शास्त्रीय संगीतासाठी ट्यूनर

Submitted by दिनेश. on 26 December, 2014 - 03:45

मी करंदीकरांची एक डीव्हिडी बघत होतो. त्यात त्यांनी स्वरांची चर्चा केल्यानंतर एक ट्यूनर दाखवला आहे पण त्याबद्दल ते फारच त्रोटक बोलले आहेत.

नेटवर बघितल्यावर http://shrutituner.blogspot.in/ ही माहिती मिळाली. पण ते मोबाईल अ‍ॅप आहे.

करंदीकरांनी दाखवलेला ट्यूनर ( ज्यात आपले स्वर नेमके लागलेत का, ते कळते ) मुंबईत कुठे मिळेल ? त्याचा उपयोग शास्त्रीय गायनाच्या रियाझासाठी होतो का ? कुणी वापरलेय का ?

शास्त्रीय गायनात प्रत्यक्ष गुरुकडून विद्या मिळावी यासारखे दुसरे काही नाही, पण जर असे काही उपकरण वापरून स्वरज्ञान मिळवता आले तर छान होईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पण तानपुरा ड्रॉईड च वापरतो! माझ्या सरांकडे एक आहे ट्युनर टाईप पण त्यात फक्त षड्ज आणि पंचम च चेक करता येतो आणि मला तो ट्युनर कधीही वापरुन देत नाहीत सर!

करंदीकरांनी तो ट्यूनर डिव्हिडीमधे दाखवला आहे, त्यात स्वर देवनागरी लिपीत दिसतात अगदी सप्तकाच्या खुणांसकट.
नेटवर जे दिसताहेत ते बहुतेक वाद्यांसाठीच दिसताहेत. र्‍हीदम हाऊसच्या साईटवर नाहिय. आता मुंबईला आलो कि चौकशी करतो.

घरच्या घरी गायन शिका, अशी दोन भागातली डीव्हीडी आहे ती. त्यात त्यांनी दाखवलाय तो. मी त्या डीव्हिडी चे डिटेल्स उद्या देतो.
असा एखादा ट्यूनर असेल तर किती छान.