भेटवस्तू काय द्यावी?

Submitted by पियू on 10 April, 2015 - 10:33

या रवीवारी घरी साबांच्या काही जुन्या मित्रमैत्रीणींचे गटग ठरले आहे.
ज्यांना साबांनीच कित्येक वर्षे पाहिलेले नाहीये.

सुरुवातीला १० मग १३ मग १७ असा आकडा वाढत चालला आहे.

आधी आम्ही पर्सनलाईझ्ड गिफ्ट्सचा विचार करत होतो.
पण आता नक्की कोण येणार आहे नी कोण नाही हे ठरत नाहीये सो तो ऑप्शन बाद.

त्यामुळे आम्ही ठोक वस्तु देणार आहोत ज्या कोणालाही (इर्रिस्पेक्टेव्ह ऑफ नेम अँड जेंडर) देता येतील.
जास्त संख्येने आणून ठेवणार आहोत जेणेकरुन वस्तु उरल्या तरी इतर कोणाला देता येतील गिफ्ट म्हणून.

शिवाय रवीवारला आता फार शिंग न राहिल्याने घरी कोणाला काही हँडमेड वस्तु बनवणे शक्य नाहीये.
मागे इथे वास्तुशांतीला काय गिफ्ट द्यावे असा धागा वाचल्याचे आठवतेय पण तो सापडत नाहीये.

सो खालील माहितीच्या आधारे गिफ्ट सुचवा.

१. बजेटः रु. ५० ते ६० प्रत्येकी
२. संख्या: १७ ते २५
३. ठिकाणः पुणे (म्हणजे पुण्यातच मिळेल अशी वस्तु सुचवा).
४. वयोगटः ४५ ते ५० (म्हणजे खुप म्हातारे पण नाहीत पण अगदीच तरुण पण नाहीत).
५. कोलाज करायला जुने फोटो वै. उपलब्ध नाहीत.

माहिती अपडेट करत जाईल जसजसे लागेल तसे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमितव
थोडा बदल करतो.
दातांसी जीर्णांनी यथा विहाय
ढिगानी आयडिया अनिंद्य देयी

अरे काय धमाल इथे. 😁

अमितव, ऋतुराज शिघ्रकवी / वित्व 👏

dental clinic चे उदघाटन उद्या आहे. विक्षिप्त मुलगा तुम्हाला योग्य भेटवस्तू सापडू दे.

Pages