नमस्कार!
माझ्या घरी कामाला येणाऱ्या बाईंचा मुलगा मराठी माध्यमातून इयत्ता दहावी जेमतेम गुण मिळवून उत्तीर्ण झाला. त्याला पुढच्या शिक्षणात फार रस नाही, परंतु व्यवहारात उपयोगी पडतील अशा गोष्टी त्याला शिकवल्या तर पुढे त्याला उत्पन्नाचे चांगले साधन मिळेल असे त्याच्या आईला वाटते. सध्या त्याची आई एकटीच घर चालवते. घरोघरी धुणीभांड्याची कामे करते. मुलाचा बाप व्यसनाधीन असून बेकार आहे. मुलाला वाईट संगत लागू नये, त्याने रिकामटेकडे न बसता पुढे शिकावे व कमवावे, आपले शिक्षण त्याने स्वकमाईतून करावे असे मुलाच्या आईचे मत आहे. मुलाचे वय १६ पूर्ण असल्याने त्याला थेट नोकरी मिळू शकत नाही. (अठरा वर्षे पूर्ण लागतात.)
तरी सद्यस्थितीत त्याला पुण्यात राहून किंवा पुण्याच्या जवळपास 'कमवा व शिका' शिक्षणाचे (खास करून तांत्रिकी प्रकारच्या) कोणते पर्याय उपलब्ध होऊ शकतात? कोठे?
खासगी कंपनीत शिकाऊ म्हणून भरती करून प्रशिक्षण व नंतर सर्व बाबींची समाधानकारक पूर्तता केल्यावर नोकरी अशी संधी उपलब्ध होऊ शकते का?
यासाठी कोठे चौकशी करावी लागेल?? कोणाकडे मार्गदर्शन (विनामूल्य) मिळू शकेल?
यासंबंधी माहिती असल्यास कृपया ती संस्था / व्यक्तीचे नाव, संपर्क क्रमांक / पत्ता इ. सह द्यावी ही विनंती.
धन्यवाद!
नक्की माहीती नाही पण कदाचीत
नक्की माहीती नाही पण कदाचीत विद्यार्थी सहयक समीती मदत करू शकेल.
पुर्वी F C रोडला त्यांचे ऑफीस होते. अजुनही असेल तर कल्पना नाही.
मला वाटते आपणच
मला वाटते आपणच म्हंटल्याप्रमाणे त्याला आत्ता काम करायला लावणे अयोग्य ठरेल, वयामुळे!
एखाद्या कुटुंबाने त्याला मदत करावी व आय टी आय मध्ये एक दोन चांगले कोर्सेस लावून द्यावेत असे वाटते.
खासगी कंपनीत शिकाऊ म्हणून
खासगी कंपनीत शिकाऊ म्हणून भरती देखिल वयामुळे (१६) अवघड आहे.....
विद्यार्थी सहायक समिती ही फक्त बाहेर गावातून पुण्यात शिकायला आलेल्या मुला-मुलींना रहाण्याची व्यवस्था नाममात्र दरात करतनाहीघरातील करतो तशी वसतीगृहातील कामे त्यांनाच करावी लगतात. त्याच्या जोडीला म्हणून कमवा आणि शिका स्वरुपाची योजना राबवते. पुण्यातच रहाणार्या मुलांकरता अशी योजना त्यांच्याकडे किंवा इतरही कुणाकडे असल्याचे ऐकिवात नाही.
सॉरी
ऑरगनाईज्ड सेक्टर मधे अशी कामे
ऑरगनाईज्ड सेक्टर मधे अशी कामे (नियमानुसार) अशक्य असली तरी त्याला खरोखरच कामे करायची असतील तर पुर्वापार चालत आलेली पेपर टाकणे, दूधाचा रतीब घालणे अशा प्रकारची कामे त्याच्या पुढच्या अभ्यासात अडथळा न येता करू शकतोच (ह्यात नवीन ते काय सांगीतले म्हणा मी ... पण तरी )
घराजवळ असणार्या एखाद्या गराज
घराजवळ असणार्या एखाद्या गराज किंवा हॉटेल मधे चौकशी करता येईल. त्यांना मदतनीस हवेच असतात. लहान वयामूळे मोठ्या कंपनीत कदाचित काम मिळणार नाही.
मी नताशा, बेफ़िकिर, हर्पेन,
मी नताशा, बेफ़िकिर, हर्पेन, दिनेशदा, प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!
