अल्टो कारनी पुणे-भोपाळ प्रवास करायचा आहे!

Submitted by हतोडावाला on 8 October, 2014 - 04:16

दिवाळीच्या सुट्टीत भोपाळला जायचे आहे. मस्तपैकी आठ द्विस फिरायचा प्लान असल्यामुळे अल्टोनी जावा असा विचार केला. पण चेत॑न गुगळेंचा दिल्ली प्रवास वाचल्यावर जरा खचून गेलो. ट्रेनचा प्रवास तसा बेश्टच पण तिकडे फिरायची जरा गैरसोय होते म्हणून गाडीचा विचार केला.

पुणे ते भोपाळचे अंतर जवळपास ८२५ किमी आहे.

एवढ्या लांबच्या प्रवासाला अल्टो चालेल का?
दोघे चालविणारे असल्यामुळे हा प्रवास नॉनस्टॉप करता येईल का?
किती तासानी ब्रेक घ्यावा ?
गाडिची काही विशेष काळजी घ्यावी लागते का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी २ वर्षापूर्वी मी डिझायर घेऊन इंदोर ला घेऊन गेलो होतो. मजा आली. ११ तास सलग प्रवास. चालवणारा मी एकटाच होतो. मी स्वत: alto वापरतो. १ दिवसात ६०० किमी (महाराष्ट्र) चालवली होती. माझी उंची ६'२'' आहे. अजूनही मी पुण्यात alto वापरतो.

धन्यवाद तुषार साहेब,
म्हणजे ६०० किमी सलग चालवायला हरकत नाही.
त्या नंतर दोन अडीच तासाचा ब्रेक घेऊन पुढे दामटता येईल का?
अल्टोचा जिव पाहता असा प्रश्न पडला.

आमचाही ठाणे ते भोपाळ गाडी घेउन जायचा विचार आहे. कधी प्रत्यक्शात येतो ते बघू. पण आमचा बेत एका दिवसात इंदूरपर्यंत आणि मग दुसर्या दिवशी इंदूर ते भोपाळ असा आहे. रस्ता चांगला आहे असं बर्याच जणांकडून अ‍आकले आहे. तिथे फिरताना आपली गाडी हाताशी हवीच.

ठाणे भोपाळ संपूर्ण ४ लेन आहे. फक्त एक दीड हजार रुपये टोल लागेल ते लक्षात ठेवा.

पुण्याहून निघून भोपाळकडे जायला दोन रस्ते. नाशिककडून नॅशनल हायवे ३ ला लागा, किंवा नगर-औरंगाबाद-जळगांव-बर्‍हाणपूर करता येईल. दोन्हींत नॅशनल हायवेला लागे पर्यंत वाट लागते. मधे नगर शिर्डी मार्गे धुळे मग तिथून वरती असेही करता येईल. एकदा आग्रा रोडला लागलं की मस्त प्रवास आहे. पण तोपर्यंत वात येतो.

फक्त एक दीड हजार रुपये टोल लागेल ते लक्षात ठेवा.>>>
मनसेचा झेंडा असेल तर टोल लागत नाही असं वाचलं होतं, खरं आहे का ते ? Wink

Alto is good. No problem. I used it from Delhi to Manali & back and also for Nainital trip. No issues. If it can survive in these areas there should be no issues in plain roads.BTW I have Alto K10.
Drive safely. Avoid night driving.

जा बिन्धास्त, माझ्या सासर्‍यांनी लेह लडाखला एम.एच.१२ ची नॅनो पाहिली होती. आहात कुठे ? Wink

गाडीची काळजी घ्यावी लागते का?
>>
सर्विस सेंटरला नेऊन सर्विसिंग करून घ्या. तेल पाणी नीट बघतात ते लोक. इंजिन ऑइल, ब्रेक ऑईल, कूलन्ट, वायपरचं पाणी, बॅटरी. तिथल्या मेकॅनिकला सांगा, लाँग जर्नीला जायचंय म्हणून. गाडीला वेगवेगळे फ्यूज असतात. ते कुठे असतात, अन कसले असतात ते मेकॅनिककडुन शिकून घ्या. डॅशबोर्डवर लागणारे वेगवेगळे इंडिकेटर्/वॉर्निंग लाईट्स कसले असतात ते समजून घ्या. गाडीसोबत आलेलं मॅन्युअल (एकदा पूर्ण वाचून) सोबत ठेवा.

सर्विसिंग केल्याच्या लगेच दुसर्‍या दिवशी निघू नका. ४-६ दिवस आधी सर्विसिंग करून घ्या गाडीची. मग गावात चालवून नंतर लाँग जर्नी.

स्टेपनीत हवा आहे / नाही बघा. स्टेपनी बदलता येते ना स्वतःला? नसेल तर शिकून घ्या. जॅक, बेसिक टूलकिट पाहून ठेवा.

चालती गाडी पंक्चर झाली तर अचानक ब्रेक दाबू नका, तिरकी खेचली जाते अन अपघात होतो. ताबडतोब चारी इंडिकेटर लावून हळू हळू स्पीड कमी करा. टायर घासलं जाईल त्याची काळजी करू नका. सेफली साईडला येईपर्यंत गाडी चालवत रहा. रेडियल टायर्सना काही होत नाही, अन झालं तरी टायरपेक्षा जीव जास्त महाग आहे.

हायवेवर हेल्पलाईन नंबर्सच्या पाट्या लावलेल्या असतात, शेजारच्या सीटवाल्याने ते नोंदवून घ्यावेत / मोबाईलात फोटो काढून ठेवावा.

गाडीची कागदपत्रे, इन्शूरन्स, पीयूसी अद्यावत आहे की नाही हे पाहून सोबत घ्यावे. (एक सेट झेरॉक्स ठेवावा, कुणी मागितला तर तो द्यावा आधी हातात. Wink ) गाडीतील सर्व डायवर मंडळींकडे लायसन आहे की नाही पाहून घ्यावे.

सर्विस सेंटरला नेऊन सर्विसिंग करून घ्या. >> हे डोक्यात आलेच नव्हते.

धन्यवाद इब्लिस,

गाडीला वेगवेगळे फ्यूज असतात. ते कुठे असतात, अन कसले असतात ते मेकॅनिककडुन शिकून घ्या. >> हे तर खूपच महत्वाचं सांगितलात. आपली नुसती बोंब आहे!

टो करायची वेळ आलीच तर म्हणुन मजबुत रोप वै ठेवा गाडीत.
सुरक्षितता म्हणुन गाडीत काठी वै ठेवावी.
आपल्या गाडीच्या जीव ओळखुन असावं.
कुणी मोठा माणुस लै जोरात जात असेल. हॉर्न वाजवत असेल तर जा बाबा तुझीच गाडी लै भारी म्हणुन त्याला जाउ द्यावे.