singapore airline

Submitted by पूनम पाटिल on 25 November, 2014 - 10:19

me singapore airlines ni ya saturday la singapore jat ahe maze sabot lahan multi ahe…..te onboard milk provide kartata ka?kiva me amul che cartoon carry karu shakate ka?tychya policy badal konala kahi mahit ahe ka?jar hey donihi option nasel tar mazya muli sathi me konta formula powder vaparu?ple help immediately

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यांच्याकडे गरम दूध मिळू शकते. वेळ पडल्यास हवाई सुंदर्‍या मूलाला उचलूनही घेतात. त्यांच्या ऑफिसमधे विनंती करा आधीच. ते तूम्हाला खास सिट ( पाळणा असलेली ) देतील.
मुलं त्या पाळण्यात आरामात झोपतात. तूम्हालाही अवघडल्यासारखे होणार नाही. फक्त उडताना व उतरताना बाळाला मांडीवर घ्यावे लागेल. त्यावेळी बाळासाठी खास सेफ्टी बेल्टही मिळेल.
मुलाला तर एखाद्या खास प्रकारच्या दूधाचीच सवय असेल तर तेही नेता येते. भारतात सिक्यूरिटीवाल्यांना तसे सांगावे लागेल.

एक मैत्रिण, इथे सगळी माहिती दिली आहे ह्या एअर लाईन्स ची.

http://www.singaporeair.com/en_UK/travel-information/travelling-with-chi...

तुम्ही अमुलचे दुध किंवा फॉरमुला मिल्क आतमधे नेऊ शकता. बुकींग करताना जर आधीच त्यांना सांगितले की मला हे हे लागेल तर ही लोक तशी व्यवस्था करतात. मी सिंगापुरलाच राहतो.

मी तुम्हाल सुचवेन की एक अमुलचा पॅक, फॉरमुला मिल्क जवळ असू द्या. सामान चेक इन करताना त्यांना आधीच सांगा की मुलीसाठी हे मी आतमधे नेले तर चालेल का?

लहान मुल सोबत असेल तर सेक्युरिटी चेक मध्ये काही अडचण नाही येणार. आम्हाला कधीही बाळासाठी दुध न्यायला अडवलं नाही. बेसिनेट सीट अवश्य घ्या. त्यामुळे बाळाला झोपताना त्रास नाही होणार. आणि सिंगापूर एअरलाइन्स च्या सर्व्हिस बद्दल काहीच प्रश्न नाही. शक्य तेव्हडी मदत करायला तयार.

बाळा ला सवय असलेले दूध सोबत अवश्य घेऊन जा एरलाइन वाले अडवत नाहीत ..मी माझया मुलासाठी दर वेळी नेते आणि कधीच आडवलेले नाहीए.. हवे असेल तर फॉर्मुला पाउडर जवळ ठेवा ..पण चवीची सवय नसेल तर तो पीणार नाही[प्लेन मधे दूध फार थंड होते अशा वेळी बाळ दूध घेत नाही ..गरम करायला सांगावे..प्लेन मधे साधे दूध असतेच..]

तुमचे मुल किती महिन्याचे/ वर्षाचे आहे यावर बॅसिनेट सीट तुम्हाला मिळेल किंवा नाही हे ठरते. तसेच फ्लाईटमध्ये बरीच लहान मुले असतील तर ते प्रत्येकाला बॅसिनेट देऊ शकत नाहीत.
लहान मुलांच्या दुध किंवा इतर खाद्यपदार्थामुळे सहसा अडवणुक होत नाही. पण वेळ सांगुन येत नाही. मागच्या वेळी येताना दोन्ही मुलींची तापाची औषधे सोबत होती. दोघी वेगळ्या वयोगटातील असल्याने दोघींचे एकाच ब्रँडचे पण वेगळ्या वयोगटाचे औषध होते. त्यावरुन मुंबई विमानतळावरील सेक्युरिटी बाईने अदवले. तिला समजावून सांगितले तरी ती जाऊ देत नव्हती. मग तिचा साहेब आला त्याला सांगितल्यावर त्याने जाऊ दिले!

वेळ पडल्यास हवाई सुंदर्‍या मूलाला उचलूनही घेतात.>>>>> मला वाटतं त्या इतर सगळी मदत करतील पण मुलाला उचलुन घेणार नाहीत.

वत्सला, सिंगापोर एअरलाईन्स ( सिंगापूर ते ऑकलंड ) एमिरेट्स ( दुबई ते नैरोबी ) कोरीयन ( सोल ते ऑकलंड )
गल्फ एअर ( किलिमांजारो ते मस्कत ) या चारही एअर लाईन्सच्या हवाई सुंदर्‍यांनी मुलांना संभाळल्याचे मी स्वतः बघितले आहे.

दिनेशदा, मी लेकी अगदी तान्ह्या (तीन महिने) असल्यापासुन त्यांना घेऊन एकटीने प्रवास करते आहे पण माझा अनुभव वेगळाच आहे. सिंगापोर एयरलाईन्सचा. त्यानुसार मी लिहीले आहे

बरोबर वत्सला.. तो त्यांच्या ड्यूटीचा भाग नक्कीच नाही. मी बघितल्याप्रमाणे सिनीयर एअर होस्टेसच असे काही ड्यूटीच्या बाहेरचे काम करतात. असो, आपण मूळ प्रश्नाकडेच वळू.

लहान मुलांसाठी दुध, पाणी नेऊ देतात.फॉरमुला नेला तर उत्तम पण मुलीला त्याची सवय नसल्यास कठीण आहे.
बॅसिनेट सीट भेटली तरी ६-७ महिन्यांपेक्षा मोठे बाळ असेल तर उपयोगी नाही. थोड्या मोठ्या मुलांच्या लांबीला पुरत नाही.
फ्लाईटमध्ये बसल्यावर एअर होस्टेसला विनंती करून कुठे जोडून सीट रिकामी असेल किवा कोणाच्या बाजुला सीट रिकामी असेल त्यांना आपली जागेवर जाण्याची विनंति करून तिथे शिफ्ट होवू शकता. पण शनिवार असल्याने फ्लाईट फुल असण्याची शक्यता जास्त आहे.