मला नेटवर शोधताना य़शस्वी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, चिंचवड यांचा पत्ता मिळाला. त्यांची दहावी पास / बारावी नापास मुलांसाठी 'कमवा व शिका' अशी योजना दिसत आहे. मेकॅनिकल इंजिनियरिंगचा डिप्लोमा देतात. मकरंद अनासपुरे ब्रँड अँबॅसेडर दिसत आहे. याबद्दल कोणाला अधिक माहिती आहे का? वयोमर्यादेचा उल्लेख वाचनात आला नाही.
http://www.yashaswigroup.in/
https://m.youtube.com/watch?v=BfbYBqqcDj0
http://www.tacogroup.com/newsmedia/releases/201011august/20101108_automo...
सदर योजनेचा आमच्या कामवाल्या बाईंच्या मुलाला कितपत उपयोग होईल हे माहीत नाही. मुख्य अडचण ही की त्या मुलाला आपला कल / आवड अद्याप उमगलेली नाही व स्वत: होऊन त्यासाठी हात-पाय मारायची इच्छा नाही. आईच सगळीकडे धावाधाव करत आहे.
वरती बेफ़िकिर यांनी म्हटल्यानुसार आयटीआयचा पर्याय त्यांना मी अगोदरच सुचवला आहे. तसेच त्यांच्या मुलाला शैक्षणिक खर्चासाठी मदत करतील अशा संस्थाही त्यांना सांगितल्या आहेत. मुलाला कामाची शिस्त लागावी, श्रमसंस्कार व्हावेत, त्याचे शिक्षण व्हावे व त्याने किमान स्वत:चा अर्थभार तरी उचलावा यासाठी त्याच्या आईची धडपड चालू आहे.
अकु शैक्षणिक खर्चासाठी मदत
अकु
शैक्षणिक खर्चासाठी मदत करतील अशा संस्थांबद्दल कुठे माहिती मिळेल? आमच्याही कामवालीचा मुलगा १०वी झालाय. त्यांचीही आर्थिक परिस्थिती बरी नाहीये. त्यांना मला सांगता येईल.
चाइल्ड लेबर च्या प्रोव्हिजन्स
चाइल्ड लेबर च्या प्रोव्हिजन्स बघून मगच पुढे जा. बर्याच आस्थापनात अलाउड नसते मायनरांना कामला लावणे.
त्याला स्कूटर/ कार मेकेनिक, डीटीपी चा कोर्स, फोटो शॉप ऑपरेटरचा कोरस वगैरे शिकवून द्या तीन/ सहा महिन्याचे कोर्सेस असतात. किंवा टॅली वगैरे. तसेच मार्केट रिसर्च, इवेंट मॅनेजमेंट मध्ये वीकांताला इव्हेंटच्या तिथे बसणे, माहीती गोळा करणे अशी कामे ते लोक देतात. तरुणांचे प्रॉडक्ट असले तर तरुणांन घेतात. ही नोकरी नाही पर असाइन मेंट पैसे मिळतात.
मॅक डोनाल्ड मध्ये चौकशी करा पण तिथेही वयाची अट असेलच नक्की. कुक किंवा डिलिव्हरी बॉय म्हणून करताअ येइल. कुरीअर कंपनीत चौकशी करा. पाळंदे वगैरे सध्या डिलिवरी बॉइजना खूप डिमांड आहे. ऑनलाइन शॉपिन्ग मुळे. पण मग त्याला वाहन घेउन द्यायला लागेल.
आवड असेल तर उच्चभ्रू वस्तीत कुत्रा चालकाची नेहमी डिमांड असते. ते काम दोन तासाचे दिवसाला व २- ३००० महिन्याला मिळेल. एका कुत्र्याचे. त्याचा खर्च निघेल.
महत्वाचे म्हणजे त्याला आळस, व्यसने, चुकीची संगत, क्रशेस प्रेमात पडण्याची भूल पडल्यासारखी अवस्था ह्या पासून जपले पाह्जे. १८ परेन्त वय धोक्याचे आहे. ( असे आम्हा पालकांना रुईयाच्या प्रिनिसीने सांगितले होते)
त्याच्या आईची धडपड समजते.
माधवी, माझ्या माहितीतील सावली
माधवी, माझ्या माहितीतील सावली सेवा ट्रस्ट आहे जो होतकरू, गरीब व निम्नस्तरीय मुलांना तसेच गरीब वर्गातील सिंगल अर्निंग पेरंट केसेसमध्ये त्या त्या मुला/मुलीचा वकूब, मानसिक तयारी, कष्ट करायची तयारी वगैरे पाहून त्यांचा शैक्षणिक खर्च उचलतो. पुढे या मुलांनी त्यांच्यासारख्या इतर मुलांना पुढे येण्यास मदत करावी अशी अपेक्षा असू शकते.
