पॉझिटीव्ह दृष्टीकोन ठेवण्यासाठी मदत

Submitted by Mother Warrior on 5 November, 2014 - 13:10

मी आज कुठलेही ऑटीझमसंबंधित उपदेश करणार नाही तर मलाच थोडी मदत हवी आहे. आशादायी दृष्टीकोन ठेवण्यासाठी. कराल का?

झालंय असं, की मुलाच्या वय वर्षे २ पासून ऑटीझमशी झुंज देऊन जरा थकायला झाले आहे आता. हे सर्व किती दिवस चालणार, मुलगा कधी बोलणार अशा प्रश्नांनी आता २ वर्षं भंडावून सोडले आहे. आत्ता लिहीताना मला जाणवलं, २च वर्षं झाली या सगळ्याला? पण ७३० दिवस गुणीले २४ तास असं म्हटलं की जाणवते थकण्याची इंटेसिंटी.
दिवसाची सर्व कामे सुरळीत पार पडतातच, मुलाबरोबर हसतमुखाने दंगा केला जातोच, त्याचे जेवण-खाण आजारपण त्यात मी कुठेही कसूर होऊ देणार नाही. (बिलिव्ह मी, ऑटीझम आणि आजारपण = वर्स्ट काँबिनेशन! एरवी मुलं गृहीत धरतातच पालकांना परंतू माझा मुलगा आजारी पडला की माझी शब्दशः कसोटी असते. त्याची चिडचिड कमालीची वाढते व आपण शांत राहून त्याला काय होत असेल हे गेस करत राहणं = बॅटल.)

डोक्यात, मनात एकप्रकारची पोकळी येत चालली आहे. आयुष्य हे एक आनंददायी प्रकरण आहे हे विसरत चालले आहे. आयुष्य म्हणजे कर्तव्यांची रांग. मला ना काही वाचण्यात इंटरेस्ट राहीला आहे ना कुठला मुव्ही पाहण्यात. इतकंच काय, मी ऑटीझम बद्दलही वाचत नाही सध्या. याचा अर्थ असा नाही मी डिप्रेस्ड आहे. तो ऑप्शनच नाही उपलब्ध मला. परंतू बंद पडलेल्या गाडीला किकस्टार्ट देऊन जोमाने पळवायचे आहे. त्यासाठीच मदतीचे आवाहन.

आपण या पानावर आशादायी, ऑप्टीमिस्टीक, पेशन्स, जिद्द, हार्डवर्क इत्यादींबद्दल पोस्ट्स एकत्र करायच्या का? असं काहीतरी जे वाचून आमच्यासारख्या स्पेशल नीड्स मुलं असलेल्या पालकांना उभारी येईल. कारण पॉझिटीव्ह अ‍ॅटीट्युड हा एकच लाकडाचा ओंडका आम्हाला ऑटीझमच्या समुद्रात जरा तरंगत ठेऊ शकतो..आमचा तो ओंडका जरा तात्पुरता झिजत चालला आहे. जमल्यास आपण सर्वांनी मिळून तराफा बनवायचा का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

“Deep in the meadow, hidden far away
A cloak of leaves, a moonbeam ray
Forget your woes and let your troubles lay
And when it's morning again, they'll wash away

― Suzanne Collins, The Hunger Games

पुस्तक वाचा, सायकलींग करा किंवा फोटोग्राफी करा. पैकी सायकलींग तुम्हाला शारिरीक आणि मानसीकदृष्ट्या फिट ठेवेल.

हँग इन देअर.

इथे लिहून मोकळे वाटले ना, असेच लिहित रहा.
अंजली चित्रपटात एक छान वाक्य आहे. अंजलीला एका खास घराची गरज होती, म्हणून देवाने तिला या घरात पाठवले.. अशा अर्थाचे.
सर्व मोकळा वेळ सत्कारणी लावा. मूळात मोकळा वेळ मिळतोय हेच किती मोलाचे आहे. घरच्या घरी अगदी मुलाजवळ राहूनही तूम्ही अनेक छंद जोपासू शकतो. काळाच्या ओघात काही आवडीनिवडी मागे पडल्या असतील,
विस्मरणात गेल्या असतील.. त्या सर्व परत तपासून बघा.

आजकाल नेट्मूळे अगदी अभिजात चित्रपट बघायचीही सोय झालीय. वाचनासाठी, संगीतास्वादासाठी इतकेच नव्हे तर स्वतःच्या अविष्कारासाठी पण अनेक संकेतस्थळे उपलब्ध आहेत. मिळणारा वेळ कमी पडतोय..असे वाटू लागेल.

आणि आम्ही सगळे आहोतच कि. कधीही गप्पा मारायला, अंताक्षरी खेळायला, प्रतिसाद द्यायला !

तुमच्यात एवढे प्रेम आणि बळ आहे म्हणूनच देवाने तुम्हावर ही जबाबदारी टाकली आहे!>> अगदी अगदी

हो.. आणि तुला आनंदी रहायचा पुर्ण हक्क आहे. प्लीज बोलत रहा, एकटी पडु नकोस!

खरेतर तुमचा अतिशय व्यक्तिगत प्रश्न आहे पण तरी दुसर्‍या मुलाचा विचार केलात तर ? आमच्या शेजारच्या कुटुम्बात असाच पहिला मुलगा ऑटीस्टीक आहे. तो ७-८ वर्षाचा झाल्यावर त्यांना दुसरी मुलगी झाली. ती सुद्धा अता ३ वर्षाची झालीये.पहिल्यापेक्षा अता त्यांची आई अतिशय बीझी असली तरी आनंदी , हसतमुख असते. पहिल्याला संभाळून थोडी धावपळ , त्रास होईल. पण तरीही असे वाटते की दुसर्‍यामुळे वेगळी आशा , आनंद तुम्हाला मिळू शकेल.

सगळा धागाच फार पाॅझिटिव्ह आहे. त्यात माझाही थोडा हातभार..

स्वतःशी, नव-याशी 'I am thankful for...' हा खेळ अधून मधून खेळून बघा. दोघं खेळत असाल तर ज्याने जास्तीत जास्त कारणं दिली तो जिंकला.

उदा. I am thankful for the school I have found for my son, I am thankful for I am educated enough to understand autism... अशी अनेक वाक्यं सुचतील.

अनेकदा आपण लहानसहान ब्लेसिंग्सना विसरून जातो, आणि मग समोरचं आव्हान आणखीच खडतर, थकवणारं वाटायला लागतं. एक प्रकारचं सॅच्युरेशन आलेलं असतं. या ब्लेसिंग्सना पुन्हा एकदा आठवणं हे या खेळाचं प्रयोजन. आणि हे करून खरंच खूप पाॅझिटिव्ह वाटतं, हा माझा अनुभव. हवं तर नोंद राहण्यासाठी थँकफुलनेस जर्नलही लिहू शकाल.

मी वाॅटस् अॅपवर असाच एक ग्रुपही चालवते, या ग्रुपमध्ये माझ्या ओळखीतले वेगवेगळे सदस्य आहेत.

