कविता करणे म्हणजे नेमके काय करणे ?

Submitted by गणेश पावले on 7 January, 2015 - 00:47

कविता करणे म्हणजे नेमके काय करणे ?
मनात रंगवलेले भाव शब्दात उतरणे
कि,…………….
हृदयाने जाणलेले, मानलेले सत्य
यमकात जुळवून शब्दात उतरणे…. ?
खर तर मलाही अजून कळलेलं नाहीय…

मी लेखणी हातात घेतली ती छंद म्हणून
ताऱ्यांना शब्दात लपेटून, चंद्राला खुश करणारा मी.
चांदणीला सौंदर्याच गुपित सांगून….
शुक्राला एकटा तु एकटाच का? विचारणारा मी….
सूर्याच्या प्रखर तेजाला सलाम करून….
त्याने पाहिलेल्या दुनियेच्या रोचक घडामोडी शब्दात बांधणारा मी…
कधी कधी कवी म्हणुन लिहिणारा
आज स्वताला कवी म्हणून मिरवतो….
पण अजूनही मला कळल नाही
कशा घडतात या कविता?
कशा सुचतात या कविता
का सुचतात या कविता?
कशा शब्दांना बंदी बनवतात या कविता?
कशा मनाला स्वच्छंदी बनवतात या कविता?
मला अजूनही कळल नाही…।
हा हसवतात, खुलवतात कधी रुसवतात
तर कधी का रडवतात या कविता ?

कवी - गणेश पावले
९६१९९४३६३७
१३-०९-२०१४

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users