महामार्गावरील हॉटेल्स कडुन आपल्या अपेक्षा

Submitted by _हर्षद_ on 22 January, 2015 - 01:52

आपण बर्‍याच वेळेस दुरचा प्रवास करतो. अश्यावेळेस महामार्गावरील हॉटेल्स / रेस्टॉरंट्स वर खाण्यापिण्यासाठी , एक ब्रेक म्हनुन थांबतो. महामार्गावर थांबताना हॉटेल्स / रेस्टॉरंट्स निवडताना तुमच्या काय अपेक्षा असतात?
उदाहरणार्थ
१. इतर व्यवस्था
म्हातारे आणि अपंगांसाठी स्वच्छतागृहाची सोय
फीडींग आणि बेबी रुम
२. मेन्यु
इथे मला आपली मदत हवी आहे. तुम्हाला कोणकोणते पदार्थ खायला आवडतील.
इतर सोपे / बजेटमधले पण हॉटेल्स मधे सहजी न मिळणारे पदार्थ नाष्ट्यासाठी जेवणासाठी आणि वेगवेगळे पेय सुचवा प्लिज.
व्हेज नॉनव्हे़ज दोन्ही ही चालतील. पण दारु नको.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला वाटतं अनेक ठिकाणी पेट्रोलपंप आणि हॉटेलं हे एकाच लहानशा परिसरात असतं. उदाहरणतः मुंबई-पुणे महामार्गावरचे फूड मॉल. अशी आस्थापने भारतभर असणे गरजचे आहे. अनेक ठिकाणी असेलच. बाकी वरच्या मजकूराशी सहमत.

लै किमति लाव्त्याती राव …. मागे एकदा नगर - पुणे हायवे वरच्या एका धाब्यावर थांबलो होतोत तर नुसता चिप्स चा पुडा २० रुपायाला मिळाला ….

लोकल ऐरीयातल्या फेमस डिशेस ठेऊ शकता. जस की कोल्हापुरी चिकन / मटन किंवा नगरच काळ्या मसाल्याच चिकन / मटन.
नाष्ट्यासाठी फोडणीची पोळी / भाजणीचे थालीपीठ / हुलग्याचे किंवा हुरड्याचे शेंगुळे / वरणफळ

मोठे प्रवास करताना, मुक्काम करता येइल अशी सेफ मोटेल्स पण असावित अस वाटत.
बाकी , स्वच्छ, अन वाजवी दरातील खाद्यपदार्थ, स्वच्छ अन सुरक्षित स्वच्छतागृह, ह्यापेक्षा माङण लई नै. Happy

.

स्वच्छ म्हणता येतील अशी स्वच्छतागृहे! आणि रुचकर अन्न.

बाकी तुम्ही असं काही हॉटेल काढण्याचा विचार करत आहात कां?

महामार्गावरील हॉटेल्स कडुन आपल्या अपेक्षा

१. इतर व्यवस्था
म्हातारे आणि अपंगांसाठी स्वच्छतागृहाची सोय
फीडींग आणि बेबी रुम
२. मेन्यु
इथे मला आपली मदत हवी आहे. तुम्हाला कोणकोणते पदार्थ खायला आवडतील.
इतर सोपे / बजेटमधले पण हॉटेल्स मधे सहजी न मिळणारे पदार्थ नाष्ट्यासाठी जेवणासाठी आणि वेगवेगळे पेय सुचवा प्लिज.>>>>>>>>>> माफ करा पण तुम्ही एखादे हॉटेल बांधणार आहत का हायवेवर ...खरच वर सज्जेस्ट्ट केल्याप्रमाणे गोष्टी असाव्यात खऱ्या हायवेवरिल एखाद्या हॉटेलात Happy

अशी आस्थापने भारतभर असणे गरजचे आहे>> अहो आणि आहेत सुद्धा. हायवे ऑन माय प्लेट कार्यक्रमात दाखिवतात कि.