तो गृप सुरू करायचं कारण हेच आहे, की आपण कधीकधी अकारण उदास होतो. तर कधी अकारण भरकटतो. कधी थकून जातो. अशावेळी फोकस परत मिळवायला काही वाक्यं मदत करतात.

पाॅझिटिव्ह कोटस् मी नियमित वाचते, त्यांची खूप मदत होते अशावेळी. हे कोटस् या ग्रुपवर शेअर होतात. शिवाय आलेल्या फाॅरवर्डस् पैकी जे मनाला उभारी देणारं, नवा विचार देणारं असं जे काही असेल ते आम्ही सगळेजण शेअर करतो. ग्रुपचं नावच आम्ही B+ & Inspire असं ठेवलं आहे. ही आमची पाॅझिटिव्हनेसची बँकच म्हणा..

या ग्रुपवरच्या काही ओळी तुमच्यासाठी..

We can't upload luck,
we can't download time,
Google can't give all the ans in life,
so just login to reality, and
like the status of your life!

इनिगोय, काय सुंदर लिहीलयेसं गं! अशोकमामांची पोस्टही छान! मी नियमीत कोल्हापूरी धागा वाचते, वर्चुयल जगात इतकी आपुलकीचे नाते, भाच्या/ भाचे - मामांचा संवाद वाचून छान वाटते.

माझ्या आयुष्यातल्या एका खडतर प्रसंगी ज्ञानेश्वर आदी मंडळी मदतीकरता धावून आलेली..
"एवढा छोटा मुलगा आपल्या व्यक्तिगत प्रॉब्लेम ला मागे टाकून (जो रोज छळायचा) येवढा व्यापक विचार करतो" हा विचार खूप बळ देऊन गेलेला..

प्रिय सखे.....
वर खुप खुप छान लिहिले आहे सर्वानी...एकदम मनापासून..

सध्या एकच सुचवते - Tom and Jerry चे जुने भाग बघ....
माझ्यासाठी तरी हा रामबाण उपाय आहे ...

मोकळ्या वेळात घरी एकटी न थाम्बता कुठे तरी बाहेर चक्कर मार बघू आधी...

एक बाप, तरल, वॉरीअर मॉम हॅट्स ऑफ. तुम्ही सगळे खूप स्पेशल आहात.

वॉरीअर मॉम. तुमच्या मुलाच्या कंडीशनबद्दल तुमच्या प्रेमाच्या लोकांशी बोला. आपल्या नात्यातील मंडळी, फ्रेंड्स यांच्यापैकी आपल्यावर निरपेक्षपणे प्रेम करणारे कोण आहे ते नाही म्हटले तरी आतुन आपल्याला माहित असते. सुरवातीला हवे तर फक्त त्यांच्याशीच बोला. मग जसे तुम्हाला कंफर्टेबल वाटेल तसे त्याच्या बाहेरच्या सर्कलमधे सांगणे करता येइल. इथे अमेरिकेतील फ्रेंड सर्कलमधेही जसे शक्य होइल तसे सांगा. माझ्या दादाच्या स्पेशल नीड बाळाबद्दल दादाने सुरवातीपासुनच सांगितले होते. दोन्ही बाजूच्या एक्सटेंडेड फॅमिलीचे प्रेम आणि आधार असल्याने रोजच्या लढाईला बळ मिळायचे. बाळाच्या रुटिनची, त्याची काळजी कशी घ्यायची याची नातेवाईकांना हळू ह्ळू माहिती करुन दिली होती. बाळाच्या आईला विश्रांती/चेंज मिळावा म्हणून आठवड्याभरासाठी बाळाची आत्या बाळाचे बघायला घरी आणि बाळाची आई माहेरपणासाठी दुसर्‍या नातेवाईकांकडे असे करता यायचे.

मला विपश्यना meditation ने पॉझिटीव्ह दृष्टीकोन ठेवण्यासाठी खुप मद्त केलि आहे.
मेडिटेशनि खुप बळ मिळते कितिहि कठिन प्रसंगाशि सामना करुन्याचे बळ.
https://www.dhamma.org/mr/about/vipassana

सुरेख, ही चांगली पधदत आहे पण सध्या वाॅमाॅला एकट वाटतंयं अश्या परिस्थित व्यक्त व्हायला, मोकळं व्हायला जागा मिळणार नाही तेव्हा हे किती उपयोगी पडेल साशंकता वाटते...

केदार +१.
असे जे काही वाटते (-) ते काही वेळासाठी असते. तो काही वेळ किती कमी करता येतो ते बघायचे बस्स. Happy

आमचा तो ओंडका जरा तात्पुरता झिजत चालला आहे. जमल्यास आपण सर्वांनी मिळून तराफा बनवायचा का?>>> तुमच उदाहरण लै भारी आहे. पण ओंडका जरी झिजला तरी तो सिझन्ड होत असतो. Wink

एकूणच हा धागा सुंदर चालू आहे. सर्वांनाच प्रेरणा देणारा धागा सुरु केल्याबद्दल धन्यवाद वॉ.मॉ.
आणि हो...तुमचा नवीन आयडी खूप आवडलाय Happy

एक बाप, तरल, मदर वॉरीअर हॅट्स ऑफ! तुमच्याकडून किती शिकण्यासारखे आहे!!

वरती सगळ्यांनी खूप चांगले सल्ले दिले आहेत. मी पण तेच म्हणेन
१. स्वतःकरता वेळ (टिव्ही, पुस्तकं, हलकेफुलके सिनेमे, शॉपिंग)
२. छंद जोपासणे, त्याकरता वेळ काढणे
३. मेडीटेशन
४. फिजिकल अ‍ॅक्टिव्हीटी
५. फोनवर गप्पा मारणे, कोणाकडे मन मोकळं करणे,

तुम्हाला खूप शुभेच्छा. मायबोलीवर प्रेमाने, काळजीने सल्ले देणारे किती लोक आहेत हे पाहूनही मनाला किती उभारी येत असेल नाही! Happy

लग्नाला कैक वर्ष होवुनही माझे कुटुंब दोन माणसांचेच राहीले. तीसरे कुणी आलेच नाही. आयुष्यभराचा सल आहे हा. तारिहि मला मनापासुन वाटते की माझयापेक्ष मोठी जी दुः खे आहेत त्यात अपत्याबद्दलचे दुःख हे आहे. तुझया हिमतीला सलाम.मदर तु अच्युत गोडबोले यांचे मुसाफीर वाचलेसका? नसेल तर तु जरुर वाच.त्यांच्या एकुलत्या एक मुलाविषयी तुला माहीत असेलच. त्यापुस्तकात तुला बरेच सिमिलर अनुभव व तयातुन ते कसे गेले त्यांच्या मनाची अवस्था काय झाली हे वाचायला मिळेल. तुझी लढाई लढण्याचे बळ नक्की मिळेल.तसेच नीला सत्यनारायण यांचेही पुस्तक तुला बाराच धीर देईल.त्यांच्या पुस्तकामागची भुमिका हीच आहे की त्या त्यांच्या मुलगा वाढवात असताना कोणते अनुभव आले ते त्यांनी ईतरांना मार्गदर्शक ठरावेत .तु धीराची आहेसच.आशा करते की माझ्या लिहीण्याने एकवेळ तुला धीर नाही मीळाला तरी चालेल पण तु दुखावली जाउनयेस.मन हळवं झालं की छोटीशी गोष्ट ही डोळयात पाणी आणते माहीतेय मला.

