epoxy बद्दल माहिती हवी आहे

Submitted by अंतरा on 11 January, 2016 - 10:06

मी नुकतीच कॉफी पेण्टींग्स केली आहेत.पण इपॉक्सी कोटींग (2 part epoxy,resin-hardener, 2:1 ratio)नंतर थोडा प्रोब्लेम झाला आहे.surface smooth आहे.पण प्रकाश पडला की सर्फेस खाली खड्डे आहेत असे वाटते. ज्यान्च्या कडून विकत घेतले त्यांनी सांगितले तीच पद्धत वापरली तरी दुस र्‍या कोट नंतर तोच प्रॉब्लेम दिसतो . मी पेंटीग्स साठी ८ एमेम एमडीएफ बोर्ड वापरले आहेत. कोणाला काही माहिती असेल तर त्वरीत सांगा .

acf.jpgbcf.jpgccf.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रकाश पडला की सर्फेस खाली खड्डे आहेत असे वाटते. >>>> हे air bubbles असू शकतात. पहिला कोट (primer) नंतर थोडा वेळ द्या. पुर्ण ड्राय झाल्यावर दुसरा कोट मारा.

(industrial painting च्या आधारे मत दिले आहे)

प्रतिसादा बद्दल धन्यवाद.
मी बोर्ड वर आधी प्रायमर लावले.ते वाळल्या नंतर डिझाइन काढले मग कॉफी पेंटींग केले. ते वाळल्या नन्तर इपॉक्सी चा पहिला कोट दिला तो वाळल्या नन्तर प्रोब्लेम दिसत होता म्हणुन दुसरा कोट दिला पण...
मी वापरलेली पध्दत (मला विक्रेत्याने सांगितलेली) बरोबर आहे का ते सांगा.
hardener,resin mix केले २:१ ratio मध्ये.
ते मिक्स १० मि. साठी हलवले.
हलवलेले मिक्स १० मि. तसेच ठेवले मग फ्रेम वर लावले.

हवेचे बुडबुडे तयार होण्याचि अनेक कारणे आहेत. पैकी एक, तुम्ही हार्डनर्/कोबाल्ट वगैरे घालुन रेझिन ढवळता तेव्हाच त्यात बुडबुडे तयार होऊ शकतात, वा ब्रशने जाड थर लावत असताना तयार होतात.

खूप पूर्वी (इसवीसन १९८०-८५) दरम्यान आम्ही इपॉक्सि रेझिन वापरताना, थोडा डायल्युटरही वापरायचो, अर्थात "अंदाजपंचे" पण त्यामुळे दिलेला थर वाळायला/पक्का व्हायला वेळ लागणार असेल तरी हवेचे बुडबुड्याची शक्यता कमी व्हायची.

दुसरे कारण, एकतर ब्रशने थर अतिशय घासुन, अतिशय पातळ द्यायला हवा, किंवा चक्क पोअर /ओतुन १ ते २ मिमीचा थर द्यायला हवा. अधल्यामधल्या जाडीच्या थरावेळेस तेव्हा नजरेस बुडबुडे दिसत नाहीत, पण नंतर दिसु शकतात. यू सी, लाकडावर "फ्रेंच पॉलिश" चे कापडाच्या बोळ्याने जसे थरावर थर दिले जातात, अगदी तितके तसे नसले तरी हवेच्या संभावित बुडबुड्याच्या जाडीपेक्षा कमी जाडीचे थर देत गेलो तर अडचण रहात नाही, मात्र हे करताना एक तर चिकाटी, व तो चिकट पृष्ठभाग धूळ/कचरा/किडामुंगी इत्यादी पासुन सुरक्षित ठेवणे महा अवघड असते.
पोअर करणे/ओतुन थर देणे करायचे असल्यास मात्र धारेच्या जाडीवर ताबा मिळवुन कमीत कमी जाडिची धार टाकु शकल्यास हवेचे बुडबुडे मुळात धारेमधेच फुटुन जाऊ शकतात, वा मिश्रण हार्ड व्हायची वाट बघण्याकरता दहा मिनिटे न वापरता, मिश्रण लगेचच दोन तिन मिंटांनंतरच लावले तरी फरक पडु शकेल असे वाटते. अर्थात, याचे प्रयोग दोन चार इंचाच्या कागदावर करुन बघितले पाहिजे. (तेव्हा आम्ही तरी हार्डनर वगैरे घातल्यावर लगेचच थर द्यायचो.)

तिसरी शक्यता अशी असते की तुम्ही वापरलेले रंग, कागद, त्यावरील धूळ वगैरे बाबींचा इपॉक्सीशी संयोग होऊन क्वचित वाफ/वायु तयार होउनही बुडबुडा दिसु शकतो, पण हे फार क्वचितच होताना अनुभवले आहे.

धन्यवाद..
hardener,resin हे मिक्स किती वेळ हलवायचे / एकत्र करायचे?.
मी तयार मिश्रण सरळ फ्रेमवर टाकते आणि हाताने हळुवार पणे पसरते.अर्थात लावताना ग्लोव्ज घालते.पण हे सगळे करताना काय करावे म्हणजे बुड्बुडे येणार नाहीत. हे सांगू शकाल.

