मुले बहुभाषिक होण्यासाठी काय करावे?

Submitted by मराठी कुडी on 11 April, 2015 - 01:49

माझी मुलगी आता ६ महिन्यांची होईल. तिला मराठी, हिंदी आणि इंग्लिश नीट यावं अशी इच्छा आहे. घरी मी तिच्याशी मराठी आणि नवरा हिंदीत बोलतो. बाहेर इंग्लिश ती लगेच शिकेल त्यामुळे त्याबाबतीत शंका नाहिये.

तिच्याशी strictly मराठी आणि हिंदीतुन बोलण्याशिवाय आम्ही काय करु शकतो जेणेकरुन तिला दोन्ही भाषा नीट बोलता येतील? मी Seattle मध्ये असते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ती आता बोलायला लागली आहे का? साधारण बोबडे बोलायला लागेस्परेंत अजून सहा आठ महिने नक्की लागतील. तेवढा पेशन्स, पक्षी धीर ठेवावा लागेल. मराठी हिंदी व इंग्रजी व्यतिरिक्त अजून काही भाषा तिने बोलाव्या अशी अपेक्षा आहे का? तर फ्रेंच/ जर्मन/ मँडेरिन चायनीज/ जपानी/ स्पॅनिशचे क्लासेस उपलब्ध आहेत तिथे तिला ती योग्य वयाची झाली की घालता येइल निदान केजीत तरी जायला पाहिजे.
पहिले काही महिने ती दोन्ही तिनी भाषा मिसळून बोलेल. मग सलग वाक्ये एका भाषेत बोलेल. ते तिला डेव्हलप करू द्या फार स्ट्रि क्ट पणा शक्यतो करू नका ही विनंती.

भारतीय भाषा शिकायला देखील तीन वय होईपरेन्त शक्यतो वाट पहा. दाक्षिणात्य व उत्तरेकडील बंगाली, गुजराती वगैरे शिकता येइल. तुमच्या तिथे देशवासी असतील ते शिकवू शकतील.

ह्या व्यतिरिक्त त्या त्या भाषेतील गाणी, ऐकणे व बरोबरीने म्हणणे, टीव्हीवरील मालिका, चित्रपट बघणे,
बडबड गीते गाणे प्ले कार्ड्स अंकलिपी वगैरे वापरता येइल. आयट्यून्स वर लँग्वेज अ‍ॅप्स भेटतील.

कोकणी, आगरी, हैद्राबादी हिंदी अहिराणी अश्या व इतर डायलेक्ट्स शिकायला जरा वय वाढावे लागेल.
संस्कृत पक्के असल्यास भाषा सोप्या जातील. सीअ‍ॅटल मध्ये काही वेगळे रूल्स आहेत का?

झिम्मा, मधे विजयाबाईंनी त्यांच्या लेकीचा किस्सा लिहिला आहे. घरातील सगळे तिच्याशी वेगवेगळ्या भाषेत बोलत राहिल्याने, तिचा गोंधळ उडाला होता. त्यामूळे सर्व भाषा आल्याच पाहिजेत याची सक्ती करू नका. तिच्या कलाने जा.

तिला खरेच गरज वाटली तर ती आपणहून शिकेल.

ऋन्मेश, thank you
अमा, आत्ता एवढीच इच्छा आहे की आम्हाला ज्या भाषेत सर्वात मोकळ वाटत बोलायला त्या भाषा तिलापण याव्यात म्हणजे संवाद छान राहिल. बाकी पुढे professional development साठी वगैरे तेव्हा बघु. म्हणून मराठी आणि हिंदी म्हटल.
व्हिडिओज आणि गाण्यांची कल्पना छान आहे. शोधते मी.

दिनेश, त्याचीच चिंता वाटत होती म्हणून बघायच होत की कोणाला first hand अनुभव आहे का. तुमच म्हणण बरोबर आहे आणि नक्की जाणिव ठेवेन त्याची.

Happy चांगल चालू आहे कि! तुमची आणि तुमच्या पतीची एक कोड लँग्वेज (मराठी) राहू द्या! फक्त हिंदी शिकवा आता शिकवताय तसं. मोठी झाल्यावर फारच पडली मराठीच्या प्रेमात तर देखा जायेगा...
(अशी डेंजर असतात मुले की आपल्याला नाही शिकवत, ते दोघेच बोलतात म्हणले की आपोआप ती भाषा पिक-अप करतात!!)

