सादडे (उर्फ साधले) घाट किती अवघड आहे?

Submitted by प्र on 31 December, 2015 - 05:06

सादडे घाट (उर्फ साधले घाट) सामान्य माणसांसाठी किती अवघड आहे?
कोकणातील बेलपाडा (उर्फ वल्हीवरे) पासून सुरुवात करून वर पाचनई
किंवा पेठेची वाडी इथे पोचण्यास किती वेळ लागतो? दोर किंवा इतर काही
उपकरणे लागतातच का? वाटेत पाणी मिळेल का (जानेवारी महिन्यात)?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद फोतोग्राफेर२४३.
ती कथा मी आधीच वाचली होती.
पण त्यातून माझ्या ३ प्रश्नांची उत्तरं कळत नाहीत - निदान खात्रीशीर कळत नाहीत:
१. सादडे घाट किती अवघड आहे?
२. दोर किंवा इतर उपकरणं लागतात का?
३. नेमका किती वेळ लागतो - बेलपाडा ते पाचनई किंवा पेठेच्या वाडीपर्यंत?
फक्त वाटेत पाणी मिळेल अशी आशा वाटते - पण खात्री नाही, कारण ते नेमके
केव्हा गेले होते माहिती नाही. जानेवारीमध्ये पाणी असतं का? शिवाय यंदा पाऊस
कमी झाला आहे म्हणून आणखी शंका आहे.

त्यांच्या कथेत वेळेचा उल्लेख सापडला नाही.
असता तरी तो उतरण्याचा वेळ असता, चढायला किती
वेळ लागतो तो नाही.

सादडे घाट आणि साधले घाट हे दोन्ही मी मराठी आणि इंग्रजीमध्ये गुगलून झाले आहे.
त्यात ज्याची उत्तरं मिळाली नाहीत तेच माझे प्रश्न आहेत.

आत्ताच एका मित्राकडून कळले की:
१. सादडे घाट फार काही अवघड नाहीये.
२. बेलपाड्यापासून हरीश्चंद्रगडावर पोचायला सुमारे ८ तास पुरे.
म्हणजे पाचनईला किंवा पेठेच्या वाडीत पोचायला ६ तास?
३. जानेवारी मध्ये पाणी तर बहुतेक मिळेलच.
४. दोर वगैरे आवश्यक नाही!
म्हणजे सगळे प्रश्न सुटले Happy