मंगलयान...दंगलगान

Submitted by उडन खटोला on 24 September, 2014 - 09:39

फ़क्त 450 कोटी मध्ये मंगळमोहिम आखली गेली...खरच प्रशंसनीय आणि उल्लेखनीय !!
दहा महिन्यापूर्वी पाठवण्यात आलेले 'MOM' नावाचे हे 'अवकाश यान' मंगळाच्या कक्षेत प्रवेश करून निर्विध्नपणे स्थिरावले आणि ही मोहिम यशस्वी झाल्याची सुवार्ता जिकडे तिकडे पसरली आणि मनोमनी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे या कौतुकास्पद कामगिरी बद्दल आभार मानले.
पण...फक्त 450 कोटि मंगळ मोहिमेला वापरले गेले हे कळल्यावर माझ्या डोळ्यापुढे भारतातल्या करोडो रुपयांचे घोटाळ्यांचे आकडे आठवले....बाप रे..!! आणि हा खर्च क्षुल्लक वाटू लागला...
कलमाड़ी फेम कॉमन वेल्थ गेम घोटाळा...8000 करोड़
सारडा चिट फण्ड घोटाळा....5500 करोड़
लालू चा चारा घोटाला....950 करोड़
यड्डीरप्पाचा खाण घोटाळा...350 करोड़
रोबर्ट वाड्राचा DLF घोटळ...500 करोड़
सगळ्यात मोठे घोटाळे म्हणजे, 3G घोटाळा आणि महाराष्ट्राचा सिंचन घोटाळा....अनुकमे 20,000 करोड़ आणि 25000 करोड़
अजूनही बरेच आहेत...ते मांडले तर 'नासा'लाच आरामात विकत घेवु....
साले हे...दादा, लालू..कलमाड़ी, येदूरप्पा वर्षातून दोन फेरी तरी आरामात मंगळावर मारून येतील इतक्या खर्चात...नाही का?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्हॉट्सअ‍ॅपवर फिरणारा एक (अर्थातच लेटेस्ट) विनोद

मंगळ ग्रहाच्या कक्षेत पोहोचलेल्या यानाने पहिले छायाचित्र पाठवले त्यात एक फलक आढळून आला आहे,
"सदर जागेचा सातबारा श्री अबक साहेब यांचे नावे असून अतिक्रमण केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. . Proud

(अबक साहेब आपल्या सोयी अन कुवतीनुसार टाका Wink )

अबक साहेब आपल्या सोयी अन कुवतीनुसार टाका>>>
अखंड भारत देशात एकच 'साहेब' हायेत आणि जमिन अधिग्रहणात 'साहेबांचा' हात कोणिही धरु शकत नाही.

पाकिस्तानचे मंगळयान देखील फिरतेय, अर्थातच फन्नी ईस्टाईल.
काल मी एका ग्रूपवर शेअर केले तेव्हा त्यातील एक मुस्लिम मित्र म्हणाला की त्या चित्रातील झेंडा पाकिस्तानचा नसून इस्लामचा आहे. मग मी त्याला सॉरी बोललो. इतरांनीही काळजी घ्या. Happy