शतशब्दकथा (शशक) - एक कथाप्रकार आणि चर्चा

Submitted by ऋन्मेऽऽष on 22 February, 2015 - 00:07

शंभर शब्दांची आणि शंभर’च शब्दांची कथा हा कथाप्रकार मायबोलीवरच प्रथम पाहिला. शंभर शब्दातही बरेच काही लिहिता, मांडता, पोचवता येते हे समजल्याने, अनुभवल्याने आवडलाही. मायबोली-शोध घेत सापडतील त्या सर्वच वाचून काढल्या. एखाद दुसरा अपवाद वगळता सर्वच आवडल्या, काही तर सरसच जमल्या होत्या. पण तरीही काही प्रश्न पडले, शंका उद्भवल्या त्या इथे मांडतोय. त्या मुद्द्यांबाहेर आपल्यालाही काही मुद्दे घेऊन चर्चा करायचे असल्यास हरकत नाही.

शंभरच शब्द का?
चारोळीमध्ये चारच ओळी का यासारखे हा प्रश्न ऐकून वाटेल, पण तरीही प्रश्न वॅलिड (मराठी-ग्राह्य,योग्य,उचित?) आहे असे मला वाटते.
पन्नास वा पंच्याहत्तर का नाही? खूप कमी होतील का?
सव्वाशे-दिडशे वा दोनशे का नाही? खूप जास्त होतील का?

बरे नेमके शंभरच का? शंभर शब्दांपर्यंत असे का नाही? जसे निबंध असतो १५०० शब्दांत लिहा वा एखादी कथास्पर्धा असते २००० शब्दांत लिहा, तत्सम!

हा प्रश्न माझ्यामते जास्त महत्वाचा!

शब्द मोजतच कथा लिहिण्याचा अट्टाहास का? कवितेबाबत शब्द वा मात्रा अचूक असावेत हा अट्टाहास समजू शकतो, तिथे काही प्रकारांत यमकही असावे अशी अपेक्षा असते. कारण ते पद्य असते, एका तालात एका चालीत असावे, तसेच वाचले जावे, हा त्यामागचा हेतू असतो. पण कथेला हे लागू होत नाही. कथेमार्फत जे आपल्याला वाचकांपर्यंत पोचवायचे आहे त्याला शब्दमर्यादा आणि ती देखील ‘नेमकी’ हे कशाला!

उदाहारणार्थ, माझ्या मनात एखादा विचार आला, मला तो मांडायचा आहे. त्या विचाराची व्याप्ती पाहता तो लघुकथेच्या रुपात कमीत कमी शब्दांत मांडला तरच तो परिणामकारक ठरेल हे मला समजले आणि मी लिहायला घेतले. मग ते लिहून झाल्यावर मी पुन्हा एकदा पॉलिश करून त्यातील अनावश्यक बाबी काढल्या, एखाददोन आवश्यक संदर्भ आणखी दिले, तसेच गरज भासली तिथे वाक्यरचना सुधारली. थोडक्यात परिणामकारकता वाढवली आणि माझी कथा तयार झाली. आता ती कथा ९५ शब्दांची भरल्यास मी तिच्यात हट्टाने ५ शब्द जोडून तिला शतशब्दकथा बनवणे यात मी काय साधणार? परफेक्ट १०० शब्दांत कथा लिहिल्याचे समाधान! पण ते असणार फसवेच.. एका अर्थी हे डेलीसोपमध्ये वीस-पंचवीस मिनिटांचा एपिसोड बनवायच्या उद्देशाने एकच द्रुश्य चार अ‍ॅंगलने दाखवत गरज नसलेली भर टाकण्यासारखेच झाले कारण माझी कथा तर ९५ व्या शब्दालाच संपली होती.

