रक्क्म परत मिळू शकेल का?

Submitted by dreamgirl on 23 September, 2014 - 03:50

फॅमिली फ्रेंडपैकी एकाशी काल बोलणं झालं...
त्याने पाच वर्षांपूर्वी चुलत भावाला जवळपास ५०,०००/- दिलेले होते मदत म्हणून, म्युचुअल फंडस मध्ये इन्व्हेस्ट करायला.
१) चुलत भावाने स्वतःच्या नावे ती रक्कम इन्वेस्ट केली.
२) सर्व व्यवहार चेक ने झाला. २५,००० चे दोन चेक एकत्र
३) त्यानंतर तीन वर्षांनी त्या भावाने त्यातील २५,००० रक्कम परत करून ते पैसे बुडाले या पैकी इतकेच सध्या देऊ शकतो. उरलेल्यापैकी फार फार तर १०,००० देऊ शकेन पण जमेल असं वाटत नाहीये. असं सांगितलं (खरं तर ते तेव्हाच अक्कलखाती जमा झाले असे समजावयास हवे होते.)
४) पण बर्‍याचदा गरज आहे असे सांगून मित्राने ते पैसे परत मागण्याचा प्रयत्न करून पाहीला. बघतो करू शकतो का असे टाळाटाळ करणारे उत्तर मिळे.
५) दोघांच्या व्यवहारात कोणी साक्षीदार नव्हता, लिखापढी नाहीये.
६) आता तो भाऊ म्हणतो की फायदा झाला असता तर घेतलेच असतेस ना वरचे पैसे तर आता बुडालेत, नाही देऊ शकत.

आता १) अक्कलखाती जमा झाले असे समजून नाद सोडून द्यावा?
२) कोणा मध्यस्थाच्या मार्फत जेवढे जमतील तेवढे सामापचाराने मागावेत?
३) पोलिस केस / काही लिगल अ‍ॅक्शन घ्यावी? कारण या भावाने अजून तीन चार जणांना असाच गंडा घातलाय... अमूक रक्कम गुंतवायची आहे, मदत हवी आहे करून...

प्लीज सजेशन्स द्या.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुळात मुच्युअल फन्डात गुंतवायला असा मध्यस्त लागलाच का हे कळेना.
अशा गुंतवणूकीसाठी काहिही फारसे कॉम्प्लिकेशन्स नाहिये. फक्त केवायसी पुर्ण केले की झाले.

असो.

सध्या मार्केट खुप वर आहे.
सर्व युनिट्स विकले नसतील तर विकुन पैसा मोकळा करता येइल की ज्याने पैसे घेतलेत त्याला.

मुळात मुच्युअल फन्डात गुंतवायला असा मध्यस्त लागलाच का हे कळेना.>> मित्राच्या चुलत भावाला पैसे हवे होते मुच्युअल फन्डात गुंतवायला. त्याने स्वतःच्या नावे गुंतवण्यासाठी मित्राकडून उसने पैसे घेतले होते परतीच्या बोलीवर! आता देत नाहीये.

सर्व युनिट्स विकले नसतील तर>> यापैकी काहीही माहीती मिळाली नाही बहुदा. कारण अर्धी रक्कम परत करतानात्याच्या त्या भावाने सांगितले पैसे बुडाले. Uhoh

तिसरा पर्याय नाहीच वापरता येणार ना?

ड्रिमगर्ल, एखाद्याला मदत म्हणून पैसे देणे समजु शकते. पण एखाद्याला स्वतःच्या नावावर गुंतवायला पैसे देणे म्हणजे अगदीच Uhoh झाले वाचुन. असो.

वेळ असेल + डोकं शांत ठेवायची तयारी असेल तर मी तरी २ आणि ३ पर्याय सुचवेन.
शक्यतो नात्यातल्या मोठ्या व्यक्तीला मध्यस्थ म्हणून घ्या.
तरी नाही दिले तर पोलिसात वै. जा.

अक्कलखातीच टाकायचे असतील तर इतरांच्या सल्ल्याची काय गरज? आपले आपण विसरुन जा.

लिखापढी नसताना लीगल अ‍ॅकशन कठीणच.... बहुतेक !

२५ हजार मिळालेत, आता उरलेत २५ हजार. पैकी तो अजून १० हजार देऊ शकतो म्हणालाय तर त्यासाठी मागे लागत राहा, त्याला छळत राहा, ते मिळाल्यावरही आमचे पैसे लाटले म्हणून आयुष्यभर त्याला सुनावण्याचा आनंद घ्या. तू आम्हाला फसवलेय, किंवा आमचे नुकसान केलेय, आमचे देणे लागतो असे एखाद्याला सुनावणे यातही आनंद असतोच. याउपर नात्यातल्या आणखी चार लोकांनाही हे सांगून आनंद द्विगुणित करू शकता. पोलिस तक्रार केलीच तर त्यातूनही पैसे परत मिळण्याची आशा ठेवण्यापेक्षा त्यांना धडा शिकवण्यातच समाधान मानायला बघा. कारण जरी लीगल अ‍ॅक्शनचा निकाल आपल्या बाजूने लागलाच तरी त्यातही चायपाण्याला पाच-दहा हजार आपले खर्ची पडायची शक्यता आहेच. अन्यथा ते ही गेले ..

जाणकार आपली मते देतीलच, पण हे माझे वैयक्तिक मत आहे .. मी या केसमध्ये असा वागलो असतो. Happy

पाच वर्षे झालीत ना, मला वाटते लिमिटेशन लागू होईल. तीन वर्षाच्या काळात काही लेखी व्यवहार ( पत्रव्यवहार वगैरे ) असता तरी फायदा झाला असता.
जे पैसे परत केले ते चेकनी कि कॅशनी ? त्यावेळी तरी लेखी व्यवहार व्हायला हवा होता.
मध्यस्थांमार्फत काही होण्यासारखे असले तर ठिकच, पोलिस आणि कोर्ट केसमधे जास्त वेळ आणि पैसा खर्च होईल.

