लहान मुलांसाठीच्या वाहिन्या

Submitted by स्वस्ति on 21 October, 2014 - 03:25

जाहिरातिंच्या धाग्यावर चर्चा सुरु झाली म्हणून नविन धागा काढला

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आय्येम बिSSSSग फॅन ऑफ ओल्ड कार्टून नेटवर्क..

फ्लिनस्टन्स.. जेटसन्स.. स्कुबी डू.. पावरपफ गर्ल्स.. डेक्स्टर्स लॅब.. योगी बेअर.. हाना बार्बरा..
खुप आठवण येतेय. Sad

Ed, Edd n Eddy,
oggy and the cockroaches,
road runner,
The mask,
popeye,
Johnny Bravo

हल्ली छोटा भीमने नुसता धुमाकूळ घातला आहे. मागे एकदा पाहिलेला एक एपिसोड. अक्षरक्षः पांचटपण असतो, म्हणजे काहीही झाल कि धोलपुर का कश्यावर तरी संकट येणार आणि मग हि मंडळी ते पळवणार. तो शाळेत जात नाही म्हणून आता छोटा भीम पण शाळेत जाणार अस काहीतरी आलेलं कानावर. सध्या काय आहे काही माहित नाही.

कार्टून नेटवर्कवर अनेकदा मी इंडो-जापनीज रामायण (रामायणा: दि लेजंड ऑफ प्रिन्स राम) पहिले आहे. Happy तेव्हा ते दिवाळीला कि दसऱ्याला हमखास लागायचेच.

असो, या वेबसाईट वर तुम्हांला भरपूर नवीन, जुन्या वाहिन्या (?) पाहता येतील. तुनळी वर बरेच एपिसोड्स, मुव्हीज आहेत.

खालील लिंक्स वर जुने कार्टून्स पाहू शकता:

माझ्या काही आवडत्या वाहिन्या/ Anime Series:

 1. Beakman's World
 2. The Adam's Family
 3. Pokemon (All Series)
 4. Digimon (All Season)
 5. Cambala Investigation Agency
 6. Bayblade
 7. Batman (Animated)
 8. Yogi Bear
 9. Captain Planet
 10. Courage The Cowardly Dog
 11. Dexter's Lab.
 12. Dragon Tales
 13. Ed, Edd, Eddy
 14. Tiny Planets (The Fisher Bing)
 15. Avatar: The Last Airbender
 16. Top Cat
 17. Road Runner
 18. Transformers (All Series)
 19. Pingu
 20. Popeye the Sailor Man
 21. Powerpuff Girls
 22. Powerpuff Girls Z
 23. Mr. Been
 24. Takeshi's Castle
 25. Richie Rich
 26. Samurai Jack
 27. Jackie Chan Adventures
 28. Johnny Bravo
 29. Aquaman
 30. M.A.D. (Music, Art, Dance)
 31. Dragon Ball
 32. Dragon Ball Z
 33. The Sleepover Club
 34. Kirby
 35. Clifford the Big Red Dog
 36. Clifford's Puppy Days
 37. Oswald
 38. Naruto
 39. DOREMON! Proud
 40. Thunder Cats
 41. Bugs Bunny Show
 42. Cartoon Cartoon Show
 43. Flintstone Kids
 44. Flintstones
 45. Jetsons
 46. Land Before Time
 47. Looney Tunes Show
 48. Stuart Little (Animated Series)
 49. SWAT Kats
 50. Sylvester and Tweety Mysteries
 51. Teenage Mutant Ninja Turtles
 52. Teen Titans
 53. The 13 Ghosts of Scooby-Doo
 54. Adventure Time
 55. Ben 10
 56. The Tom and Jerry Show
 57. Teletubbies
 58. MY LITTLE PONY Friendship is Magic! Proud
 59. Astroboy
 60. Hole in the wall
 61. The Pink Panther Show
 62. Baby Looney Tunes
 63. Make Way for Noddy
 64. Garfield & Friends
 65. Oggy and the Cockroaches
 66. Tom & Jerry Kids
 67. Tom and Jerry Tales
 68. Samsher Sikander Chuddie Buddie
 69. Justice League

मी खात्रीनिशी सांगू शकते यातल्या ९०% वाहिन्यांची गाणी (इंट्रो, तेही हिंदी आणि इंग्रजी दोन्ही) मला अजूनही (घरात २ वर्ष टीवी नाहीये) पाठ आहेत. तेव्हा सकाळचाच एपिसोड परत लागायचा. माझी शाळा आमच्या कॉलनीत असल्याने सकाळ आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस पहायचे. उगाच पापणी मिटताना काही 'महत्वाचे' मिस झाले तर? Proud

अजून यातल्या काही कार्टून्सवर आधारित मुव्हीज पण आहेत. पोगोवर नेहमी Harry Potter
च्या मुव्हीज असायच्या मेमध्ये. Same for Scooby Doo, Tom & Jerry, Ben 10, etc.

