मुलीचे( ६ वर्षे) कान टोचायचे आहेत कुठली पद्धत वापरावी पारंपारिक कि गन ?

Submitted by सुप्रिया. on 12 November, 2015 - 04:50

मुलीचे( ६ वर्षे) कान टोचायचे आहेत कुठली पद्धत वापरावी पारंपारिक कि गन ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी माझं नाक गनने टोचले होते, एका डॉक्टरकडुन. त्यावेळी माझं वय २६ होतं. काही त्रास झाला नाही. डॉक्टरने बजावलं होतं की काहीही त्रास झाला तर त्यांना भेटायचं, स्वतः उपचार करायचे नाहित.

मुलीचे कान मात्र मी पारंपारीक पद्धतीने टोचले एका महिन्याच्या आत. तिलाही काहीही त्रास झाला नाही.

पारंपारीक पद्धतीने होणारे छिद्र लहान असते तर गनने केलेले जरा मोठे असते, आतल्या फिरकीचे अलंकार ६ महिन्यात वापरु शकता.

Happy यूट्यूबवर इयर पियर्सिंग इन्डिया सर्च टर्म दिली तर दोन्ही पद्धती दिसतील. व्हिडियो दाखवून लेकीलाच विचार कुठे चप बसून टोचून घेणार ? Happy थोडी मोठी मुले आधीच उगाच सोनाराकडे भोंगा पसरतात. Happy

बाकी घरात कुणाचेच कान्/नाक गनने टोचलेले नाही. कुणाला सोनाराने टोचल्याने त्रासही झाला नाही. दोनचार आठवडे सोनार तांब्याची तार घालायला लावतात तोच काय तो त्रास. लगेच आवडते डूल घालू देत नाही म्हणून वैताग. Happy

सगळ्या प्रतीसादाकांचे धन्यवाद! मी शेवटी सोनाराकडून टोचून घेतले मुलीचे कान. इथे अन इतरही ठिकाणी मी चौकशी केली तेव्हा अनुभवाचे बोल म्हणाले कि गन मुळे कानाचे छिद्र मोठे होते जे कालांतराने अजून मोठे होत जाते. म्हणून मग सोनाराकडेच टोचले. आधी दंगा केला मुलीने पण एक कान टोचल्यावर तिला जाणवले कि फार काही त्रास झालेला नाही. मग हळूहळू रडायचे बंद करून टाकले. Happy
अन तिला कानात सोन्याची तार न घालता फासा असलेल्या सोन्याच्या रिंग्स घालायला मिळाल्या. सोनाराने त्या कानातल्याची तार टोकदार केली अन त्यानेच कान टोचले. म्हणून तर नंतर आरशात किती कित्ती बघू असे झाले होते आम्हाला Happy