NO PORN PLEASE ! .. पण काही FAQ ??

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 August, 2015 - 13:01

गेले काही दिवस पॉर्न साईट बंद झाल्यात, की होणारेत, की पुन्हा चालू झाल्यात वगैरे गोंधळ चालू आहे..
त्याच्याशी माझा व्हॉटसप विनोदापुरताच संबंध असला तरी काही प्रश्न मनात पडले आहेत.. त्यांचे शंकानिवारण करायला हा धागा !

१) यात कोणाला राजकीय वा आर्थिक फायदा आहे का? संपुर्ण पॉर्नबंदी झाल्यास त्याविरुद्ध विरोधक आवाज उठवणार का?

२) हा सरकारचा केवळ पब्लिसिटी स्टंट किंवा लोकांचे लक्ष्य ईतर मूलभूत गरजांवरून ऊठवण्याची राजकीय खेळी आहे का?

३) जसे संपुर्ण दारूबंदीनंतर लोकांना आणखी दारू दारू सुटते, तसेच संपुर्ण पॉर्नबंदीनंतर लोक आणखी पॉर्न पॉर्न होऊ लागतील का?

४) संपुर्ण पॉर्नबंदी शक्य आहे का?

५) जर सर्वच पॉर्न साईट बंद केल्या नसतील तर सरकारने नेमका काय परीणाम साधला?

६) जर माबोवरून कोणाची हकालपट्टी झाल्यास तो ड्यूआयडीने परत येतो, तसेच प्रॉक्सी साईट उघडून कोणी त्या बंद झालेल्या पॉर्न साईट बघत असेल तर काय उरला अर्थ या बंदीला?

७) जर आजही १८ वर्षांखालील मुले पॉर्न बघत असतील तर नेमकी बंदी कोणासाठी आहे?

८) मुळात १८ वर्षांखालील मुलांनी पॉर्न बघणे योग्य की अयोग्य? पॉर्न बघायचे योग्य वय काय?

९) अन्न वस्त्र निवारा यातील वस्त्र ही गरज मानवनिर्मित असून ईतर प्राणीमात्रांना लागू होत नाही. तर वस्त्रच्या जागी खरे तर पॉर्न ही गरज योग्य नाही का जी सर्वच प्राणीमात्रांना लागू होते?

१०) पॉर्न बंद होतो तर वेश्याव्यवसाय का नाही?

११) संपुर्ण पॉर्न बंदी करण्यात सरकार यशस्वी झाले तर बॉलीवूडमध्ये आणखी १० सनी लिऑन येतील का?

१२) ‘एआयबी रोस्ट’चे समर्थन करणारे पॉर्नबंदीबद्दल काय मते राखून आहेत?

१३) अमेरीकेत पॉर्नवर बंदी नाही तर या निर्णयामुळे अमेरीकेला जाणार्‍यांचे प्रमाण वाढेल का?

१४) ईंटरनेटच्या व्यवसायावर परीणाम होईल का? ज्या लोकांसाठी इंटरनेटचा मुख्य वापर पॉर्न बघण्यासाठीच असेल ते आपला डेटा प्लान चेंज करतील का?

१५) पॉर्नबंदीमुळे लोकसंख्या वाढेल की आटोक्यात येईल?

१६) पॉर्नबंदीचा सर्वात मोठा फटका कोणाला बसणार आहे? आणि सर्वात जास्त फायदा कोणाला होणार आहे?

जाणकारांनी कृपया प्रकाश Light 1 टाका.

प्रश्न विस्कळीत वा बाळबोध वाटले तर समजा की माझे पॉर्नसंबंधात सामान्यज्ञानही तसेच आहे. Happy

आणि मला कल्पना आहे की ईथे पॉर्न या विषयावर सर्वांनाच सखोल ज्ञान नसणार. असले तरी लोक त्याचे प्रदर्शन मांडणार नाहीत. म्हणून यातील दोनचार प्रश्नांची ऊत्तरे द्या आणि सोबत दोन चार प्रश्न आपले विचारा.

फक्त एक विनंती -
धाग्याला राजकीय रंग दिल्यास हरकत नाही, फक्त धार्मिक रंग देऊ नका.
क्यों की पॉर्न देखनेवालों का, कोई मजहब नही होता Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

समाजाची नीतिमत्ता सुधारायचा आणि चारित्र्य जपायचा महान प्रयत्न आहे हा! (पाहा हं, मी संस्कृतीबिंस्कृती वगैरे काही मध्ये आणलेलं नाही. Wink )

ते आमाला काय विचारता?