१. Movies broadcasted by Cartoon Network here

२. Movies broadcasted by Pogo here

कॉपी नाही. पाठ आहे Proud
जसे आठवत गेले तशी यादी बनवली. काहींची गाणीच आठवत होती. मग लगेच सर्च केलं आणि पूर्ण नाव कॉपी केलं. Happy

पुर्वी कार्टून नेटवर्क हिंदीत लागायचं तेव्हा हे फ्लिनस्टन्स.. जेटसन्स.. स्कुबी डू.. पावरपफ गर्ल्स.. डेक्स्टर्स लॅब..
हे सगळं बघायला अजुनच मजा यायची.

झरबेरा, कार्टून्स बाबत तुझी आणि माझी आवड ९०% सारखी आहे Happy
माझ्या आवडत्या कार्टून्सची लिस्ट (यात लहानांसाठीचे प्रोग्राम्स पण येतात) :

The Adam's Family
Cambala Investigation Agency
Sylvester and Tweety Mysteries
Captain Planet
Dexter's Lab.
Dragon Tales
Ed, Edd, Eddy
Tiny Planets (The Fisher Bing)
Road Runner
Pingu
Popeye the Sailor Man
Powerpuff Girls
Powerpuff Girls Z
Mr. Been
Richie Rich
Johnny Bravo
M.A.D. (Music, Art, Dance)
Dragon Ball
Dragon Ball Z
The Sleepover Club
Clifford the Big Red Dog
Clifford's Puppy Days
Oswald
Naruto
DOREMON! Proud +१ Wink
Bugs Bunny Show
Looney Tunes Show
Stuart Little (Animated Series)
Sylvester and Tweety Mysteries
The 13 Ghosts of Scooby-Doo
The Tom and Jerry Show
Hole in the wall
The Pink Panther Show
Baby Looney Tunes
Make Way for Noddy
Garfield & Friends
Tom & Jerry Kids
Tom and Jerry Tales
Justice League
phineas and ferb
Bob d builder
ninja hatodi
Perman

*high-5*

माझ्या नादी लागून आईला पण आता बऱ्याच वाहिन्या, गाणी लक्षात आहेत. अगदी २ मिनटांवर होती माझी शाळा. इथे एपिसोड संपला आणि मी पाळले शाळेला. Proud

अजून एक शो असायचा, प्रत्येक एपिसोड मध्ये एक गाणं, डायनोसोर सदृश्य काहीतरी असायचा तो प्राणी.. त्यांचंच गाणं होतं ज्यावरून एनर्जी चं स्पेलिंग एकदम फिट्ट बसलंय डोक्यात Happy

सध्या बाळराजे आणि मी ,दोघेही झी क्यु चे फॅन झालो आहोत .

रात्री बॅक टु बॅक कार्यक्रम बघतो Happy

डायनोसार ट्रेन - मस्त कार्यक्रम .ते पूर्ण डायनो कुटुम्ब धमाल आहे . त्यान्ची नाव जरा दमछक करतात . हसत खेळत माहिती .

ईन्जिनीअर धिस - शौर्य जाम क्युट आहे . 'रीयुज' , रीसायकल . तो जे बनवतो आणि जस बनवतो बघायला मजा येते.

झु : झेब्रा फॅमिली . झु( स्वतः) ,मॉम , डॅड , ग्रॅन्मा , ग्रॅन्पा , झु ची मैत्रिण ( ध्रुवी) .. त्यामुळे आम्हाला ही आमचीच कथा वाटते Happy

कार्टून नेटवर्कचे जुने एपिसोड्स (हिंदी) कुठे बघायला मिळतील का?
तुनळीवर सगळे इंग्रजी आहेत. पण मला हिंदी एपिसोड्स जास्त आवडायचे/ आवडतात.

हल्ली आमच्याकडे नुसते पोकेमॉन पिसाळलेयत. एकूण १५० आहेत म्हणे.... इति चिरंजीव..

पण माझं ऑल टाईम फेवरेट - टॉम अँड जेरीच !!

हल्ली आमच्याकडे नुसते पोकेमॉन पिसाळलेयत. १०० %अनुमोदन.>>++११ मला तर ते बघवत पन नाही..

पण माझं ऑल टाईम फेवरेट - टॉम अँड जेरीच !!>>++११

झरबेरा | 8 November, 2014 - 09:58

>> धन्यवाद झरबेरा.. पण मी पोकेमॉनची अज्जिबात फॅन नाही. मला फ्लिनस्टन्स.. जेटसन्स.. स्कुबी डू.. पावरपफ गर्ल्स.. डेक्स्टर्स लॅब इ. हिंदीत बघायचे आहे.

