०४ महीन्याच्या बाळाचा आहार

Submitted by devoo on 28 December, 2014 - 03:03

आमचे बाळ आता ४ महीन्याचे झाले. अजुन आइचे दूध चालु होते पण आता आई ऑफीस जॉईन करणार आहे ०१ जानेवारी पासून. बाळाला आज पासुन NAN Pro -1 चालू केले आहे. बाहेरचे काय देता येइल ? सध्या टाईम टेबल असे प्लान केले आहे.

माझा ऑफिस टाईम सकाळी ६:३० ते ४:००
सकाळी ५:०० - आईचे दूध
०८:३० - बाळ गुटी आणी आईचे दूध (सकाळी काढुन ठेवलेले.)
१०:०० - NAN Pro -1
१३:०० - मुग दाळीचे पाणी ४ चमचे आणी NAN Pro -1

१६:०० पासून - आईचे दूध

अजून काय काय देता येईल..???

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद अतरंगी.. मी ते वाचले होते पण आमच्या छकुलीला नुकतेच ०४ महिने झाले, म्हणुन विचारले. तीला नुकतेच NAN Pro -1 आणी मुग दाळीचे पाणी चालू केले आहे.

मुलांना पहीले सहा महीने फक्त आणि फक्त आईचे दूध द्यावे. तेव्हढे पुरेसे असते त्यांना. आईला पुरेसे दूध नसल्यास बाहेरचे दूध्/फॉर्म्युला दूध द्यावे लागते. पण दूध पुरेसे आहे.

सहा महीन्यांनंतर हळूहळू इतर लिक्विड पदार्थ जसे भाज्यांचे क्लिअर सूप, डाळींचे पाणी, फळांचा ताजा काढलेला रस द्यायला हरकत नाही... पण त्या आधी पेडीयाट्रिशनचा सल्ला जरूर घ्या.

@ dreamgirl, पण ०६:३० ते १६:०० पर्यन्त आई नसणार ना.. दूध काढुन ठेवलेले किती वेळ टिकते..??

देवू, आईचे काढून ठेवलेले दूध हवाबंद करून फ्रीजमध्ये पाच-सहा तास टिकते. तरीही ते द्यायचे नसल्यास गायीच्या/फॉर्म्युला दूधाचा पर्याय आहेच. लहान मुलांबाबतचे तब्बेतीचे/औषधांचे/जेवणाचे निर्णय शक्यतो डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावेत. मालती कारवारकरांचं वंशवेल म्हणून पुस्तक आहे, ते अवश्य वाचा.

आईचे काढून ठेवलेले दूध फ्रीजरमध्ये सहा महिने सुद्धा टिकते. Happy
फ्रीजमधे ४, ५ दिवस. फ्रीजमधे ठेवलेल्या दुधाचे दूध-पाणी वेगळे झाले तर सावकाश हलवून घ्यायचे. परत एकसंध होते. आईचे दूध लवकर खराब होत नाही. ऑफिसात दूध एक्स्प्रेस करायची सोय आहे का?
नाही तर आतापासून ६.३० ते ४ दूध न देता संध्याकाळी आणि पहाटे एक्स्प्रेस करा.

ड्रीमगर्ल..आभारी आहे.
मृदुला.. ऑफिसात दूध एक्स्प्रेस करायची सोय नाही आहे..आतापासून ६.३० ते ४ दूध न देता बाहेरचे फूड देतो आहे..म्हणुन विचारले.. अजुन काय काय देवू शकतो...:)