लग्नाला कैक वर्ष होवुनही माझे कुटुंब दोन माणसांचेच राहीले. तीसरे कुणी आलेच नाही. आयुष्यभराचा सल आहे हा. तारिहि मला मनापासुन वाटते की माझयापेक्ष मोठी जी दुः खे आहेत त्यात अपत्याबद्दलचे दुःख हे आहे. तुझया हिमतीला सलाम.मदर तु अच्युत गोडबोले यांचे मुसाफीर वाचलेसका? नसेल तर तु जरुर वाच.त्यांच्या एकुलत्या एक मुलाविषयी तुला माहीत असेलच. त्यापुस्तकात तुला बरेच सिमिलर अनुभव व तयातुन ते कसे गेले त्यांच्या मनाची अवस्था काय झाली हे वाचायला मिळेल. तुझी लढाई लढण्याचे बळ नक्की मिळेल.तसेच नीला सत्यनारायण यांचेही पुस्तक तुला बाराच धीर देईल.त्यांच्या पुस्तकामागची भुमिका हीच आहे की त्या त्यांच्या मुलगा वाढवात असताना कोणते अनुभव आले ते त्यांनी ईतरांना मार्गदर्शक ठरावेत .तु धीराची आहेसच.आशा करते की माझ्या लिहीण्याने एकवेळ तुला धीर नाही मीळाला तरी चालेल पण तु दुखावली जाउनयेस.मन हळवं झालं की छोटीशी गोष्ट ही डोळयात पाणी आणते माहीतेय मला.

>>स्वतःचा मुलगा आपल्याशी अजिबात कनेक्ट होऊ शकत नसेल तर आपल्याला आनंदी राहायचा काय अधिकार!? किंवा कसं कोणी आनंदी होऊ शकेल अशी विचारधारणा तयार झाली आहे. आणि ती पुसून टाकणेच अवघड जात आहे.>>
हे पूर्णपणे मान्य आहे, म्हणजे असं वाटु शकतं, किंबहुना असचं वाटणार हे अगदि कळतय. But kids get our vibes. तो कनेक्ट होऊन सांगु शकत नसला तरी तुम्ही काळजीत आहात. पूर्णपणे आनंदात नाही आहात हे त्याला नक्की कळत असणार. त्यामुळे आनंदात रहा. तुमच्या मुलालाही ते कळेल.

दुसरं महत्वाचं म्हणजे त्याची काळजी घेताना तुमची पण काळजी घ्या. तुम्ही निट राहिलात तर त्याच्याकडे बघु शकाल. annual physical करून घ्या व्हिटॅमिन लेव्हल्स चेक करून घ्या. कदाचित त्यात काही सापडेल ज्यामुळे तुम्हाला down वाटत असेल. विटॅमिन डी च्या कमतरतेमुळे असं होऊ शकतं

A big hug! Hang in there.....

राजसी, Worry is like a revolving chair; it keeps you occupied but takes you nowhere.>> छान वाक्य, थँक्स..

प्रकाश घाटपांडे, भूभू पाळणं नाही जमणार आत्ता. पुढे भविष्यात कधीतरी.

सीमंतिनी, धन्यवाद. मी ऐकून पाहते. बघते जमतंय का मेडीटेशन?
मामी , सत्यमेव जयतेची लिंक बघते. मला साध्या जगाला जाऊद्या, नुसतं जवळच्या एक दोन मैत्रिणींना सांगितल्यावर ओझं कमी झाल्याची भावना आली होती. आय अ‍ॅम शुअर, झाकून न ठेवता मोकळेपणाने लोकांशी बोललो तर आम्हाला उलट जास्त मदतच मिळेल. खात्रीदेखील आहे. परंतू अजुन मन होत नाही. Sad (एकतर आमचा मुलगा लवकर सुधारावा नाहीतर आम्हाला जे आहे ते तसं सगळ्यांना सांगण्याचं बळ यावं. )

तरल, hydrocephalus बद्दल मला काहीच माहीत नव्हते. नेटवर शोधून थोडी आयडीया आली. तू पण मदर वॉरिअर आहेस की. तुला व तुझ्या मुलाच्या प्रगतीसाठी शुभेच्छा!
तू जे म्हणत आहेस वाईट विचार, तो आम्हीही केलाच आहे. होतोच. काहीनाही तर हातीपायी धड आहे, अतिशय क्युट आहे असं आम्हीही आमच्यामधल्या चांगल्या गोष्टींबद्दल विचार करतोच. लोकांना अजुन खूप प्रॉब्लेम्स असतात. ऑटीझमबद्दल वाचताना तर अशाही केसेस खूप वाचल्या आहेत की मुलाला ऑटीझम आणि काहीच काळात आईला कॅन्सर डिटेक्ट झालाय. पण तीही कुटूंबं करतात सगळं मॅनेज. हे फार एक्स्ट्रीम उदाहरण आहे, परंतू त्यांनादेखील जमतंय तर आम्हालाही जमावेच.

झकासराव, धन्यवाद कौतुकाबद्दल. Happy कदाचित मी वाचावेच जुने लेख. मलाच माझ्यातून नवीन मार्ग सापडेल.

अशोकमामा, थँक्यू सो मच! तुमचा प्रतिसाद वाचून डोळ्यात पाणी आले. इनफॅक्ट सगळ्यांनीच किती भरभरून लिहीले आहे कालपासून. तुम्ही कोणी मला ओळखत नसाल पण आमच्या कुटूंबासाठी इतके हितचिंतक आहेत याचा विचार करून बरं वाटतं. सगळ्यांनाच खूप धन्यवाद!

वैजयन्ति, रीया, जिज्ञासा धन्यवाद!

पुढच्या पानावरच्या प्रतिसादांना पुढच्या प्रतिसाद उत्तर लिहीते. Happy खूप प्रतिसाद आले आहेत, मला जमलं तर प्रत्येकाचे पर्सनली आभार मानायला आवडेल. पण ते शक्य नाही, निदान कमेंटमध्ये तरी करायलाच हवे.

सानुली,

>> But kids get our vibes. तो कनेक्ट होऊन सांगु शकत नसला तरी तुम्ही काळजीत आहात. पूर्णपणे आनंदात
>> नाही आहात हे त्याला नक्की कळत असणार. त्यामुळे आनंदात रहा. तुमच्या मुलालाही ते कळेल.

अगदी अगदी!! मुलावर सकारात्मक परिणाम व्हावा म्हणून मातृयोध्यीने आनंदात राहायला हवं, हे अगदी मनापासून पटलं.

नव्या दृष्टीकोनाबद्दल धन्यवाद! Happy

आ.न.,
-गा.पै.

मदर वोरीयर ,एकबाप,इनिगोय तुम्ही स्पेशल आहात ,तुम्हाला सलाम .
सर्वांच्या पोस्टस छान आहेत ,मायबोली वर असल्याचा अभिमान वाटतो आहे .
मदत करणार्या तत्पर पोस्टस खरच मनाला उभारी देवून जातात .

