मुंडन कधी करतात?

Submitted by मराठी कुडी on 11 April, 2015 - 13:40

मुंडन करण्यामागे केस नंतर नीट वाढावेत असा उद्देश असतो ना? कोणाला अनुभव आहे अस झाल्याचा, न झाल्याचा?

आणि कधी करावे?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुंडन म्हणजे जावळ ना?
ते मुलाचे करतात आणि मुलीचे नाही असे ऐकून आहे.
या मागे काही शास्त्रीय कारण आहे की इथेही स्त्री - पुरुष असमानता Happy

मागे कुठल्याश्या चर्चेत ऐकलेले की जन्मत:च जे केस असतात ते अपवित्र असतात म्हणून ते काढून आगीत जाळतात वगैरे..
हि अंधश्रद्धा आहे की यामागे काही शास्त्रीय कारणही आहे हे जाणून घेण्यास उत्सुक ..

अजून एक प्रश्न, आमचे जुने शेजारी जे होते त्यांच्या मुलीचे केस लहानपणी मस्त सोनेरी, रेशमी आणि कुरळे होते. तिला आम्ही सोनेरी केसांची राजकुमारी म्हणायचो.. त्यानंतर तिचे जावळ केले. येस्स मुलगी असूनही केले.. त्यांच्यात करतात असे म्हणाले.. पण मग त्यानंतर तिला सोनेरी केस कधी आलेच नाहीत.. ते आजतागायत.. ना कुरळेही आले.. म्हणजे रंग आणि केसांचा टेक्चर दोन्ही बदलले..

तर प्रश्न असा की जर तिने जावळ केले नसते आणि फक्त केस थोडेसे कापलेच असते तर तिचे केस कायम कुरळे सोनेरी राहिले असते का?

मुलाचे केस भरपूर वाढून त्रास दायक होउ लागले की करावे जावळ :-$
निदान माझ्या घरी तरी मुलामुलिंच याच कारणासाठी जावळ केले. अपवाद माझ्या मुलीचा. तिला केसच नव्हते धड म्हणून जोतो जावल करा म्जन्जे वाढ़ तील हां सल्ला देत असे. तिचे तीनदा केले पण काही परिणाम झाला नाही
n

>>>> मुंडन कधी करतात? <<<<
हिंदु धर्मापुरते बोलायचे तर
१) जन्मानंतर बालकाचे केस पहिल्यांदा पूर्ण काढतात, त्यास जावळ काढणे म्हणतात. काही जातीजमातीत मुलिंचे करित नाहीत.
२) मुंजविधीत व विद्यार्थी असताना मुंडण करावे असे अपेक्षित आहे.
३) आप्त/नातेवाईक/मित्र/गुरु असे कोणी मयत झाल्यासही मुंडण करतात. त्यास बोडक्या डोक्याचा म्हणतात. हे फक्त पुरुषांचे केले जाते.
४) नवरा मेला असल्यास स्त्रीचे मुंडण/केशवपन करण्याची (क्रुर) चाल काही जातीत अस्तित्वात होती. पण नवरा मेल्यावर स्त्रीचे मुंडण करावे या चालीकरता कोणताही शास्त्राधार नाही.
५) पौरोहित्य करणारे/वेदाभ्यास करणारे यांनी मुंडण करावे अशी प्रथा आहे.
६) याव्यतिरिक्त, एक प्रयोग म्हणुन, विशिष्ट गोष्टींचा निषेध म्हणुन, वा सौंदर्य(?) म्हणुनही स्त्रीपुरुष मुंडण करुन घेतात. तिसेक वर्षांपूर्वीचे याचे ठळक उदाहरण म्हणुन माननीय पर्सिस खंबाटा यांचे उदाहरण देता येईल.
७) सन्यास घेतल्यावर, मुंडण करावे किंवा अजिबात करू नये असे दोनही मतप्रवाह आहेत. पण दोनही मागचे सूत्र एकच आहे की, "केसांची (व एकंदरीतच त्यागलेल्या शरिराची) निगा" राखण्यात व त्याद्वारे शारिरीक "स्व" च्या जाणिवेत मन गुंतून राहू नये.
८) ऐकिव माहितीनुसार जैन धर्मात मुंडणाचा एक प्रकार असतो ज्यात एकेक केस स्वतः/दुसर्‍याकडून उपटून काढुन मुंडण केले जाते. अशा प्रकारे केस काढलेल्या जागी नविन केस उगवत नाही.

>>>>> मुंडन करण्यामागे केस नंतर नीट वाढावेत असा उद्देश असतो ना? कोणाला अनुभव आहे अस झाल्याचा, न झाल्याचा? <<<<<
डोईवरचे केस म्हणजे, भादरल्यानंतर अधिक जोमाने वाढेल असे ते गवताचे लॉन नाही. असे होईलच याला कसलाही शास्त्राधार नाही. ही एक अंधश्रद्धा आहे असे आमचे मत. याबाबतीत अन्निसवाल्यान्नी लक्ष घातले तर अधिक बरे... Proud

>>> आणि कधी करावे? <<<<
प्रश्न अर्धवट आहे. का / कशाकरता अन कुणाचे करायचे आहे? याच्या उत्तरांवर कधी करावे वा करूच नये हे ठरेल.

हो, आमच्याकडे तरी असा अनुभव आहे. दोन मुलींचे जावळ केल्यानंतरचे केस अतिशय दाट आले. न केले तिचे केस पातळच आहेत.

