झेंडुच्या झाडाला फुले येत नाहित?

Submitted by Sakshi M on 25 September, 2014 - 03:01

माझ्या घरी मी २ महिन्या अगोदर झेंडुचे झाड लावले होते... ते थोडे मोठे झाले त्याला पान सुध्धा फुटली पण अजुन त्याला फुले आली नाहि आहेत? कोणी मला सांगु शकेल का कि साधारण किती दिवस लागतात फुले यायला? आणि फुले येण्यासाठी कोणते उपाय करावे?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साधारण नवरात्रीत फुले यायला हवी. झेंडूत दोन प्रकार असतात. एक फ्रेंच आणि दुसरा आफ्रिकन. फ्रेंच प्रकारात लवकर फुले लागतात, आफ्रिकन प्रकारात जरा वेळ लागतो. तरी २/३ महिने म्हणजे फार झाले. झाड जर झेंडूचेच असेल तर दिवाळीपर्यंत वाट बघता येईल.

नर्सरीत खताच्या पिशव्या मिळतात त्यातले अगदी थोडे टाकून पहा.....धन्यवाद डीविनिता
आता हा प्रयोग करुन बघते पाहुया फुले येतात का ते...

साक्षी, झेंडु ला फुल हमखास येतात... आपण साधं निर्माल्य जरी झाडात टाकल तरी त्याच रोप तयार होऊन छान
फुलं लागल्याचा माझा अनुभव आहे... त्यामुळे निराश होऊ नका... दिनेश दा सांगतायत त्या प्रमाणे दिवाळी पर्यंत
फुल यायला हवी...:)

गेल्या वेळेस मी झेंडूची झाडं लावली होती. खात बित काही घातलं नवता तरी छोट्या छोट्या झाडांना किती फुलं यायची . थांबा आता मीच झेंडूची झाडं लावते आणि बघते किती दिवसात फुलं येतात ते

त्या झाडाला चांगलं उन मिळतय का
ख़त म्हणून ओला कचरा ही चालेल
माझ्याकडची झाडं ४-५ फूट उंच वाढतात
छान फुलं येतात

माझ्याकडे घरातल्या बाल्कनीत दोनच मोठ्या कुंड्या आहेत आणि एकात बेसिल चं मोठं झाड आहे. तिथेच खिडकीत ठेवलेल्या वाळलेल्या फुलांमधली बी तिथे पडली की काय ते माहित नाही पण मध्ये फुगवटयावर उभ्या अगदी छोट्ट्या पाकळ्या आणि बाजूला फक्त मोठ्या रुंद आठ पाकळ्या असलेलं केशरी रंगाचं (पानंही झेंडूसारखीच आहेत) फूल येणारं रोप आपणहून आलं आहे. साधारण गणपतीत फुलायला लागलं आणि आता एकाच वेळेस सात-आठ फुलं झाडावर आहेत.. खत वगैरे काहीच घातलेलं नाही.. भाज्या धुतलेलं पाणी किंवा तांदूळ धुतलेलं पाणी मात्र घालते जमेल तेव्हा.. माझ्या खिडकीत ठेवलेली फुलं गेल्या पाडव्याला आणलेल्या झेंडूच्या (नेहेमीचा गोल फुलणारा झेंडू) तोरणापैकी आहेत. त्यामुळे हे फूल नेमकं कुठून आलं कळत नाही पण आपणहून आलं होतं म्हणून तसच वाढू दिलं होतं.. आता पाच वर्षाच्या लेकाचा फुलं मोजायचा रोजचा उद्योग झाला आहे. Happy

झेंडुची झाड जर जमिनीत /कुंडीत लावली असतील तर पाणी तोडणे हा एक खात्रीलायक उपाय आहे अस म्हणतात. काही झाडे पाणी तोडल्याशिवाय फुले/फळे लागत नाहीत.

सुरवातीला एक दिवसा आड पाणि घालुन बघा. झाड मरणार नाही इतकच पाणी द्या.

झाड जमिनीवर असेल तर हा उपाय लागु पडेल असे वाटते.

नविन, पाणी तोडणं हा फुलं येण्यासाठीचा उपाय असतो हे ऐकून आश्चर्य वाटलं. खरच कधी ऐकलं नव्हतं.. Happy