गणपती बसवण्याबद्दल

Submitted by अंजली_१२ on 11 September, 2015 - 17:57

या वर्षी घरी पहिल्यांदाच गणपती बसवण्याचे खूप मनात आले आहे. तसे पुण्यातल्या घरी सासू सासरे करतात पण इकडे न्यू जर्सीतही सुरू करावे असे मनात आलेय. तर साबा साबुंच्या म्हणण्याप्रमाणे पंचधातूची किंवा सिल्व्हर कोटेड मूर्ती बसवली तर चालेल की जी विसर्जन करायची नाही. ५ दिवसानंतर (विसर्जनानंतर) खोक्यात वगैरे घालून ठेवू शकतो.
तर प्रश्न असे आहेत की

अशा प्रकारे कोणी मूर्तीची स्थापना केली आहे का?
एकदा बसवला की मग खंड पडता कामा नये असं आहे का ?
इथे दोघंच असल्यामुळे मासिक धर्माच्या वेळी वगैरे काय करायचे?(नंतरच्या वर्षी कधी असे झाले तर)
मातीची जर मी मूर्ती आणली तर आमची दोन घरं वेगळी झाली असं अस्तं का? (मी हा प्रश्न विचारला पण काही समाधानकारक उत्तर मिळाले नाही घरून)
विसर्जन म्हणजे फक्त मूर्ती हलवायची असेच असते का?
थोडीफार सजावट केली तर चालेल का?

मंडळ आभारी आहे Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनात काहीही किंतु न आणता गणपती बसव.
बाकी शास्त्र माहीत नसल्याने तुझ्या प्रश्नांची उत्तर देऊ शकत नाही. मा पाळी सुरु असली तरी ते नैसर्गिक असल्याने बाप्पाला चालते (अस मी मानते).

अशा प्रकारे कोणी मूर्तीची स्थापना केली आहे का?...बरेच लोक करतात, प्र्तिकात्मक सुपारिचे विसर्जन करतात.
एकदा बसवला की मग खंड पडता कामा नये असं आहे का ?... अस काही नाही,
इथे दोघंच असल्यामुळे मासिक धर्माच्या वेळी वगैरे काय करायचे?(नंतरच्या वर्षी कधी असे झाले तर)...
याचे उत्तर अजुन जगाला मिळायचे आहे... युगे युगे कलियुगे गेल्यावर ते स्त्रिला मिळेल.
मातीची जर मी मूर्ती आणली तर आमची दोन घरं वेगळी झाली असं अस्तं का? (मी हा प्रश्न विचारला पण काही समाधानकारक उत्तर मिळाले नाही घरून)...तुम्ही चुकिचा प्र्शन विचारालाय
विसर्जन म्हणजे फक्त मूर्ती हलवायची असेच असते का?..नाही
थोडीफार सजावट केली तर चालेल का?...करा की आवडेल ती करा. मोदक, प्र्साद आरती सगळ करा.

थँक्स वत्सला प्राजक्ता
येस आता एक्दम मनापासून करणार आहे मी सगळं Happy
तुम्ही चुकिचा प्र्शन विचारालाय>>>> अगं तसं नाही म्हणजे हे दोन घरं कन्सेप्ट साबा साबुंचा होता त्याला मी फक्त असं का विचारत होते.

मला माहितअसल्याप्रमाणे शास्त्र आणि सवडीशास्त्र असे दोन प्रकार आहेत

मूळ शास्त्रात काहीही लिहिले असले तरी सवडीशास्त्रात आपापल्या परिस्थितीनुसार (स्थळ /काळ /वेळ ) थोडाफार बदल करता येतो...

याला आधार म्हणून "अकरणात मन्द्करणः अपि श्रेयात" या श्रुतिवचनाचा आधार दिला जातो.. म्हणजे व्रतवैकल्ये अथवा साधना/उपासना /आराधनेत सगळे नियम पाळता येत नसले तरी जे शक्य होईल तेवढे तरी करावे.

भाद्रपदी गणेशोत्सव हे कामनिक व्रत आहे. यास्तव शक्यतो एकदा घेतल्यानन्तर ते नेहमी(प्रतिवर्प्रतिवर्षी)परंतु तसे शक्य नसल्यास पहिल्या वर्षीच तसे देवाला सांगावे , की या वर्‍षी व्रत केलेले आहे , परंतु दर वर्षी शक्य होईलच असे नाही.. तरी सांभाळून घ्या , अशी प्रार्थन पूजेनन्तर करावी करावी.

अशा प्रकारे कोणी मूर्तीची स्थापना केली आहे का? चालेल , विसर्जन सुपारीवर करावे
एकदा बसवला की मग खंड पडता कामा नये असं आहे का ? उत्तर वर दिलेले आहे
इथे दोघंच असल्यामुळे मासिक धर्माच्या वेळी वगैरे काय करायचे?(नंतरच्या वर्षी कधी असे झाले तर) शक्यतो मासिक काळात त्या स्त्रीने पूजा / नैवेद्य यापासून लाम्ब रहावे... घरात गोमुत्र वापरावे
मातीची जर मी मूर्ती आणली तर आमची दोन घरं वेगळी झाली असं अस्तं का? (मी हा प्रश्न विचारला पण काही समाधानकारक उत्तर मिळाले नाही घरून) तसे काही नाही
विसर्जन म्हणजे फक्त मूर्ती हलवायची असेच असते का? नाही. विसर्जनम्हणह्जे मूरिमधिल देवत्व काढून घेण्याची प्रक्रिया
थोडीफार सजावट केली ................ का नाही ? थोडीफार का? भरपूर करा की

अंजली, गणपतीसमोर सुपारी ठेव आणि तिच्यात प्राणप्रतिष्ठा कर - तिचंच विसर्जन कर. हाकानाका.

मासिक पाळीच्या काळात पूजा वगैरे करायची नाही हा मूर्खपणा आहे, कुणी काही म्हणलं तरी लक्ष देऊ नकोस. तुझी भावना आणि श्रद्धा महत्वाची.

अंजली_१२,

भाव तिथं देव. म्हणून गणपतीच्या काळात (गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी) नामस्मरण करण्यास सर्वाधिक महत्त्व आहे. गणपती घरी आणला वा न आणला तरी नामस्मरण जास्तीत जास्त करा. Happy

कृपया हा लेख पहा : http://www.sanatan.org/mr/a/494.html

पुढे चारपाच इतर लेखांचे दुवे मिळतील. तेही वाचावेत म्हणून सुचवेन. यानंतर तुमच्या मनात जर प्रश्न उरलेतर ते प्रश्न तुम्ही संपत्र (email) पाठवून विचारू शकता : sanatan@sanatan.org

आ.न.,
-गा.पै.

namaste anjali ji

mala watate uddan khattola ji yanni atishay yogy w samarpak uttar dilerle ahe

dhanyav