माझा अनुभव-

मी अमेरिकेत जाताना मोठ्या मुलाला (३.५ वर्षे) मराठी (बोलणे,ऐकणे), हिन्दी (बोलणे, ऐकणे) आणि इंग्लिश (बोलणे, ऐकणे, लिहिणे) येत होतं आणि मुलगी (१वर्ष ) लहान होती. मुलगा प्लेग्रुपमध्ये जायच्या.

मी ३ वर्षानंतर भारतात परत आलो तेव्हा मुलाला मराठी (बोलणे,ऐकणे) आणि इंग्लिश (बोलणे, ऐकणे, लिहिणे, वाचणे) येत होतं आणि मुलीला मराठी (बोलणे, ऐकणे) आणि इंग्लिश (बोलणे, ऐकणे, लिहिणे) येत होतं. मुलगा लोकल स्कुल आणि मुलगी खासगी प्लेग्रुपमध्ये जायचे.

आता नवी मुंबईत एक वर्ष राहिल्यानंतर मुलाला मराठी (बोलणे,ऐकणे), हिन्दी (बोलणे, ऐकणे, लिहिणे, वाचणे) आणि इंग्लिश (बोलणे, ऐकणे, लिहिणे, वाचणे) येत आहे आणि मुलीला मराठी (बोलणे, ऐकणे), हिन्दी (बोलणे, ऐकणे) आणि इंग्लिश (बोलणे, ऐकणे, लिहिणे, वाचणे) येत आहे. मुलगा आणि मुलगी CBSE शाळेत जातात.

सल्ले-
१. आता काही करु नका.सध्या बोलण्यापेक्षा मुलीशी स्पर्श/ संगीत/ भावनेने संवाद साधा.
२. १ वर्षानंतर Flash Cards (Pictures) वापरा.
३. २ वर्षानंतर तिला लोकल लॉयब्ररीत घेऊन जा.
४. ३ वर्षानंतर तिला प्लेग्रुपमध्ये घाला. इतर लहान मुलांबरोबर राहून मुले लवकर बोलतात.
५. ६ वर्षानंतर तुम्ही तिला लोकल हिंदू देवळात मराठी आणि हिन्दी भाषा वर्गात पाठवू शकतात.

१ वर्षानंतर Flash Cards (Pictures) वापरा>> हे लवकरात लवकर वापरावेत. अगदी पहिल्या दिवसापासून वापरलेत मी. मुळात हे लाल रंगात असल्याने आणि तोच रंग त्यांना आकर्षित करत असल्याने, मुलं त्यांच्याकडे पाहतात. एका सेकंदात कार्ड त्यावरील शब्द उच्चारून फ्लॅश करायचा असतो. ह्याने एक तर मुलांची दृष्टी चांगली आणि तिक्ष्ण होते. पिक्चर मेमरीमुळे त्यांना अक्षरओळख नसली तरी ते शब्द ओळखू शकतात.
लहान मुले कोणतीही नविन भाषा अतिशय कमी कालावधीत उत्तमरीत्या बोलू शकतात. तुम्ही त्यांच्याशी बोलताना एकावेळी एकच भाषा वापरायला हवी. मुलांशी बोबडे बोलणे कटाक्षाने टाळावे.
बोलताना शब्दसंग्रह वाढवण्याकडे लक्ष द्यावे.
भांडणे, दादागिरी असे प्रकार असणारे कार्टून न दाखवता चांगली भाषा आणि संवाद असणारे मुलांचे कार्यक्रम दाखवावेत. जसे की पेपा पिग, डॅनियल टायगर, ट्रॅक्टर टॉम, पिंगू, बेन अ‍ॅन्ड हॉलीज लिटल किंगडम, बॉब द बिल्डर.(हे इंग्रजी आणि इतर भाषेत उपलब्ध आहेत) .

माझी मुलगी १ वर्षाची असताना सिंगापुर ला आली होती आनि ६ वर्षाची असताना इथुन भारतात शिफ्ट झाली.
मराठी घरी बोलायचो म्हनुन शिकली, हिन्दि सिरिअल्स बघुन आणि ईंग्लिश शाळेमध्ये शिकली. आनि जोडीला बडबड गिते आहेतच ना.

धन्यवाद राजू७६, नलिनी आणि मी एस एम.

