Submitted by स्वस्ति on 19 December, 2014 - 09:16
http://www.philips.co.in/c-p/FC8800_01/robot-vacuum-cleaner
या सारखं प्रॉडक्ट कोणी वापरला आहे का?
मी घ्यायचा विचार करत होते .
पण फक्त कचरा काढला जातो की लादी पूसायचा ही ऑप्शन आहे ?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फिलिप्स्चा व्हॅक्यूमच्मी
फिलिप्स्चा व्हॅक्यूमच्मी वापरलेला नाही, पण वर्णनावरून तो 'रूम्बा' सारखा असावा असे वाटते म्हणून
अशा प्रकारच्या व्हॅक्यूम क्लीनरविषयी माझे दोन पैसे:
रूम्बाचा माझा गेल्या सात वर्षांचा अनुभव खूपच चांगला आहे.
बारीक केर- कचरा, केस, धूळ-माती इत्यादी चांगले साफ करतो. रोजच्या रोज पुरेसा वेळ फिरवला तर जास्त सखोल स्वच्छता आठवड्यातून एकदा केली तरी पुरते. मात्र हा फक्त कोरडा केर- कचरा उचलतो.
जमीन पुसण्यासाठी असलेला स्कूबा देखील बर्यापैकी चांगले काम देतो. फरशी अगदी कोरडी होत नाही, वाळायला जरा वेळ लागतो , एवढेच.
व्यस्त जीवनशैली असणार्याना वरच्या फिलिप्स्चा व्हॅक्यूमसारखे उपकरण खूपच उपयुक्त ठरेलसे वाटते.
ही सगळी खूप चांगली उपकरणे पण
ही सगळी खूप चांगली उपकरणे पण आमच्यासारख्या घरांमधे जिथे जमिनीवर कांद्याच्या साली, नाणे, केसांची क्लिप, छोट्या डबीचे झाकण, रुमाल, क्रेयॉन यापैकी काहीही असू शकते तिथे ही उपकरणे देह ठेवतील असे वाटते.
>>>>>>>>कांद्याच्या साली,
>>>>>>>>कांद्याच्या साली, नाणे, केसांची क्लिप, छोट्या डबीचे झाकण, रुमाल, क्रेयॉन यापैकी काहीही असू शकते तिथे ही उपकरणे देह ठेवतील असे वाटते.
वरीलपैकी बहुतेक गोष्टी रूम्बा आणि स्कूबा दोन्हीमध्ये सहसा अडकत नाहीत. रुमाल रूम्बात अडकू
शकतो, पण काढणे एवढे त्रासाचे नाही. तेच सतरंजीच्या दशा इत्यादी गोष्टींचे.
मोठ्या गोष्टींसाठी हाताने उचलणे, झाडणे करावे लागेल, पण तरीही रूम्बा आणि स्कूबा नुसते चालू करून सोडण्याने बराच केर निघतो. दोन्ही यंत्रे बराच वेळ फिरत बसतात खरी, पण आपल्याला फार
वेळ खर्च करावा लागत नाही. सकाळी बाहेर जाताना रूम्बा चालू करून दिला की संध्याकाळी घरी
येईपर्यंत त्याने बरेच काम उरकलेले असते. हाताने झाडणे आणि आवरणे याला हा
१००%पर्याय अर्थातच नाही, पण बरीच मदत होते. काहीसे डिशवॉशरसारखे.
आमच्या ओळखीच्या आजींना
आमच्या ओळखीच्या आजींना त्यांच्या नातीने रुम्बा दिलाय. त्यांना आवडतो. बेडखालचे डस्ट बनीज पकडतो असं कौतुकाने सांगत होत्या.
मलाही रूम्बाचा खुप चांगला
मलाही रूम्बाचा खुप चांगला अनुभव आहे. मस्ट हॅव लिस्ट मधे!
तरीही >>हाताने झाडणे आणि आवरणे याला हा १००%पर्याय अर्थातच नाही+१
धन्यवाद मंडळी.
धन्यवाद मंडळी.