सध्या, सर्व परिचितांना या व्यक्तीबाबत सावध करणे, एवढे तरी कराच.

पैसे खरच बुडालेका याची शहानिशा करा... तो जितके पैसे देतोय तेवढे आधी ताब्यात घ्या... उरलेले पैसे स्वतहाच्या खिश्यातुन द्यायची त्याची ऐपत असेलतर त्याला शक्य त्या मार्गाने प्रेशराईज करा.. पोलिसात जाऊ नये असे मला वाटते कारण एकदा झालेले वैर पुढे महागात पडू शकेल, जवळचा नातेवाइक असल्याने तो भविष्यात कधीही पाठीत खंजिर खूपसू शकतो... ईमोशनल अत्याचार करा, हे प्रकरण विसरलो आहे असे दाखवा, एखाद्यावेळेस तुम्हाला मदतीची गरज आहे असे भासवा आणि थोडे थोडे पैसे मदत म्हणुन घेऊन वळीत करुन घ्या... एक ना एक दिवस पैसे परत मिळतील धीर ठेवा...

सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार.
एखाद्याला मदत म्हणून पैसे देणे समजु शकते. पण एखाद्याला स्वतःच्या नावावर गुंतवायला पैसे देणे म्हणजे अगदीच अ ओ, आता काय करायचं झाले वाचुन.>> मलाही

लिखापढी नसताना लीगल अ‍ॅकशन कठीणच.... बहुतेक !>> हेच मी सांगितलेले त्याला.

पाच वर्षे झालीत ना, मला वाटते लिमिटेशन लागू होईल. >> हो!!
तीन वर्षाच्या काळात काही लेखी व्यवहार ( पत्रव्यवहार वगैरे ) असता तरी फायदा झाला असता.>> काही लेखी पुरावा नाही. फोनवरून मागणी फक्त!!
जे पैसे परत केले ते चेकनी कि कॅशनी ? त्यावेळी तरी लेखी व्यवहार व्हायला हवा होता >> पैसे कॅशने परत केले गेले.
मध्यस्थांमार्फत काही होण्यासारखे असले तर ठिकच, पोलिस आणि कोर्ट केसमधे जास्त वेळ आणि पैसा खर्च होईल.>> तेच योग्य वाटतेय.

सध्या, सर्व परिचितांना या व्यक्तीबाबत सावध करणे, एवढे तरी कराच. >> याला प्रचंड अनुमोदन. थँक्यू दिनेशदा.

अशी काही सॉब स्टोरी सांगून तुमच्या कडून काही रक्कम उपटली जात नाही ना ह्यावर लक्ष ठेवा नाहीतर तुम्ही ते नुकसान भरणार आणि दोघे मित्र वाटून घेतील . असे न व्हावे. तुमचा देणारा मित्र व्हिक्टिम आहे कश्यावरून. दूर राहा.

कोकणस्थ विपू डिलीट केली. सुचवलेला पर्याय शक्य नाही. Happy मी असते तर अंमलात आणायचा नक्की प्रयत्न केला असता. Happy मुळात मी आधी असे गुंतवण्यासाठी वगैरे ते ही दुसर्‍याच्या नावावर पैसे कधीच दिले नसते आणि लिखापढी नसताना... शक्यच नाही!!
प्रतिसादासाठी धन्यवाद.

पैसे नक्की मिळणार नाहीत. २५००० मिळाले हेच नशिब मानून गप्प बसा.
उरलेल्या २५००० हजारात आयुष्याभराचा धडा मिळाला असे समजा.

तुम्ही ते नुकसान भरणार आणि दोघे मित्र वाटून घेतील .>> मी नुकसान भरण्याचा प्रश्नच येत नाही. मी फक्त मला सुचलेले/सुचवले गेलेले पर्याय त्याला सुचवणार!! Happy तरी धन्स अमा निराळाच पैलू! हल्ली आर्थीक व्यवहारात कोणावरही (इतका आंधळेपणाने ) विश्वास ठेवणे अशक्य असते.

उरलेल्या २५००० हजारात आयुष्याभराचा धडा मिळाला असे समजा.>> Happy हो अक्कलखाती जमा. मी सगळ्यात आधी हाच सल्ला दिला. तरीही लिगल अ‍ॅक्शन शक्य असल्यास (माबोकरांना) विचारून बघते असा (उसना) धीर दिलेला. धन्यवाद.

त्याच्याकडुन एक ब्लॅक चेक घ्या गोड बोलुन कीवा फसवुन..जास्त अमांउट टाकुन भरा बँकेत जेनेकरुन बाऊंस होईल आणि मग लावा ४२० ची केस्..धडा मिळेल त्याल आणि बदला तुमच्या मित्राला.

पैसे खरच बुडालेका याची शहानिशा करा...>> हे कसं करता येईल? नातेवाईकांमध्ये व मित्रपरीवारामध्ये इतरांना दाखवण्यासाठी (सावध करण्यासाठी) कारण प्रूफ नाहीये तसा काहीच. पैसे त्या व्यक्तीने स्वतःच्या नावे गुंतवलेले त्या कंपनीचं नाव असावं बहुदा. त्या वर्षी मार्केट कसं होता ते पडताळून बघता येईल बहुदा. अजून कोणाला म्युचुअल फंडस इन्व्हेस्टमेंट बद्दल आणि (पैसे खरच बुडालेका याची शहानिशा कशी करता येईल) याविषयी कोणाला काही सुचवता आलं तर प्लीज...