स्वस्तात मस्त स्मार्ट फोन कोणता घेऊ ?

Submitted by विश्या on 11 December, 2014 - 06:08

स्मार्त फोन घेण्याचा विचार आहे , पण स्वस्तात मस्त काही idea असेल तर सुचवा ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहो बजेट आशा अपेक्षा काहीतरी द्या..
उद्या मी मला लग्न करायचेय मुलगी सुचवा असा एका वाक्यात धागा काढला तर चालेल का..

>>>> उद्या मी मला लग्न करायचेय मुलगी सुचवा असा एका वाक्यात धागा काढला तर चालेल का.. <<<<
ऋन्मेऽऽष, तुम्ही काढून तर बघा... ! मला खात्री आहे.... तुमच्याकरता ढीगाने पोस्टी पडतील सल्ल्यांच्या.

उद्या मी मला लग्न करायचेय मुलगी सुचवा <<< तुमच्या गर्लफ्रेण्डने हे वाचले म्हणजे!!!!

असो. मलापण चांगल फोन सुचवा. ईमेल, व्हॉट्सअ‍ॅप आणि उत्तम कॅमेरा आणि म्युझिक क्वालीटी इतक्याच अपेक्षा आहेत.

तुमच्या गर्लफ्रेण्डने हे वाचले म्हणजे!
>>>
नंदिनी, ती माझ्याबरोबर टिकलीय याचा अर्थ कमालीची समजूतदार, समंजस अन सहनशील आहे हे ओघाने आलेच Happy

असो,
@ धागा,
५-६ हजार बजेटमध्येच सुचवा रे.. साधा फोनही वापरताना माझी मदत घेणार्‍या माझ्या बाबांना पण टचस्क्रीन स्मार्टफोन हवा झालाय.. त्या द्रुष्टीनेही सुचवा प्लीज !!!!!!!!!!!!

स्वतात हवाय का.
माझा आहे, सॅमसंगचा ड्यूआस.
किंमत तुम्ही ठरवा.
घेऊन वर्ष झाले तरी उत्तम अवस्थेत आहे.
मला यापेक्षा चांगला घ्यायचा आहे म्हणून हा विकायला काढला आहे.

फोन घेताना कमीत कमी 1 GB RAM, 4-8 GB internal storage, explandable memory ,किमान 4.3 इंची मल्टीटचस्क्रीन या गोष्टींची पुर्तता करा. उपरोक्त दिलेले फोन या गोष्टींची पुर्तता करतात.

तुमच्या गर्लफ्रेण्डने हे वाचले म्हणजे!!!! >>>>>>>

@नंदीनी - तुम्ही अडकलात ऋन्मेऽऽष च्या प्रतिसादात. नेहमी ऋन्मेऽऽष गर्लफ्रेंड चा उल्लेख केल्या शिवाय कुठलाही प्रतिसाद्/धागा सोडत नाही. त्याबद्दल ते नेहमी टोमणे ही खातात.

ह्या वेळेला असा प्रतिसाद देवून त्यांनी तुम्हालाच त्यांच्या गर्लफ्रेंड्च्या विषयावर आणले आणि मग पुढे त्यांची नेहमीची बॅटींग चालू झाली.

झिओमी वर बंदी आली आहे हाय्कोर्टात.
पेटन्ट रिलेटेड केस आहे.

मायक्रोमॅक्स मध्ये बघा.
मिळुन जाइल.
५-६ हजाराच्या मोबाइलात उत्तम कॅमेरा मिळ्ण कठीण आहे हे मान्य केलं पाहिजे. Happy

मोटो ई ७ हजारात फ्लिपकार्ट विकत. अधे मधे डिस्काउन्ट असतो.
तो ही ऑप्शन किमतीच्या मानाने खुपच चांगला आहे. Happy
मी साडेपाच हजारात घेतलाय.

मायक्रोमॅक्स मध्ये बघा. <<<<< हा पर्याय चांगला आहे मला हि micromax चा चांगला वाटतोय माझ्या बंधू ने हि मला हेच सुचवले आहे .

