माझे बागकाम

Submitted by सुभाषिणी on 26 January, 2015 - 10:40

माझे बागकाम
मी माझ्या बागेतील झाडांचे फोटो मा. बो. वर टाकले त्याला तुम्ही सगळ्यांनी छान प्रतिसाद दिलात. त्या बद्दल मनापासुन आभार. अता बागकाम कसे केले विषेश्तः ओला कचर्याचा वापर कसा केला/करते या बद्द्ल मा.बो. करांनी बरीच ऊत्सुकता दाखवली. त्यांच्यासाठी माझे अनुभव शेअर करते.
माझी बाग अवघ्या तीन रोपांपासुन सुरु झाली.त्यावेळी ओला कचरावापरुन बाग करणे ही कल्प्ना फार प्रचलीत नव्हती.तेंव्हा मी तीन कुंड्या आणल्या.रोजचा स्वैपाकाचा कचरा आज एका कुंडीत उद्या दुस्रर्या व परवा तीसर्या कुंडीत चौथ्या दिवशी पुन्हा पहिली. असे करत गेले. ज्या कुंडीत कचरा टाकायचा आहे त्यातला कचरा खालीवर ढवळत असे व मग नवा कचरा टकत असे.विरजण काहीच टाकत नव्हते. कुंडी भरली की रोप लावुन मग थोडा मातीचा थर देइ.काळ्जी फक्त एवढीच घेइ की कचरा फार ओला किंवा फार कोरडा राहुनये. त्यासाठी गरज वाटल्यास थोडे पाणी शिंपड्त असे. सुरवातीलालाल गुलाब,मोगरा आणि कढीपत्ता अशी तीनच झाडे होती. ती छान जोमाने वाढली. मग आत्मविश्वास आला आणि मग वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात केली. एक गोष्ट म्हणजे मी यामधे शीजवलेले अन्न अजीबात घालत नसे. त्यामुळे कचरा कुजण्याच्या प्रक्रीयेत अडथळा येतो असे मला जाणवले.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काव्या.............फळांच्या साली, भाज्यांचे देठ, साली हा तो ओला (न शिजवलेला) कचरा.
सुभाषिणी इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
मीही ओल्या कचर्‍यापासून खत करते. थोडी फार बाग फुलवते.
आमच्या घरातून फक्त कोरडा कचरा...प्लॅस्टिक, थर्माकोल इ.इ. कचरा बाहेर जातो.

सायली धन्स. दरवेळी चाफ्याचे फुल पाहीले की तुमचे दोन तोळ्याचे फुल आठवते. काव्व्या मानुशींनी सांगीतले तोच म्हणजे भाज्यांची देठे, फळांच्या साली,भाजलेल्या शेंगांची साले इ.मानुशी,डी विनिता तुम्हीपण ओला कचरा उपयोगात आणता खुप छान.मानुशी कोर्डा कचरा काही प्रमाणात बागेसाठी वापरते. त्यावरही माझ्या आय्डीया शेअर करीन