राजू७६ - तुमचे ५ उपाय आवडले.
नलिनी - flashcardsच बघते आता. तिला मी सध्या रोज संध्याकाळी एक board book वाचुन दाखवते आणि तिला ते प्रचंड आवडत. flashcardपण आवडतीलच.
मी एस एम - मी इंग्लिश नीटपणे Friends serial पाहुनच शिकले त्यामुळे तुम्ही म्हटलेल पटतय.

मुंबईमध्ये वाढताना एव्हढं exposure मिळत की काही विशेष प्रयत्न करायला लागत नाहीत. त्यामुळे मला मराठी, हिंदी, इंग्लिश नीट येत. गुजराथी समजत आणि संस्क्रुत पूर्वी यायच. इकडे एव्हढ exposure मिळत नाही म्हणून विचारल.

स्वानुभव
Bilingual पेरेंट्स असाल तर हिंदीतूनच बोला , मुलगी छान पैकी पिकप करेल .भारतात येऊन घरच्या लोकां मधे

मिक्स होताना , कार्टून चॅनल्स वर हिंदी ट्रांसलेशन ऐकताना अडचण येणार नाही.

मुलं बोलू लागताच ( एक वर्ष वयापासून ) नेहमी कानावर पडणार्‍या २,३ भाषा खूप फास्ट आत्मसात करतात.

थोडे शब्द इकडे तिकडे मिक्स होतील पण नो वरीज.. Happy डोरा द एक्स्प्लोरर मधून खूप सारे स्पॅनिश वर्ड्स शकतात

तुमच्या मुलीच्या प्रॅम वर वेगवेगळ्या प्राण्यांची खेळणी टांगता येतील.. फिरताना, वॉक ला जाताना सतत

तिच्याशी बोलत राहा.. हे प्राणी दाखवून त्यांची नावं रीपीटेडली सांगत राहा, नावं, प्रायमरी कलर्स पण इतकी

तान्ही बाळं ऐकून ऐकून लक्षात ठेवतात,

multilingual - as soon as possible. from the birth , no need for anything special. just lots of exposure

this advise is from my my nephew who has done his phd in cognitive sciences ( new born baby's brain , how it works and how do babies learn languages was his subject)

मी माझ्या मुलीशी पहिल्यापासून मराठीतून संवाद साधत गेले. तिचा बाबा तिच्याशी हिंदीतून बोलत असे / बोलतो. लेक आपसूक मराठी हिंदी दोन्ही भाषा बोलायला शिकली. माझ्याशी बोलताना मराठीतून बोललेलं वाक्य, बाबाला सांगताना सहजपणे हिंदीतून बोलायची. टिव्हीवरची हिंदीतली कार्टून्स ही हिंदीची एक जबरदस्त शिकवणी असते.

शाळेत जायला लागल्यापासून इंग्लिशही शिकलीच. शाळेत, आजूबाजूला कॉस्मोपॉलिटन वातावरण असल्याने ती इंग्लिश जास्त करून बोलत असली तरीही मराठी हिंदीही सहज बोलते. मुंबईत रहात असल्याने शाळेत पहिल्यापासून मराठी हिंदी हे विषय आहेत त्याचाही फायदा झालाच. वाचन मात्र केवळ इंग्लिशमधूनच आहे आणि त्यामुळे तिची फर्स्ट लँग्वेज इंग्लिश आहे.

इंग्लिश - समजणे, बोलणे, लिहिणे, वाचता येणे, वाचन.
मराठी - समजणे, बोलणे, लिहिणे (शाळेपुरते), वाचता येणे (शाळेपुरते)
हिंदी - समजणे, बोलणे, लिहिणे (शाळेपुरते), वाचता येणे (शाळेपुरते)

आम्ही आमची मुले जनमल्यापासुन भारताबाहेर आहोत आणि दोन्ही मुले मराठी आणि हिंदी उत्तम बोलतात. हिंदी लिहायला वाचयाला पण येते. एकाला अमेरिकेत हायस्कुल क्रेडिट पण घेतले आणि मुलीचा पण हिंदी डिप्लोमा पुढच्या वर्षी पुर्ण होईल ज्याचा मुळे अमेरिकन हायस्कुल मध्ये तीला २ क्रेडिट मिळतिल. ह्या अनुभवावरुन माझे २ पैसे ...

