फीट वरील उपाय सुचवा

Submitted by मया on 15 January, 2016 - 00:40

मकरसंक्रांतीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !

सरळ मुद्यावर येतो मला योग्य सल्ला हवा आहे मला वयाच्या १६ वर्षा पासून फीट त्यानंतर मी डॉक्टर कडे बराच test केल्या नंतर ४ ते ५ वर्षांनी एका डॉक्टर कडून मला VALPARIN CRONO - ५०० हि गोळी घेतो सकाळी आणि रात्री पण काही बंद होत नाही आहे फिट येतेच पूर्ण बंद झालीच नाही आहे पहिली ४ ते ५ महिन्यांनी एकदा यायची आता ती थोड्या थोड्या दिवसांनी फिट येते त्यावेळी जी चाहूल लागते ती दिसून येते.

फीट येते तेव्हा कळून येते ते खालील प्रमाणे …।
१) शरीर तडतडणे
२) Vibrate होणे.
३) फीट येते ती समजते तोंडातून फेस येणे नंतर उलटी येते आणि मग मी झोपतो १५-२० मिनिटांनी व्यवस्तीत होतो
४) झोप पूर्ण नसेल तरी हे होत

मी हे इथ्ये टाकल आहे जेणे करून मला योग्य उपाय सुचवेल एखादा चांगला डॉक्टर जो पूर्ण पणे बंद करू शकेल

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या नणंदेलाही हा त्रास आहे. तिला वाल्प्रॉल सोबत अजून दोन गोळ्या दिल्या आहेत. टेग्रेटाल आणि लॅमिटॉर. त्याही दिवसातून चार वेळा.

पूर्वी ती जेव्हा फक्त वालप्रॉल घ्यायची तेव्हा खूप फिट्स येत. मग डॉ बदलला. त्यांनी ह्या दोन गोळ्या अ‍ॅड केल्या, गोळ्यांच्या वेळा जशाच्या तशा पाळायला सांगितल्या. शिवाय दर सहा महिन्यांनी ब्रेन स्कॅन आणि फॉलो अप सांगितला. ते सगळे सुरु केल्यापासून तिच्या फीट्स ऑल्मोस्ट बंद झाल्या. आता फक्त जेवण जास्त झाले, अपचन झाले किंवा खूप जागरण झाले तरच फिट येते, जे दोनेक वर्षातून एकदाच होते.. हो पण जर दोन डोस मिस झाले तर मात्र नक्की हटकून फिट येतेच. (जे सहा महिन्यातून एकदा होऊ शकते.) आम्ही तिची एक डायरी मेंटेन केली होती. तिला कधी फिट्स आल्या त्या आधी तिने काय केलं होतं काय किती खाल्लं होतं. इत्यादी.

शिवाय ह्या आजाराला पूर्ण क्युअर नाही. म्हणजे अगदी रेअर केसेस मध्ये औषधे न घेता माणूस राहू शकतो. आयुष्यभर औषधे घेणे हे एकच सोल्युशन आहे फिट्स कन्टृओल करण्याचे. (हे मी मनचे सांगत नाही तर ३ डॉ बरोबर बोलून जे मला समजले ते साम्गते आहे). ह्याला आयुर्वेदात सोल्युशन आहे असे म्हणतात पण रिस्क घ्यायला तुम्ही तयार असाल तर योग्य डॉ शोधा आणि ट्रीटमेण्ट ट्राय करा. आम्ही ती रिस्क घेतली नाही.

मुंबईत डॉ निर्मल सूर्या हे एक अत्त्युत्तम डॉ (न्युरोफिजिशियन) आहेत. निर्मला निकेतन जवळ त्यांचे क्लिनिक आहे. (वागायला रुड वाटतील ते. पण त्यांची ट्रीट्मेण्ट खुप चांगली आहे. आम्ही त्यांच्याकडे अनेक फिट्सचे पेशण्ट पाठवले, सगळ्यांना चांगला गुण आला आहे.) त्यांच्याकडे मंगळवारी का बुधवारी अत्यंत कमी फी मध्ये ट्रीटमेण्ट होते.