>>> मी तयार मिश्रण सरळ फ्रेमवर टाकते <<<
ओके, तुम्ही कशाप्रकारे टाकता ते कळले नाही. पण, भांड्यातुन मिश्रण फ्रेमवर टाकताना, एकतर आधीच धार बारीक येईल असे बघावे - भस्सकन ओतु नये, व धार धरताना भांडे जास्तित जास्त उंच धरल्यास भांड्याच्या कडेपाशी रुंद मोठी असलेली रेझिनची धार उंचीवरुन पडताना बारीक तारेसारखी होत जाते (एकतारी पाक? Proud ). शक्यतो कमित कमि जागांवर पण शेजारी शेजारि अंतर सोडून धारेने ढीग घालात जावे व ते नंतर पसरवुन एकमेकात मिसळून सलग लेयर करावा. स्वतःचा अंगभुत प्रवाही पणा असेस्तोवर सहसा लेयर सपाट व गुळगुळीत होतो.
पसरविण्यास प्लॅस्टिकच्या पातळ पट्टीचा लांबोडका तुकडा वापरावा तो टोकाला एका रेषेत सरळ कापलेला असेल.
हात, ब्रश किंवा रुंद सरफेसने पसरविल्यास जास्त बुडबुडे येऊ शकतात असा अनुभव आहे. ब्रशने तेव्हाच लावावे/पसरवावे जेव्हा लेयर अगदी घासुन द्यायचा आहे व असे बरेच चार/पाच लेयर तरी देणार असू.

अरे वा, खुप छान प्रश्न अनि खुप छान माहिती. मलाही हे वापरुन पाहयचे आहे. प्लीज मला कोणते इपॉक्सी वापरायचे त्यासोबत अजुन काय लागते, ते कुठे मिळेल ह्याबद्दल सान्गाल का? मला जे बनवायचे आहे ते काचेच्या ट्रान्सपरण्ट पेपर्वेट सारखे दिसेल अशी अपेक्शा आहे. म्हणजे अगदी एक इन्च उन्च नाही पण अर्धा सेमी इन्च तरी, माझ्या कलाकृतीत मुळातच एअर बबल्स असतील. तेव्हा अर्धा सेमी इपॉक्सीच्या थरात एअर बबल्स चालतील. पण ते सुकायला काय करावे लागेल. अर्धा सेमी एपॉक्सी सुकेल का?

सगळे प्रयत्न करून बघते आहे पण..
dcf.jpg

इपॉक्सी मिक्स करण्याचे आणि फ्रेम वर लावण्या साठी व्हिडिओ आहेत का ? मी localy maufactured / available इपॉक्सी वापरते आहे.त्या bottles वर काही माहितीचे लेबल पण नाही दिसत.

>>>> अर्धा सेमी एपॉक्सी सुकेल का? <<<<
वेल, इपॉक्सी घट्ट/कडक होते ते त्यात मिसळलेल्या हार्डनर व कोबाल्ट बरोबर होत असलेल्या रासायनिक प्रक्रियांमुळे.
सबब, तुम्ही योग्य प्रमाणात हार्डनर मिसळले, तर एक काय, दहा सेंमी. जाडीचा थरही कडक्/घट्ट होईल व २४ तासात पूर्ण सुकेल. (इन फॅक्ट, सुकेल हा शब्द वापरणेच मला जरा अवघड जातय कारण इथे पाण्यासारखे बाष्पीभवन अपेक्षितच नसते, पण संपुर्ण घट्ट होण्याची (सुकण्याची?) केमिकल प्रोसेस पूर्ण व्हायला २४ तास घालवावेत असे समिकरण तेव्हा वापरायचो, हार्डनर किति प्रमाणात घालता यावर मिश्रण केल्यापासुन किती वेळात ते घट्ट्/कडक होईल हे ठरते. अति प्रमाणात हार्डनर घातले गेले तर मिश्रण करताकरताच घट्ट होऊन जाईल.)

लिंबुकाका थॅन्क्यु. अर्ध्या सेमीचा थर ट्रान्स्परण्ट दिसेल की नाही,

इपॉक्सी आणि हार्डनर कुठे मिळेल साधारण काय किंंमत असते त्याची?

thick epoxy resin आणि thin epoxy resin मध्ये काही फरक आहे का? ( mdf board वर लावण्याच्या संदर्भात )

तुम्हा ला या माहितीचा कितपत उपयोग होईल माहिती नाही, तरी

ईंडस्ट्रियल कोटींग मधे जे इपॉक्सी वापरतात त्यात थिक (हाय सॉलिडस), थिन (लो सॉलिड्स) असतात.

सॉलिड्स म्हणजे जे evaporation होण्यासारखे घटक evaporate झाल्यावर शिल्लक राहणारे घटक.

Mdf board वर बहुतेक थिन ईपॉक्सी चा एक थर देउन वर थिक ईपॉक्सी मारणे सोयीस्कर.

माझे एक जेष्ठ मित्र व उपक्रम मिपावरील लेखक शरद हर्डीकर याबाबत अधिक माहिती नक्की देऊ शकतील.त्यांचा यासंबंधी व्यवसाय आहे. पुण्यात सेनापती बापट रोडला रहातात.