Submitted by योकु on 10 June, 2015 - 13:03
जेजुरीगडावर ज्येष्ठनागरीकांसाठी जाण्याकरता सोय आहे का? कंडी/दंडी/पालखी टाईप्स? कुठे संपर्क करावा लागेल? आधी बूक करावं लागतं का?
पुण्याहून सकाळी लवकर निघून दर्शन घेण्याचा विचार आहे. ६० किमी जाणं + ६० किमी येणं.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पुणे स्वारगेट वरुन जेजुरी ४७
पुणे स्वारगेट वरुन जेजुरी ४७ किमी आहे, मंदिराच्या पायथ्यशी डोली मिळते, सीझननुसार रेट असतात.
मंदिराच्या मागच्या बाजुने जुन्या जेजुरीतुन कच्च्या रस्त्याने गाडीने जाता येते त्यासाठी आधी ट्र्स्टकडुन परवानगी घ्यावी लागेल त्यानंतर गेट उघडले जाते. रस्ता बर्यापैकी कच्चा आहे आणि थोडा रिस्की आहे.
जेष्ठ नागरीकांसाठी डोलीने जाणे श्रेयस्कर.
धन्यवाद डोली ठीकच राहील.
धन्यवाद
डोली ठीकच राहील. सर्वसाधारणपणे काय रेट्स असतात? संस्थानाकडून ही सोय असते का की खाजगी लोक्स असतात?
डोली बरोबर आहे. दुसरा उपाय
डोली बरोबर आहे. दुसरा उपाय नाही. वरच्या काही पायर्या कठिण आहेत.
"ज्येष्ठ नागरिकांकरता वर
"ज्येष्ठ नागरिकांकरता वर जाण्याची सोय" टायटलात वाचून जरा धस्स झालं.
थोडं एडिटता का जरा?
डोली ट्रस्ट च्या नाही आहेत,
डोली ट्रस्ट च्या नाही आहेत, रेट अंदाजे १२०० असावा, बरेच जेष्ठ नागरीक गड चढु शकत नाहीत पण उतरु शकतात. त्यामुळे वन साइड फेअर वर काम होऊ शकेल. मंदीराच्या पायथ्याशीच नंदी जवळ या डोली उपलब्ध आहेत.
इब्लीस
इब्लीस
अरे ए... शीर्षक बदल की.
अरे ए... शीर्षक बदल की. ज्येनांना 'वर जाण्याची सोय' काय? आणि 'जेजुरीगडावर वर जाण्याची सोय' हेही...
कृपया "वर" हा शब्द काढाल
कृपया "वर" हा शब्द काढाल का?
ज्येष्ठ नागरीकांकरता जेजुरीगडावर सोय
किंवा
ज्येष्ठ नागरीकांकरता जेजुरीगडावर वरपर्यंत जाण्याची सोय
मंदिराच्या मुख्य गेट कडे न
मंदिराच्या मुख्य गेट कडे न वळता त्याच रस्त्यानी थोडे पुढे गेलात की उजवीकडे वळल्यानंतर मागील बाजुनी गडावर जायला एक रस्ता आहे..तिथुन फार थोड्या पायर्या चढाव्या लागतात..५० पण नसतील..त्यामुळे डोली मिळाली नाही आणि जर थोडेसे चढणे शक्य असेल तर ह्या रस्त्याचा विचार करा
तुम्ही कधी जाणार आहात ते
तुम्ही कधी जाणार आहात ते लिहीले नाही तरीसुद्धा आता पर्जन्य ऋतुची सुरूवात होत आहे त्यामुळे डोली हाच पर्याय उत्तम आहे. जेजुरी गडावर चढताना तेथील पायर्या भक्तांनी जागोजागी उधळलेल्या भंडार्यामुळे निसरड्या होतात त्यामुळे उतरताना सुध्दा डोली करावी असा सल्ला मी देईन.
बहुतेक सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे शिर्षक बदला ही विनंती.
http://www.jejuri.in/ इथे
http://www.jejuri.in/ इथे अधिक माहिती मिळेल
ज्येष्ठ नागरिकांकरिता जेजुरी
ज्येष्ठ नागरिकांकरिता जेजुरी गडावर जाण्याची सोय
ज्येष्ठ नागरिकांकरिता जेजुरी
ज्येष्ठ नागरिकांकरिता जेजुरी गडावर जाण्याची सोय>>
हे उत्तम आहे शीर्षक. हे ठेवा.
किंवा वर सुचवल्याप्रमाणे:
ज्येष्ठ नागरिकांकरिता जेजुरी गडावर वरपर्यंत जाण्याची सोय
Aअरे ए वाचून तुफान
Aअरे ए वाचून तुफान हसले.
लोक्स, तो कामावर गेला असेल. जरा दमानं.
काल जरा घाईत टाईपून गेलो
काल जरा घाईत टाईपून गेलो होतो. चूक लक्षात आणून दिल्याबद्द्ल धन्यवाद. दुरुस्ती केली आहे.
सल्ल्यांबद्दल आभारी आहे.
इथे लिहायचं राहिलं. आमची
इथे लिहायचं राहिलं. आमची जेजुरीगडाची ट्रीप मस्त झाली. सकाळी ०६०० लाच घरून निघालो. लवकर निघाल्यामुळे कुठेही गर्दी न लागता ०७३० ला पायथ्याशी पोचलो.
मुख्य दरवाज्यावरच डोली वाले आहेत (खुर्ची अन त्याला चारीबाजूनी लांब दांडे). प्रतिज्येना रु.८००/- असा दर आहे. त्यात ते लोक गडावर नेणे + खाली आणणे एव्हढं करतात. लईत तरबेज असल्यानी अक्षरशः १५/२० मिनिटांत वर जातात.
वरही रु.५०/- दिले की शॉर्ट्कट नी दर्शन मिळतं.
बाईक असेल तर वरपर्यंत गाडीनीच येता येतं. गडामागून रस्ता आहे.
मंदीर खूपच जुनं अन भक्कम आहे.
गड उतरून आलो तेव्हा जेमतेम ०९१५-०९३० झाले होते. येतांना कामतमध्ये ब्रेफा केला अन ११३० ला पुण्यात पोहोचलो.
गड उतरतांना मात्र गर्दी बर्यापैकी चढती होती. अर्थातच वर दर्शनाची रांगही वाढली असणार. लवकर जाऊन दर्शन घेणे हे जास्त योग्य वाटलं.