आशय असा की न्युरोफिजिशियनकडे रेग्युलर व्हिजिट्स मस्ट आहेत. डॉसुद्धा ब्रेन स्कॅन करुन मगच पुढचे डोस देत आहे का नाही हेही लक्षात घ्या. न्युरोफिजिशियनची फी खुप जास्त अस्ते (२००७ मध्ये १२०० रु पर व्हिजिट आणि शिवाय ब्रेन स्कॅन). शिवाय वालप्रॉल, टेग्रेटाल आणि लॅमिटॉर तिनही औषधे बरीच महाग आहेत. पण त्या फी ला आणि औषधाच्या खर्चाला घाबरुन जर डॉ कडे जाणे आणि औषधे घेणे टाळले तर हा आजार कधीच कन्ट्रोल मध्ये येणार नाही.

वरील सर्व गोळ्या केवळ डॉ च्या प्रीस्क्रिप्शन नेच मिळतात आणि ते प्रिस्क्रिप्शन देखील केवळ काही काळापुरतेच व्हॅलिड असते, म्हणून औषधांची नावे लिहिली आहेत. फिट्स वरची कोणतीही औषधे प्रीस्क्रिप्शनशिवाय मिळूच शकत नाहीत.

फिट येणे हा प्रकार कशामुळे होतो यावर तज्ज्ञ प्रकाश टाकतील का कृपया? कारण काही लोक 'फिट येणे' हे इतके सहजतेने घेतात तर काही फारच गांभिर्याने घेताना पाहिले आहे.

सारस्वतादि चूर्ण/सारस्वतारिष्ट,इतर आठ औषधांपैकी हे एक. परंतू अॅलोपथी चालू असताना घेऊ नये.
वैद्यनाथ /आरोग्यप्रकाश भाग दुसरा यात म्हटले आहे "रोग संपूर्ण बरा होत नाही फक्त वारंवारता कमी करू शकतो." उगाच काही अचाट दावा करण्यापेक्षा स्पष्ट केलेले मला आवडलं.

मया, तुम्ही मुंबईला रहाता असे दिसते.
तुमचे आत्तापर्यंतचे सगळे रिपोर्ट्स घेऊन के ई एम हॉस्पिटलच्या न्यूरॉलॉजी ओपिडीत जा.
तुमची ड्रग हिस्टरी सांगा. के ई एम मध्ये अत्यंत कमी पैशांत सिरम अँटीएपिलेप्टीक लेवल (तुमच्या रक्तातील एपिलेप्सीवरच्या औषधांचे प्रमाण) तपासून मिळते. बाहेर प्रायवेटमध्ये त्याची किंमत हजारो रुपये आहे.
काहीवेळा व्यवस्थित औषधे घेऊनही शरीरातील काही इतर व्याधी किंवा अ‍ॅबसॉर्प्शनच्या कमतरतेमुळे ह्या औषधांचे रक्तातील प्रमाण सुयोग्य रहात नाही. मग डोस वाढवावा लागतो.
सुरूवातीस हे चेक करणे दर महिन्याला लागू शकते, मग मात्र दर तीन महिन्यांनी करतात.

तुमची एपिलेप्सी ही ड्रग रेजिस्टंट प्रकारची आहे.
थोडे ड्रग्ज बदलून पहायला लागेल. वालप्रोएट ऐवजी दुसरे औषध देऊन.

के ई एम्च्या न्यूरॉलॉजी ओपिडीत केवळ ५-१० रु किंमतीच्या केसपेपरात हे करून मिळेल.

शुभेच्छा!

अगदी लहानपणी येणार्‍या फिट्ससाठी दोन वर्षांचा गोळ्यांचा कोर्स केल्यानंतर पूर्ण बर्‍या झालेल्या केसेस माहितीत आहेत. त्यामुळे आयुष्यभर औषध घ्यावे लागेल की थोडक्यात होईल हेही व्यक्तीव्यक्तीवर अथवा फिट्सच्या प्रकारावर अवलंबून असावे, असे वाटते.

