डिजिटायजेशन सॉफ्टवेअर

Submitted by मृदुला on 9 January, 2015 - 05:29

भारतीय भाषांतील छापील पुस्तके स्कॅन करून डिजिटल फॉर्म मधे आणण्याच्या काही प्रणाली उपलब्ध आहेत का? कोणी वापरल्या आहेत का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही हो. जुनी पुस्तके, संदर्भ ग्रंथ इत्यादी डिजिटाइज करण्यासाठी मित्रमंडळींपैकी एकजण स्वयंसेवक म्हणून काम करत आहे. त्यांची टीम पुस्तक वाचून टाइप करणे अश्या अतिशय लेबर इन्टेन्सिव पद्धतीने काम करत आहे. इंग्रजीतील पुस्तके डिजिटाइज करण्याची अनेक उपकरणे, सॉफ्टवेअर्स इत्यादि सहज उपलब्ध आहेत. तसे भारतीय भाषांसाठी इंटरनेटवर सहज काही सापडले नाही. म्हणून इथे विचारले, कोणाला काही अनुभव / माहिती?

माझ्या फोनवर बिंग ट्रान्सलेटर आहे ते कॅमेरा वापरूनही चालवता येते. ( म्हणजे चिनी अक्षरांचा फोटो काढला तर त्याचे भाषांतर पोर्तुगीज मधे करता येते. ) पण ते मोठ्या मजकूरासाठी वापरता यायचे नाही.
हे लिहायचा हेतू एवढाच कि निदान तंत्र तरी उपलब्ध आहे.

बिंग ट्रान्स्लेटरचे भाषांतर हा एक भलताच विनोदी प्रकार आहे. कधीतरी फेसबूकावरचे बिंग ट्रान्स्लेटर वापरून बघा.

मृदुला, ऑफिसमध्ये एक स्कॅनिंग सॉफ्टवेअर होते ते मराठी स्कॅन केल्यास युनिकोडमध्ये करून द्यायचे. फॉन्ट थोडाफार करप्ट व्हायचा, पण एकंदरीत प्रकरण मॅनेजेबल होतं.

नंदिनी, सॉफ्टवेअरचे नाव सापडल्यास कळव, प्लीज.

मित्रमंडळींमध्ये ही चर्चा सुरू होऊन आता आपणच एक स्कॅनर, सॉफ्टवेअर आणि पाने उलटणारा रोबो तयार करावा (इन्वेस्टर शोधावा!) असा बेत तयार होतो आहे.

मृदुला, खूप वेळचं आठवतेय. पण खरंच आठवेना.

मी जास्त करून न्युज क्लिपिंग स्कॅन करायला वापरायचे (आय गेस, ते सॉफ्टवएअर बहुतेक भारतीय भाषांसाठी चालत असावं)

हो, बरोबर चिन्नू. पीडीएफ म्हणजे चित्रच असते. शब्द, अक्षरे वेगवेगळी नसतात.
शिवाय पुस्तकाचे करायचे म्हणजे पुस्तक आधी बाइंडींग मधून काढून एकेक पान वेगळे करून स्कॅन करायला लागणार. टाइप करण्यापेक्षा वेगात होईल, हे नक्कीच. पण पुस्तकाला धक्का न लावता काही करता येते का ते बघत आहे.

मृदुला, मार्केटमध्ये बरेच बुक स्कॅनर्स उपलब्ध आहेत. बुक स्कॅनिंगमध्ये स्कॅनरऐवजी डिजिटल कॅमेरा असतो आणि फ्लॅटबेडऐवजी इंग्रजी व्ही आकाराचा बेड असतो. कॅमेरा आणि बेडमध्ये थोडे अंतर असते. याचा फायदा असा की एकेक पान स्कॅन करण्यासाठी स्कॅनरवर पुस्तक दाबून धरावे लागत नाही. पानं उलटावी मात्र लागतात पण त्याने पुस्तकाला काही डॅमेज होत नाही शिवाय एका वेळी दोन पानं स्कॅन होतात.

http://arstechnica.com/gadgets/2013/02/diy-book-scanning-is-easier-than-...

http://www.piqximaging.com/xcanex

पानं उलटण्यासाठी रोबो बनवणे या आयडियेवर तुम्ही काम करा Happy

धन्यवाद सिंडरेला. असेच व्ही आकाराचे काहीतरी करायचे डोक्यात होते.
भारतीय भाषांचे स्कॅनिंग सॉफ्टवेअर सापडलेले आहेच. आता फक्त रोबो शिल्लक आहे करायचा. Wink