हल्ली आमच्याकडे नुसते पोकेमॉन पिसाळलेयत. Biggrin

झरबेरा आणि रिया ...... बाळांनो, तुम्ही काय दिवसभर टिव्हीलाच डोळे चिकटवून बसायचात का गं??? आँ???? Proud

डिस्ने ज्यु. वर डॉक. मॅक्स्ट्फिन लागतं.

कसली क्युट सिरियल आहे .
ती छोटी मुलगी खेळण्यांची डॉक्टर आहे .
काय मस्त एकेक आजार आणि निदान .

मित Happy सेम पिन्च .

फक्त ओगीच्या एवजी दोरेमॉन ने उच्चाद मान्डला आहे .
मिस्टर मेकर बघयला लागल्यापसून आम्हि फावल्या वेळेत चित्र काढ्तो ती डायरेक्ट रंग घेउनच .
उगाच पहिल्यान्दा पेन्सिल ने काढण्यात वेळ कशाला घालवायचा Happy

आर्ट अटॅक हाही नविन छंद आहे सध्या

आमच्याकडे सध्या झू, ओगी आणि मिस्टर मेकर सुपरहिट! + ११११११११११११
आमच्याकडे पपेर मधुन नव नविन कात्रने कापन्याचा चन्द लगला आहे. साबा कचरा जमा करुन कन्तलया अहेत
गुरुवार व रविवार नको होतो.

पोगो वर साडे नऊ क्रिश ट्रिश बाल्टीबॉय लागते. माहितीतल्याच पंचतंत्र कथा पण वेगवेगळ्या प्रांतांच्या बोली/अ‍ॅसेंट मधे. मजा येते ऐकायला. त्यातला बंगाली वाली कथा ऐकून प्रचंड हसले होते. बंगाली ब्रह्मराक्षसाला बायकोची ओळख 'हा आमचा ब्रह्मराख्खस' म्हणून करुन देतो Happy

क्रिश ट्रिश बाल्टीबॉय लागते>>> आमच्याकडे पोराला अजिबात नाही आवडत, त्याच्या आई बापाला मात्र आवडते Wink

क्रिश, ट्रिश बाटलीबॉय मस्त असते. त्यातील कार्टूनही पुरातन भारतीय कलांमध्ये असतात. त्यामुळे खूप छान वाटते. देशभरातील वेगवेगळ्या ठिकाणची भाषा वापरलेली असते. पण पोरांना तो डोरेमॉनच जास्त आवडतो. आपला टॉम अॅण्ड जेरी आणि शॉन द शिप एकदम फेवरिट. मूळ कार्टूनला आवाज नाही. पण शॉन द शिपमध्ये दिलेला शाहरूखचा डमी आवाज मस्तच.

कालचे हैदराबादी क्रिश ट्रिश कथा जबर्‍या होती.
ब्रह्मराक्षस सुब्रहमण्यम राक्षस्वामी क्रिष्णमूर्ती (का असेच काहीतरी) येस्स आर के अ‍ॅट योर सर्व्हिस !!
राजस्थानी पण चांगली होती

क्रिश ट्रिश ची मूळ संकल्पनाच खूप छान आहे. भारतातील जुन्या चित्रकला शैली (उदा. मधुबनी चित्रकला शैलीत साकारलेली बोका आणि दोन माकडांची गोष्ट) च्या आधारावर साकारलेली कार्टून्स असतात. भाषाही तिच- भोजपुरी, बंगाली वगैरे. त्यामुळे एक प्रकारे जुन्या, लुप्त होणार्‍या चित्रकला शैलींचे एक प्रकारे जतन/प्रोत्साहन होतं.

शनिवार-रविवार ओन्ली फॉर परिवार , या गोंडस टॅगखाली सुरु झालेल्या मालिका आठवडाभर चालू असतात , डिस्नेवर .

ऐसे गीत गाया करो : अतिगोड , साखरेच्या पाकात बुडवलेली पुरणपोळी . भल मोठ्ठं कुटुंब . प्रेमळ बाबुजी , सबका पूरा ख्याल रखे टाईप्स बडी बहु ( इथेही रेणुका शहाणे ) , एक नमुना सून , भरपूर कच्ची-बच्ची , बाबुंजीच्या आज्ञेत असणारे मुलगे . एक एपिसोडच्यावर नाही पाहू शकले .

गोल्डी अहुजा ... : नमुनेदार शिक्शक , कॉमेडी बाप , हुशार मुलगा , मधल्या मध्ये अडकणारी आई. लहान मुलानी सहसा पाहू नये अशी सिरेल . (आधीच मर्कट.... ) . पण ती आई खूप आवडते , छान दिसते , बोलते . हॅरी पण खूप स्मार्ट आहे .