माझी आई स्पेशल मुलांच्या शाळेत प्रिन्सिपल होती ,त्यामुळे जवळून पहिले आहेत ,पालक आणि त्याना सतावणाऱ्या काळज्या.सपोर्ट ग्रुप ने पण खूप मदत होते.
माझ्या आईची मैत्रीण त्यांचे दोन्ही मुले special child आहे,पण बँक मधले काम सांभाळून .संगोपन करतात .
मेडीटेशन चे बरेच video online सापडतील .

केदार, Deep in the meadow, hidden far away
A cloak of leaves, a moonbeam ray
Forget your woes and let your troubles lay
And when it's morning again, they'll wash away >>>

थँक्स! किती चित्रदर्शी ओळी आहेत. मी क्षणभर त्याजागी जाऊन आले. थँक्स! सगळ्यांच्याच कमेंट्समध्ये काहीतरी फिजिकल एक्झरसाईझचा उल्लेख आला आहे. मी पूर्वी रेग्युलर होते व्यायामाच्या बाबतीत. पण गेल्या ३-४ वर्षात दुर्लक्ष झाले आहे हे खरे. आय प्रॉमिस एव्हरीवन, मी व्यायामाचा काहीतरी प्रकार चालू करतेच आता. थँक्स !

दिनेश, धनुकली धन्यवाद! Happy

डेलिया, मी ही या शक्यतेचा विचार करते तेव्हा मला वाटते माझ्या मुलाला खूप फायदा होईल. पण एक मन असंही सांगते (भिववते) की दुसरंही मूल ऑटीस्टीक झाले तर? ऑटीझम होण्यात जेनेटीक्सचाही भाग आहे. तसं जर झाले तर मी आहे का तितकी स्ट्राँग? मला अजुन नाही माहीत. तसेच दुसरं न्युरोटीपिकल असले तर त्यामुळे माझ्या मुलाला एकटं पडल्यासारखे वाटेल का? आय डोन्ट नो. मी माझ्या मुलाला कुठल्याही प्रकारे त्रास झालेला सहन नाही करू शकणार. त्यामुळे हा मुद्दा फार नाजुक व द्विधा मनस्थितीत टाकणारा आहे. Happy

इनिगोय, आय अ‍ॅम थँकफुल फॉर हा फारच चांगला खेळ आहे. थँक्स. मी अशी लिस्ट करून पाहीन.
We can't upload luck,
we can't download time,
Google can't give all the ans in life,
so just login to reality, and
like the status of your life!>>> या ओळी तर खरोखर सुंदर आहे. धन्यवाद!

नानबा, ज्ञानेश्वर? इंटरेस्टींग.. असा विचार माझ्याच्याने झाला नाही कधी. मला कित्येकदा वाटतं, भगवद्गीता वाचावी, दासबोध वाचावे. काहीतरी मार्ग सापडेल. कुठेतरी मनाला शांतावणारं काहीतरी सापडेल. मी खूप लहान आहे हे वाचायला असं वाटायचे. पण तसं बघायला गेले तर मी ऑटीझम पेरेंट होण्यासाठीही लहानच होते. कदाचित वाचून बघावे. Happy

धनवन्ती, टॉम & जेरी कोणाला आवडत नाहीत? Happy मी माझ्या लेकाबरोबर देखील बघते. शिवाय डिस्नीच्या कार्टुन्स! Happy

निवांत पाटील, हा वेगळाच मुद्दा मांडला तुम्ही ! येस, ओंडका सिझन्ड होत जातो. सोनं तावून सुलाखून लखलखते. तसंच आमचंदेखील होणार. दॅट शुअर गिव्ह्ज मी होप. Happy

मो, खरं आहे. किती आपुलकिने सल्ले देत आहेत सगळे. मी इतके दिवस स्वतःला लोनली समजायचे. पण तसे नाही हे कळले. Happy

सुभाषिणी, Sad मला तुमचे दु:ख्ख समजु शकते.
तुम्ही लिहीलेली पुस्तके मी वाचली नाहीत. नोंदवून ठेवते. नक्की वाचेन. थँक्स! Happy

सानुली, But kids get our vibes.>> अ‍ॅबसॉल्युटली. एकदम खरं आहे हे. माझे तर मत आहे, ऑटीझम किड्स हॅव सम काईंड ऑफ पॉवर! माझ्या मुलाला बरंच बेसिक सांगता, कन्व्हे करता येत नाही. पण मी मूडमध्ये नसेन तर स्वतःहून मला एक हग देतो. किंवा त्याला जाणवते समथिंग इज ऑफ. किंवा उलट म्हणजे मी त्याच्याबरोबर डान्स केला, पळापळी केली तर तो मनापासून खुष होतो. आय ऑल्वेज कीप धिस इन माय माईंड. Happy
व्हिटामिन्स व चेकअप मी बर्‍याच वर्षात केले नाही. डॉक्टरांची अपॉईंटमेंट घेते. थँक्स!

Wow! I am amazed at Maaybolikar's overwhelming response. I am truly grateful. Thanks everyone!

आता हे मला आवडलेले चित्र.
86117-81878.jpg

इथे सगळ्यांनीच खुप छान, उपयोगी सल्ले दिले आहेत.
मी पण मागे असाच एक धागा काढला होता, तो पण एकदा वाचून पहा.

तुमच्या त्रासाची मला कल्पनाही येऊ शकत नाही, इतकी मी अनभिज्ञ आहे.
पण मला स्वतः च्या स्ट्रेस ला कमी करताना लक्षात आलेलं काही लिहिते. तुम्हाला उपयोगी पडेल किंवा नाहीही.. सतत स्ट्रेस असेल (कसलाही) तर वर लिहिलेले कुठलेही उपाय तात्पुरते रिलेफ नक्कीच देऊ शकतात. नेहमीसाठी टिकणारं उत्तर म्हणजे मेडिटेशन अन स्वतःच्या बिलिफ सिस्टमला तपासून बघणे अन आवश्यक ते बदल करणे. जसं टाइप ए पर्सनअ‍ॅलिटी आहे का तुमची? असेल तर त्यावर उपाय करा. म्हणजे कधीकधी असं "वाटतं" आपल्याला की "मलाच हे केलं पाहिजे, मी केलं नाही तर कोण करणार, मी अमुक केलं नाही तर जणु आभाळ कोसळेल इ." पण खरंच सांगते तसं काही नसतं. इथे तुम्ही मनात म्हणाल, "हे सगळं खरं, पण..............."! हे सगळे किंतुपरंतु मनातून काढून पहिले प्रयत्न करा हा विचार आत्मसात करायचा.

तसंच " माझं मुल आनंदात नसेल तर मी कशी आनंदी राहू?". तुम्हाला स्वार्थी अन इन्सेन्सेटिव्ह वाटेल पण खरंच स्वतःला लिटरली "प्रोटेक्ट" करा अशा विचारांपासून. कितीही जीवात जीव गुंतले असले तरी प्रत्येक माणूस स्वतंत्र आहे, अन स्वतंत्र नशीब्/आयुष्य/भविष्य घेऊन येतं. अगदी जे मुल तुम्हाला आज टोटली डिपेंडन्ट वाटतंय तेही. त्यामुळे चिंता सोडून द्या असं नाही म्हणणार मी, पण तुम्हाला ही माणुस म्हणून ज्या काही मर्यादा आहेत त्या स्वीकारा. यु आर नॉट सुपर ह्युमन.