इतर अन्ना बरोबरच. अगदी बेबीज व छोट्या मुलांसाठी:

१) गरम सकस दूध - पावडरीचे नव्हे.
२) उकळलेले गरम पाणी व सिरीलॅकचे डबे/ पेडिआ शुअर चे डबे.
३) मउ गरम भात व वरण
४) अगदी कमी तिखटाचे पदार्थ पराठे / पोळी भाजी.
५) ताजा ब्रेड व बटर/ जॅम सँडविच.
५) ताजी व उत्तम फळे.

हे एवढ्या साठी की मोठी माणसे खाण्यात बदल सहन करू शकतात पण प्रवासात मुलांचे व म्हातार्‍यांचे हाल होतात बरोबर अन्न मिळाले नाहीतर. तसेच मातांची पण ओढाताण होते. ती होउ नये.

तुमचं स्वतःचं असणार आहे का?

असं असेल तर-
महामार्गाजवळच्या हॉटेलकडून अपेक्षा-
१.स्वच्छ टॉयलेटस- पुणे हैद्राबाद रोडवर एका ठिकाणी एक कामत नावाचे हॉटेल होते तिथे हा एकमेव क्रायटेरिया पूर्णं व्हायचा. बाकी खाण्यापिण्याच्या नावाने .. पण आम्ही थांबायचो तिथे.
मुलांना आणि वृद्धांनाही बाहेरच्या बाहेर फ्रेश व्हायची सोय होती

२. चटकन खाण्याजोगे किंवा तयार मिळणारे पदार्थं- कितीही म्हणा इडली डोसा वडापाव समोसा याला पर्याय नाही.
यात जर ईडली फ्लफी आणि चटणी छान असेल तर उत्तम. आंध्रात पेट्रोल स्टेशनजवळ 'अपना घर' नावाची हॉटेल चैन आहे तिथे बर्याचदा ईडली डोसा खायला थांबतो.

३. चहा- हा मस्तं उकळलेला द्या बुवा
४. कॉफी- झक्कास फेसवाली
५. पैसे देण्याची सोय- यावेळी आग्रा एक्सप्रेस हायवेवर एका ठिकाणी पाहिलं. टोकन सिस्टीम, एकाच ठिकाणी टोकन घ्यायचं.
आणि त्या परिसरात चार्पाच छोटी छोटी हॉटेल्स. तिथे जाऊन त्यात्या डिश घ्यायच्या.
नेहमी खाणार्यांना ते माहित. पण मी एक चहा, एक फ्राईड राईस, एक छोले राईस आणि एक आईस्क्रीम अशी ऑर्डर दिली तर मला अक्षरशः चार ठिकाणी नाचून आणि मुलाला आणि नवर्याला एका ठिकाणी बसवून प्लेटस आणाव्या लागल्या.
६. मुलांसाठी एंटरटेनमेंट.- हल्ली प्रत्येक महामार्गाजवळील धाब्यावर किमान बाग्/घसरगुंडी/मेकॅनो/झोपाळा असं असतं.
७.कचरापेट्या
बाकी काही पदार्थं दिलेत तरी महामार्गावरची हॉटेल्स मूलतः थोडीशी विश्रांती/ वैयक्तिक स्वच्छ्ता/आणि भूकेसाठी चटकन मिळणारे पदार्थं देणारे स्वच्छ ठिकाण असावे अशीच अपेक्षा.

Sorry for typing in English, but couldn't stop myself. Early this month when we went to Mahabaleshwar, we took a brief stop at ShriRam VadaPaav. I really don't want to comment on food as everyone has a different taste but had to use toilet for my little daughter and it was unbelievably unclean. Specially the western toilets which are often used by small children and senior citizens. The owner of this place, is minting money but he didn't feel clean toilets is his responsibility towards customers. If not as a free service at least as a paid service! Is it expecting something too much??
So my request would be for toilets! we can carry food not toilets!!