तसेच याउलट १०५ शब्द भरले तर माझ्यासमोर आव्हान आहे की मी त्यातील ५ शब्द कमी करावेत. याबाबत आव्हान हा शब्दच योग्य ठरावा. एके ठिकाणी मी हा अनुभव घेतला आहे. जास्तीत जास्त ५०० शब्दांत लिहायचे होते, माझे ५२० च्या आसपास भरल्यावर काय ठेवावे आणि काय काढावे याबाबत गोंधळून गेलो होतो. आपल्याला आपण लिहिलेला प्रत्येक शब्द तोलून लिहिलाय आणि काहीही संदर्भहीन नाही असे वाटत असल्यास ते वरचे शब्द कमी करणे हे एक आव्हानच असते. पण त्यावेळी माझा त्याला नाईलाज होता कारण समोरून तशीच अट होती. पण इथे मात्र हि अट आपणच आपल्याला घालत आहोत. कथा शंभर शब्दातच बनवायच्या नादात आपण त्या कथेवर अन्याय करत आहोत असे नाही का हे झाले.

इथे शतशब्दकथा लिहिलेल्या कोणालाही हे जाब विचारल्यासारखे नाहीये, किंवा त्यांनीच याची उत्तरे द्यावीत वा द्यावीतच असेही नाहीये. पण अश्या कथा लिहिण्याचा अनुभव घेतलेल्यांचे विचार जाणायला नक्कीच आवडतील. तसेच इतर वाचकांच्या विचारांचेही स्वागत आहे. मी माझे हे विचार एक वाचक म्हणूनच न मांडता, माझीही हा कथाप्रकार ट्राय करण्याबाबत बोटे शिवशिवू लागल्याने त्याआधी मनात उठलेले विचारांचे तरंग शांत करूया म्हटले.

एक सहज अजून मनात आले, कदाचित हे आता प्रायोगिक तत्वावर आहे, असावे, पण पुढे जाऊन हा प्रकार वाचकांमध्ये लोकप्रिय झाला आणि बरेच लेखकांना याने भुरळ घातली तर याने मराठी साहित्याला फायदा होईल का? कारण या प्रकारात सकस कथा बनण्याचे प्रमाण नक्कीच जास्त असेल..

किंवा यामुळे नुकसानच होईल का? कारण कित्येक कथाबीज ज्यावर सुंदर लघुकथा निर्माण होऊ शकतात त्या शतशब्दकथांमध्येच अडकतील.

चर्चेची अपेक्षा!

***- इथे जुन्या शतशब्दकथा शोधताना मला "तुमचा अभिषेक" या आयडीच्याही दोनचार कथा सापडल्या. काही लोकांना तो आयडी माझाच आहे असे वाटते. पण तसे ते नाहीये आणि काही लोकांच्या या अश्या वाटण्याचा मला काही फरक पडत नसला, तरी हे इथे मुद्दाम नमूद करतोय, कारण त्याचा प्रभाव या चर्चेवर पडण्याची शक्यता आहे जे मला इथे नकोय. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपल्याकडे अमुक एक स्कील आहे हे लोकांना दाखवायचा प्रकार , दुसरे काय!
म्हणजे कविता वृत्तबद्धं रचणे, अमुक छंदातच रचणे तसा एखादा गद्य प्रकार शंभर शब्दातच रचणे यात लोकांना स्कील वाटते.
पहिल्यांदा हा प्रकार इंग्रजीत गाजला(हण्ड्रेड वर्डस फ्लॅश फिक्शन नावाने) रुजला आणि आता सगळ्याच भाषांत रुजू पहातोय.
एक वाक्य कथा किंवा एक शब्दं कथा असाही प्रकार आहेच.

आता तुझे वाट्टेल त्या विषयावर बाफ काढण्याचे स्किल आहे तसेच मोजक्याच शब्दांमधे हवे ते मांडण्याची हातोटी काही जणांना जमते. हव्या तेव्हढ्या च शब्दात आपले मुद्दे समोरच्याला पोहोचवता येत असतील तर त्यात नुकसान नि नफा, अन्याय-न्याय कसला बघायचा ?

त्यापेक्षा लिहिताना स्वांत सुखाय लिहायचे कि इतरांनी वाचावे म्हणून हे ज्याने त्याने ठरवावे.