मी हा वापरतोय आणि माझा अनुभव चांगला आहे. शिवाय तुमच्या अपेक्षेपेक्षाही कमी किंमतीत मिळेल.

http://www.bqmobile.com/product/BQS37.html

http://www.flipkart.com/bq-s37/p/itmdt447qprf3w9p

http://www.naaptol.com/mobile-handsets/bq-s37-3-5-inch-wvga-ips-kitkat-4...

http://www.snapdeal.com/product/bq-s37-kitkat-442-os35/617430893

http://www.shopclues.com/bq-s-37-3.5-wvga-ips-kitkat-4.4.2-os-weui-2.0.html

लाव्हा आयरिस फ्युएल ....एकदम लय भारी !

अ‍ॅन्ड्रॉइड असुनदेखील बॅटरी ३ दिवस चालते , १जीबी रॅम ,क्वाड-कोअर

किंमत फक्त ७९९०/-

माझ्याकडे मोटो-़जी आहे, पण हा घ्यायचा विचार करतोय . कुणाला अनुभव असल्यास सान्गावे...

http://www.lavamobiles.com/smartphones/iris-fuel50

http://www.gsmarena.com/lava_iris_fuel_50-6765.php

थोडं बजेट वाढवायची तयारी असेल तर Panasoni P81 अतिशय चांगला पर्याय आहे. internal memory, screen, touch response, camera (except for low light photography) all are good.

या शिवाय Octa core processor पण आहे..

खूप जास्त वेळ इंटरनेट, गेम्स, व्हिडिओ चालवले तरी बॅटरी जास्त खर्च नाही होत आणि फोन तापत पण नाही...

@ ऋन्मेऽऽष | 11 December, 2014 - 16:55

<< अहो बजेट आशा अपेक्षा काहीतरी द्या..
उद्या मी मला लग्न करायचेय मुलगी सुचवा असा एका वाक्यात धागा काढला तर चालेल का.. >>

बस्स का आता? खरंच असा धागा काढला तर इथे मायबोलीवरच कितीतरी जणी प्रपोज् करतील तुम्हाला. तुमच्या प्रत्येक धाग्यावर महिलावर्गाच्या किती प्रतिक्रिया असतात ते पाहत नाही का? हां आता तुम्ही दरवेळी तुम्हाला गर्लफ्रेन्ड असल्याचं जाहीर करता त्यामुळे कावून त्या जरा नकारात्मक प्रतिसाद देतात खर्‍या. पण एकदा तुम्ही लिहाच की गर्ल्फ्रेंडनं तुम्हाला किंवा तुम्ही तिला सोडचिठ्ठी दिलीय. मग पाहा कशा तुमच्या करिता रुमाल घेऊन तुमचे नाक डोळे पुसायला रांगा लावतात की नाही ते!

स्नॅपडिलवर मायक्रोमॅक्स कॅनव्हास ज्यूस ए १७७ रु.५२७९ ला आहे.
५ इंची स्क्रीन, १ जीबी रॅम, ड्युअल सिम, १.२ जीझेड प्रोसेसर. असा उत्तम मामला आहे.

*

ऋन्मेष,
धागा हायज्याक करू नका. Proud

कृपया धागा विश्या यांना हव्या असणार्‍या मोबाईल बद्दल आहे
विश्याला हव्या असणार्‍या गर्लफ्रेंड बद्दल नाही

अहो, त्यांचं बजेट ६ हजार आहे, तुमचा फोन मार्केटमधे १२ हजाराच्या आसपास आहे. > हा तर ६ हजार दोन वेळा द्या हाकानाका Proud
किस्सीको पता नही चलेगा बाप्पू ऽऽऽऽ

Canvas doodle three
सात सव्वासात हजारात चांगले फीचर्स, मोठा स्क्रीन वगैरे

Zenfone 4/Xolo/ Lava Iris/ Android One phones/Micromax/Karbonn/Auxus... you have multiple options

मोटो - E हा पर्याय चांगला आहे असे वाटते ....... त्याचा report चांगला आहे ना ? >>>>> हो. फक्त एकच प्रॉब्लेम आहे. त्यात file manager नाहिये.. नवर्‍याचा तोच आहे.. त्याने file manager डाउनलोड केलय भौतेक

मोटो ई च्या बॅक कव्हरचा प्रॉब्लेम आहे. २-४ वेळा उघड लाव केली की खिळखिळे होऊन जाते. अनेक लोकांनी हा प्रॉब्लेम रिपोर्ट केलेला आहे.
दुसरे, मिनि सिम आहे. सध्याच्या सिमकार्डचे काय करायचे ते नीट पहा.

