रसायन परिक्षा करण्यासाठी नवी मुंबईतील प्रयोगशाळा

Submitted by स्पॉक on 14 August, 2015 - 03:37

नमस्कार. मला नक्की कोणती प्रयोगशाळा हवी आहे हेच ठरवता येत नसल्यामुळे ईथे प्रश्न विचारला आहे आणि त्याचमुळे गुगलबाबांचा काही उपयोग नाही कारण सर्च काय करु तेच माहिती नाही.
थोडक्यात पत्रास कारण की, माझ्या फिश टँकमधील सगळे मासे मेले आहेत. ते त्यांच्यासाठी असलेल्या एका ऑषधामुळे मेलेत असे मला वाटते. कारण शेवटचा मासा ३-४ दिवस एका वेगळ्या पाण्यात होत तिथे मी हे ऑषध टाकले नव्हते. नंतर मुळ फिश टँक व्यवस्थित सेट करुन याला त्यात टाकले आणि ते औषध टाकले आणी दुस-या दिवशी सकाळी हा मासा मेलेला होत.
अगदी आधिच्या सगळ्या माशांप्रमाणे.

तर, मला हे औषध टेस्ट करायचे आहे. याच्यमुळेच मासे मेलेत का यासाठी.
कुठे करावे? गुगलमेधे नक्की कोणत्या प्रकारच्या प्रयोगशाळा सर्च करु? साधारण किती खर्च येईल?
धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users