होटेल्सपेक्षा एखादे स्वच्छ सुंदर सुलभ स्वच्छतागृह सुरू करून तिथे पेड सर्विस दिल्यास चांगली कमाई होईल असा अंदाज.
आणि मग ते स्वच्छतागृह लोकप्रिय झाले की आजूबाजुने हॉटेल थाटावे Happy

स्वच्छ अन सुरक्षित स्वच्छतागृह, , भरपूर पाणी असावे & त्या सांडपाण्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावलेली असावी. अगदी त्यासाठी पैसे मोजावे लागले तरी चालेल
दारू बिअर नसावी
साधे गरम अन्नपदार्थ. खूप सारे ऑप्शन नसले तरी चालतील.

१. स्वच्छ परिसर
२. स्वच्छतागृहे (मेन्टेन्ड - हवे तर चार्ज करा पण मेन्टेन्ड ठेवा - लोक पैसे द्यायला तयार होतील)
३. पार्किंग प्लेस मुबलक
४. सी सी टीव्ही कव्हरेज सर्वत्र
५. सामान सुरक्षित राहावे ह्यासाठी (शक्य असल्यास) एक वेगळा गुरखा
६. महत्वाच्या गोष्टींची माहिती असलेला फलक! जसे जवळचे रुग्णालय, जवळचा पेट्रोल पंप, जवळचे टूरिस्ट स्पॉट्स, जवळचे पोलिस स्टेशन, जवळचे गाव वगैरे
७. लहान मुलांसाठी आवश्यक अश्या व्यवस्था
८. प्रथमोपचार पेटी
९. मद्यपानास व धूम्रपानास पूर्ण बंदी करणे व ती अंंमलात आणणे
१०. मेन्यू - खाली मेन्यूबाबत लिहीत आहे.

सर्वत्र तेच तेच प्रकार मिळतात आणि पब्लिक त्या प्रकारांना कंटाळलेले असते. मुख्य म्हणजे आजकाल हेल्दी डाएटबाबतचा अवेअरनेस खूप वाढलेला आहे. त्यामुळे खूप वेगळ्याच डिशेश ठेवाव्यात!

१. ताज्या फळांचे काप - ग्राहकासमोरच कापून देणे
२. ताजे सॅलड - हेही ग्राहकासमोर कापून देणे
३. उसळपाव हे नांव जुने वाटेल पण अनेक कढधान्यांची उसळ एकत्र करणे व त्याची माहिती एका फलकावर!
४. पराठे (सोबत दही, लोणचे, एखादी कोशिंबीर वगैरे, अर्थातच लिमिटेड आणि चार्ज्ड)
५. ग्रीन टी / ताक / नारळपाणी / गाजर-टोमॅटोचे ज्यूस
६. हुरड्यासारखा एखादा पदार्थ

स्वच्छतेबाबतः

१. सर्व कर्मचार्‍यांच्या हातात ग्लोव्ह्ज, डोक्यावर टोप्या व युनिफॉर्म आवश्यक!
२. भटारखान्यातील लाईव्ह चित्रण बाहेर दाखवणे शक्य असल्यास फारच उत्तम!
३. पाण्याबाबत प्रचंड काळजी घेणे व तिची माहिती पुरवणे अत्यावश्यक
४. कोणताही पाळीव प्राणी आसपास नसावा.
५. हायवेवरील धूळ हॉटेलात येऊ नये
६. माश्या, किडे अजिबात दिसणार नाहीत ह्याची दक्षता!

इतके सगळे वाचून मला शिव्या देऊ नका Proud

(अर्थात - ह्या सगळ्याची कॉस्ट पदार्थांवर लोड केली तरी आजकाल लोक गुणवत्तेसाठी पैसे द्यायला तयार असतात). Happy

३. उसळपाव हे नांव जुने वाटेल
>>>>
यात पावाच्या जागी ब्राऊन ब्रेड वापरू शकतो.

पाळीव प्राणी नसावा ह्याला अनुमोदन . आजूबाजूला भटकी कुत्री , मांजरी असतील तरी त्यांनी आत येवू नये याची काळजी घ्यावी. जेवताना पायात येणारे हे प्राणी नको वाटतात.