मागच्याच आठवड्यात 'epilepsy' (मराठीत अपस्मार??) या एका प्रकारच्या फीट साठी कीटोजेनिक डाएट उपयुक्त ठरते असा लेख वाचला होता. दादरच्या शुश्रुषा रुग्णालयाशी संलंग्न असलेले डॉ. नाथन यांनी यावर बरेच संशोधन केले आहे आणि त्यात त्यांना चांगले यश आले अशा स्वरुपाची बातमी होती.

फीट वरुन आठवले म्हणुन बातमी शेअर केली. त्याचा आपल्याला कितपत उपयोग होईल ठाउक नाही.

के ई एम्च्या न्यूरॉलॉजी ओपिडीत केवळ ५-१० रु किंमतीच्या केसपेपरात हे करून मिळेल.
<<
हो,
सोबत इतर पेशंट्सची भरपूर गर्दी असेल, व डॉक्टर्स/नर्सेस कडून हँड होल्डींग व स्वीट टॉक अजिबातच मिळणार नाही, पण इलाज शंभर नंबरीच होईल हे नक्की.

पुण्यात नगर रोडला या आजारासाठी एक प्रसिद्ध्स डॉ. होते. बुलाख नाव होते बहुतेक. लांबून यायचे पेशंट्स. रात्री क्लिनिक च्या बाहेर झोपायचे. निवर्तले ते.
औंध ला एक डॉ. आहेत. नाव आठवत नाही..

अनील अवचट ह्यांची मुलगी यशो हिला हा आजार होता. तिने त्रिची ला जाउन एका इन्स्टिट्यूट मधूनऑपरेशन पण करून घेतले होते. व आता त्यांचे एपिलेप्सी सपोर्ट फाउंडेशन पुण्यात आहे. सल्ला नक्की डिटेल वारी लेख सात आठ वर्शा पूर्वी साप्ताहिक सकाळ च्य दिवाळी अंकात आला होता. लेटेस्ट माहिती शोधावी लागेल.

इथे बघा.

http://epilepsysupport.aarogya.com/sanvedana/index.php?option=com_conten...

Sanvedana Foundation - Epilepsy Counselling Centre
Print
Address:
Niwara Old-Age Home, Near S.M. Joshi Hall, Navi Peth,
Pune
Maharshtra
India
411030

E-mail: contact@aarogya.com

Counselling Centre for people with epilepsy is held on: Every Wednesday 5:00 pm to 7:00 pm.

Contact Numbers:
+91-9822008035, +91-9850887644, +91-8983632893, +91-9423003366, +91-9552518909

मला ह्यांचा काही अनुभव नाही. स्वतःच्या जबाबदारीवर अ‍ॅप्रोच करा. बेस्ट लक.

मुंबईचे नंबर. त्याच साइट वरून घेतलेत.
IEA - Indian Epilepsy Association, Mumbai Chapter.
E-Cell and Samman Epilepsy Support Group
J.S.S. Municipal School Building
Nana Chowk, Grant Road (E)
Mumbai 400007, Maharashtra.

Tel: 022-56057751

Email: ecellin@yahoo.co.in

Contact Person: Ms. Carol D'Souza Counselor,

Phone Work: 022-23850563/26511328 (9 to 5)

Mobile: 09819029338 (9 to 5)
Ms. Kavita Shanbhag, Coordinator, 24377457

Office Timings: Mon-Friday – 11 a.m. to 3 p.m., 2nd, 4th & 5th Saturday from 2 p.m. to 4.30 p.m. People wanting to join for the first time are requested to phone before coming.

Notes: Registered in December 1971 as a Public Charity Trust. Raise epilepsy awareness; Increase acceptance of persons with epilepsy; Provide relief and rehabilitation to patients & their families.
ashamumbai - Asha
310, Lotus House, 33A, New Marine Lines, Marine Lines
Mumbai 400020, Maharashtra.

Tel: 022-22001180

Email: epfoundation@gmail.com

Notes: Treatment of Epilepsy. Various incidents on epilepsy and their cure

माझ्या वडिलांना गेल्या ६ वर्षात ३ वेळा फिट्स आल्या आहेत. त्यांना मेंदुतज्ञाची ट्रीटमेंट सुरु आहे. कायम एक गोळी घ्यावी लागते. ती रक्त घट्ट होऊ नये म्हणून आहे. रक्तात गुठळी होऊन ती मेंदुत गेल्यास फिट येते. त्यामुळे ही गोळी सुरु आहे.