पहिले तीन वर्ष तुम्ही मुलीशी तिची भाषा बोला. मात्र TV/computer वर मराठी , हिंदी आणि इग्रजी भाषेतिल लहान मुलाचे प्रोग्रम दाखवा. कार्टुन, लहान मुलाचे प्रोग्रम तीन्ही भाषेत दाखवा. ३ वर्षानंतर तिच्याशी घरी मराठी बोला. ५ वर्षानंतर हिंदी बोलायला चालु करा.
नंतर कुठेतरी संडे हिंदी स्कुलमध्ये घालुन हिंदी लिहायला आणि वाचायला शिकवा. ती शाळा लांब असेल तरी आळस न करता चालु ठेवा. कमित कमी ४ वर्ष हिंदी शिकवा .
१० वर्षानंतर मुलाना हिंदी- मरठी गाण्याची आवड निर्माण करा. मुलीला ह्या दोन्ही भाषा नक्की चांगल्या येतिल.

लेकीची मैत्रीण कन्नड आहे. ती लहान असताना घरात आई मराठी / कन्नड बोलायची. पुण्यात रहात असल्याने आजूबाजूला सहाजीकच मराठी बोलले जायचे. टीव्ही मुळे हिंदीही शिकली. तिचा बाबा तिच्याशी फक्त इंग्रजीच बोलायचा (बाबाला मराठीसुद्धा येते हे तिला बरेच वर्ष माहीत नव्हते :P) शाळा इंग्रजी माध्यमाची. थोडक्यात ती लहान वयापासूनच ह्या चारही भाषा छान बोलते.

आमच्या शेजारची लहानगी (वय वर्षे पाच फक्त) मल्याळम (मातृभाषा), हिंदी (चित्रपट), मराठी (मित्र मैत्रिणी व इतर शेजारी), तमीळ (मावशी कडे हंगामी वास्तव्य) आणि अर्थातच अस्खलित इंग्रजी (शालेय शिक्षण) बोलते.

मी हिमाचल मध्ये असतांना माझी धाकटी मुलगी २ १/२ वर्षांची होईपर्यंत बोलतच नव्हती. कारण आई कानडी, बाप मराठी आणि बाहेर पंजाबी व हिंदी. शेवटी आम्ही एकाच भाषेत -- कानडीत घरी बोलायचे ठरवले. मग ती बोलू लागली. त्या नंतर ती आपणहून वरील सर्व भाषा व शाळेत गेल्यावर इंग्लिश सुध्दा बोलू लागली. मतितार्थ-- घरी एका भाषेने सुरु करा आणि रेस्ट - लीव्ह इट टू हर ~!!!!!

वर्षुनील, मामी, साहिल शहा, मी नताशा, चेतन सुभाष गुगळे, रेव्यु, सगळ्यांना लिहिलयाबद्दल धन्यवाद! खूप शिकायला मिळतय सगळ्यांच्या अनुभवांवरुन.

वर्षुनील, आम्ही फक्त हिंदीमधुन बोललो तर तिला मराठी कस येणार?

मामी, तुमच उदाहरण खूपच motivating (प्रेरणादायक?) आहे.

साहिल, पहिली तीन वर्ष तिची भाषा बोला म्हणजे नक्की कोणती भाषा?

लिहायला वाचायला शिकली मराठीतुन तर फारच छान पण आत्ता पहिला टप्प बोलण्याचा आहे म्हणजे आजी, आजोबा, मामा, मामी, मामेभावंड सगळ्यांशी नीट मिसळेल.

माझ्या नात्यात एक व्यक्ती आहे जो मराठी आहे. त्याची बायको कानडी आहे.

मुलांशी आई कानडीत तर वडील मराठीत संवाद साधायचे. हे सर्व ठरवुन आणि भाषा तज्ञांशी तसेच मुलांचे मानसपोचार तज्ञांशी चर्चा करुन.

शाळेत जाण्यापुर्वी त्याने ह्या भाषा आत्मसात केल्या.
पुढे शाळेतल्या मुलांबरोबर इंग्र्जी आणि हिंदी तो बोलु लागला.

माझ्या मते मुलांचा भाषा विषयक बुध्यांक किती आहे यावर या प्रयोगाचे यश अवलंबुन आहे. जेव्हा मेंदुचा विकास होत असतो अश्या ४ ते ५ वयात मुल चौकस असतात. नविन शिकलेले लक्षात ठेवतात आणि उपयोगात आणतात.
पालकांनी भाषेचा जाज्वल्य अभिमान टाळुन संवादाची गरज म्हणुन भाषा आग्रह न धरता शिकवावी.