मान ना मान ... : एकतर या लोकांच घर ईतक मोठ्ठ आहे की तिकडेच डोळे विस्फरतात . जाम बोर वाटली मला सिरियल . एक लैला-मजनूचा एपिसोड सोडला तर कुठलाच पटला नाही.

जिंदगी खट्टी मिठी : टीपिकल सेट अप , एका घरात जेवण करणारा लखन तर दूसर्या घरात रोझी , एका घरात मालकिणीची बहिण तर दूसर्या घरात मालकाचा भाउ , एका घरी मुलगा तर दूसर्यान्ची मुलगी . पण सगळ्यात आवडते ती " मिसेस लाजवंती सिन्हा" . भरपूर श्रीमंत पण अशिक्शित . ईन्ग्रजी बोलायची बोलायची हौस. ती ज्या सहजतेने ईन्ग्रजी मिश्रीत हिन्दी बोलते ते धमाल आणतं . दूसरी ती अप्पु एक मस्त आहे .

लगे रहओ चाचु : ही एकच सिरियल मला बघायला आवडते . एक तरूण काका आहे . त्याची डॉक्टर गफ्रे आहे .
२ पुतण्या आणि एक पुतणा अशी ३ मुलं आहेत . त्याना सांभाळायला एक तरूण , स्मार्ट मुलगी नॅनी म्हणून आहे .
पण मुलं अतिआगावू नाहीत , काका कावलेला नाही , गफ्रे समजूतदार आहे , नॅनी चांगली शिकलेली , स्मार्ट आहे ., तीच अणि काकाचं काही लफड नाही आहे , गफ्रे अजिबात गैरसमजूत करून घेणारी नाही ,नॅनीशी तितकीच मैत्रिणीसारखी वागते .तिला मुलांबद्दल किन्वा मुलांना तिच्याबद्दल कुथलीच तक्रार किन्वा आकस नाही .

काका पण मुलांना समजून घेतोय - मोठ्या पुतणीला मैत्रिणिसोबत पार्टी करायची आहे. तीच्या मैत्रीणी येतात . तो लवकर घरी येतो , लपत छपत , नॅनीला साण्गतो - तीचा मूड ऑफ होईल सांगू नकोस मी आलोय ते . गपचूप जाउन आपल्या रूम्मध्ये बाकिच्या मुलांना घेउन बसतो . आणि यातले विनोद पण बर्यापैकी दर्जेदार आहेत .

सध्या मिस्टर मेकर आणि छोटा भीम मधला इंटरेस्ट संपुष्टात आला असून, त्याची जागा झी क्यू वरच्या द आर्ट रुम आणि बंडबूख और बुडबक ने घेतल्या आहेत... लल्लनटाप . झू लागत नाही वाटतं आता.
ओगी मात्र अजूनही सर्वोच्च स्थानावरच !

Disney junior वर दुपारी 3pm आणि रात्री 9:30 pm ला octonauts असतं. त्यात ८-९ octonauts असतात जे समुद्रातील इतर प्राण्यांची मदत करतात. १० मिनीटांचा एक episode असतो. त्यात एका नवीन प्राण्याची story असते. त्या नवीन प्राण्याची ५-६ माहिती देतात, ती खरी असते. या कार्यक्रमातून माझ्या लेकीला अनेक प्राणी कळले. इतकच काय मलाही 'ओर फिश' आणि 'नारवाल' बद्दल कळलं. Worth watching cartoon serial.

सध्या मिस्टर मेकर आणि छोटा भीम मधला इंटरेस्ट संपुष्टात आला असून, त्याची जागा झी क्यू वरच्या द आर्ट रुम आणि बंडबूख और बुडबक ने घेतल्या आहेत... लल्लनटाप . झू लागत नाही वाटतं आता.
ओगी मात्र अजूनही सर्वोच्च स्थानावरच ! >>>>>>>>>>>> येस्स्स .
आमचं पार्सल पण आता मोठं झालं .छोटा भीम केव्हाच मागे पडला. अगोदर तो लालोन आवडत नव्हता , हल्ली कंटाळत का होईना पण द आर्ट रुम बघतो . 'ईंंजिनीअर धिस ' पण बघतो . त्याच्या वयाच्या मानाने जरा भारी आहे , पण त्याच्या आईला जास्त इन्टरेस्ट !
आमच्याकडे सध्या उच्छाद आणणारी लोक म्हणजे - गोल्डी अहुजा , नायशा,निक्की अ‍ॅण्ड फॅमिली आणि विवेक चाचु . यातले शेवटचे दोन आम्हालाही आवडतात . Happy
डोरेमॉन अजूनही टॉप पोजिशन पकडून .

Pages