दरम्यान मागे लोकसत्ता मध्ये एक लेखमालिका यायची झोपे वर ठाण्याचे डॉ देशपांडे होते बहुतेक. obstructive sleep apnea सारखा प्रॉब्लेम असल्यासही फीट्स येऊ शकतात.

कालच डॉक्टर कडे जाऊन आलो नेट वरती शोधून गेलेलो मला माझ्या जवळचाच डॉक्टर हवा होता कारण तब्येत १५ दिवसा पासून खूप वाईट होती त्यात जॉब ला जातो म्हणून आजुनच डोक्याला ताप जाऊदेत थोडी औषध वाढवलीत आता किती बर वाटतंय देव जाणे.
ज्या ज्या डॉक्टर कडे गेलो एक गोष्ट दिसून आली प्रत्येक जण MRI आणि EEG पुन्हा करायला सांगतात ते पैसे जाणारं

आता तर मला कळून चुकल आहे कि माझी फिट कधी बंद होणार नाही जितके दिवस आहे तितके दिवस जगायचं

ज्या मुलांना लहान वयात फीट आली तर व्तरित डॉक्टर चा सल्ला घ्या त्या वेळी ते बरे होऊ शकते नाही तर माझ्या सारख आहेच

ज्यांना फिट येते ते कधी ऑफिस किंवा घराच्या बाहेर असतील तर त्यांना एक महत्वाचा सल्ला डॉक्टर ला विचारून अशी एक गोळी घ्या जी घेतल्यानं तुम्ही सुरक्षित ठिकाणी जाई पर्यंत काही होणार नहि.

तुमचे आत्तापर्यंतचे सगळे रिपोर्ट्स घेऊन के ई एम हॉस्पिटलच्या न्यूरॉलॉजी ओपिडीत जा.
तुमची ड्रग हिस्टरी सांगा. के ई एम मध्ये अत्यंत कमी पैशांत सिरम अँटीएपिलेप्टीक लेवल (तुमच्या रक्तातील एपिलेप्सीवरच्या औषधांचे प्रमाण) तपासून मिळते. बाहेर प्रायवेटमध्ये त्याची किंमत हजारो रुपये आहे.
के ई एम्च्या न्यूरॉलॉजी ओपिडीत केवळ ५-१० रु किंमतीच्या केसपेपरात हे करून मिळेल.>>>>>
वर एका डाॅक्टरांनी लिहीलय हे सगळं ते का नाही वाचलंत अजून???

माझ्या भावाला तो एक वर्षाचा झाला आणि फीट्सचा त्रास सुरु झाला. डॉ. दामले म्हणुन आहेत अपना बझार,मुलुंडला. होमिओपथीक आहेत, पण वर्षभराच्या औषधाने कायमच्या फिट्स बंद झाल्या त्याच्या. आता तो २२ वर्षाचा आहे पण एकदाही फीट आलेली नाहीय. तुम्हांला जमत असेल तर एकदा सल्ला घेऊन बघायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं.

माझ्या मैत्रिणिच्या मुलाला पण फिट येतात..आता तो ६ वर्षांचा आहे... परवा त्याला १ वर्षाने आलि फिट तेह्व्हा डॉ ला दाखवले असता ते म्हणाले की मेंदुतिल कुठलीशी नस अस्ते त्याची जन्मतः च वाढ न झाल्याने फिट येतात..बाकी तो मुलगा एकदम नॉर्मल आहे...त्यावर त्यांनी फिट न येण्यासाठे गोळी दिली आहे वेळा न चुकवा घ्या असे सांगितल... ते झाले तर नैसर्गिकच बरे होईल... मोठा होईल तसा...पण मैत्रिण आत खुपच नाराज आणि टेंशन मध्ये आहे...कुठल्या डॉ ला दखवावे...ती सध्या अह्मदबादला असते .

