खालील धागा वाचा आणि इथे पोल समजून मतदान करा.
प्रतिसादात मी दोन पर्याय देतो, त्यापैकी एकाला निवडा.
१) सई मला आवडते.
२) सई मला आवडत नाही.
सई = सई ताम्हाणकर = दुनियादारी गर्ल
होऊन जाऊ दे, दूध का दूध, पाणी का पाणी ..
सई आवडणार्या मूकवाचकांनी कृपया इथे आपली आवड बिनधास्त नोंदवावी.
आपले मतच बोलेल !!
______________________________________________
______________________________________________
सई मला आवडते - निकाल ! आणि निष्कर्ष !!
नाही जरी ‘सई’ तरी ...
http://www.maayboli.com/node/50822
वरील लेखावर आधारीत चार दिवसांपूर्वी गुरुवारी सकाळी काढलेल्या पोलचा हा रविवारी रात्रीपर्यंतचा निकाल.
(पुढेमागे थोडाफार बदलेन, बदलत जाईल, पण तुर्तास पोलचे उद्दीष्ट साध्य झाल्याने यालाच प्रमाण मानूया)
सई मला आवडते - ३० मते
सई मला आवडत नाही - १२१ मते
पण हा निकाल ईथेच संपत नाही!
यातून निष्कर्ष निघणेही तितकेच गरजेचे आहे, आणि पोलकर्ता म्हणून तो मी काढणे हे माझे कर्तव्य आणि माझी जबाबदारी आहे.
मुळात हा पोल मी का काढला???
सई न आवडणार्या लोकांपेक्षा सई आवडणार्यांची संख्या जास्त आहे हे मला दाखवायचे होते का???
किंवा तसे झाले असते तर मी जिंकलो असतो का???
तर याचे उत्तर आहे, अर्थातच .. " नाही " !!
माझ्या सईच्या लेखावर, किंवा सईच्या माझ्या लेखावर म्हणूया, कित्येकांनी गरज नसताना नकारात्मक प्रतिसाद दिले. अगदी विरोधालाच विरोध करायचे म्हणून पुरते टोकाचेही दिले. ज्यातून एक असे चित्र निर्माण झाले की अरे हि अभिनेत्री कोणालाच आवडत नाही का? पण अर्थातच हे धादांत खोटे होते. कारण हि वस्तुस्थिती असती तर आज रिलीज होणार्या कित्येक महत्वाच्या चित्रपटांमध्ये कोणत्याही निर्मात्या दिग्दर्शकाने तिला घेतलेच नसते. तिच्या गत दोनेक वर्षात आलेल्या आणि भविष्यात येऊ घातलेल्या चित्रपटांची संख्या पाहता तिची जी लोकप्रियता निर्विवादपणे आहे तीच मला आकड्यांची भाषा चटकन समजणार्यांना दाखवायची होती...........
आणि ती दिसली!
सर्वप्रथम ‘सई मला आवडते’ या पर्यायाला मत देणार्या माझ्यासह सर्वच सभासदांचे मी आभार मानून अभिनंदन करतो.
आणि आता सईची लोकप्रियता दाखवणारा खरा आकडा जोडून दाखवतो, तो असा -- ३० + १२१ = १५१ मते टोटल!
गुरुवारी सकाळी मी हा पोल काढल्यावर १ ल्या तासाभरातच जवळपास ३५ ते ४० जणांनी मतदान केले.
पावणे २ तासांतच ५० शी गाठली गेली..
रात्री झोपण्यापूर्वी मी हा आकडा ९० दीच्या घरात पोहोचलेला पाहिला..
आणि २ र्या दिवशी २४ तास उलटून जातात न जातात तोच १०० फलकावर लागले होते!
विकांताचा फायदा उचलत आज रविवार मावळताना केवळ साडे ३ दिवसांच्या मतदानानंतर तब्बल १५१ जणांनी या धाग्यावर हजेरी लावत आपले मत नोंदवले.
हा आकडा मायबोलीची सक्रियता लक्षात घेता छोटा कि मोठा असा विचार करता मला सहज सुचले का नाही याची तुलना भरभरून प्रतिसाद मिळालेल्या गणेशोत्सवातील मतदानाशी करावी, तेव्हा मला खालील आकडे आढळले.
स्पर्धा - मलाही कोतबो - १२१ टोटल मते.
स्पर्धा - आता कशाला शिजायची बात - १४२ टोटल मते.
(मतदानाचा कालावधी - साधारण आठवडा!)
सई ताम्हाणकर - १५१ टोटल मते
(मतदानाचा कालावधी - साडे ३ दिवस!)
आता या निकालाचे आणि निष्कर्षाचे मोजमाप करणारे माझ्या लेखातीलच वाक्य पुन्हा एकदा देतो -
यू कॅन हेट हर, यू कॅन लव हर ..
बट बट बट..
यू कॅन नॉट कॅन नॉट ..
इग्नोर हर!
सई ताम्हाणकर!
- ऋन्मेऽऽष
जाता जाता -- एक प्रतिसाद असा आला कि कोण सई???? तर त्या सद्गृहस्थांना मी सांगू इच्छितो, याचे उत्तर मायबोलीवरील या साडे ३ दिवसांत सक्रिय असणार्या त्या १५१ पैकी कोणत्याही सभासदाला नक्की विचारा
गिरे तो भी टांग उपर +१००
गिरे तो भी टांग उपर
+१००
निष्कर्श>>> निष्कर्ष करा
निष्कर्श>>> निष्कर्ष करा प्लीज.
