वेगवेगळ्या सॅमसंग स्मार्टफोन्ससाठी वेगवेगळी बॅक-अप सॉफ्टवेअर्स ??

Submitted by ललिता-प्रीति on 28 September, 2014 - 22:52

घरातल्या दोन स्मार्टफोन्सवरच्या कॉण्टॅक्टसचे बॅक-अप्स घेण्यासाठी Kies 2 वापरत होतो.

नुकताच त्यातला एक हॅण्डसेट बदलला. (सॅमसंग गॅलेक्सी ग्रॅण्ड टू ड्युओस घेतला). Kies 2 या फोनला चालत नाही असं समजलं. मग Kies 3 डाऊनलोड केलं. मग कळलं की उरलेल्या दुसर्‍या फोनला (सॅमसंग गॅलेक्सी कोअर ड्युओस. मॉडेल GT-I8262) हे नवीन Kies भीक घालत नाही.

आता प्रश्न असा आहे, की घरच्या कॉम्पवर एका वेळी एकच Kies ठेवता येणार. तर दोन्ही फोन्सच्या कॉन्टॅक्टसचे नियमित बॅक-अप घ्यायचे कसे?

सॅमसंग स्मार्टफोन्ससाठी कुठलं पर्यायी सॉफ्टवेअर आहे का?
असल्यास एका फोनला Kies 3.0 आणि दुसर्‍या फोनला ते दुसरं सॉफ्टवेअर असं करता येईल.

नसल्यास, यावर काय उपाय?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही क्लाऊड सिंक करत नाही का? फोनबुक एंट्रीज गुगलशी सिंक करून ठेवा. फोन हरवला, किंवा सोबत नसला तरी नेटवरून काँटॅक्ट्स मिळतील.

फोनबुकात एक्स्पोर्ट ऑप्शन असतो. एक फाईल तयार करेल तो एस्डी कार्डवर. जस्ट कॉपी करा. तिथून हवं तेव्हा इंपोर्ट करता येईल.

एक फोन गूगलशी सिंक केलेला आहे. पण तिथून फोन नंबर्स कॉपी करायचे, तर नेट कनेक्शन हवं. त्यापेक्षा हार्डडिस्कवर बॅक-अप असलेला आम्हाला बरा वाटतो.

एक्स्पोर्ट ऑप्शन ट्राय करून पाहते. (त्यासाठी आधी फोनमधे एसडी कार्ड टाकावं लागेल. :फिदी:)

विना काईज पण बोलतंय की ते कॉम्प्युटरसंगे. >>माझ्याकडे GT-I8262 हे मॉडेल आहे ते विना काईज बोलत नाही कॉम्प्युटरसंगे. त्याशिवायचं काही सोल्युशन माहीती आहे का कुणाला?

@ कैलासजी,
मोबोजिनी मला न विचारता स्वतःहून एकदा फोनवर इन्स्टॉल झाले. बहिणीकडे लॅपटॉपला फोन जोडून एक फाईल ट्रान्स्फर करत होतो, तर हे सॉफ्टवेअर आले.

स्वतःहून न विचारता माझ्या मशीनमधे येतो तो कितीही उपयोगी असला, तरी व्हायरसच.

Mobogenie is common crapware:

Mobogenie*is a*potentially unwanted programwhich uses the OpenCandy, Quick Downloader, Conduit and various other monetization programs to bundle with third party installers.

Mobogenie is a program that can be used to transfer pictures and other data between your PC and phone, however very often users have no idea where did it come from, so it’s not surprising at all that most of them assume that Mobogenie is a virus.
Mobogenie it’s technically not a virus, but it does exhibit plenty of malicious traits, such as rootkit capabilities to hook deep into the operating system, browser hijacking, and in general just interfering with the user experience. The industry generally refers to it as a “PUP,” or potentially unwanted program.

माझा फोन रूटेड असल्याने मी त्याचा सहज व समूळ नायनाट करू शकलो, पण हे बिनाकामाचं झेंगट गळ्यात घेऊ नये ही नम्र विनंती.

ललिता, मी जेंव्हा माझ्याकडे andriod phone होता तेंव्हा फोनबुक गुगलशी सिंक करून ठेवले होते व त्याचा बॅकप घेत असे offline use करता ह्या पद्धतीने
https://support.google.com/mail/answer/24911?hl=en

माझ्याकडे नित्याच्या वापरात असलेल्या फोनच्या स्क्रिनचा चक्काचुर झाला तुटला (दुरुस्तीच्या स्थितीत नाही). आता मी त्याचे SIM कार्ड माझ्या कडच्या दुसर्या सॅम्सन्ग्च्या फोनवर वापरायचे ठरवले.

पहिली अडचण आली SIM कार्डचा आकार, मी व्यावस्थित हव्या असलेल्या स्लॉट च्या आकारात कापले. सॅमसन्ग चा फोन हे SIM कार्ड असल्याचे दाखवतो कारण त्यावर मला जुन्या फोनचा नम्बर दिसतो आहे. पण outgoing/ incoming फोन काही चालत नाही. फोन करायला गेल्यास Not registered on network असा सन्देश मिळतो.
Android version 4.4.2 आहे.

मला जुना फोन नम्बर जर सॅमसन्ग वर दिसतो आहे तर SIM कार्ड अयोग्य प्रकारे कापले असण्याची शक्यता आहे का? अजुन काही चुकते आहे का?

सिमकार्ड चुकीचे कापले गेलेले आहे. कंपनीकडून नवे मायक्रोसिम मागवा. योग्य फी भरून त्याच नंबरचे नवे सिम मिळेल.