हा आणखी एक पत्ता मिळाला. येथे व्यावसायिक प्रशिक्षण मिळू शकते असं दिसत आहे. चौकशी करणार आहे.
UNNATI SAMPARC VOCATIONAL TRAINING CENTRE
Rajhira Residency, 1st floor, A Wing, Flat no.104, 42 Shaniwarpeth,Pune 411030
Email : Samparc_1990@yahoo.com;samparc@gmail.com
Mobile- 9766343468, 9922579522
http://www.samparc.org/index.php
बाकी मी मागे रूडसेट संस्था तळेगाव, महाबँक स्वयंरोजगार योजनांची जी माहिती एका धाग्यावर दिली होती तीच वापरून काही करता येत आहे का, हे बघत आहे.
http://www.maayboli.com/node/25613
अमा, उपयुक्त टिप्स. कामवाल्या
अमा, उपयुक्त टिप्स.
कामवाल्या बाईंना मुलाला वाईट संगत लागायची भीती वाटते. जवळच्या वस्तीत पूरक वातावरण आहेच! तुम्ही सुचवलेल्या गोष्टी मी त्यांना जरूर सांगेन व शक्य ती मदत करेनच!
अप्रेन्टिस म्हणूनही काम मिळू
अप्रेन्टिस म्हणूनही काम मिळू शकते
आयडू, अप्रेन्टिसशिपसाठी कोठे
आयडू, अप्रेन्टिसशिपसाठी कोठे चौकशी करायची, कोणाला विचारायचे वगैरे माहिती देऊ शकाल का?
नितिन्चन्द्र अधिक माहिती देउ
नितिन्चन्द्र अधिक माहिती देउ शकतील.
कमवा शिका योजना विषयी.
आधी टाटा मोटर्स मध्ये एफटिआय असायची स्कीम.
अर्थात त्यात मेरीट वर अॅडमिशन असायची.
फुल टाइम अप्रेन्टिस.
Mitcon Balewadi ithehi
Mitcon Balewadi ithehi courses conduct kartat like mobile repairing vagire . Hyachya sadhya sakal madhe advt yetat.
अप्रेन्टिसशिप टाटा मोटर्स आणि
अप्रेन्टिसशिप टाटा मोटर्स आणि आता व्होक्सवॅगनमधेही उपलब्ध आहे. पेपरमधे जाहिरात येते त्यांच्या भरतीची आणि परिक्षेची. या कंपनीतला कोणी जवळपास असेल तर सांगू शकेन कि जाहिरात येउन गेली कि नाही.
त्याचप्रमाणे मोठ्या कंपन्यामधे क्लिनींगचे कॉन्ट्रॅक्ट घेतलेल्या कंपन्यामधेही वरचे वर भरती चालूच असते. कंपनीतल्या लोकांकडे चौकशीकरा. युनियन लिडर/ साहेब वगैरे असेल एखाद्या कंपनीचा तर तो मदत करेन.
अकु, माझ्या माहितीतला लर्निंग
अकु, माझ्या माहितीतला लर्निंग डिसेबिलिटी असलेला एक मुलगा दोन वर्षे नववीत काढल्यावर सध्या प्रिंटिंग टेक्नॉलॉजी शिकतोय आणि कमवतोय.
मुंबईतल्या शासकीय मुद्रणालयाच्या अशा कोर्सेसच्या जाहिराती प्रकाशित होत असतात.
पुणे शोधल्यावर ही संस्था दिसली पण ती आहे नवी मुंबईत
http://www.mmpiptr.com/courses.html
असेच सुतारकाम, इलेक्ट्रिशियन शिकवणार्या संस्था असतील
अरे वा, पेरू व भरत, उपयुक्त
अरे वा, पेरू व भरत, उपयुक्त माहिती! शोध घेते. मुलाच्या आईला जेमतेम लिहिता-वाचता येते. तरी मेहनतीच्या जोरावर त्यांनी घर सांभाळले आहे. आता दहावीपर्यंत शिकलेल्या मुलाने आयुष्यात लवकरात लवकर स्वत:च्या पायावर उभे राहावे अशी त्यांची अपेक्षा आहे.
अकु, मला नेटवर शोधताना
अकु,
मला नेटवर शोधताना य़शस्वी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, चिंचवड यांचा पत्ता मिळाला. त्यांची दहावी पास / बारावी नापास मुलांसाठी 'कमवा व शिका' अशी योजना दिसत आहे. मेकॅनिकल इंजिनियरिंगचा डिप्लोमा देतात. मकरंद अनासपुरे ब्रँड अँबॅसेडर दिसत आहे. याबद्दल कोणाला अधिक माहिती आहे का? वयोमर्यादेचा उल्लेख वाचनात आला नाही.
