युएस ओपन - २०१५

Submitted by Adm on 30 August, 2015 - 20:34

वर्षातली शेवटची ग्रँड स्लॅम स्पर्धा युएस ओपन उद्यापासून पासून सुरु होते आहे.
त्याबद्दल चर्चा करण्यासाठी हा धागा.

स्पर्धेची वेबसाईट :
http://www.usopen.org/index.htm

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Maria ne aatach dukhapatimule maghar ghetli aahe.

I want Serena to complete the grandslam for this uear..Go Serena.

अरे वा काढलास का धागा?

आम्ही परवा किड्स डे ला जाउन आलो. फेडरर, नादाल, जोको, चिलिच आणि सेरेना हे प्लेयर्स होते. जोको भयंकर माकडचाळे करतो ते बघायला मुलांना फार मजा येते. छोटी छोटी मुलं पण खूप कॉन्फिडन्टली खेळतात एवढ्या मोठ्या प्लेयर्सविरुद्ध.

सेरेनाचं ग्रॅंडस्लॅम >>> +१

मी कालच विचार करत होते .. अजून पराग हा धागा घेऊन कसा काय आला नाही ते ..

ह्यावेळी ज्योको आणि नादाल क्वार्टर की सेमी मध्ये भेटतील , दोघेही तिथपर्यंत पोचले तर?

सिंडरेला .. मस्तच .. फोटो टाक खरंच ..

>> जोको भयंकर माकडचाळे करतो ते बघायला मुलांना फार मजा येते

Happy

मी कालच विचार करत होते .. अजून पराग हा धागा घेऊन कसा काय आला नाही ते >> पग्याचे FB post बघून धाग्याची आशा नव्हती.

जोको भयंकर माकडचाळे करतो

म्हणून आम्ही सुरुवातीपासून त्याला सपोर्ट करत नाही Wink आवंदा फेडररने कमाल केली तर धावेल आम्हाला.

सिंडरेला फोटोज टाक.

सर्वात टफ होईल अशी फर्स्ट राउंड पाहिली की नाही? किरयोस वि. मरे. चार सेट्सची झाली. अपेक्शेएवढी मजा नाही आली पण बेकर मरेच्या गेमचा अभ्यास करण्यासाठी खास आला होता हे आणखी एक वैशिष्ट्य.

स्टॅन द मॅन ला टफ फाइट मिळतेय .. दुसरा सेटही टाय ब्रेक मध्ये आहे ..

>> बेकर मरेच्या गेमचा अभ्यास करण्यासाठी खास आला होता हे आणखी एक वैशिष्ट्य

असं कामेन्टेटर्स म्हणत होते का? म्हणजे एकदम पहिल्या राउंडची मॅच बघून किती अभ्यास होइल ते मला कळत नाहीये म्हणून विचारते आहे? चिलीच आहे ना डिफेण्डिंग चॅम्पियन .. मला काहिच आठवत नाही मागच्या वर्षीच्या टुर्नामेन्ट चं ..

आज भारी मॅचेस आहेत. वुमेन्स सेमिज आजवर ढकलल्यामुळे चार तोडफोड मॅचेस (...अन दो टकियांदी नौकरी ;)) एकाच दिवशी. कुणी लेचेपेचेपणा करणार नाहीत अशी आशा Happy

पेस-हिंगिस आणि मिर्झा-हिंगिस आपापल्या ग्रूपच्या फायनल्समध्ये पोचलेत. काल बीबीसी की गार्डियनमध्ये एका लेखात मिर्झाबाईंच्या सॉल्लिड फोरहँडचं फारच कवतिक वाचलं. आहे खरंच जबरी फोरहँड तिचा.

परवा आमच्या घोड्यानं लै आतषबाजी केली. आज दोस्ताशी मॅच खेळताना बघू काय होतंय.

हरु द्या. तिसरा आहे अजून. तिकिट काढून मॅच बघायला गेलेल्यांचे पैसे वसूल होतील तेवढेच Happy

हिस्टरी मेकींग सेमी फायनल!!!

टू बॅड इ एस् पी एन् वर दाखवतायत हे त्यांनीं सांगितलंच नाही गाइड मध्ये .. :|

ओ माय गॉड.

अगं सशल आता मी बोल्ले नं कुठेतरी की दाखवताहेत म्हणून. माझ्याकडे ३-३ नंतरचं रेकॉर्डींग आहे.

पार दंगाच झाला काल....

पुरुष एकेरीच्या सेमीज अगदीच एकतर्फी झाल्या पण... एकदम बकवास...

फायनल तरी जोरदार होऊ दे आणि फेडेक्स जिंकू दे...

पेस - हिंगीस ही पण स्पर्धा जिंकले... आणि मिर्झा - हिंगीस काय करतात ते बघायचे...

पाहिली का फायनल कोणी.. ठिक ठिक झाली. पण ऑल इटालियन आणि नवी चॅम्पियन त्यामुळे अप्रुप !
पॅनेट्टाने रिटायरमेंट जाहीर केली की जिंकल्यावर !

तिकडे हिंगिस-पेसने तिसरे विजेतेपद मिळवले. उद्या मिर्झाबाई आणि हिंगिस पण जिंकले पाहिजेत.

Pages