धन्यवाद सगळ्यांना.
थोडीशी पार्श्वभुमी : माघच्या वर्षी मार्च महीन्यात जोरदार गारपीट झाली आणि आमच्या सगळ्या फळबागा उध्वस्त झाल्या. हातात आलेला बहार तर गेलाच पण २.५ वर्ष राखलेली झाड पण गेली. खुप नुकसान झाल. त्यातुन सावरुन परत पावसाळ्यात पेर केली तर पाउसच उशिरा झाला आणि केलेली धुळपेर वाया गेली. दुबार पेर करुन कांदा आणि गहु चांगले आले होते तर नुकत्याच झालेल्या अवकाळीने परत सगळ गेल. सध्या शेतात काहीच नाहीये. झालेल्या नुकसानीमुळ काही करण्याची इच्छापण नाहीये. पण ते नुकसान भरुन काढण्यासाठी आम्ही इतर पर्यायांचा विचार करत आहोत. त्यात हॉटेल हा येक पर्याय समोर आला. पण जर वेगळ काही दिल तरच हॉटेलला रिस्पॉन्स मिळु शकेल. म्हनुन इथ तुमची मत विचारलीत.
परत एकदा खुप खुप धन्यवाद. जर मी हॉटेल चालु केलच तर वरील मुद्दे नक्की लक्षात घेईल आणि अमलात कशे आणता येईल ते पाहिल.
वि. सु. : मायबोली गटगसाठी एक्स्ट्रा चार्जेस आकारले जातिल Proud

हर्षद, नुकसानीबद्दल वाचून वाईट वाटले. हॉटेल लवकर चालू करा. त्यासाठी मनापासून शुभेच्छा.

सर्वांनी लिहिलंच आहे पण तरीही पुन्ह एकवार लिहिते, स्वच्छ वॉशरूम्स! हायवेवर फिरताना लागणारी सर्वात आवश्यक गोष्ट. इथली वॉशरूम्स स्वच्छ आहेत म्हटलं की लोकं नक्की थांबतात इतकंच काय पण अमुक रस्त्यावर चांगली वॉशरूमस असलेली हॉटेल्स एकमेकांना सांगून ठेवतात.

जेवणासाठी थाळी ऑप्शन ठेवाच. त्याखेरीज लहान मुलांसाठी दूधभात वरणभात असे ऑप्शन ठेवा. त्यासाठी मऊ गुरगुटा भात बनवू शकलात तर उत्तम. बर्‍याच्दा हॉटेलमधला फडफडीत भात मुलं खाऊ शकत नाहीत. त्याखेरीज मुलांसाठी थोडीफर खेळणी (उदा, झोका अथवा घसरगुंडी) शिवाय गावरान मेवा (उदा. काजू, फळं, चटण्या पापड) इत्यादि विकत ठेवू शकलात तर ग्राहक नक्की विकत घेतात.

हर्षद तुम्हाला अनेक शुभेच्छा. झालेले नुकसान लगेच भरुन येणार नाही, पण नवीन सुरुवातीसाठी तरी प्रयत्न करताय हे बघुन बरे वाटले.

बाकी अपेक्षा आणी सूचना सगळ्यानी उत्तम रीत्या लिहील्या आहेत.

हर्षद
नुकसान झाल्याचे कळाल्याने वाईट वाटले.

पन नुकसानीने खचून न जाता नवी उभारी घेत आहात हे सकारात्मक वाटले. या आधी हा धागा पाहीला होता, पण कशासाठी माहीती मागवली जातेय असं वाटून प्रतिसाद दिला नव्हता. माझ्या थोड्याच अपेक्षा आहेत.

हॉटेल महाराष्ट्रात असेल तर महाराष्ट्रीयन जेवण मिळायला हवं. पुण्यातल्या अभिरुची किंवा गोखले मळ्याची थीम पकडून (शेतातच असल्याने) झाडाखाली बसून गावरान मेवा खाल्ल्याचा फील यावा. आजूबाजूने पाटाचे पाणी असावे, त्यात पाय बुडवून फ्रेश होण्याची संधी मिळावी. पंजाबी डिशेस नकोतच. हिरव्या मिरचीचा खर्डा आणि बाजरीची भाकरी, तांदळाची भाकरी + पिठलं + लाल ठेचा + कांदा असा मेन्यू. शेवग्याच्या शेंगांची आमटी, भात. शेंगदाण्याची चटणी. सूप वगैरे काही नको. माडगं किंवा मग साऊथचं रस्सम ठेवलं तर चालेल. गावरान उसळ, गोड खाणा-यांसाठी गावाकडे बनवतात तो लापशी हा गव्हाचा पदार्थ. इ. इ. (भावना पोहोचल्या असतील तर आवरतं घेते ).

थोडी जागा असेल तर मागच्या बाजूला पशूधन असावं. आमच्या मुलांना पहायला मिळत नाही. दूध कसं काढतात, कोंबडीची पिल्लं, बक-या हे त्यांना पहायला मिळावं. त्यांच्याबरोबर खेळता यावं.

हल्ली रस्तोरस्ती एकाच छापाचे ढाबे आणि हॉटेल्स असतातच. जरा हटके (खरं म्हणजे आपल्या मातीतली) थीम आवडतेय का पहा.

हिरव्या मिरचीचा खर्डा आणि बाजरीची भाकरी, तांदळाची भाकरी + पिठलं + लाल ठेचा + कांदा असा मेन्यू. शेवग्याच्या शेंगांची आमटी, भात. शेंगदाण्याची चटणी.>>

तोंपासू!

पुणे हैद्राबाद हायवेवर अशी महाराष्ट्रीयन थाळी देणारी मस्तं हॉटेल्स आहेत.
काहीतर अख्ख्या सोलापूरात वर्ल्डफेमस आहेत.
तिथे कवडीचं दही, दाण्याची चटणी, सोलापूरी धपाटे, दाण्याची पोळी, वांग्याचं भरित आणि पिठलं-भाकरी असा थाट स्पेशल थाळीत असतो.
स्वतः ड्रायविंग करत असाल तर खाऊ नये. खूप सुस्ती येते नंतर.

स्वतः ड्रायविंग करत असाल तर खाऊ नये. खूप सुस्ती येते नंतर. >>> धन्यवाद. उपयुक्त टीप.
कोल्हापूर गोवा हायवे वर आहेत का अशी मोटेल्स ?

नव्या आगामी हॉटेलसाठी शुभेच्छा.

शक्य असल्यास वर्तमानपत्रांचाही स्टॉल टाकू शकता.
लोकांना मोबाईल चार्जिंगची सोय देऊ शकता.
वेफर बिस्किटच्या पाकिटांचा खप हल्ली जास्त असतो.
त्यातही चोको चॉकलेट फ्लेवर वा क्रिमची बिस्किटे जी चहात बुडवून खायची गरज नाही अशी बिस्किटे प्रवासात सुकी खायला घेतली जातात.
चहावरून आठवले, ती फक्कड असली की गर्दी वाढते आणि गर्दी वाढली की चर्चा होत गर्दी गर्दीला खेचते.
मांसाहार असला तरी त्याचे प्रदर्शन मांडणे किंवा त्याचे बोर्ड लावत हायलाईट करने टाळा.

स्चच्छतागृह सुरूवातीला चांगलीच असतात, पण आपल्याकडे बहुजन समाजाला ती वापरून देखील स्वच्छ कशी ठेवावी हे कळत नाही, त्यामुळे २/३ महिन्यात अशक्य होतात. स्चच्छतागृह तासा-तासाला साफ ठेवण्यासाठी काही सोय कराल (पगारी माणूस नेमाल आणि त्याच्याकडून नीट काम करून घ्याल) तरच ते तसे स्वच्छ राहील...

स्वछतगृहाबद्दल सर्वाना अनुमोदन.

सर्वच सुचना मस्त आहेत.

भटारखाना मात्र ऐसपैस व मोकळी हवा खेळत असलेला व प्रकाशमय असावाच. म्हणजे तिथे काम करणारे मनापासुन काम करतील.
एका हॉटेलातील एक भटारखाना 'चुकुन' पहाण्यात आला गेल्या वर्षी. आकार लहान, दाटीवाटीने लोक काम करताहेत. तिथे एकही खिडकी नाही, वेंटिलेशनच नाही. अत्यंत अंधारा. मंद दिवे लावलेला, म्हणजे प्रकाश पण जेमतेम काम करायला दिसेल असा. तिथेच त्यांची बाथरुम, अत्यंत घाणेरडी. लोक भाज्या न धुता कापत होते व वापरत होते.. (प्रत्यक्ष हॉटेलात काम केलेल्या व्यक्तिकडून ऐकले आहे की त्यांच्याकडे भाज्या 'न धुता' वापरतात. काय माहिती हे किती ठिकाणी होत असेल).
पण ते सर्व आठवले की अजुनही मळमळते व तिथे का खाल्ले हे पुन्हापुन्हा वाटत रहाते. दृष्टीआड सृष्टी.

त्यामुळे भटारखाना स्वच्छच हवा, ऐसपैसच हवा व पुरेशा (जाळ्या लावलेल्या) खिडक्या, प्रकाश छान खेळता असलेलाच हवा. भांडी चांगल्या प्रतीची व स्वच्छच हवीत. व त्यांच्यासाठी वेगळी, स्वछा बाथरुम ती पण भ.खा. पासुन दुरच हवी. चुकुन लोकांना नजरेस पडला तर त्यांना छान वाटायला हवे. चांगल्या गोष्टींकरता एकदाच पैसे गुंतवले की मग पश्चाताप होत नाही. नाहीतर बरेचदा लोक स्वस्त माल घेतात व मग ते त्रासदायक होऊन बसते, धड वापरता येत नाही, धड टाकुन देता येत नाही.

भरपुर पदार्थ नसले तरी चालतील पण चांगले पोटाला हलके असावेत. प्रवासात जड सोसेलच असे नाही. पाणी चांगले हवेच.

हर्षद, आपल्या योजनेस शुभेच्छा.

जर तिथल्या स्थानिक महिलांना थोडंफार ट्रेनिंग देऊन त्या प्रांतातले खास पदार्थ मिळाले तर उत्तम. त्या जोडीला नेहमीचे यशस्वी पदार्थही ठेवावेच.

नक्की कुठे असेल हे हॉटेल? आजूबाजूला कशा प्रकारची हॉटेल्स आहेत? जवळ मोठं शहर आहे का जेणेकरून केवळ महामार्गावरील प्रवाश्यांवर न विसंबता शहरातील लोकंही फॅमिली डिनरकरता येऊ शकतील? एखादा छोटा समारंभ करण्यास योग्य असं लॉन बनवून ते ही भाड्यानं देता येईल. केटरींग तर तुमचं असेलच.

हर्षद , पुणे नाशिक रस्त्यावर आळे प्फाटा व संगमनेर च्या मध्ये संजय देशमुख नावाच्या शेतकरी तरुणाने 'दौलत 'नावाचे रेस्टॉरन्ट यशस्वी रेत्या चालविले आहे. भरपूर पार्किन्ग , टॉयलेट्स् ओपन एअर, बूक शॉप्स. पेट्रोल पम्प. त्याना एकदा भेटलात तर मर्गदशन मिळेल ( ही जाहिरात नव्हे)

अजून एक .. माश्या मारण्याचे काम मनापासून करावे.. काही ठिकाणी इतक्या माश्या असतात की तिथे २ मिनिटे उभे राहवत नाही..

मोठ्या प्रवासात चालक थकलेले असतात. एखादी स्वच्छ रुम, जिथे थोडावेळ झोप काढता आली अशी मिळत असेल तर किती छान. रात्री उशीर झाला तर मुक्कामी पोहोचू अशी खात्री नसते, अशा वेळी देखील अशी सोय मिळत असेल तर छान होईल.

अगदी मॉटेल, हॉटेल च्या सोयी नसू देत. स्वच्छ जागा, अंथरुण / पांघरुण, गरज असल्यास मच्छरदाणी अशी सोय हवी.

तांबडा पांढरा रस्सा आणि भाकरी आणि शिजवलेली गावरान कोंबडी. सोबतीला शेतातलाच कांदाफोड

इतक ठेवा . आलोच मी Happy

हर्षद , पुणे नाशिक रस्त्यावर आळे प्फाटा व संगमनेर च्या मध्ये संजय देशमुख नावाच्या शेतकरी तरुणाने 'दौलत 'नावाचे रेस्टॉरन्ट यशस्वी रेत्या चालविले आहे. भरपूर पार्किन्ग , टॉयलेट्स् ओपन एअर, बूक शॉप्स. पेट्रोल पम्प. त्याना एकदा भेटलात तर मर्गदशन मिळेल ( ही जाहिरात नव्हे)
>>>

रॉहुंच्या या पोस्टला पूर्णपणे अनुमोदन.
दौलत हे हायवेवरचे रेस्टॉरंट कसे असावे याचा उत्तम नमुना आहे (मी २००३ पासून २००७/८ पर्यंत हे बघितले आहे. सध्याचे माहिती नाही पण चांगलेच असावे अशी अपेक्षा). जेवण चांगले, परिसर स्वच्छ, स्वच्छतागृहे स्वच्छ! २००८मध्ये त्यांनी बरेच जोडधंदे जसे पुस्तकांचे दुकान (उत्तम कलेक्शन होते), किराण्याचे दुकान वगैरे सुरू केलेले दिसले. दौलतमध्येच बस वा जीप/वडाप (जर शेअर्ड जीपने येत असाल तर) थांबवा असे प्रवाश्यांनी इन्सिस्ट केल्याचे मी अनेकदा पाहिले आहे. यापेक्षा अधिक ब्रँड लॉयल्टी असू शकत नाही.
एक अभ्यासदौरा म्हणुन तुम्ही तिथे भेट देवू शकता.

पुणे कोल्हापुर रस्त्यावरचे माइलस्टोनला देखील भेट देवू शकता. ते यशस्वी रेस्टॉरंट आहे आणि ते पाहून तुम्हाला त्यात काय काय सुधारणा कराव्या लागतील ते पण लक्षात येईल.

पुणे कोल्हापुर रस्त्यावरचे माइलस्टोनला देखील भेट देवू शकता. >> माइलस्टोन सुरू झालं तेव्हा चांगलं होतं सध्या ते इतरांसारखंच झालंय..

दौलतची वाट लागलिये. अन त्याने मुंबई आग्रा रोडवर दिलेली फ्रँचाईज पण बोंबलली आहे. स्पेसिफिकली तिथे थांबायचं नाही असं ठरवून जातो मी तरी आजकाल.

नासिक मुंबई हाय्वे वर संस्कृती म्हणुन एका हॉ टेलात जेवायला जायचा योग आला होता. मस्त वाटल होतं. मराठी जेवण, स्वच्छ रेस्ट रुम्स. आवडलेल Happy

सर्वच सूचना छान. तुम्हाला ऑल द बेस्ट!

हे हॉटेल कुठे असणार आहे? कशाप्रकारचं पब्लिक तिथे ये-जा करतं जास्त करुन?

आम्ही देशात हायवेवर थांबताना पुढील गोष्टी बघतो-
१. स्वच्छ टॉयलेट
२. एक स्त्री म्हणून मी हे बघते की वातावरण, क्राऊड कसं आहे, सुरक्षित आहे ना?
३. फूड- नवीन ठिकाणी फूड कसं असतं माहीत नसतं. पण स्वच्छता असेल तर फूडही सेफ असेल असा अंदाज बांधतो.

याशिवाय बिसलेरी व इतर मिनरल वॉटर, बिस्कीटं, चिप्स हे ब्रँडेड पदार्थ घेतले जातात कारण सेफ असतात.

मला स्वतःला एक्स्प्रेसवेचं दत्त प्रचंड आवडतं. पुण्याहून मुंबईला जाताना दत्तमधे खादाडी हा एक महत्त्वाचा कार्यक्रम असतो. ऑसम ऑसम फूड.

एक कार मेकॅनिक आणि पोलिसांशी संपर्क साधण्याची सुविधा. प्राथमीक आरोग्य सुविधा.

सध्या हायवेवर चोर्‍या होतात त्या अनुषंगाने.

Pages