असामी,
मोजक्या शब्दांमध्ये मांडण्याचे कौशल्य हे आलेच यात. नाकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
पण शंभरच का? इतर आकडा का नाही? आणि नेमके शंभरच का? दोनचार कमी वा दोनचार जास्त का नाही? हे प्रश्न कायम आहेत, आण यावर भाष्य अपेक्षित आहे.

Liha 100 shabd katha pan lokanna kaltil ashya liha na? Kahi katha 10 vela vachalya tari samjt nahit .... Karam 100 shabdat lihhinyachya nadat tyatil arthch kadhun takala jato kadhi kadhi

याच विभ्गात कथालेखनावर एक बाफ आहे. तिथे तुम्हाला हा विषय मांडता आला असता, नवीन बाफ काढायची आवश्यकता नव्हती.>>>> जाउ द्या हो. कोणाला कसली नशा तर कोणाला कसली. ह्यांना बाफ काढण्याची आहे.

ती विश्वचषकाच्या धाग्याची लिंक येथे का दिली आहेत ते समजेल का?
>>
क्रिकेटचा एक धागा असताना विश्वचषकाचा धागा चालतो तर कथेचा एक धागा असताना शतशब्द कथेचा आणखी एक धागा का नाही चालत असं विचारायचं असेल त्यांना

क्रिकेटचा एक धागा असताना विश्वचषकाचा धागा चालतो तर कथेचा एक धागा असताना शतशब्द कथेचा आणखी एक धागा का नाही चालत असं विचारायचं असेल त्यांना
>>>>

एक्झॅक्टली, हाच मुद्द्दा, कमीत कमी शब्दांत Happy

अरे बाप रे!

असे असेल तर कोणत्याही धाग्याचा सिक्वेलसुद्धा निघू शकेल.

रीया, हल्ली तुला झाडावर संत्री उगवायच्या आधीच ती सोलण्याचे कसब अफाट जमू लागले आहे.

बाकी ऋन्मेष,

शतशब्दकथा वाचायला आपल्याला तरी फार आवडते. एक तर ती लगेच वाचून होते आणि दुसरे म्हणजे ती आवडली नाही तरी फार परिश्रम घेतले असा पश्चात्ताप होत नाही.

बेफिकीर, पॉईंट आहे
आणि याच धर्तीवर मग ती मला लिहायलाही आवडेल, अ‍ॅक्चुअली!
लगेच लिहून होईल आणि कोणाला आवडली नाही वा कोणी प्रतिसाद दिला नाही तरी फार परिश्रम फुकट गेले असे वाटणार नाही. Happy

अवांतर - झटपट शंभर शब्द कसे मोजायचे हे कोणी सांगू शकेल का?

असो,
पण या गप्पात मूळ मुद्द्याला (शंभर का आणि शंभरच का?) बगल देऊ नका. कोणीतरी त्यावरही लिहा.

ऋन्मेऽऽष - या प्रकाराला पाश्चिमात्य देशांत ड्रॅबल असे म्हणतात. ही कल्पना बर्मिंगहॅम युनिव्हर्सिटीच्या सायन्स फिक्शन सोसायटीने पुढे आणली. मूळात हे नाव मॉन्टी पायथॉनच्या बिग रेड बूक मधल्या एका खेळावरुन घेतले आहे जिथे जो कोणी पहिल्यांदा दिलेल्या थीमवर कथा लिहितो तो जिंकतो. बर्मिंगहॅम वाल्यांनीच १०० शब्दांची मर्यादा सेट केली. आता त्यांना १०० शब्दच पुरेसे का वाटले तर मॉन्टी पायथॉनच्या पुस्तकातल्या ज्या खेळावरुन हा फॉरमॅट उचलला तो खेळ वेळेत पूर्ण व्हावा म्हणून १०० शब्दांची मर्यादा पुस्तकात आहे. म्हणून या फॉरमॅटला १०० शब्दच असतात/ठरविले. त्यामुळे तुमच्या प्रश्नाचे/मूळ मुद्द्याचे उत्तर मॉन्टी पायथॉनच जाणे कोणी माबोकर नव्हे.

