पाळणाघराची माहिती

Submitted by स्वाती आम्बेकर on 28 November, 2014 - 06:07

माझ्या १४ महिन्यांच्या मुलीसाठी बदलापुर येथील पाळणाघराची माहिती हवी आहे. म्हणजे चार्जेस वैगरे सर्व.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माफ करा स्वाती तुमच्या प्रश्नांचे उत्तर माझ्याकडे नाहीये , पण हा धागा आहेच तर याचा उपयोग करून मी माझा प्रश्न विचारते आहे. त्याबद्दल sorry.

मलाही ही माहिती हवी आहे. काही महिन्यात मलाही याची गरज भासेल. ६-८ महिन्यांच्या बाळाला पाळणाघरात घेतात का? कारण माझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये. नंतर ऑफिस करावेच लागेल. माझे ऑफिस पुणे स्टेशन जवळ बंड गार्डन रोडवर आहे, तर तिथे आसपास असे पाळणाघर आहे का? म्हणजे मी दिवसभरात अधून मधून तिथे जावू शकेन बाळाला भेटायला. साधारण महिना फी काय असते?

स्मिताजित

साधारणपणे बाळाचे वय १ वर्ष किंवा अधिक हवे, तर त्याला पाळणाघरात घेतात.
पण कमी वय असलेल्या बाळालाही अधिक मूल्य आकारुन पाळणाघरात प्रवेश मिळू शकतो.

फी: साधारणपणे -
रोज एक तास असे महिनाभर ठेवायचे अंदाजे ६०० रुपये पडू शकतात.
म्हणजे रोज आठ तास ठेवायचे असल्यास ६०० x ८ = ४८०० इतके होतील.
अर्थात हे फक्त सांभाळण्याचे. जेवण, दूध, तिथे सोय असल्यास फळे, सूप वगैरेंचे वेगळे पैसे होऊ शकतात.

ऑफिसजवळचे पाळणाघर बरे पडेल मान्य, पण बंडगार्डन भाग हा हायफाय असल्याने महाग पडू शकेल. त्यापेक्षा तुम्ही कुठे राहता ते सांगितलेत तर तिथले शोधण्यास मदत करण्याचा प्रयत्न करु.

उंड्री- पिसोळी - माफ करा. त्या भागाची काहीच माहिती नाही.

कुणी उंड्री- पिसोळी या भागात राहत असल्यास कृपया स्मिताजित यांना सहाय्य करा.

स्मिताजित,
www.maayboli.com/node/43021 ही लिन्क वाचा. याच्या अनेक शाखा पूण्यात आहेत. मला खुप छान वाटल हे वाचुन पण बद्लापूरला नाहीएत यान्च्या शाखा.

dhanyavad ya mahitibaddal aani link baddal ..maaybolikar asalyacha fayada hoto..:)

एवढ्या लहान मुलाला ठेवणार असाल तर पाळणाघर आई किंवा बाबा दोघांपैकी एकाच्या ऑफिसजवळ असलेले बरे. काही कारणाने मध्येच उठून जावे लागले तर लवकर पोचता येइल असे. मग थोडे पैसे जास्त द्यावे लागले तरी हरकत नसावी.