---------------------
ह्या प्रश्नांची उत्तरे मिळाल्यावर तुम्ही काय करणार ते पण लिवा की राव.

किंवा काय करावे ह्यावर प्रश्ण परत आम्हालाच विचारू नका.( आम्ही लोणचे घाला सांगू, नाहितर छुंदा) Proud

झंपी काही विशेष नाही, तेवढेच व्हॉटसपग्रूपवर वा उद्या ऑफिसमध्ये लंच टाईम डिस्कशनला जरा शायनिंग मारता येईल .. अन्यथा उगाच काहीतरी पचकायचो आणि `जा जाऊन पोगो बघ' असा सल्ला मिळायचा Happy

चांगला वैचारिक लेख.
.
.
.हुश्श !
बंदी मागे घेतली.
.
.येऊ दे अजून एक लेख-

शुभं करोति कल्याणम्

माझे प्रश्न खरेच जेन्युअन आहेत रे, तसेच घ्या रे.. आपल्या माहितीनुसार उत्तरे द्यायचा प्रयत्न तर करा..

अन्यथा वैयक्तिक ईंटरेस्ट म्हणून मला आणखी एक प्रश्न पडलेला, की कोणत्या राशीचे लोक पॉर्न बघणे जास्त पसंद करतात? पण उगाच त्याच्यामुळे धागा वेगळ्या ट्रेकवर जायला नको म्हणून ईथे विचारला नाही..

>>धागा वेगळ्या ट्रेकवर जायला नको म्हणून ईथे विचारला नाही..> बरोबर. नवीन धाग्याचं पोटेन्शियल असताना कशाला उगाच ह्यातच गर्दी करा. प्रत्येक राशीचा आणि पॉर्नचा संबंध असा वेगळा धागा निघायलाच हवा.

अरे देवा ! आता राशिचक्र वाले उपाध्ये प्रत्येक राशीच्या व्यक्तीला कोणत्या प्रकारचे पोर्न आवडते यावर लोकांना पिळणार !

मला तरि वाटते कि हे एक पॉर्न प्रमोशन चा प्रयत्न असावा सरकारचा.
असे ऐकले आहे कि सरकार उद्योगाभिमुख आहे.

१४) ईंटरनेटच्या व्यवसायावर परीणाम होईल का? ज्या लोकांसाठी इंटरनेटचा मुख्य वापर पॉर्न बघण्यासाठीच असेल ते आपला डेटा प्लान चेंज करतील का? >>

या प्रश्नावर माझे एक निरिक्षण - मागच्या वर्षी गावाकडे गेलो असताना, जवळ जवळ प्रत्येकाकडे स्मार्टफोन (साधे फोन नव्हेत) पाहीले. एवढेच नाही तर इंटरनेट डेटा प्लॅन्स ही पाहीले. न्हावी, हॉटेल, दुकानांमध्ये काम करणारी मंडळी..अगदी झाडून सर्वांकडे स्मार्टफोन्स आणि इंटरनेट प्लॅन. या इंटर्नेटचा उपयोग कशासाठी तर...फक्त आणि फक्त पॉर्न साठी...आणि थोडाफार व्हॉटसअ‍ॅप.... जबर धक्का बसला होता त्यावेळी मला.

बंदी झाली तर माझे पूर्वी निरागस वाटणारे गाव पूर्ववत होईल का या विचाराने सध्या मनात पूर्ण गोंधळ उडाला आहे.

बंदी वगैरे ठिक आहे पण एवढी जाहीरातबाजी करुन बंदी करायची काही गरज नव्हती , सध्या व्हॉट्सअ‍ॅपला अमूक तमूक साईट्वर बंदी नाही असे सांगत माहित नसलेल्या शेकडो पॉर्न साईट समोर आल्या आहेत म्हणजे मोरीला बोळा लावायचा आणि..............

People who say they don't watch porn or never watched porn are lying ...
>>>>

मी शाळेत असताना ज्या वयापर्यंत पॉर्न बघितला नव्हता तेव्हा तो मी बघितला नाही हे मित्रांना सांगायची मला लाज वाटायची आणि मी बघितला आहे असे खोटेच सांगायचो. Happy

किरणकुमार,
जाहीर न करता बंदी घातली असती तर जे पोर्न बबघत नाही त्यांना कळलेच नसते.
जे बघतात ते कोणाकडे बोलणार? आणि कसे,?

पण गाजावाजा न करता काम करेल ते मोदी सरकार कसले?