तनु वेड्स मनू रिटर्न्स!

Submitted by ऋयाम on 19 May, 2015 - 04:01

२२ मे २०१५.

बहुत काय लिहीणे? Happy

संदर्भ : http://www.maayboli.com/node/23966

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पेपरात एक चांगली बातमी वाचली की कंगना ने क्विन २ धुडकावून लावला. चला एका छ्ळातून मुक्तता झाली>>>
दक्षे निषेध!! क्विनमधे उत्कृष्ठ काम केले आहे तीने. उगाच काहीपण.

लियाम निसन म्हणाला होता - टेकन ३ आला तर इट्स जस्ट बॅड पेरेंटींग! Biggrin
तसं क्वीन २ आला तर इट्स जस्ट बॅड डेटींग. छान काम केले कंगनाने पण म्हणून काय उगाच दोन दोन वेळा बिचारीचे लग्न मोडायचे Wink Happy

केपी, उत्कृष्ठ काम वगैरे काहीतरी लॉजिकल बोलू नका; क्वीनमध्ये ती पाणीपुरी तयार करते म्हणून तो वाईट सिनेमा आहे हे तुम्हाला माहिती आहे का?

क्वीनमध्ये ती पाणीपुरी तयार करते म्हणून तो वाईट सिनेमा आहे हे तुम्हाला माहिती आहे का? >>> काय सांगता, पब्लिकला फक्त तितकेच सापडले क्वीनमधे? अवघड आहे.

हो ना. मला पण तनु वेड्स मनू खुप्प आवडला होता.
क्वीनमध्ये ती पाणीपुरी तयार करते म्हणून तो वाईट सिनेमा आहे हे तुम्हाला माहिती आहे का?>>> Uhoh असेही असते का?

तनु वेड्स मनु पाहिला नाही पण क्वीन आवडलेला .
तनु वेड्स मनु रिटर्न्स चे प्रोमो पाहिले . कण्गना आवडली .
तिचा तो लग्नाच्या मिरवणुकीतला डान्स बघा आणि नन्तर ज्या अ‍ॅटिटुड्मध्ये बाहेर पडते आणि मग कोसळून रडते ... भारीच !

कंगनाईतके वेगवेगळे आणि तरीही उठून दिसणारे लुक्स इतर कोणीही नायिकांनी दिलेले नाहीत.. स्पेश्यली हेअरस्टाईल.... !!!! >>>> कंगना म्हटली की नेहमी कुरळे लांब केस आठवतात.
पण तनु वेड्स मनु रिटर्न्स , क्वीन ,क्रिश ,फॅशन,वन्स अपॉन अ टाईम.. तिचे लूक्स भन्नाट होते .

तनू वेड्स मनू प्रचंड आवडलेला चित्रपट त्यामुळे दुस-या भागाबद्दल खूपच उत्सुकता आहे..
आणि क्वीन ज्यांना (थोडासाही ) आवडला नसेल तर त्यांना तो समजलाच नाही असं म्हणावं लागेल... कंगना ही अतिशय चांगली अभिनेत्री आहे यात दुमत नाही आणि माधवन तर खूपच क्युट आहे.. ( यात कोणाचे दुमत असे तर मला काहीच फरक पडत नाही Happy ... )

ऋयामा, कोणी जाउदे, तू अजून पाहिला नाहीस हेही एक आश्चर्यच.

क्वीनमध्ये ती पाणीपुरी तयार करते म्हणून तो वाईट सिनेमा आहे >>> Lol हा काय प्रकार आहे? संस्प संस्प प्लीज.

सिनेमाची स्टोरी बंडल आहे ! पण सगळे साहाय्यक कलाकार आणि कंगना इतके मस्त काम करतात की वन टाईम वॉच नक्कीच आहे.
तवेमरि मध्ये बादलीने दूध ओतून कंगना बासुंदी बनवते. (तिने बनवलेल्या पदार्थावरून सिनेमा बघायचे की नाही असा कुणाचा निकष असल्यास त्यांना निर्णय घेण्यास साहाय्य करण्याचा माझा प्रयत्न!)

सिनेमाची स्टोरी बंडल आहे ! पण सगळे साहाय्यक कलाकार आणि कंगना इतके मस्त काम करतात की वन टाईम वॉच नक्कीच आहे.>> +१
मटात फक्त कंगनाच्या अ‍ॅक्टींगसाठी ४ स्टार्स दिलेत... मला त्या पपीची अ‍ॅक्टींग आवडलेली... सहज वावर!

ऋयामा तेच म्हणाले तनु परतली.. अजून तू कसा नाही परतलास माबोवर? Wink

सिनेमाची स्टोरी बंडल आहे ! पण सगळे साहाय्यक कलाकार आणि कंगना इतके मस्त काम करतात की वन टाईम वॉच नक्कीच आहे.>>> +१
मलातरी शेवट आवडला नाही. पण पिक्चर करमणूक नक्कीच करतो. कंगनाचा दोन्ही रोल्समधे परफॉर्मन्स मस्त आहे.

मलातरी शेवट आवडला नाही. >> +१००० !!! (पण इतक्यात इथे शेवटची चर्चा नको म्हणून काही लिहीले नाही मी.)

कालच पाहिला .. आवडला ..
यावेळी सर्वांचेच डायलॉग्स खतरनाक ..
कंगणा ला मानलं बॉस.. आणि तिच्या मेकअप आर्टीस्ट ला पण .. मस्त घडवल्यात दोघीही .
कुसुम कॅरेक्टर मधे काय भाषेचा लहेजा सांभाळलाय तिनं खत्रा .. अजिब्बात मिक्स नै करत ती दोघींनापन ..
माधवन तो पहेलेसेहीच आवडीका हिरो हय . निव्वळ डोळे ..
शेवटच्या फेर्‍याला त्याला विचारल्यावर त्याच्या आवाजाची थरथर .. एक नंबर .. पहिल्या मुव्हीत जस तिला शेवटी कन्फेस करताना .. मै क्या करु ? .. आईशप्पथ ..
बघाच सर्वांनी एकदा ..

>>तसं क्वीन २ आला तर इट्स जस्ट बॅड डेटींग. छान काम केले कंगनाने पण म्हणून काय उगाच दोन दोन वेळा बिचारीचे लग्न मोडायचे

अगं तिचंच कशाला दुसर्‍या कोणाचंतरी मोडतील ह्यावेळी. आणि मग ही तिला "तुम्हीच बना तुमच्या जिवनाची क्वीन" असा सुविचार शिकवेल.

पार्ट १ आवडलाच होता, हा पण आवडला !
कंगनानी अक्षरशः धुमाकुळ घातलाय ! , दीपक डेब्रियाल, तो घरात्ला भाडेकरु, सरदारांचा गर्बा डान्स.. धमाल आली !
पैसा वसुल .. ( कंगनाचे पटियाला सुट्स, लाँग स्कर्ट्स , अ‍ॅक्सेसरीज फारच आवडले.),
गाणी पण मस्तं :)., जुनं 'जा जा जा जा बेवफा 'काय मस्तं फिट झालं !
सगळ्यांनाच आवडेल कि नाही माहित्नाही,पार्ट १ मधे बर्याच पब्लिकला दारु पिउन उलटी करणारी मुलगी हिरॉइन असुच कशी शकते इथेच घोडं आडलं होतं Proud

Pages