हे मनाला पटणं सगळ्यात कठीण आहे. हे पटलं तर तुम्ही आपोआपच आतून शांत व्हाल. आणि त्याचा सकारात्मक परिणाम तुमच्या आजुबाजुला तुम्हाला नक्कीच दिसेल.

अजून एक- मेडिटेशन करताना सकारात्मक, एम्पावरिंग विचार मनात आणा.

तुम्हाला अनेक शुभेच्छा.

मदर वॉरियर (ह्याचा काही शॉर्टफॉर्म होऊ शकतो का?), तुमच्यामधली आवडलेली गोष्ट नमूद कराविशी वाटतेय ती ही की तुम्ही सजेशन्सकरता ओपन आहात आणि खूप पॉझिटिवली घेताय सल्ले. रडतराऊ अ‍ॅटिट्युड न ठेवता हे करायचा प्रयत्न करेन, ते ट्राय करेन म्हणताय हे मला खूप आवडलं.
तुमचा मुलगा नक्की बरा होईल, तुम्ही इतके प्रयत्न करताय त्याला नक्कीच यश येईल. पण आत्ता आहे ही परिस्थिती कुणापासून लपवू नका, त्याचाच ताण तुमच्यावर खूप येईल. जी मित्रमंडळी विश्वासातली आहेत त्यांना जरूर सांगा. हलकं, मोकळं वाटेल.

सगळ्यानीच खूप छान प्रतिसाद दिले आहेत. मी वेगळे काय सांगू? पण प्रयत्नपूर्वक स्वतः ला कशात तरी गुंतवा, त्यानेच मनाला उभारी येईल. तुम्हअला, तुमच्या मुलाला खूप खूप शुभेच्छा.

कितीही जीवात जीव गुंतले असले तरी प्रत्येक माणूस स्वतंत्र आहे, अन स्वतंत्र नशीब्/आयुष्य/भविष्य घेऊन येतं. अगदी जे मुल तुम्हाला आज टोटली डिपेंडन्ट वाटतंय तेही. >> सुरेख लिहल!

मदर वॉरियर, व्यायाम!! रोज एक तास - कुठल्याही हवेत, घरात, जिममधे, पार्कात - जमेल तिथे एक तास केवळ आपल्या शरीरावर लक्ष केंद्रित करणे. दुसरे कुठले काळजीचे वगैरे विचार मनात येतीलच, त्यांना दूर न लोटता, न टाळता आरामात येऊ द्यायचे. हळू हळू ते विरत जातात. कर के देखो.

मदर वॉरियर सगळ्यानी इतकं छान लिहिलय त्यामुळे सल्ला काहीच नाही पण प्लीज आनंदात रहा. बोलण सोपे करणे कठीण but take baby steps and work towards it. You need to feel happy from inside.

तुम्ही इतकं छान लिहिता. गप्पा मारायला आवडत असणार तुम्हाला. ओपन अप. नवर्‍याशी, मित्रमैत्रिणींशी गप्पा मारा. वाटलं तर स्वतःचेच विचार डायरीत लिहून काढा. तुमचे आधीचेही लेख वाचलेत. खूप पॉझिटिव्ह आहात तुम्ही. थोडासा ब्रेक हवाय तुम्हाला negativity ची धूळ झटकायला.

इथेअजूनही काही स्पेशल पेरेंटसनी लिहिलय, त्यानाही सलाम.

तुमच्या जिद्दीचं कौतुक. सगळ्यांनी बरेच सल्ले दिले आहेत.

पद्मजा फेणाणींच्या वॉलवरचं हे एक वाक्य....

Accept everything about Yourself. I mean Everything.
You are you, and that is the beginning and the end;
No Apologies, No Regrets.
Wish U all a great and confident time ahead.

हग्ज, शुभेच्छा.

इतक्या सार्‍या लोकांनी हॅट्स ऑफ केलेले पाहून बरे वाटले ! त्या टोप्या गोळा करून विकल्या तर चार पैसे तरी भेटतील.

>>तुमची हरकत नसेल तर लिहाल का थोडं तुमच्या प्रवासाबद्दल? ऑटीझम स्पेक्ट्रमवर कुठे होता/आहे तुमचा मुलगा? व्हर्बल की नॉन व्हर्बल इत्यादी.

माझा मुलगा आता तेरा वर्षाचा आहे. तो व्हर्बल आहे पण तरीही स्पेक्ट्रम वर आहे. त्याला अजूनही लिहायला/वाचायला येत नाही. दुसरे बाळ होऊ देणे ही मोठी रिस्क आहे कारण निदान आतापर्यंत संशोधनाने तरी जेनेटिक कारण महत्त्वाचे मानले आहे. तरी ही रिस्क घ्यायची का हे आई बाबांचे वय, अर्थिक स्थिती, ई ई वर अवलंबून असावे. आमच्या गॄपमध्ये एका जोडप्याने दुसरा चान्स घतला आणी दुसर्‍या मुलालाही ऑटिझम चे निदान झाले. इतर बर्‍याच कुटुंबात एक टिपिकल आणी एक ऑटिस्टिक असे आहे. मी लिहितोए ते कदाचित आवडेल न आवडेल, पण हा निर्णय अतिशय विचारपूर्वक घ्या. शिवाय टिपिकल मुलाला आपण न्याय देऊ शकू का हेही तपासून पहा.

ऑटिझम इज व्हेरी हार्ड ऑन मॅरेज. आपल्या दोघांचा संवाद तुटू न देणे महत्वाचे. आमच्यात पैशावरून नेहेमी खटके उडत. जास्तीत जास्त पैसे वाचवून मुलाच्या नावावर ठेवावे असे माझे मत. नवनव्या उपायांवर हजारो डॉलर्स खर्च करायची तिची मातृसुलभ प्रवृत्ती. ऑतिझम मध्ये तर दर वर्षी नवनवी फॅड्स येतात. आता थोडेसे कमी भांडतो आम्ही.

सेन्स ऑफ ह्यूमर फार महत्वाचा आहे. इन द लार्जर स्कीम ऑफ थिंग्ज, नथिंग मॅटर्स. रियली. ऑटिस्टिक मुलांच्या निरागसतेमुळे कधी कधी गंमत होते. ओळखीतली बारा वर्शाची मुलगी आहे तिला रोज एक तास टिपिकल वर्गात शिकवतात. तिथली मुले मुली स्लीप ओव्हर ची चर्चा करताना तिने ऐकलं आणी एका मुलाला म्हणाली, आय वाँट टू स्लीप विथ यू.

इतर सर्व लोकांचे प्रोत्साहन वाचून भरून आले. उगाच नाही माबोला कुटुंब मानतो आपण.