चार ओळींची कविता : चारोळी
(चौथी ओळ सुचत नसेल तर) तीन ओळींची कविता : त्रिवेणी

आपापल्या सोयीने नवनवीन शोध लावतात कलाकार! आता एकाने शतशब्दकथा सुरू केल्यात तर तुम्ही उरलेल्या पंच शत वै. आपापल्या सोयीने सुरू करायला हरकत नाही... नवा साहीत्यप्रकार रूजू होईल तुमच्या नावे! Happy

असामी +१
हल्ली तुला झाडावर संत्री उगवायच्या आधीच ती सोलण्याचे कसब अफाट जमू लागले आहे.>> Lol अगदी अगदी! त वरून ताकभात तसं व्हॅरीएबल वरून पोरगी अख्खं प्रोग्रॅम लॉजिक एक्सप्लेन करतेय!

पायस,
छान आणि उपयुक्त माहिती, धन्यवाद

हि पोस्ट वाचताना दोन गोष्टी डोक्यात आल्या.

१) त्या खेळात शंभर शब्दांची मर्यादा, म्हणजे १०० पर्यंत असे असावे का एक्झॅक्ट शंभर..

२) समोरून दिलेल्या थीमवर कथा वा निबंध लिहिणे वेगळे आणि आपल्या डोक्यातील थीम शंभर शब्दांत बसवणे वेगळे.

असो, वरच्या पोस्टीतले कीवर्ड घेऊन गूगाळून बघतो..

..

आता एकाने शतशब्दकथा सुरू केल्यात तर तुम्ही उरलेल्या पंच शत वै. आपापल्या सोयीने सुरू करायला हरकत नाही... नवा साहीत्यप्रकार रूजू होईल तुमच्या नावे!
>>>>>>>
ड्रीमगर्ल, तुम्ही माझ्या माबोवरील वावराला एक हेतू दिलात, नक्की विचार करेन, कोपरापासून धन्यवाद Happy

ड्रीमगर्ल, तुम्ही माझ्या माबोवरील वावराला एक हेतू दिलात, नक्की विचार करेन, कोपरापासून धन्यवाद >> आता नवा साहित्य प्रकार उजेडात आणा (आणि इतर धागे कमी करा) म्हणजे आमच्या माबोवरील वावराचे हेतू सफल होतील! अ‍ॅडव्हान्स मध्ये कोपरापासून धन्यवाद Happy

इंग्रजी मध्ये स्मॉलेस्ट स्टोरीज आहेत ६ शब्दांच्या! आठवणारी, आवडणारी स्टोरी... For sale: baby shoes, never worn. - Ernest Hemingway

प्रिय ऋन्मेऽऽष,
१. शंभर शब्दात कथा जास्तीत जास्त प्रभाव पाडणारी कथा लिहायची. झालं.. ह्यावर कसली आलीये चर्चा?
२. शंभरच का? ह्याच उत्तर १०० मीटर धावण्याची स्पर्धा १०५ मीटर किंवा १०८ मीटर धावण्याची का नसते ह्यासारखेच आहे. काहीतरी एक परिमाण ठरवायचं ज्यात "चॅलेंज" असेल, म्हणुन १००.
३. हजारो शब्द लिहुन जे सांगता येतं, तेच कमी शब्दातही सांगता येतं किंवा हजारो शब्द लिहुन जे सांगता येत नाही, ते अतिशय कमी शब्दातही पटकन सांगता येतं कधी कधी. म्हणून शतशब्दकथा!
४. तुला लिहायचे असेल २००/ ५०० / १००० / १०००० शब्दात, तर लिही की लेका. कोण नाही म्हणतयं? (तसही तू लिहितोसच) एवढाच तुझ्या कथेवर अन्याय होत असेल तर १०० शब्दात कोंबायला जाऊ नको.
५. आणि "कोपरापासून धन्यवाद" ?? अरे काय हे? किती वाट लावशील मराठी भाषेची? कोपरापासुन 'नमस्कार' करतात आणि तो सुद्धा जेव्हा समोरचा त्याच्या अकलेचे तारे तोडून दाखवतो तेव्हा उपरोध म्हणून! उदाहरणार्थ, तू दर दिवसाआड माबोवर जे काही धागे पाडतोस त्याबद्दल तुला कोपरापासुन नमस्कार करावा लागेल (इथे दिवे घे!)..
रच्याकने - मला शतशब्दकथा हा प्रकार फार आवडतो. काही काही कथा फारच क्रिएटिव्ह वाटतात.