य़शस्वी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, चिंचवड ची योजना महाराष्ट्र शासन अधिकृत आहे. जिथे शिकता शिकता कमवण्याची सोय आहे. या संस्थेमार्फत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठाचा डिप्लोमा मिळण्याची सोय आहे. पैसे लागत नाही उलट चार वर्षे असलेल्या स्कीम मधे स्टायपेंडची सोय आहे.
वयाची अट बाबत मला सांगता येणार नाही.
आय टी आय मधे सुध्दा ( शासकीय ) फी लागत नाही. आजकाल आय टी आय च्या काही ट्रेडस ना खुपच मागणी आहे जसे की टर्नर, ड्राफ्टसमन, मशिनिस्ट, टुल आणि डाय मेकर इत्यादी. इथे सुध्दा वयाची अट नाही.
खालील माहीती ज्यात वयाची अट नाही.
टाटा मोटर्स चा फुल टाईम अॅप्रेटीसेस चा कोर्स तर उत्तम आहे. अशीच योजना आता भारत फोर्ज आणि व्होल्क्स वॅगन कंपन्या सुध्दा चालवतात. माथर प्लॅट या कंपनीत सुध्दा याच धर्तीवर योजना आहे.
टाटा मोटर्स योजने मध्ये कुशल तंत्रज्ञच नाही तर सोबत सुजाण नागरीक बनविण्याचे सर्व प्रयत्न केले जातात.
त्या आईंना एक सल्ला द्या कि
त्या आईंना एक सल्ला द्या कि हे खूप अवघड वय आहे व लगेच दहावी झाली की तो कमवायला लागणे होणार नाही आईच्या प्रेशर मुळे मुलगा काही चुकीचे चॉइसेस करेल व ही ग्रोथ फेज मिस करेल. १८ मेजॉरिटी हा टप्पा पार करेपरेन्त तो अपरिपक्व आहे. जमल्यास बारावी परेन्त शिक्षण,
पार्ट टाइम नोकरी करून करता आले तर २० - २१ वया परेन्त अधिक चांगला चॉइस करता येइल. तसेच नातेवाइकाण्च्या प्रेशर खाली येउन मुलाचे लगेच लग्न करून देउ नका त्याला २४ - २५ परेन्त स्वतःचा वकूब सिद्ध करू द्या. थोडी स्टॅबिलिटी येउद्या. त्याला स्वातंत्र्य उपभोगु द्या.
धन्यवाद नितीनचंद्र! त्यांना
धन्यवाद नितीनचंद्र! त्यांना ही माहिती देते.
अमा, मुलाला बाहेरून बारावी करायचंय... तेही घरच्यांचा आग्रह आहे म्हणून. उरलेल्या वेळात काय करणार आहे तो? त्याला आपण होऊन काही वेगळे, नवे शिकावे याची इच्छा नाही. काय करायचे हे विचारल्यावर धड उत्तरे देत नाही. काही काम न करता नुसते रिकामे बसायला किंवा इकडे तिकडे करायला आवडते. त्याच्या दोन मोठ्या बहिणींनी दहावीनंतरच्या सुट्टीत स्वत: होऊन पार्ट टाईम जॉब्ज शोधले व बारावीपर्यंतचे शिक्षण पार्ट टाईम जॉब करून पूर्ण केले. त्यात वावगे काही नसावे. परंतु या मुलाची तसे काही करण्याबद्दल आपण होऊन हालचाल नाही. तो रिकामटेकडेगिरी करत बसला तर कुसंगतीने वाया जाईल ही त्याच्या आईची भीती अगदीच अवाजवी नाही. तो राहातो त्या भागात गँगमध्ये सामील झालेले, गुंडगिरीला लागलेले, वाईट संगतीने व्यसनाधीन झालेले किंवा गुन्हेगारीकडे वळलेले अनेक तरूण आहेत. दिवसभर घरी कोणी नसते. त्या वेळेत हा मुलगा काय करतो, कुठे जातो, कुणाबरोबर बोलतो वगैरे गोष्टींवर कोण व कसे लक्ष ठेवणार? त्यापेक्षा त्याला जर शिकता शिकता कमावता आले तर तो वेळ फुकट वाया न घालवता कामात व्यस्त राहील व भरकटणार नाही असे त्याच्या आईला वाटते.
अकु आणि माधवी, ज्या कळकळीने
अकु आणि माधवी, ज्या कळकळीने तुम्ही तुमच्या संपर्कात येणार्या गरजवंतांना मदत करायची धडपड करताय, ती कौतूकास्पद आहे. हॅट्स ऑफ.