तुम्हाला स्वार्थी अन इन्सेन्सेटिव्ह वाटेल पण खरंच स्वतःला लिटरली "प्रोटेक्ट" करा अशा विचारांपासून. कितीही जीवात जीव गुंतले असले तरी प्रत्येक माणूस स्वतंत्र आहे, अन स्वतंत्र नशीब्/आयुष्य/भविष्य घेऊन येतं. अगदी जे मुल तुम्हाला आज टोटली डिपेंडन्ट वाटतंय तेही. त्यामुळे चिंता सोडून द्या असं नाही म्हणणार मी, पण तुम्हाला ही माणुस म्हणून ज्या काही मर्यादा आहेत त्या स्वीकारा. यु आर नॉट सुपर ह्युमन.

वरचा नताशाचा पॅरा एखाद्या फोटो फ्रेम मध्ये टाकून ओळखीतल्या काही मातांना द्यावासा वाटतो. शंभर टक्के पटले.

इथे भारतीय / विदेशी असा वाद सुरु करायची इच्छा नाही पण भारतीयांना (वयस्कर लोकांना) पर्सनल स्पेस ची कंसेप्ट नसते. माझ्या मुलाला बर्गर किंग, के एफ सी वगैरे ठिकाणी थेरपिस्ट घेऊन जातात आणी त्याला रांगेत उभे रहाणे, डेबिट कार्ड देणे, ऑर्डर देणे, आपला ट्रे परत ठेवणे ई करायला शिकवतात. बर्गर के एफ सी मधली टीन एजर मुले मॅचुयर पणा दाखवतात. चुकुन डंकिन डोनट ला गेले तर तिथले केशियर चांभार चौकशा करतात, इरितेत करतात. ज्या एरियात आम्ही रहातो तिथे बरीच भारतीय कुटुंबे रहातात आणी आम्हाला शंभर टक्के चांगला अनुभव आहे.

मलाही कधी कधी कंटाळा येतो मग मी इथे येतो आणी श्रद्धा, फारेंड, मंदार, मामी , स्वप्ना ई लोकांचे चित्रपट परिक्षण वाचतो.

आणखी काय लिहू, हँग इन देअर, आम्ही सारे आहोत, इथे मोकळेपणाने लिहा, इथल्या लोकांचे फोन कधी एंगेज लागणार नाहीत.

छान लिहिले आहेत तुम्ही .आणि महत्वाचा सल्ला हि दिला आहे .
मी वर लिहिल्या प्रमाणे ओळखीच्या मावशींची दोन्ही मुले special child आहे ,हे सर्व गुणसूत्रांचे खेळ असतात ,टिपिकल ,special child हे हातात नसते .तेव्हा दुसरे मुल होवू द्या हा सल्ला देणे खूप सोपे आहे .
नताशा तुझे वाक्य खरेच कोरून ठेवावे असेच आहे .
खरे तर शब्दच थिटे पडत आहे पण लिहावेसेही वाटले .
तुम्हाला शुभेच्छा !!

कितीही जीवात जीव गुंतले असले तरी प्रत्येक माणूस स्वतंत्र आहे,>>> लाख मोलाची बात Happy
थोडेसे अवांतरः प्रयत्न आणि अट्टाहास यात बेसिक लोच्या होतो असे बरेच वेळा वाटुन जाते आणि हाच अट्टाहास पुढच्या स्ट्रेस / डिप्रेशन्चा इनिशिअल पॉईंट ठरतो. हे 'टीपिकल' / नॉन स्पेशल लोकांच्या बाबतीत तर ९९ % घडत असतं.

एक बाप, किती चांगले लिहीत आहात तुम्ही. लिहील्याबद्दल थँक्स! मला अजुन काय लिहावं कळत नाही आहे. जस्ट मेनी मेनी थँक्स. काही प्रश्न असल्यास विचारेनच मी तुम्हाला. Happy

Dhanashri, माझ्या मैत्रिनि ची २९वर्षाचि मुलगी के ई एम मधुन शिकलेलि एक talent डॉक्टर आनि ऑटीझमशी झुंज देनारि एक आई.
संर्पका तुन मेल पाठ्वलि आहे पाह्ने.

या सर्व पोस्ट्स वाचून कोणीही अंतर्मुख होईल ....

फारच धैर्यवान, जिद्दी, प्रॅक्टिकल आणि सकारात्मक विचाराची मंडळी आहात तुम्ही सारेच .... हॅट्स ऑफ टू यू ऑल ...

खूप सुंदर धागा आणि एकसो एक प्रतिसाद! हॅटस ऑफ टू माबोकर..

जर आपण स्वत: आनंदी राहू शकलो तरच आपल्या सभोवतालच्यांना आनंदात ठेवू शकू हा वैश्विक नियम झाला.
मग तुम्ही तरी त्याला अपवाद कसे असाल !

माझ्या वाट्याची थोडी पुण्याई तुमच्यासाठी खर्च करायला आवडेल मला. Happy

4d4087c34ef2c45b567b792f802d68bc.jpgdWt8nM8.jpginspirational-quote-people-cry.jpg

एक बाप, तरल, वॉरीअर मॉम...तुम्हा सर्वांच्या जिद्दीला सलाम! वर सर्वांनी प्रतिसादात दिलेले सल्ले अमलात आणा. . . तुम्हाला नक्कीच बरं वाटेल.

सर्वांत प्रथम मदर वॉरियर असा आयडी घेतल्याबद्दल अभिनंदन.
तुम्ही स्वतःच इथे बर्‍याच जणांचे इन्स्पिरेशन आहात, माझेही. त्यामुळे निराशेचा सूर तुमच्याकडून उमटला तर सर्वजण येणारच तुम्हाला उचलून घ्यायला आणि तसेच आलेही आहेत.

इथे हक्काने आणि आपलेपणाने मदत मागितलीत ते फारच चांगले झाले. हे सर्व प्रतिसाद अगदी मोलाचे आहेत जे तुमचं नैराश्य कुठच्याकुठे पळवून लावतील......

वरती मला वाटतं अकुने हे लिहिलंय ते मलाही रिपीट करावसं वाटतं.

सामान्य माणसाचा स्वभाव असतो की जे चांगलं झालंय ते विसरून जाणं आणि वाईट गोष्टींचाच जास्त विचार करुन स्वतःला त्रास करुन घेणं. हे अगदी प्रत्येकाला लागू होत असतं, मलाही. जसं एखाद्या परिक्षेची ९०% तयारी झाली असेल तरी राहिलेल्या १०% चाच विचार भंडावून सोडतो आपल्याला. पण प्रयत्नपूर्वक आपल्या आयुष्यात घडून गेलेल्या चांगल्या गोष्टीही आठवा आणि त्याबद्द्ल परमेश्वराचे आभार माना (count your blessings... हे ही आलंय वरती). असे क्षण नक्कीच असतात प्रत्येकाच्या आयुष्यात, अनपेक्षितपणे मिळालेले यश, आपल्या प्रयत्नांपेक्षाही जास्त प्रमाणात मिळालेले फल/श्रेय इ.

जितंकं मला माहितीये, तुमच्यबद्दल, तुम्ही यू.एस. सारख्या प्रगत देशात आहात, तुमच्या मुलासाठी उत्तमातील उत्तम उपचार पद्धती अवलंबू शकता, पतीचा आधार आहे तुम्हाला. कैक जणांना अशी मुले असतात व इच्छा असूनही उपचार करता येत नाहीत, तसे आपले नाही ना !