काही दिवसांनी मराठीत साष्टांग निषेध ही संज्ञा अस्तित्त्वात येईल.

सर्वांगीण आंघोळ केली
नाकाच्या शेंड्यावर दु:ख होते
कानांत पाणी येईस्तोवर हसलो
उचलले कोपर लावले जिभेला
ते दृश्य पाहून लिव्हर धडधडत होती
आखरी हिचकी तेरी नाभीपे आये, मौतभी मै शायराना चाहता हूं

<< तुला लिहायचे असेल २००/ ५०० / १००० / १०००० शब्दात, तर लिही की लेका. कोण नाही म्हणतयं? (तसही तू लिहितोसच) >>

हे वाचून शिरीष कणेकरांच्या फिल्लमबाजीची आठवण झाली. त्यात एक विधान असं आहे.

"नाही कुणीही गावं, माझं काही म्हणणं नाही; अगदी बप्पी लाहिरीनी देखील गावं. गावं काय? गातोच की तो, भितो की काय कुणाला?"

शंभरच का? ह्याच उत्तर १०० मीटर धावण्याची स्पर्धा १०५ मीटर किंवा १०८ मीटर धावण्याची का नसते ह्यासारखेच आहे.
>>>>>>>>>>>
ही तुलना नाही पटली.
किंबहुना एकवेळ असे बोलता येईल की १०० मीटर धावल्यावर स्पर्धकाने ब्रेक मारत तिथेच थांबायचे, एक जरी पाऊल पुढे टाकले तर तो बाद. थोडक्यात, सांगायचा मुद्दा हा की अननेसेसरी रिस्ट्रीक्शन !

@ कोपरापासून धन्यवाद,
यात कोपरापासून नमस्कारसारखा उपरोध वगैरे न शोधता विनम्रतेचा अँगलच घ्या. त्याच मूडमध्ये जो शब्द आठवला तो मांडला. बाकी उपरोधात्मक बोलणे वा टोमणे मारणे माझी स्टाईल नाहीये. त्यापेक्षा मुद्देसूद (वा निरर्थक) वाद घालेन. Happy

बेफिकीर Proud

थोडासा विषयाला सोडून आजून एक संदर्भ येथे देत आहे. जर आपल्या पैकी कोणी 19८4 हे पुस्तक वाचले असल्यास त्यात ह्या स्वरुपाचा संदर्भ आहे. साम्यवादी राजवटीत कुठल्याही व्यक्तीला आपले विचार व्यक्त करायला १०० शब्द पुरेसे आहेत अशी संकल्पना यात मांडली आहे.

साम्यवादी राजवटीत कुठल्याही व्यक्तीला आपले विचार व्यक्त करायला १०० शब्द पुरेसे आहेत अशी संकल्पना यात मांडली आहे.
>>>> ठिकसे समजले नाही, उलगडाल का?

