मायबोली वरचे लेख कसे सग्रहित करावेत?

Submitted by पन्तश्री on 29 May, 2015 - 08:53

मला एक महत्वाचा प्रश्न पडला आहे. काहि केल्या उत्तर सपडत नाहि आहे. प्रश्न तसा बवळट आहे. मला मायबोली वरचे लेख अत्यन्त आवडले. पण जेव्हा हवे तेव्हा ते लेख सापडत नाहित. बाकीचे मन्डळी कसे काय सम्भाळतात. कुथली एखादि साइट असल्यास सुचवावे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एका जुन्या मोबाइलात ओपरा ब्राउजरने केवळ मायबोलीच नाही तर इतर पेपरातलेपण लेख साठवतो.वेगवेगळे फोल्डर केलेले आहेत.पर्यटन,मोबाइल रिव्ह्यु,बातम्या वगैरे वेगळे ठेवल्याने लगेच सापडते.आताच्या स्मार्टफोनला क्लाउड स्टोरिज दिलेले असते-android चे google drive, windows चे onedrive इत्यादी.सर्व लेख तिथे अपलोड न करता फक्त लिंक साठवायची. कुठुनही वाचता येते.ज्या फोन अथवा संगणकात साठवले आहे त्यातूनच पाहायला हवे असे होत नाही.

बाकी सुरुवातीपासुनच फोल्डर कसे बनवता यावर पुढे शोधाशोध सोपी जाते.

मलाही यानिमित्ताने एक प्रश्न विचारायचा आहे.,

आपण मायबोलीच्या लेखाच्या लिंक्स कॉम्प्यूटर मध्ये जमवून ठेवल्या तर ते प्रताधिकाराच्या विरुद्ध ठरते काय .?

मलाही पंतश्री प्रमाणे अनेक गोष्टी पुन्हा वाचायच्या असतात. मी काही निवडक १० मध्ये साठवले आहेत .. पण मला अजून काही साठवायचे आहेत .. जाणकारांनी कृपया मार्गदर्शन करावे.

Pocket नावाचे browser extension चांगले आहे. It is available across all platforms.

>आपण मायबोलीच्या लेखाच्या लिंक्स कॉम्प्यूटर मध्ये जमवून ठेवल्या तर ते प्रताधिकाराच्या विरुद्ध ठरते काय .?

नाही. तुम्ही मायबोलीवरच्या कुठल्याही लेखनाची लिंक (फक्त लिंक+ शीर्षक; ) कुठल्याही संगणकावर, फोनवर, वेबसाईटवर कितीही वेळा साठवू शकता. किंवा हव्या त्या सोशल नेटवर्कवर देऊ शकता. किंवा तुमच्या ब्लॉगवर प्रसिद्ध करू शकता. (जो पर्यंत फक्त लिंक किंवा शीर्षक आहे, मजकूर नाही)

प्रत्येक ब्राऊझर मधे बुकमार्क ठेवण्याची सोय असते ती वापरणे हा सगळ्यात सोपा उपाय आहे. पण तुम्ही हवा तो मार्ग वापरू शकता.

शक्यतो कीपॅड असलेले जुने फोन यानिमित्ताने वापरातही राहतात आणि लेख झटकन डिलीट होत नाहीत.संगणकाची हार्डडिस्क फॅार्मॅट केली जाते.