Astral Projection

Submitted by उडन खटोला on 21 October, 2014 - 18:18

सूक्ष्म देहाने संचार अर्थात Astral Projection म्हणजे थोडक्यात गाढ निद्रा / स्वप्नावस्थेत स्वतःच्या शरीराबाहेर पडून अज्ञात जगताची सफर करणे.

याविषयी कोणाला माहिती आहे का ?

यू ट्युब वर तसेच अन्य वेबसाईट्स वर याविषयी प्रचण्ड माहिती आहे ,पण ते कितपत उपयोगी ठरेल याबद्दल शंका आहे

मराठी मध्ये याविषयी काही साहित्य उपलब्ध आहे का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

या विषयी लोकांमध्ये अपप्रचार करायचा असेल, खोट ठरवायच असेल तर काहीही नाही वाचल , पाहिल नाही तरी चालेल.

जर आपल्याला खरोखरी उत्कंठा असेल तर आद्य शंकराचार्यांच्या परकाया प्रवेशाच्या प्रयोगाच्या वाचनापासुन सुरवात करा.

मायबोलीवर ज्यांच नाव घेतल की गदारोळ होतो त्या डॉ. प वि वर्तक यांच्या मंगळ ग्रहाच्या प्रवासाचा प्रयोगही वाचा. त्यांनी याचे पुरावे ठेवले आहेत तेही पहावेत.

हे सर्व करुन पहायच असेल तर त्या संदर्भात "योगसुत्रे " हा पतंजली मुनींचा ग्रंथ अभ्यासावा. अर्थात यावरच्या टीका वाचुनच ही सुत्र अभ्यासता येतात.

खालील लोकांनी योगसुत्रे वर टीका लिहल्या आहेत.

१) भारतीय मानसशास्त्र अर्थात योगसुत्रे - श्री कोल्हटकर
२) राजयोग - स्वामी विवेकानंद
३) - डॉ प वि वर्तक
४) - श्री विश्वास मंडलिक

क्र . ३-४ या पुस्तकांची नावे लक्षात नाहीत.

हा विषय योगाभ्यासाच्या अंतर्गत येत असल्यामुळे धागा ज्योतिष विषयातुन हलवला तरी चालेल.

जगन्नाथ कुंटे यांच्या नित्य निरंजन आणि कालिंदी या दोन पुस्तकात याचा उल्लेख आहे , तुम्हाला कीतपत उपयोगी ठरेल हे सांगता येत नाही.

themindunleashed.com या संकेतस्थळावर तुम्हाला हवी असलेली माहिती मिळू शकेल.

डॉ. प वि वर्तक यांनी जो प्रयोग केला त्या आधी कोणि मंगळा वर गेले नव्हते म्हणजे त्यांच्या प्रयोगात बनवाबनवी प्रकार नाहि.
म्ह्नणजे त्यांना ही माहीती दुसरी कडून मिळाली वगैरे आणि या सर्व गोष्टी वेदा मध्ये होत्या म्हणजे वेदांतील इतर गोष्टी (ज्योतिष सुद्धा) सत्य
असल्याची शक्यता बळावते

यासन्दर्भात एक धमाल लिन्क शेजारच्या संस्थळावर सापडली. इच्छुकांनी जरुर लाभ घ्यावा

https://www.misalpav.com/node/21379

( इतर ठिकाणच्या लिंक देणे इथे चालत नसल्यास हा प्रतिसाद उडवावा ही विनंती)