तसेच, विश्वास असेल तर रोज थोडा वेळ तरी मेडिटेशन, नामस्मरण, प्राणायाम हे करूनही बघा, फायदा होतो या सर्वांचा.

शुभेच्छा तुम्हाला !

खूप सुंदर धागा! परत परत वाचावासा! एक बाप ह्यानी अगदी नेमक्या शब्दात मांडलंय माझीपण टोपी स्वीकारा. नताशाने फ्रेम करुन ठेवण्यासारखे वाक्य आहे. शुभेच्छा!

एक बाप तुम्ही खूप छान लिहीले आहे. ठळक शब्दातले पचनी पडायला खूप अवघड आहे पण बरोबर आहे. मी तुमच्या व मदर वॉरिअर च्या मुलांसाठी रोज रात्री प्रार्थना करते. लव्ह फॉर द चिल्ड्रेन ऑलवेज.

नताशा, अशा विचारांपासून प्रोटेक्ट करणं - खरोखर फ्रेम करून ठेवलं पाहीजे घरात. मी प्रयत्न करते अशा विचारांना मागे ढकलायचा आता. थँक्स!

सायो धन्यवाद कौतुकासाठी. माझ्या दोन पर्सनालिटीज आहेत. एक माझीमाझी आणि एक माझ्या मुलाची आई. मुलाची आई आहे ती बर्‍यापैकी गुणी मुलगी आहे. ती असं सल्ले ऐकते, तिला सुधारणा करायची आहे. माझीमाझी पर्सनालिटी मात्र आहे जरा स्टबर्न. Happy

झेलम, धन्यवाद. मला लिहायला आवडत आहे हे ही मला अलिकडेच ऑटीझमचे लिहायला लागल्यापासून कळले आहे.

वेका, पद्मजा फेणाणींच्या वॉलवरचे वाक्य छान! लिहून ठेवते.

एक बाप, ऑटिझम इज व्हेरी हार्ड ऑन मॅरेज >>> हे खरे आहे. पैशांच्या बाबतीतले तर अगदी आमच्याच घरातील कथा! नवर्‍याला मुलाच्या भविष्याची तरतूद करायची आहे. मला बायोमेडीकल आणि अजुन काय काय ठिकाणी पैसे गेले तर काही वाटत नाही. Happy अ‍ॅक्चुअली ऑटीझम पेरेंट्स, नवरा बायकोचे नाते अगदी ताणले जाऊ शकते हा खूप चांगला पॉईंट आहे लेखमालिकेच्या दृष्टीने. किती लिहिता येईल माहीत नाही, परंतू अतिशय महत्वाचा अ‍ॅस्पेक्ट आहे.

भारतिय विदेशी हा मुद्दा खरा आहे. आपल्याकडे स्पेस नावाचा प्रकार कमीच असतो. पण आमचे अनुभव विचाराल तर मी म्हणीन मनुष्याच्या स्वभावातील विविधता. आम्हाला काही इरिटेटींग देसी भेटले आहेत तर काही अमेरिकन शेजारी अक्षरशः तापदायक आहेत. एकदा आम्ही घराच्या बाहेर जात असताना मुलाचे चांगलेच बिनसले होते व तो खूप टँट्रम्स करत होता. बहुधा झोप व रूटीनमधील अचानक बदल आवडला नव्हता. जोरात रडणं, ओरडणे. आमचे सगळे उपाय व्यर्थ ठरत होते. तो इतका रडत होता की त्याला जवळ घेऊन शांत करणं देखील शक्य नव्हते. कारण अंग फेकून देत होता, शिवाय आता तो मोठा होत चालला आहे. माझी फिजिकल ताकद कमी पडते त्याला आवरायला. अशा परिस्थिती एक अमेरिकन बाई येऊन म्हणे हा इतका का रडतोय? इथे लोकं राहतात, तुम्ही डिस्टर्ब करताय शेजार्‍यांना. तो असा रडतोय जसं काही त्याचा अ‍ॅब्युझ होतोय. कॉप्स ना बोलवू का? Sad मी माझ्या आख्ख्या आयुष्यात प्रथम भांडले होते तावातावाने. Happy

ऋन्मेष आशिता धन्यवाद! Happy

आशिका, बरोबर आहे तुमचे म्हणणे. ब्राईट साईड कडे पाहणे अवघड जाते पण पाहायला हवे.

अमा, धन्यवाद! Happy

मी माझ्या आख्ख्या आयुष्यात प्रथम भांडले होते तावातावाने. >>> आता नक्कीच म्हणू शकतो आपण आयडी योग्यच घेतला Happy

पैश्याच्या बाबतीत शेवटी एक सोल्युशन केले ते असे, दर वर्षी एक बजेट मी तिला देणार आणी तिने त्यातच बायो मेडिकल ई ई करायचे. हे पैसे मी दुसर्‍या कुणासाठी साठवत नाहीये हे तिलाही कळते. त्यामुळे फार ताणले जात नाही.

एकदा पार्टीला गेलो असताना शेजार्‍याचे मागचे दार उघडे होते. त्यातून आत जाऊन फ्रीज मधला कोक घेऊन आरामात पीत बसला खुर्चीवर. शेजारी घाबरून बाहेर आले आणी ९११ ला फोन केला. त्यांना अतिरेकी वाटला म्हणे पाच वर्षाचा मुलगा. असे काही अनिभव वगळता चांगलेच आहेत.

आपल्या नातेवईक्/मित्र यांना सांगायचे का? हा मोठा प्रश्न आम्हालाही पडला होता आणी उत्तर सोपे नाही हे मलाही कळते. पण शेवटी हे बॅगेज घेऊन किती दिवस रहायचे हाही प्रश्न आहेच. मानीनी (?) च्या एका दिवाळी अंकात पूर्णा धर्माधिकारींचा सुंदर लेख आला होता. आम्ही सांगितल्याने फरक पडला नाहीच, उलट मदतच झाली. इट इज नॉट अ बिग डील. आणी त्या फिल्टर ने कोण 'आपले' आणी कोण 'खरे आपले' हेही कळते. पण तरीही लहानपणापासून तुला किती टक्के पडले अशा मानसिकतेत असल्याने थोडा त्रास झाला. आपण सांगितले तर काय होईल अशी भिती रास्त आहे पण ट्रस्ट मी, काहीही फरक पडत नाही. जवळच्या मित्रांना मात्र सांगणे बरे होते. असो फार तुटक तुटक लिहिले आहे.

'नातीगोती' हे अप्रतीम नाटक पहाताना हे आपल्या जीवनात ही होईल का अशी क्षणभर शंका आली पण "काहीतरीच काय?" असे वाटून उडवून लावली.

सुदैवाने अमेरिकेत सोशल सिक्युरिटी मुळे मुलाचे जेवणाखान्याचे हाल होणार नाहीत हे फार चांगले आहे.