बाकी कोपरापासून धन्यवादला हसू नका रे...
मनापासून धन्यवाद असतेच ना..
तसेच हे मनाच्या एका कोपर्‍यातून धन्यवाद Happy

>>किंबहुना एकवेळ असे बोलता येईल की १०० मीटर धावल्यावर स्पर्धकाने ब्रेक मारत तिथेच थांबायचे, एक जरी पाऊल पुढे टाकले तर तो बाद. थोडक्यात, सांगायचा मुद्दा हा की अननेसेसरी रिस्ट्रीक्शन !>>
परत एकदा बेसिक मधे वांदा होतोय असं नाही का वाटत? असा विचार कर कि १०० मीटर धावायच्या स्पर्धेत धावणारा पुढे २००, ३०० मीटर पर्यंत तसाच सुसाट धावत गेला तरी त्यानी १०० मीटर धावायला किती वेळ घेतला हेच बघितलं जाईल. पुढच्या धावण्याला काही अर्थ उरणार नाही. १०० मीटर पुढे एकही पाऊल न टाकण्याचं रिस्ट्रीक्शन नाहिच आहे. पण जी काही कमाल करून दाखवायची आहे ती १०० मीटर मधेच करायची. तुमची ५००० मीटर धावायची इच्छा / क्षमता असेल तर मॅरेथॉन धावा कि खुशाल.
थोडक्यात ही काही परिक्षा नाही कि ३ तासाच्या वर लिहायला वेळ मिळणार नाही आणि त्यापुढे "बाद". इथे शब्दसंख्येची मर्यादा लेखकाचे कौशल्य बघण्यासाठी आहे, त्याच्या लिखाणावर मर्यादा म्हणुन नाही.

आणि जाता जाता, ते "कोपरापासुन धन्यवाद".. तुझा "विनम्रतेचा अँगल" कळला रे लगेच, बाकि काही स्टाईल/ उपरोधात्मक बोलणे वगैरे शोधतच नाही आहे त्यात मी. मुळात शब्दप्रयोग चुकला हेच फक्त सांगायचं होतं, ते सविस्तर पणे सांगितलं एवढच.

शुभेच्छा...

शब्दसंख्येची मर्यादा लेखकाचे कौशल्य बघण्यासाठी आहे, >>> एक्झॅक्टली, हाच तर मुद्दा आहे, एक लेखक म्हणून तुमचे कौशल्य आपल्या मनातील भाव आणि विचार वाचकापर्यत समर्थपणे पोहोचवणे यात आहे की ते बरोबर शंभर शब्दांतच बसवून पोहोचवणे यात आहे. अर्थात कमीत कमी शब्दांत विचार पोहोचवणे यात कौशल्य आहे पण मुद्दा आहे त्याला एक्झॅक्ट १०० शब्दांची मर्यादा देणे. तसेच यात जर कथा ९५ शब्दांतच संपत असेल तर त्यात ५ शब्दांची भर घालण्यात कौशल्य उरत नाही.

१०० शब्दात सर्व विचार मांडण्याची संकल्पना कळण्या साठी हे पुस्तक वाचणे आवश्यक आहे. तरी सुध्दा जमेल तसे सांगायचा प्रयत्न करतो.

ह्या पुस्तकात वर्णन केल्या प्रमाणे पूर्ण जग ३ महासत्तां मधे विभागले गेलेले आहे. तीन्ही सत्तांमधे साम्यवादी राजवट आहे.

तीन्ही सत्ता व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी करण्यासाठी नवनवे उपाय शोधून काढत असतात. त्यातील एक उपाय म्हणजे माणसाची विचार शक्तिच खुरटवायची. हे साध्य करण्यासाठी राज्यकर्ते एक हुकूम काढतात. त्या हुकूमा प्रमाणे प्रत्येक व्यक्तीने आपले विचार मांडण्या साठी सरकार मान्य शब्दकोषाचाच वापर करणे बंधनकारक असते आणि त्या कोषात फक्त १०० शब्दच असतात.

मला नाही वाटत कि ९५ शब्द झाल्यास ५ शब्दांची भर घालावी लागते. ९५ वर थांबल्यासही चालेल. जास्तीत जास्त १०० शब्दात लिहिण्याचे बंधन आहे. १०५ शब्द झाल्यानी काही लेखकाची प्रतिभा कमी होत नाही.

१०० ह्या आकड्यावर एवढं फिक्सेट न होता कमीत कमी शब्द असा विचार केल्यास पटायला सोपं जाईल कदाचित.