एपिलेप्सीवर योग्य टेस्टस करून डॉक्टरचा सल्ला घेऊन औषधे उपलब्ध आहेत. कुठल्याही हॉस्पिटलमध्ये न्युरोसर्जरी डिपार्टमेंट मध्ये ट्रीटमेंट होईल. औषधे कायम घेत चला, चालढकल जीवावर बेतू शकते. जसलोक मध्ये डॉ. अनिल देसाई उत्तम होते. त्याचं निधन झालं.
ठाण्यात डॉ. विनायक जोशी चांगले आहेत.
परत परत फिट्स येत असतील तर सुरुवातीला डॉ. रेग्युलरली कार्बामेझापाईन चेक करायला सांगतील, त्यावरून ओषध/ डोस बदलून देतील.

आता तर मला कळून चुकल आहे कि माझी फिट कधी बंद होणार नाही जितके दिवस आहे तितके दिवस जगायचं >>>>>असे म्हणु नका हो. नियमित औषधे घ्या..डॉक्टरकडे ट्रीटमेंट सुरु ठेवा. इथे चांगले सल्ले मिळतच आहेत. निगेटिव्ह विचार केलात तर आणखी डिप्रेस व्हाल. सगळे नीट होइल तुमचे. शुभेच्छा.

निरज क्लिनीक की निरजा क्लिनीक ह्र्षीकेश येथील एका आयुर्वेदीक डॉक्टर यांनी एक औषध शोधले होते. माझे एक काही काळापुर्वीचे सहकारी श्री सरस्वते यांच्या पत्नी या उपचाराने पुर्ण बर्‍या झाल्या. अ‍ॅलोपॅथी औषध आणि भिती मुक्त होऊन त्या आनंदाने जगु लागल्या असे श्री सरस्वते ( रिटायड सेफटी ऑफीसर बजाज अ‍ॅटो ) स्वतः सर्वांना सांगायचे.

नंतर समजले की ह्या डॉक्टर साहेबांनी हे औषध विकसीत करताना अफु वापरुन केले. ज्यामूळे एफ डी ए नी त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांचे क्लिनीक बंद केले.

मी कायम आयुर्वेदीक औषधे घेतो म्हणुन माझ्या डॉक्टर् साहेबांना विचारले असताना ते म्हणाले अफु हे मेंदुतील विकृतीवर औषध आहे पण प्रचलीत कायद्याचा अन्वये ते वापरायला अनेक अडचणी असल्यामुळे सहसा ते कोणी वापरत नाही.

<<आता तर मला कळून चुकल आहे कि माझी फिट कधी बंद होणार नाही जितके दिवस आहे तितके दिवस जगायचं

ज्या मुलांना लहान वयात फीट आली तर व्तरित डॉक्टर चा सल्ला घ्या त्या वेळी ते बरे होऊ शकते नाही तर माझ्या सारख आहेच >>
------ निराशावाद डोकावतो आहे, त्यातुन प्रथम बाहेर या... नोकरी आणि जबाबदार्‍या सम्भाळुन आजाराशी तुम्ही सामना करत आहात याची जाण आहे आणि ते कौतुकास्पद आहे. मनापासुन शुभेच्छा.

वर वैद्यकीय क्षेत्रातल्या (साती, दिमा) तज्ञ व्यक्तीन्नी सल्ले दिले आहेत त्याचा उपयोग होतो का ते तपासा.

ठाण्यात डॉ. विनायक जोशी चांगले आहेत. >>>> +१००

के.ई.एम, परेल येथे नक्की न्यूरोलॉजी OPD मध्ये जाऊन या. ह्या मोठ्या जनरल हॉस्पिटल्सच्या डॉक्टरांना अनुभव जबरदस्त असतो. आजुबाजुच्या वातावरणाकडे दुर्लक्ष करा. अनेक प्रकृतीने गांजलेले जीव तिथे छान बरे होवून जात असतात हेच डोक्यात असूद्या.

मया, धीर सोडू नका. मेडिकल सायन्स खूप पुढे गेलं आहे आणि जात आहे. हौसला, दवा आणि दुवा एकत्रितपणे तुमचं आयुष्य नक्की सुखावह करुन देईल.

All the best!

अगो, यशोदाने जो लेख लिहिला होता त्यातच तो फरक पण स्प्ष्ट केला होता की कोणत्या फीटस बर्‍या होऊ शकतात आणि कोणत्या नाही ते.