म वॉ तुम्ही थोढी गेंड्याची कातडी आणा हो. यू ट्यूब वर कुणी तरी ए बी ए ची तुलना कुत्र्याचा ट्रेनिंगशी केली म्हनून वाईट वाटले ना? अहो टिपिकल मुलांचे शिक्षण ए बी ए पेक्षा वेगळे आहे का? सदत हसन मंटो वेड्याच्या दवाखान्यातून सुटले तेव्हा एकाने विचारले की कैसा लग रहा है पागलखानेसे छूटने पर. तो म्हनाला छोटे पागलखानेसे बडे पागलखाने मे आया और क्या.

माझा मुलगा डिसलेक्झिक होता. मी छोटी लढाई लढले आहे तुम्ही वाॅरियर्स कोणत्या प्रसंगातून जात असाल कल्पना करु शकते. मायबोली उघडल्यावर हा धागा आधी वाचते. मला खूप काही लिहीता येत नाही पण एवढचं म्हणू शकते ' हम आपके साथ है '

मेधा, सीमंतिनी,एक बाप, नताशा, शूम्पी आणि बरेच इतर यांच्या पोस्ट छान आहेत.

आपण सांगितले तर काय होईल अशी भिती रास्त आहे पण ट्रस्ट मी, काहीही फरक पडत नाही. जवळच्या मित्रांना मात्र सांगणे बरे होते.>>>>. कठीण आहेच.पण वर म्हटल्याप्रमाणे काहीही फरक पडत नाही.

इतक्या सुंदर आणि भरभरुन प्रतीक्रीया आल्यानंतर खरतर मलाही इथे लिहीण्यापेक्शा वाचायला फार आवडतय आणि खुप काही शिकायलाही मिळतय , ज्या फक्त तुमच्यासाठी पाठवलेल्या सर्वांच्या लिहीलेल्या प्रतीक्रीया आहेत त्या अनेक जणांना स्वत:च्या (निराशावादी ) कोषातून बाहेर पडण्यासाठी प्रेरणा देतील .यासाठी जे तुम्ही लिहुन स्वतःचे मन मोकळे केले त्यासाठी तरी मला लिहावेसे वाटत आहे .

जरा फिलॉसॉफीकल वाटेल पण माझ्या मते पॉझिटीव ,निगेटीव या दोन्ही गोष्टी फायद्याच्याच असतात . त्या तुम्हाला तुम्ही नक्की कसे आहात याची ओळख करुन देतात. त्याने जरा दु:ख होतं पण खरया आनंदाची किंमतही कळते. उदा. बालीश वाटेल पण हेच आता आठवतेय---- माझ्या लहानपणी मी एकदा साध्याश्या कारणावरुन आईचा खुप (जो मला तेव्हा वाटायचा) (बालमन शेवटी) मार खाल्ला तो वाईट दिवस मी फार मनाला लावुन बरेच दिवस आईचा रागराग करायचे नंतर कालांतराने सगळ्या गोष्टी रुळावर आल्या ,पण तो राग खुप वर्ष तसाच राहीला होता .मग जेव्हा मी जरा मोठी झाले त्यावेळच्या माझ्या मैत्रीणीचा अनुभव मला फार हलवुन गेला ,मी तीला हा प्रसंग जसाच्या तसा सांगितला त्यावर ती फक्त एवढचं म्हणाली" तुझ्याकडे कमीत कमी रागवायला तरी आई आहे माझ्याकडे तर त्या साठीही आई नाही" . तीची आई देवाघरी गेली हे कळल्यावर आजही मला मी कीती निगेटिव विचार करत होते पण त्या एका प्रसंगाने स्वतःला सुदैवी समजु लागले जे आजपर्यंत मी अनुभवतेय. आणि तो राग तिथेच कायमचा निवळला. Happy

आज जर का तुम्हाला वर लिहिल्याप्रमाणे >>>> 'मनात एकप्रकारची पोकळी येत चालली आहे. आयुष्य हे एक आनंददायी प्रकरण आहे हे विसरत चालले आहे. आयुष्य म्हणजे कर्तव्यांची रांग. मला ना काही वाचण्यात इंटरेस्ट राहीला आहे ना कुठला मुव्ही पाहण्यात. इतकंच काय, मी ऑटीझम बद्दलही वाचत नाही सध्या. >>>> त्याहीपुढे तुम्हाला डिप्रेस व्हायचाही ऑप्शनच नाही असं जे वाटतय ते जितकं चुकीचं आहे ,तितकच नॉर्मलही आहे.हेही आपण जिवंत असल्याचच लक्षण आहे. फक्त ती अवस्था प्रयत्नपुर्वक दुर करायची.त्यासाठी सर्वांनी जे उपाय सांगितले आहेत ते कराच .

माझ्याकडुनही तुम्हाला आशादायी दृष्टीकोन ठेवण्यासाठी ह्या टीप्स . Happy
प्रथम माबो वरचे सगळे धमाल धागे बूकमार्क करायचे आणि रोज नियमित वाचायचे. त्यासाठी आम्ही अजुन मदत करुच. Happy

तुमची जी काही आवड असेल ती जोपासा जसे बागकाम,छान स्वतःच्या आवडीचे पदार्थ बनवणे,व्यायाम म्हणुन नव्हे तर आनंदासाठी दोघेच किंवा तीघेही एकत्र फिरायला जाणे.नेहमीच्या वाचनापेक्षा विनोदी वाचन ,चांगल्या गोष्टी, प्रसंग जे घडतील तेच फक्त स्वतःच्या हाताने नेटवर तर लिहाच पण त्या पेक्षाही डायरीत लिहा .आपलं पेनाने लिहीलेलं अक्षर पाहताना व आपल्या डायरीतल्या चांगल्या गोष्टी वाचताना खुप वेगळा आनंद मिळतो . आणि वर त्या डायरीला चार्जींगही करावं लागत नाही कधीही उघडुन वाचता येते. Wink

खरया निसर्गाबरोबरच माबोत असणार्या निसर्गाचेही धागे ,फोटो पहा, फुलं, पानं फोटोतुन बघुनही एकप्रकारचं चैतन्य निर्माण करतात.खुप छान वाटेल तुम्हाला.

आणखि ही http://maharashtratimes.indiatimes.com/lifestyle/gents-/-ladies/World-fo...
एक लिंन्क देते आहे तुमच्यासाठी, त्यातल्याही गोष्टी करायला तुम्हाला नक्कीच आवडतील. Happy

गाणी आणि चित्रपटासाठी तर तुम्ही इथल्या कुठ्ल्याही गाण्याच्या धाग्यावर जाउन गाणी ऐकु शकता त्याबद्दल वाचु शकता आणि गाण्याच्या गप्पाही मारायला तुमचं कायम स्वागत आहे . आणखी गरज गाण्यांची किंवा कुठलीही तर खुशाल मला विपु करा . आता आपण सगळे मैत्रीने आणि जिव्हाळ्याने जोडले गेलो आहोत हे कायम लक्षात असु द्या. त्यामुळे तुम्ही एकटया आहात हा विचार हद्दपार करा. लागलीच एक गाणं तुम्हाला मी इथे देते आहे ,

http://www.youtube.com/watch?v=nDWSo-tVZTU

आत्ताच सुरुवात करा ऐकायला. या गाण्याचा अर्थही सुंदर आहे. Happy

Pages