खासकरुन क्लचवर. कोणाला गाडी कंट्रोल करायची असल्यास किंवा स्टॉप करायची ब्रेकचा वापर न करता ते फक्त क्लचवरच ती स्टॉप करतात त्याने नवीन गाडीही लवकर काम काढते.

मया, मे बी क्लच पूर्ण रिलीज होत नसावा. म्हणूनही क्लच प्लेट लवकर खराब होते. तरीही तू सांगीतल्याप्राणे इतक्याही लवकर नाही.

तुम्ही सांगत आहात ते थोड अचूक वाटत आहे कारण माझ्या कडून हि चूक होत असावी कारण पहिली तर मी गाडी कधी ४ गैर वरच चालवायचो आणि Cluch ने Speed कंट्रोल करायचो हल्लीच शिकलो आपल्याच गाडीवर दुसऱ्याची गाडी मागू नये या उदेश्याने …

जाऊ देत महत्वाचा प्रश्न मध्ये मध्ये दुसऱ्या गाड्या येणार असेल आणि तुम्हाला एकाध मोठ चढण चढायच असेल तर तुम्ही ते कुठल्या गेईर वर पार कराल ते सांगा

बरेच प्रश्न विचारतो आहे पण खर सांगू तुम्ही सांगता तेच फायदेशीर होत या आधी हि तुम्हीच सगळ्यांनी मदत केलेली

kapoche : तुम्हाला explain नाही करू शकत कारण तुम्हाला त्यातलं काही माहित नसेल तरीही सांगतो duster हे होंडा च एक मोडेल आहे >>>अरेरे , चिडलात कि काय ?

माहित नसेल तरीही सांगतो . >> तरीही च्या जागी तर ठीक राहील का ?

गेली १८ वर्षं एकच गाडी चालवतोय.. जेमतेम एकदा की दोनदाच क्लच प्लेट बदलायला लागली...

गियर टाकून झाल्यवर क्लच पूर्ण पणे सोडून द्या... म्हणजे तो एंगेज रहाणार नाही..

नवीन गाडी असल्यामुळे निदान पहिली दोन वर्षे तरी ऑथराईज्ड सर्व्हिस सेंटर पेक्षा दुसरी कडे गाडी नेऊ नये... पहिल्या वर्षी तर बहुतेक गोष्टी फ्री सर्व्हिसिंग मध्ये होऊन जातात...

चढावर शक्यतो दुसरा गियर आणि समोर कोणी आलाच तर पहिला गियर. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गाडीचा स्पीड काय आहे त्यावर गियर ठरवा... कधीकधी चढ सुद्धा चवथ्या गियर मध्ये चढता येतो पण गाडीची मोशन न तोडता ते जमायला पाहिजे.. पण म्हणून कसेही वाकडी तिकडी वळणे घेत गाडी चालवू नये..

मी कोणावर रागवत नाही आहे मला ती गाडी घेतली आहे त्याचाच प्रोब्लेम झाला आहे माझे त्या प्रोब्लेम मध्ये ५००० हजार घेतले आहेत तुम्ही काही तरी मदत करा जेणे करून मी त्या चढावर गाडी चालवू शकीन

कोणाला राग असेल माझा तर माफी मागतो

तुम्ही सांगत आहात ते थोड अचूक वाटत आहे कारण माझ्या कडून हि चूक होत असावी कारण पहिली तर मी गाडी कधी ४ गैर वरच चालवायचो आणि Cluch ने Speed कंट्रोल करायचो हल्लीच शिकलो आपल्याच गाडीवर दुसऱ्याची गाडी मागू नये या उदेश्याने

<<

मया,

४था गियर जेव्हा गाडी ४०-५० पेक्षा जास्त स्पीडने जात असेल अशाच वेळी वापरावा.

तुमचा चढ चढायला किमान सेकंड गियरमधे यायला हवे, असे दिसते.

अर्धा क्लच दाबून गाडी कोणत्याही गियरमधे पुढे जाऊ शकते, पण त्याने क्लचप्लेट मरते. क्लच गाडीचा स्पीड कंट्रोल करण्यासाठी नाही. तो गियर बदलण्यासाठी व गियर एंगेज करून इंजिनची एनर्जी चाकापर्यंत घेऊन जाण्यासाठी आहे. गियर बदलून झाला, की क्लच हँडल संपूर्ण सुटले पाहिजे.

तेव्हा सामान्यतः गाडीचा स्पीड १० पर्यंत १ ला गियर, २० पर्यंत दुसरा, ३० तिसरा अन ४० पुढे ४था असा ठोकताळा लक्षात ठेवा.

दुसरी महत्वाची गोष्ट, खासगी मेकॅनिककडे का गेलात? कंपनीची ग्यारंटी वॉरंटी वाया गेली की आता!

*

काही लोकांना ब्रेक पॅडलवरही अर्धवट पाय दाबून गाडी चालवायची सवय असते. त्याकडेही लक्ष द्यावे. गाडी चालवताना तुम्ही ठरवून ब्रेक दाबत नसाल, तर ब्रेकलाईट लागायला नको.

तुम्ही दिलेल्या माहिती साठी मनापासून आभारी आहे अश्याच माहितीची गरज होती आता जर मला ते चढण व्यवस्तीत चढू शकलो कुठल्याही गाडीचा प्रोब्लेम न होता तर तुम्ही जेव्हा मुंबईत याल तेव्हा सांगा मी गुरुदक्षिणा म्हणून पार्टी देइन.आज तुम्ही दिलेल्या माहिती नुसार गाडी चालवली नाही तर ४ गैर वरच चालवायचो आणि cluch Plate वरच गाडी कंट्रोल करायचो आज सगळ्या गैर चा वापर केला कामावर येताना. आता घरी जाताना ते चढण लागत बघूया काय होतंय चढण चढतो कि पुन्हा खर्च होतोय.

तुम्ही जे कष्ट केला आहात त्या बद्दल मनापासून धन्यवाद

बाकी सगळ्यांचे सुधा

दीड मायबोलीकर :तुम्ही दिलेल्या माहितीची खूप खूप मदत झाली हे पण कळाल कि कशी गाडी चालवायची रेगुलर रोड वर सुद्धा आणि त्या उंच चढणावर.

नेहमी हल्ली त्याच चढणावर चढून वर येतो आणि बरे सुद्धा वाटते याचे सर्व श्रेय तुम्हाला जाते.

सोन्याबापू
:
आठवण ठेवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद सध्या खाली दिलेली प्रमाणपत्र झाली

नोटरी, PAN कार्ड , Marriage certificate in प्रोसेस

बाकी राहिले आहे आधार कार्ड, RAtion कार्ड वर नाव नोंदणी