आणि ज्यांना ऑपरेशनचा उपयोग होणार होता अशा काहींची ऑपरेशन्स पण तिच्या संस्थेद्वारा केली गेली आहेत.

अर्थात मी काही डॉक्टर नाही, पण लेखातले जे आत्ता आठवत आहे त्यावरुन हे लिहिले.

यशोदाने जो लेख लिहिला होता त्यातच तो फरक पण स्प्ष्ट केला होता की कोणत्या फीटस बर्‍या होऊ शकतात आणि कोणत्या नाही ते. >>> ओह ओके. हा भाग काहीच आठवत नाहीये समहाऊ. धन्यवाद शब्दाली.

मया,
निराशावादी विचारांना थारा देवू नका. मला माहित आहे की हे बोलणे सोपे आहे पण तरीही कळकळीचा सल्ला. न्युरॉलॉजिस्टच्या सल्ल्यानुसार औषधे घ्या. साती, दिमा यांनी सल्ला दिला आहेच. बरेचदा तुमच्या साठी योग्य असे औषधांचे कॉम्बिनेशन शोधणे यात वेळ जातो कारण प्रत्येक पेशंट वेगळा. तसेच ही कंडीशन आहे हे मान्य करणे महत्वाचे, त्यामुळे मॅनेज करणे एवढेच हातात असते. अगदी पूर्ण बरे असे म्हटले तरी ते रेमिशन असते. तुम्हाला शुभेच्छा!

तुम्ही सर्वांनी जी उपयुक्त माहिती सांगितली आणि जो धीर दिलात त्या बद्दल आभारी आहे सगळ्यांचा…मायबोली चा हा एक महत्वाचा फायदा कि इथ्ये कुठल्याही विषयावर विस्तृत माहिती मिलते. मी हा लेख इथ्ये टाकला कि असे कोणी सांगेल कि इथ्ये गेलात तर तुमची फिट कायम स्वरूपी बंद होईल पण नहि.

मनापासून आभारी …

माझ्या मुलाला २.५ वर्षापासुन फिट येतात. पहिल्या फिट नन्तर ३-महिने, ६-महिने, आणि आता १९ तारखेला १.५ वर्षाने आलि आहे....तो आता साडेपाच वर्षा चा आहे....घरात कोनलहि हा त्रास नाहि.... VALPORIN च्।आआलू आहे......त्याच्या वाढिवर कहि परिनाम होणार नाहि ना.....क्रुपया माहिति द्यावि

वेल, सातीतै, चांगली माहिती.
फिट का येतात? मला लहानपणापासुनच या आजाराबद्दल कुतुहलजनक भिती आहे. अगदी बालवयापासुन फिट्सचे रुग्ण आजुबाजुला पाहिलेत. कुणी म्हणते की हा आजार अनुवंशिकही असतो.
पण नेमका का व कशाने होतो? कुणी माहिती देऊ शकेल काय?

मया अजिबात निराश होऊ नका. फिट्स योग्य औषधोपचाराने नक्की कंट्रोल होतात. माझ्या मुलाला हा त्रास लहानपणापासून आहे पण त्याची केस वेगळी आहे आणि त्याला स्वतःला काही समजत नाही. खूप वर्ष त्याला फिट्स यायच्या. हिंदुजामध्ये डॉक्टर उदानी ह्यांनी त्याच्या औषधांचे योग्य मार्गदर्शन केले, त्याला दोन औषधांचं combination द्यायला लागतं वाल्पारीन आणि टेग्रीटोल. आता अति जागरण किंवा जास्त आजारी असेल तरच फिट्स येतात. औषधे मात्र नीट वेळच्यावेळी द्यायला हवीतच.

वजनाप्रमाणे औषध डोस adjust करायला लागतात जर फिट्स परत आल्या तर. आता डोंबिवलीत आहेत एक न्यूरोसर्जन आणि न्युरोलोंजीस्ट काही हॉस्पिटलमध्ये काही ठरलेल्या वारी येतात. पण जी मूळ औषधे चालू आहेत तीच आहेत. आम्हाला वारंवार सिटी स्कॅन, EEG टेस्टस करायला लागल्या नाहीत मात्र.