>एक लेखक म्हणून तुमचे कौशल्य आपल्या मनातील भाव आणि विचार वाचकापर्यत समर्थपणे पोहोचवणे यात आहे की ते बरोबर शंभर शब्दांतच बसवून पोहोचवणे यात आहे> अर्थात आपल्या मनातील भाव आणि विचार वाचकापर्यत समर्थपणे पोहोचवणे ह्यातच आहे. १०० शब्दांची मर्यादा घालून ते फक्त अजून आव्हानात्मक केलय इतकच. लेखकाला वाटत असेल कि १०० शब्दात मनातलं नीट नाही सांगता येत आहे तर त्यानी तसं करायला जाऊ नये. शेवटी लेखकाने आपल्याला आवडेल व आपलं समाधान होईल तसं लिहावं. कोणला ते कमी शब्दात लिहून जमतं तर कोणाला नाही. कमी शब्दात जमत नाही म्हणून एवढं डिस्टर्ब होऊ नये.
असो. आपण आता वर्तुळात बोलतोय असं वाटतय. तेव्हा हेमाशेपो.

आणि त्या कोषात फक्त १०० शब्दच असतात. >>> ईंटरेस्टींग आहे!

चौकट राजा ओके Happy
खालील विधानाशी सहमत,
<<< लेखकाला वाटत असेल कि १०० शब्दात मनातलं नीट नाही सांगता येत आहे तर त्यानी तसं करायला जाऊ नये. >>> हेच धोक्याचे वळण दिसल्याने वा शंका आल्याने खरे तर या धाग्याचा जन्म झाला. एखादी नवी कल्पना वा विचार लेखकाच्या डोक्यात येतानाच सोबत आता हा शंभर शब्दात कसा बसवायचा हा विचारही सोबत येऊ नये, अशी या प्रकाराची चटक कोणाला लागू नये..

अच्छा म्हणजे त्या कुठल्या बर्मिंगहॅम युनिव्हर्सिटीत कधीकाळी कोण्या एका स्पर्धेची गरज होती म्हणून त्यांनी शंभर का काय शब्दांची मर्यादा घातली. म्हणून आपण पण येडे होऊन काय लिहितोय हे न पाहता किती लिहितोय ह्यावर लक्ष देऊन लिहायला लागलो. स्पर्धा असल्यासारखे. इतकेच काय तर त्याला नवीन कथाप्रकार असे समजू लागलो. आणि ज्याला हे जमले त्याला म्हणे मराठी साहित्यातला नवीन कथा प्रकार जमला?

त्या बर्मिंगहॅम युनिव्हर्सिटीतले ते स्पर्धक अशा कथा लिहिताना कच्चे बीफ खात लिहित होते असे पण कुणीतरी सांगा रे ह्यांना जरा. बघूच जरा मराठी साहित्यातली लिहिण्याची नवीन कला नावाखाली काय खाऊन लिहायला बसतात.

शतशब्दकथा वाचायला आपल्याला तरी फार आवडते. एक तर ती लगेच वाचून होते आणि दुसरे म्हणजे ती आवडली नाही तरी फार परिश्रम घेतले असा पश्चात्ताप होत नाही.
Submitted by बेफ़िकीर on 23 February, 2015 - 03:51

+100

आहो जुना धागा आहे तो. तेव्हा जे माझे मत होते ते आता बदलले आहे. तेव्हा मला हा शंभर शबदांचा अट्टाहास वाटायचा. कालांतराने शंभरीचा महिमा समजला !

आपल्याकडे अमुक एक स्कील आहे हे लोकांना दाखवायचा प्रकार , दुसरे काय!
म्हणजे कविता वृत्तबद्धं रचणे, अमुक छंदातच रचणे तसा एखादा गद्य प्रकार शंभर शब्दातच रचणे यात लोकांना स्कील वाटते.
पहिल्यांदा हा प्रकार इंग्रजीत गाजला(हण्ड्रेड वर्डस फ्लॅश फिक्शन नावाने) रुजला आणि आता सगळ्याच भाषांत रुजू पहातोय.
+१