टाटा स्काय (पुणे विभाग) - एच डी चॅनेल्स दिसतायत का?

Submitted by mansmi18 on 8 April, 2015 - 09:54

टाटा स्काय (पुणे विभाग) - एच डी चॅनेल्स दिसतायत का?

आमच्याकडे (बाणेर बालेवाडी) गेले ७ दिवस एच डी चॅनेल्स दिसत नाही आहेत. कस्टमर सर्विस वर एस एम एस केले तर "तुमच्याकडे सर्विस इंजिनीयर लवकरच येइल" असा मेसेज आला पण कोणीही आले नाही. टाटा स्काय अपग्रेड करत आहेत त्यामुळे हा प्रॉब्लेम आहे असे सांगत आहेत पण ते कधी संपणार कळत नाही आहे.(अकाउंट वर त्यांनी क्रेडीट दिले आहे पण चॅनेल पहायला मिळत नाही हा मेन प्रॉब्लेम. एकदा HD ची सवय झाल्यावर साधे पाहवत नाही Happy )

कोणाला माहिती असल्यास लिहाल का प्लीज?

धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एरंडवण्यात दिसत आहेत. मात्र अपग्रेडेशनमुळे व्यत्यय येऊ शकतो असे मेसेजमध्ये म्हटले आहे. आम्ही व्यत्यय येण्याचे वाट पाहत आहोत Happy

रॉहु - You dont want व्यत्यय.. very irritating.. Sad

मी त्यांच्या कस्टमर सर्विस ला विचारले की सगळे पुर्ण व्हायला किती दिवस लागतील..त्याचेही काही उत्तर दिले नाही.

आमच्या कडे ही (चिंचवडला ) दिसत नाहियत. ( एच डी नसुन सुद्धा ) अपग्रेडेशन चालू आहे, आमचे तंत्रद्न्य लवकरच तुमच्या घरी येतील असा समस गेले दोन आठवडे येतोय. आमच्या दरवाज्यावरची बेल वाजली की वाटते की तेच आलेत. त्यांच्या साठी बायकोने आवाळायचे ताट कधीचे तयार ठेवलेय !!"

यांचा satellite बदलला आहे,डिशची दिशा थोडी वळवावी लागते,खटपट्या असाल तर स्वत: करू सकता.एकदा जमलं की काम सोप्प आहे.

यांचा satellite बदलला आहे,डिशची दिशा थोडी वळवावी लागते,खटपट्या असाल तर स्वत: करू सकता.एकदा जमलं की काम सोप्प आहे.

आवाळायचे >>>> ओवाळायचे करा हो!>> Rofl

सध्या सगळीकडेच गंडले आहे. मला पण तक्रार करुन १० दिवस झाले अजूनही काही कुणी फिरकले नाहीये. त्यात त्यांना फोन केला तर १० मि. लागतात त्यांच्याशी संपर्क करायला. काल मी झाड झाड झाडलाय पण फायदा नाही झाला.

आमच्याकडे पण एच डी चॅनेल्स दिसण्यात अडचण येत आहे. तसेच दुसरी सेट टॉप बॉक्स वर रोजच पेमेंट ड्यू म्हणून भलभलतेच यूजर आयडी येत आहेत. ते आमच्या नावावर रजिस्टरच नाहीत. फोन इ मेल वगैरे करून पाहिले काही उपयोग नाही.

मी जे दिसेल ते बघते. अश्यावेळी रेकॉर्डेड कार्यक्रमांचा स्टॉक उपयोगी येतो.

दिसताहेत सगळे चॅनेल्स. फक्त अपग्रेडेशन मुळे रिजनल पॅकमधले फुकट मराठी चॅनल्स दिसत नाहियेत. ते अगदीच हवे असतील तर पेड पॅक मधे बघता येतील.
सिग्नल मधे काही इश्यु असेल तर एसेमेस पाठवला की दोन दिवसात इंजिनियर येवुन वरती डीश ला काही बाही करुन जातो. मग आपल्याला टाटास्काय दिसु लागतय. आणि हो त्या विजिटचे तो इंजिनियर अजिबात पैसे घेत नाही. नाहितर इतरवेळी नुसत रिमोटला हात लावला तरी १७०/- रु द्यावे लागतात इंजिनियरला.

सगळी कडे आहे वाटत थोड्या फ़ार फ़रकाने. आमच्याकडे काहीच दिसत नाही. . एकही चॅनेल दिसत नाही. १०० आणि १०१ चॅनेल पण दिसत नाही आहे.इजीनियर येणार येणार एवढाच एस एम एस येतो.

डीश ची दिशा कोणत्या बाजुला वळवायची?

सिग्नल मधे काही इश्यु असेल तर एसेमेस पाठवला की दोन दिवसात इंजिनियर येवुन वरती डीश ला काही बाही करुन जातो. मग आपल्याला टाटास्काय दिसु लागतय. आणि हो त्या विजिटचे तो इंजिनियर अजिबात पैसे घेत नाही. नाहितर इतरवेळी नुसत रिमोटला हात लावला तरी १७०/- रु द्यावे लागतात इंजिनियरला.>>>
लक्की यु!!