अर्थात माझ्या मुलाचा आजार वेगळा आहे आणि त्याला कायम औषधोपचार हे गरजेचे आहेत. पण काही आजारात काही वर्ष औषधे घ्यायला लागतात.

तुम्ही यशोदा यांचा लेख जरूर वाचा. मुळात टेन्शन न घेता जास्तीतजास्त आनंदी राहायचा प्रयत्न करा. काळजी घ्या पण टेन्शन नको.

मुळात फिट्स येणे हे लक्षण आहे ना? त्याचे रुट कॉज असंख्य असू शकतात. अन उपचाराच स्वरूपही त्यानुसार विभिन्न.

मया , सपोर्ट ग्रुपचा नक्की फायदा होइल तुम्हाला . उपचार म्हणून नव्हे तर , आजारासह आनंदानी जगण्यासाठी. बर्‍याचदा हा भाग औषधोपचारात कव्हरच होत नाही.

मुळात फिट्स येणे हे लक्षण आहे ना? त्याचे रुट कॉज असंख्य असू शकतात. अन उपचाराच स्वरूपही त्यानुसार विभिन्न>>

इन्ना, हो!

गेलो ज्या ज्या डॉक्टर कडेएक गोष्ट दिसून आली प्रत्येक जण MRI आणि EEG पुन्हा करायला सांगतात ते पैसे जाणारं

आता तर मला कळून चुकल आहे कि माझी फिट कधी बंद होणार नाही जितके दिवस आहे तितके दिवस जगायचं >>>>>
मया,
सर्वप्रथम एक जाणून घ्या की एपिलेप्सी हा आजार कंट्रोलमधेच रहातो.पूर्णपणे बरा होत नाही.क्वचित एखादी केस अशी असते की तिला नंतर कधीही अपस्माराचा त्रास होत नाही.नियमित औषधे, डॉक्टरांचा दर सहा महिन्यांनी फॉलोअप,रात्री लवकर झोपणे(कोअर स्लिप हवी) हे पाळा.टि.व्ही,कम्प्युटर सतत पहाणे टाळा.तुमच्या फॅमिलीडॉक्टरद्वारा न्युरोफिजिशियनकडे गेला असता तर अधिक बरं झाले असते. नेटवर सर्च करून वारंवार डॉक्टर बदलू नका.कुठल्याही गोळीचा फायदा होण्यासाठी काही काळ द्यावा लागेलच.वर डॉ.साती ,दिमा यांनी म्हटल्याप्रमाणे के ई एम मध्ये अत्यंत कमी पैशांत सिरम अँटीएपिलेप्टीक लेवल चेक करा.
वर बरेच जणांनी चांगले सल्ले दिले आहेतच.गोळ्या जेव्हा डॉक्टर सांगतील त्यावेळी बंद करा.स्वतःच्या मनाने किंवा कोणी तसं करायचा सल्ला दिला तरी बंद करू नका.
जरी हा त्रास तुम्हाला होत असला तरी एक लक्षात ठेवा की काही मिनिटांसाठी होणार्‍या त्रासासाठी निराश होउ नका.तुम्हांला त्रास होतो आहे,पण त्यातून मार्ग हा काढलाचपाहिजे ना? बरेच जणांना हा त्रास असतो.आपल्याकडे दडवण्याची प्रवृत्ती आहे.जसे इतर आजार तसाच हा पण एक आजार आहे हे लक्षात ठेवा.क्रिकेटर टोनी ग्रेग एपिलेप्टिक होता.

यशोदा अवचट यांनी जो लेख लिहिला आहे,त्यात त्यांना महिन्यात २०-२५ वेळा हा त्रास व्हायचा(आठवत नीट असेल तर).डॉ.अनिल अवचट, लेकीला येणार्‍या फीटऐवजी 'त्रास' असा शब्द्प्रयोग करत.यशोदा अवचट यांची वाडा सर्जरी झाली होती.हे सारे डॉक्टरच तुम्हांला समजवून सांगतील.
तुम्हाला मनापासून शुभेच्छा!