न केले तिचे केस पातळच आहेत.>> हे जेनेटिक फॅक्टर व न्युट्रिशनवर पण अवलंबून आहे. मी मुलीचे जावळ केले नव्हते पण दाट व चांगले केस आहेत.

तिरूपतीला जाऊन खूप लोक मन्नत पुरी झाल्याप्रित्यर्थ मुंडण करतात. ते खूप विचित्र दिसते.

नवरा मेला असल्यास स्त्रीचे मुंडण/केशवपन करण्याची (क्रुर) चाल काही जातीत अस्तित्वात होती. पण नवरा मेल्यावर स्त्रीचे मुंडण करावे या चालीकरता कोणताही शास्त्राधार नाही.>> धन्यवाद लिहील्या बद्दल लिंबू. प्रेम रोग चित्रपटात तरुण मुलीचे केस भादरायचा सीन अतिशय करूण आहे. बघवत नाही. बाल विधवांचे सुरेख केस बघून त्यांच्यावर कुणाचीही वाकडी नजर पडू शकते म्हणून ही कॄर प्रथा अस्तित्वात आलेली आहे. वृंदावन विडोजचे केस भादरलेले असतात. सॅड.

जावळाच्या वेळेस डोक्याच्या पुढच्या भागात व मुंजीला शेंडीच्या भागात थोडे केस ठेवणे हे सार्वत्रिक आहे का?

बाय द वे "मुंडन" शब्द मराठीत कधी ऐकला नाही. हिंदीवाल्यांकडून ऐकला आहे. मराठीत "मुंडण' असावा. पण तो ही अधूनमधूनच ऐकला आहे. जावळाच्या वेळेस 'जावळ काढले' असे सहसा ऐकले आहे, तर मुंजीत "टक्कल" किंवा "चकोट" ऐकले आहे बोलीभाषेत Happy

चकोट अगदी अगदी आणि थोडेसे बिस्कीट ठेवायचा मुलाचा आग्रह. मला ते जावळ काढताना आणि कान टोचताना बाळे रडतात ते अगदी सहन होत नाही. थोडी त्याला समज आल्यावर करावे असे वाट्ते, एका बाईने मला मुलाचे जावळ न काढल्यास त्याचा एखादा केस हा चेटुक करणी साठी वापरला जाउ शकतो असे सांगून घाबरवले होते. परंतु ही देखील एक अंध श्रद्धा आहे. डोंट बिलीव्ह दिस क्रॅप. तुम्ही एकट्या परदेशात आहात म्हणून सांगितले. चिमणी थोडी मोठी झाली की मस्त साधना कट करून आणा.

मी आता लांब वाढवलेत केस.

आँ? Uhoh

मुलाचे केस पातळ असल्यामुळे सातव्या महीन्यात रीतसर जावळ आणि त्यानंतर प्रत्येक उन्हाळ्यात केस काढले होते. पहील्यापेक्षा दाट झाले आहेत पण अमा म्हणते तसं हे जेनेटिक फॅक्टर व न्युट्रिशनवर पण अवलंबून आहे.

केस दाट होण्यासाठी बाळ आठ-नऊ महीन्यांचे झाले की ओले खोबरे व मेथी दाणे वाटून लावावेत. माझे स्वतःचे केस यामुळे काळेभोर व छान दाट होते बरेच वर्ष!

बाकी शास्त्रासाठी लिंबूंचा प्रतिसाद छान.

तर प्रश्न असा की जर तिने जावळ केले नसते आणि फक्त केस थोडेसे कापलेच असते तर तिचे केस कायम कुरळे सोनेरी राहिले असते का? >>> बहुतेक नाही Sad

माझ्या मुलाचे केस लहानपणी खूप कुरळे,मऊ आणि दाट होते ( एक्दम सचिन तेंडुलकर टाईप्स ) , एक्दम गोंडस दिसायचा . सव्वा वर्शाचा झाला आणि जावळ केलं - मुद्दामुनच पूर्ण टक्क्ल नाही केलं फक्त केस बारीक केले.
पण अपेक्शाभंग -- आता केस दाट आहेत पण एकदम सरळसोट आणि कडक .

पण जावळ केल्यावर केस दाट आलेले बर्याच मुलांन्चे आणि मुलींचे पाहिले आहेत.

डोक्यात कोंडा जास्त झाला तर
केस खूप गळत असतील तर
भांग नीट पडत नसेल अथवा केसांना चांगला आकार देण्यासाठी .
(वरील तिन्ही कारणांसाठी कोणतेही धार्मिक किंवा पारंपारिक गोष्टीचा आधार नाही )

केस खूप गळत असतील तर
>>>>>

आमच्याइथे एकाने केसगळतीवर असा उपचार स्वताचे डोके लढवत केला होता..
कापल्यावर केस आलेच नाहीत.. मध्येच काहेतरी कुठेतरी उगवते, पण ते आणखी बेकार दिसल्याने कापावेच लागते.

धन्यवाद लिंबुटिंबु सविस्तर माहितीबद्दल. मुंडन म्हणजे जावळच म्हणायच होत मला. माझ्या ६ महिन्यांच्या मुलीसाठी विचारत होते.

अमा, अंधश्रद्धा नाहिच. आत्ता मुलीचा मस्त mohawk आहे. विचार करत होतो आम्ही की पुढे change होईल ना म्हणून.

आशुडी, dreamgirl, स्वास्ति, विश्या, ऋन्मेSSष, तुम्हाला सर्वांना पण धन्यवाद माहितीबद्दल