सगळ्यात इरिटेटिंग त्या १०१ वरील जाहिराती आहेत. तो माणुस म्हणतो "थोडीसी दिक्कत हो सकती है आणि आम्ही लगेच येउन नदत करु आणि पैसेही घेणार नाही" (हे वर!..जसेकाय हा आमचाच प्रॉब्लेम आहे Happy
असो सध्या एस्डी चॅनेल्स तरी दिसतायत यावर समाधान मानायचे Happy कधी ना कधी तरी फिक्स करतीलच Happy

अर्थात खूप पाठपुरावा करावा लागतो कस्टमर केअरचा. प्रसंगी शिव्याही घालाव्या लागतात. बाकी जाहिरातीत दिसतात तितके मृदुभाषी, हँडसम असे काही लोक अज्जिबात नसतात. एकुणातच सगळ्या जगाचा ताप डोक्यावर घेतलेले, उपकार कर्त्याच्या भुमिकेत, आणि आत्ताच शाळेतुन तीन वर्षाचा गॅप घेऊन दहावी पास(??) झालेले नवतरुण हे इंजिनियर म्हणुन येतात. त्यांना तुम्ही साहेब आम्ही अडाणी म्हणुन आम्हाला टाटास्काय दिसत नाहिये असे भाव चेहर्‍यावर ठेवुन बोल्ल की करतात काम. Wink
जोक्स अपार्ट, जितकी तत्पर सेवा देतो अस कानी कपाळी ओरडतात त्याच्या १०% जरी सेवा दिली टाटा स्काय ने तर अर्ध्या निम्म्या शहराच्या तक्रारी निवारण होतील. अर्थात माझा अनुभव सिंहगड रोडवरचा आहे. बाकी ठिकाणी कदाचित वेगळी परिस्थिती असेल.

माझ्याकडे (बिबवेवाडी) मध्येपण एचडी चॅनेल्स दिसत नाहीयेत.खरंच एचडी चॅनेल्सची सवय झाल्याने नॉर्मल चॅनेल्स नाही बघवत..

शुकु गेले ३ दिवस मी पाठपुरावा करतो आहे व ३ तारखेला वर्क ऑर्डर बनली आहे. अजुन पत्ता नाहीये. काल मी झाड झाड झाडुन झालं.

केपी, तुला परिणय मंगल कार्यालय माहिती आहे का तिथे टाटास्कायचे आउटलेट आहे. तिथे मी गेले होते पर्सनली जाऊन बडबड करुन आले. मग आला त्यांचा माणूस.

आमच्याकडे (प्रभात रोड) सगळी चॅनेल्स दिसतात. नळ स्टॉपला दिसत नाहीयेत.

>>>
परभात रोडला येगळा शाटेलाईट हय आणि नळ स्टॉपला येगळा शाटेलाईट हय म्हनं....

खरंच एचडी चॅनेल्सची सवय झाल्याने नॉर्मल चॅनेल्स नाही बघवत..

>>
आता अल्ट्रा एच डी आलंय ते घ्या म्हणजे एस डी आणि एच डीच्या त्रासातून मुक्ती मिळेल....

खरंतर माझा अनुभव अतिशय वेगळा आहे टाटास्काय च्या बाबतीत. आजतागायत जर कोणती सर्व्हिस मला मनाजोगती मिळाली असेल तर त्यांच्याकडूनच. कोणताही प्रश्न विचारा कस्टमर केअर वाले अपडेटेड असतात. विचारून सांगतो, नंतर सांगतो अशी उत्तरं अजिबात मिळत नाहीत.
अपग्रेडेशनच्या कामाचा खरंच लोड असेल त्यांच्यावर त्यामुळे कदाचित सगळ्यांना पुरे पडणं जमत नसेल.

मी नविन ठिकाणी रहायला गेल्यावर लोकल केबल वाल्याने आमच्या बिल्डिंगच्या सर्व डिशेस तोडून टाकल्या होत्या. टाटा वाल्यांना फोन केल्यावर ते लगेच आले. आणि डिश फुकट नीट करून गेले. पैसे घेतले नाहीत. पुढे एच डी ला अपग्रेड केलं तेव्हा सुद्धा तुम्ही अकाऊंट रिचार्ज करा आम्ही तिथून डिटक्ट करतो असं म्हणाले त्यामुळे इंजिनियर येऊन बॉक्स बदलून गेला फक्त. पैशाची देवघेव नाहीच.

माझापण अनुभव खुप चांगला आहे, पण एक अठवडा झाला मला एकही चॅनेल दिसत नाहीये... Sad
कॉल केला १५ मि. नी एका व्यक्तीशी बोलणे झाले.. पन समस सारखे उत्तर मिळाले.

पण लोकल केबल्सवाल्यांपेक्षा टाटास्काय कधीही चांगले. थोडं मानगुटीवर बसलं की कामं होतात आणि कसलिही अरेरावी नसते. Happy

आता अल्ट्रा एच डी आलंय ते घ्या म्हणजे एस डी आणि एच डीच्या त्रासातून मुक्ती मिळेल>>>>
आणि अल्ट्रा एच डी पण अपग्रेङ केले म्हणजे? Happy

रोज मी एकदा नेमाने 56633 वर NS म्हणुन एस एम एस करतो..इंजिनियरला आमच्याकडे यायला अजुन "मुहुर्त" मिळाला नाही. जितके दिवस तो येत नाही तितक्या दिवसाचे क्रेडिट अकौंटवर अ‍ॅड करत आहेत.

ह्या टाटा sky वाल्यांनी आधीचा आमचा चांगला सेट top box बदलून नवीन बसवला . तेव्हापासून channels दिसण्यात प्रोब्लेम येतोय . त्यांच्या इंजिनीयरने
डिश वरचं एक यंत्र बदललं . त्याचे १५० रुपये आमच्याकडून घेतले . तरीही प्रोब्लेम तसाच राहिला . आता म्हणतोय डिशच बदलावी लागेल . त्याचे ६००
रु होतील . आता रेचार्ज संपलं कि आम्ही टाटा sky बंद करणार आहोत . दुसरी कुठली कंपनी चांगली आहे ? कृपया सांगावं

Pages