मोटो-ई मस्तच आहे .

खूप युजर फ्रेण्डली . ड्युएल सीम आहे.
पण ...

१. फाईल मॅनॅजर नाही .
२. फ्रन्ट कॅमेरा नाही
३. फोटो क्वालिटी तितकी आवडली नाही .

मिनी सिम लागत पण बरेच्से मोबाईलवाले अगोदरच सिम कार्ड कापून देतात
किन्वा कार्ड कंपनी कडून बदलून घ्यायच .
माझ डोल्फिन च कार्ड २ तासात मिळाल बदलून .

बजेट ५ ते जास्ती जास्त ६ हजार आणि क्यामेरा चांगला असावा .>>कॅमेरा बद्दल प्रत्यक्ष खात्रीलायक दुकानात जाउन निवडलेल्या फोनमधुन एक फोटो काढुन पहा.आणि मग ठरवा कुठला मोबाईल घ्यायचा ते.

या लिंक वर आहेत तुमच्या बजेट वाले फोन यातुन माहीती मिळेल http://www.91mobiles.com/list-of-phones/android-mobile-phones-below-6000 कोणता फोन घेतला? ते लिहा शेवटी.

मला पण स्वस्तातला स्मार्ट फोन हवाय.
रिक्वायरमेंट्स खालिलप्रमाणे

* स्लो होऊ नये (ईण्टर्नल मेमरी जास्त असेल तर नाही होणार बहुतेक)
* चांगला कॅमेरा
* गाणी भरपूर ऐकते त्यामुळे एक्स्पाण्डेबल मेमरी असेल तर उत्तम
* बजेट - पंधरा हजार.

Amchyakade amhi doghehi xolo vapartoy uttam quality disayla najuk sajuk pan Nokia sarkha ruff n tuff varshabhar vapartoy kadicha hi problem nahiye

नविन माय्क्रोमेक्स युरेका फोन येतोय....
९००० मधे खुपच चाण्ग्ले फिच्रर्स दिलेत...
नहितर नविन मोटो इ येनारे....त्याचि वाट पाहा...

माझी रिक्शा.. Happy

बजेट १०केच्या खालीच. स्मित

मी फोन जास्त करून या गोष्टींसाठी वापरते :-

ईमेल (आउटलुक)
गाणी (रेडियो नाही)
डॉक्युमेंट्स - वर्ड, पीपीटी (विव्हिंग आणि एडिटिंग)
तुनळी
बेसिक नेट ब्राउझिंग - फेबु नाही, इतर वेबसाईट्स तिथून mp३, डॉक्स डाउनलोड करणे
नकाशावाचन आणि जीपीएस (ऑफलाईन पण)
मधून कधीतरी कॅमेरा (आता मुद्दाम हलका फुलका सायबरशॉट घेतलाय बाळगायला, पण मोबाईलचा कॅमेरा क्वचितच वापरते )
गेम्स फक्त सुडोकू किंवा तत्सम
ebooks
आईप्रमाणे हे "मुळात जनसंपर्क असणे आणि तो वाढवणे ह्या गोष्टी माझ्यासाठी नाहीत" मलाही लागू पडते त्यामुळे व्हॉटसअ‍ॅप, इन्स्टाग्राम वै काहीच वापरत नाही
फोन आणि समसचाच जास्त वापर करते

अपेक्षा :-
एक्स्पान्डेबल मेमरी (कमीत कमी १६ जीबी)
बॅकअप घेण्याची सोय समस, फोनबुक, इ
कस्टमर सर्विस चांगली असावी (नोकियाचा अनुभव जास्त चांगला नव्हता)
साधारण कॅमेरा
फाइल मॅनेजर असावा
टच + QWERTY/ ओन्ली qwerty उत्तम, नुसता टच नको वाटतोय
Wi-Fi, EDGE २G नेटवर्क
चांगली बॅटरी असावी (कमीत कमी ८ तास विदाउट चार्जिंग)
दणकट असावा (कमीत कमी २ वर्ष तरी टिकला पाहिजे अरेरे )
साउंड क्वालिटी उत्तम असावी
अगदीच नव्याने दाखल झालेला नसला तरी चालेल पण जनरल वापरात असेल असा
लुक्स सोबर