टाईम मॅनेजमेंटला मदत करणारी अँड्रॉईड अ‍ॅप्स / कंप्युटर सॉफ्टवेअर्स

Submitted by पियू on 8 December, 2014 - 10:13

माझ्या मोबाईलमध्ये असणार्‍या टूडू अ‍ॅपला रिमाइंडर अलार्मची सोय नसल्याने मला निरनिराळ्या गोष्टींची आठवण करुन देणार्‍या अ‍ॅप्सची गरज फार भासते. विशेषतः महिन्याच्या ठराविक दिवशी भरायची बिले, अमुक वाजता अमुक यांना फोन करणे अश्या नोंदी ठेवण्यासाठी. माझा लॅपटॉपही बराच वेळ माझ्याजवळ असल्याने त्यावरही नोंदी ठेवायचा प्रयत्न केला. त्यासाठी मी काही अलार्मिंग कॅलेंडर्सचा वापर करायचा प्रयत्न केला. परंतु ती वापरली असता प्रचंड रॅम खाते आणि लॅपटॉप स्लो होतो. शिवाय लॅपटॉपजवळ नसतांना किंवा लॅपटॉप बंद असतांना पटकन एखादे काम सुचले तर नोंदवुन ठेवण्यासाठी लॅपटॉप चालु केला जात नाही व ते काम विस्मरणात जाते.

टाईम मॅनेजमेंटला (वेळेच्या नियोजनाला) मदत करणारी अँड्रॉईड अ‍ॅप्स किंवा कंप्युटर सॉफ्टवेअर्सविषयी इथे लिहुया.
उदा. याद्या करणे इ. सोपे करणारे अ‍ॅप्स, कंप्युटरवर रिमाइंडर देणारे कॅलेंडर्स, अलार्म असणारे टू डू अ‍ॅप्स इ.
आपण एखादे अ‍ॅप/ सॉफ्टवेअर वापरत असाल तर आपला अनुभव इ.

जसजशी माहिती गोळा होत जाईल तसतसे हेडर अपडेट करत जाईल.

त.टि.: कृपया अवांतर प्रतिसाद व वाद टाळावेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गूगल कॅलेंडर, क्रोम असल्यास ऑफलाईन वापरता येते. ते इन्स्टॉल करून पहा. याने अ‍ॅक्रॉस प्लॅटफॉर्म्स व फोन्/डेस्कटॉप्/लॅपी सगळीकडे तुमचे कॅलेंडर सेम राहील.
पर्सनली मला क्रोम आवडत नाही, म्हणून इतर ब्राऊजर्ससाठी गूगल कॅलेंडरची वाट पहातोय.
सध्या मी एसेन्शिअल पिम वापरतो.

*

फोनवरचं एक छान अ‍ॅप नवं सापडलं, ते टाईम मॅनेजमेंटपेक्षा धाग्यातील 'रिमाइंडर'शी संबंधीत आहे. मेडिसेफ त्याचं नांव.

*

याद्या व नोट्स साठी कलरनोट मस्त आहे. क्लाऊड सिंक असल्याने डेटा सगळीकडे अ‍ॅक्सेसिबल, तसेच पासवर्ड प्रोटेक्टेड नोट्स ठेवता येतात, त्यामुळे बिन्धास्त माहिती साठवता येते.

इब्लिस, तुम्ही त्या पिम चे फ्री वर्जन वापरता कि प्रो?
आणि माझ्यासाठी रिमाइंडर फॅसिलिटी असणे खुप महत्वाचे आहे.
सध्या एका एक्सेल शीट मध्ये रोजची कामे लिहितेय. Sad

पियु, I use "Remember The Milk" app on Android. You can create tasks list, add tasks with due date/time and much more. You can even create tags, and organize your tasks using those tags.

The basic app is free, you can also purchase pro version for more features such as sync with another mobile phone etc.

http://www.rememberthemilk.com/

मी https://www.isotimer.com/ वापरते. बेस्ट आहे. सर्वसमावेशक. कलरनोट्सही चांगलं आहे. तेही वापरते.