मुजोर भांडण कोचींग क्लासेस

Submitted by cool_vaidehi on 10 February, 2009 - 07:53

मुजोर भांडण कोचींग क्लासेस

आपल्या मराठी परंपरेत भांडणांना महत्वाचं स्थान आहे पण आजच्या या धावपळीच्या जीवनात अस्सल भांडण कुठेतरी लुप्त होत चाललंय लोकांना सोयी नुसार मनसोक्त भांडता यावं म्हणून अखील भारतीय भांडण असोसीएशन ने नागपुरात आपले 'मुजोर भांडण कोचींग क्लासेस' चे केंद्र उघडलेले आहे. इच्छुक भांडखोर या क्लासेस मध्ये ऍडमिशन घेऊ शकतात या कोचींग क्लासेस मध्ये अनेक उपयोगी कोर्सेस उपलब्ध आहेत

नेत्र मुद्रा भांडण
या कोर्स मध्ये तुम्हाला डोळे मोठे करून व तसेच न बोलता डोळयाच्या हावभावाने भांडण शिकवले जाते याचा उपयोग म्हणजे तुम्ही अचानक आलेल्या पाहुण्यांच्या नकळत केवळ डोळयांद्वारे भांडणांचा आस्वाद घेऊ शकता.

वचावचा भांडण
या कोर्स साठी जोडीदार असणं महत्वाचं आहे ... सासू सून नवरा बायको किंवा नणंद भावजय अशी जोडी असावी हा कोर्स केवळ तीन महीन्याचा आहे यात उखाळे पाखाळे कसे काढायचे व भांडण करतांना घालून पाडून कसं बोलायचे याचे सविस्तर शिक्षण दिले जाईल

हातापाई भांडण
जर तुम्हाला भांडण विषारद व्हायचं असेल तर वरील दोन्ही कोर्स झाल्यावर तुम्हाला या कोर्स मध्ये ऍडमिशन मिळू शकते हा कोर्स केवळ सहा महीन्यांचा आहे यात आमचे फायटींग एक्सपर्ट तुम्हाला भांडण करतांना हातवारे कसे करायचे शिवाय दोन बायका भांडत असतील तेव्हा एकीने दुसरीचा आंबाडा किंवा वेणी काशी पकडून खेचावी याचे संपूर्ण शिक्षण दिले जाईल.. हा कोर्स करतांना कृपया पदर खोचून यावे...

संबंधित कोर्स साठी संपर्क
श्री मुजोरराव भांडखोरे
चांडाळी रोड, वाटोळ नगर.

गुलमोहर: 

हाहा... घ्या आता भांडणाचा पण कोर्स का.... बाकी कोर्स ची फी काय आहे?

प्रशिक्षक हवे असल्यास मला संपर्क करायला सांग ग वैदेही, मुंबईच्या लोकल मधल्या ८०% बायका ह्या पि.एच्.डी. होल्डर आहेत ह्या विषयात. नाही तू त्यांना रेकमंड करच, कारण केवळ त्यांच्या सानिध्यात राहुन बालवाडी ते बिगरी प्रवास एकलव्यासारखा केलाय मी, मग प्रत्यक्ष त्या तिथे शिकवायला लागल्या तर विद्यार्थी बोर्डात येतील ग.

ह्या विषया वर व. पु. काळे यांचे एक कथाकथन आहे. खुप च सुन्दर आहे ते. बाकी तुम्ही पन छान लिहीलय.

सागर आढाव

Happy
धन्यवाद दोस्तो...
सुप्रभात... फी ची चौक्शी करून सांगेन नक्की... Wink

कविता ताइ.. Lol
व्हॅक्न्सी अस्ल्यास कळव्ते हा!!! Proud
..................................
निवडणुकीव्यतिरिक्त माझे मत फारसे कुणी विचारात घेत नाही... Wink

बाकी कोर्स ची फी काय आहे? >>>

भांडण करुन द्यायची नाही फी Lol

खुपच छान...!

बाय द वे... 'नळावरचं भांडण/ चाळीतले भांडण' याविषयात छोटे छोटे सर्टिफिकेट कोर्स किंवा 'कायिक/ वाचिक भांडण ' असे पदविका कोर्सेस आहेत का? नसतील तर सुरु करायला हरकत नाही.... Happy

xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
स्मितहास्याची ही गोलंदाजी
पेलवेल त्याने करावी फलंदाजी....
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx