बाळाच्या त्वचेची काळजी - उपाय

Submitted by devoo on 11 January, 2015 - 09:27

आमच्या ०४ महिन्याच्या छकुलीची त्वचा खूप कोरडी झाली आहे. चेहरा आणी हाताची त्वचा फुटली आहेत आणि लाल रॅशेस आले आहेत. डॉक्टरानी खालील lotions दिली. त्याने थोडी कमी आहे, पण पुर्ण बरी नाही झाली आहे. आम्ही तिला आंघोळीला दूध + मसुर डाळ पीठ + चन्दन पावडर वापरतो. अजून काय उपाय करता येतील, बदाम उगाळून वापरले तर चालेल का..??
Atopiclair Lotion
Lectaphil Moisturing Lotion
Sercos Creame

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही दिवस चंदन पावडर वापरू नका. आणि मसूरडाळ पीठही नको. माझ्या भाचीलाही कोणत्याही पिठाची अ‍ॅलर्जी होती.
सरळ जॉन्सन बेबी सोप किंवा टेडी बेबी बार वापरून बघा. पण त्याअगोदर तुमच्या डॉकना विचारा. सिटाफिल बेबी सोपसुद्धा येतो ज्याचा पीएच बॅलन्स चांगला असतो. पण बाळाला तेल लावून मग आंघोळ घालत असाल तर सिटाफिल ने तेलकटपणा कमी होत नाही. पण मॉइस्चराईझर चांगलं आहे.

त्यामुळे तुम्ही बाळासाठी वापरत असलेल्या वस्तूंची अ‍ॅलर्जी येतेय असं वाटलं तरडॉकना विचारूनच काय वापरावं/ न वापरावं ते ठरवा.

देवू शक्यतो बाळाच्या त्वचेला काहीच लावू नये अस डॉ सान्गतात. अगदी मालीश करताना तेलही नही. खरेतर मालीश नकोच सान्गतात पण आपले पूर्वीचे शास्त्र, बर्याच्दा घरातल्या मोठ्यान्चे सान्गणे टाळता येत नाही म्हणून कमीत कमी तेलात मालीश करा (हा मी शोधलेला मध्य होता)
लहान बाळाच्या तत्वचेला काहीही त्रास्दायक ठरू शकत. तूम्ही लाव्ता ते चन्दनही कदाचीत. ती पावडर जर बाजरातून आणली असेल तर मग नक्कीच. २ दिवस डॉनी दिलेल्या औषधाखेरीज काही लवू नका मग बघा रॅश येतेय का.

दूध, मसुर डाळ पीठ, चन्दन पावडर बंद करुन बघा.
माझ्या बाळाला काहीही सुट होत नाही. फक्त जॉन्सन बेबी सोप वापरते.

धन्यवाद सस्मित..

पण हा प्रॉब्लेम आता हिवाळ्यात चालू झाला आहे. आम्ही तीला गेले ३ महीने हेच वापरतो पण काही प्रॉब्लेम नाही होता. थंडीमधे सुरू झाला.

साबण वापरू नका. साबणाने त्वचा कोरडी होते. बाळ कुठेही धुळीत खेळायला जात नसते, त्यामुळे साबणाची गरज नाही. एक आठवडा काहीही न वापरता, फक्त पाण्याने आंघोळ घालून बघा. डॉक्टरांनी सांगितलेले क्रीम लावा.

चंदन पावडर खरेच लावू नका. मृदुला म्हणतात ते बरोबर आहे. इतके पदार्थ का लावत आहात? थंडीत आपली पण त्वचा फुटते, कोरडी पडते. तर ते तर बाळ आहे. स्पंज किंवा सुती कपड्याने पुसून काढले तरी बेस्ट. बदाम वापरायचे काय लॉजिक?

पीठ, पावडर ने त्वचा कोरडी पडते. पावडरचाही मारा कमी करा थंडीत. साय, तूप लावून पहा बाळ झोपल्यावर.

सुरेख -
हो..डॉक ना consult केले होते. त्यानि वरील क्रीम्स दिली.

मृदुला

बरोबर आहे तुमचे, हा विचार नव्हता केला आम्ही.. पण मग तेल लावतो ते कसे जानार..त्वचा तेलकट राहील ना..

अमा

चंदन पावडर बंद करतो.

आशूडी
मी खाली वाचले होते की साय, तूप लावू नये..
http://www.babycenter.in/a1036609/best-massage-oils-for-your-baby

माझी दोन्ही मुल दिल्ली लखनऊ सारख्या ठिकानी वाढली आहेत.थंडी च्या दिवसात मी रोज न चुकता सरसोंच्या (कोमट)तेलाने मसाज करायची व कोमट पेक्षा थोडे गरम पाण्याने अंघोळ घालायची जॉन्सन बेबी सोप लाउन.स्किन खुप छान रहात होती.

दूध, मसुर डाळ पीठ, चन्दन पावडर बंद करुन बघा.
दुसर्‍या डॉक चा पण सल्ला घ्या.

सर्वाचे खुप खुप आभार. दूध, मसुर डाळ पीठ, चन्दन पावडर बंद केले आणी सोप बदलला. आत्ता टेडी बार वापरतो. खूप फरक पडला आहे. त्वचा एकदम सॉफ्ट झाली. लाल रॅशेस पण खुप कमी आहेत.
अजुन एक प्रॉब्लेम आहे. तीच्या डोक्याची त्वचा खूप कोरडी आहे आणि ती खाजवून लाल करते. आम्ही parachute coconut oil थोडे कोमट करून लावतो पण फार फरक नाही आहे. आत्ता तीच्या हातात मोजे घालून ठेवले पन तरी पण ती खाजवायचा प्रयत्न करते.