>>>>>
हि शंका मी आधीही विचारली होती. धन्यवाद, बदल करवतो.
ते अजून एक आय डी होते, ज्यानी
ते अजून एक आय डी होते, ज्यानी सईच्या सौन्दर्याचे वर्णन केले होते, ते कुठे आहे?:अओ: आणी ते आय डी पण कुठेत?
कारण हि वस्तुस्थिती असती तर आज रिलीज होणार्या कित्येक महत्वाच्या चित्रपटांमध्ये कोणत्याही निर्मात्या दिग्दर्शकाने तिला घेतलेच नसते>>>>>>>> ऋन्मेष, दिग्दर्शक लोक फार चावट्ट लोक असतात.:फिदी: सिरीयसली.
राम तेरी गन्गा हिट झाल्यावर नन्गाकिनीला पण बर्याच दिग्दर्शकानी धबाधबा साईन केले होते.:फिदी:
तूलना कशी करावी या बद्दल चे
तूलना कशी करावी या बद्दल चे आपले निकष फारच विचित्र आहेत असे दिसते.
आवडत नाही - १२१ विरुद्ध आवडते - ३० या बद्दल चर्चा करून निष्कर्ष मांडण्याऐवजी चक्क १२१ + ३० = १५१ अशी बेरीज करून
<< आता सईची लोकप्रियता दाखवणारा खरा आकडा जोडून दाखवतो, तो असा -- ३० + १२१ = १५१ मते टोटल! >>
असे म्हणणे तार्किक वाटत नाही. शिवाय या १५१ आकड्याची तूलना इतर मतदानांसोबत करणे हे तर अजूनच विसंगत.
<< स्पर्धा - मलाही कोतबो - १२१ टोटल मते.
स्पर्धा - आता कशाला शिजायची बात - १४२ टोटल मते.
(मतदानाचा कालावधी - साधारण आठवडा!)
सई ताम्हाणकर - १५१ टोटल मते
(मतदानाचा कालावधी - साडे ३ दिवस!)>>
कोतबो आणि शिजायची बात याला झालेले मतदानापेक्षा सई च्या धाग्यावर झालेले अधिकचे मतदान ही तिची लोकप्रियता?
<< यू कॅन हेट हर, यू कॅन लव हर ..
बट बट बट..
यू कॅन नॉट कॅन नॉट ..
इग्नोर हर!
सई ताम्हाणकर!>>
हेट करणे हे पण लोकप्रियतेचा मानदंड कसे काय असू शकते? समजा ज्यांना सई आवडत नाही अशांनी मतदानाकडे दुर्लक्ष केले असते आणि सई आवडते - ३० विरुद्ध सई आवडत नाही - ० असे मतदान झाले असते तर आपण सई दणदणीत मताधिक्याने लोकप्रिय आहे असे म्हणाला नसतात काय? ते झाले नाही कारण आधी आपण लोकांना चांगलेच पेटविले होते त्यामुळे नकारात्मक मतदान उत्स्फुर्त झाले. हे नकारात्मक मतदान ही पुन्हा स्वतःच्या विधानाच्या पुष्ट्यर्थ वापरणे हे स्वतःच्या मानसिक समाधानाकरिता ठीक आहे, परंतु अशा प्रकारे मतदानाचा आपल्याला सोयीस्कर असा निष्कर्ष काढणे आपल्या आयडीच्या संकेत स्थळावरील भावी वाटचालीकरिता निश्चितच योग्य नाही.
<< चेसुगु,
चांगली भली मोठी पोस्ट लिहिलीत, तिचा सारांश मला समजला.
आपल्या प्रश्नाचे/पोस्टचे उत्तर निकालात/निष्कर्शात आपल्याला मिळेलच याची खात्री बाळगा.
सोमवारी सकाळी नक्की वाचा >>
मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे असे काही वाटत नाहीये.
जाता जाता एक व्यक्तिगत टिपः-
माझ्या नावाचे 'चेसुगु' असे लघुरुप करून केलेले संबोधन / उल्लेख मला आवडत नाही. पुर्वी मी मिसळपाव या संकेतस्थळावर सक्रिय असताना काही हितशत्रूंनी जाणून जुणून बुजून मला चिडविण्याकरिता तसे करायला सुरुवात केली होती. त्यांच्यापैकी काही इथेही आहेत ज्यांना तसे न करण्यास सुचवून देखील ते मुद्दाम करतात. पुन्हा सांगूनही उपयोग नाही.
---पालथ्या घड्यावर पाणी---
माझे "चेतन" हे नाव टंकणे आपल्या नावाइतके तरी अवघड निश्चितच नाही. आपले "ऋन्मेऽऽष" हे नाव मला टंकायला अवघड जाते तरी मी कॉपी पेस्टचा पर्याय वापरून आपला तसाच उल्लेख करतो कारण इतर प्रकारे उल्लेख करणे हा मी त्या नावाचा / आयडीचा अपमान समजतो. माझ्या प्रतिक्रिया वाचल्यात तर मी आपल्यावर अथवा आपले आवडीचे पात्र "सई ताम्हणकर" हिच्यावर कुठलीही वैयक्तिक शेरेबाजी केलेली नाहीये. आशा आहे आपण समजून घ्याल आणि पुढे सहकार्य कराल.
चेतन, क्षमस्व ! आपल्या नावाचे
चेतन,
क्षमस्व !
आपल्या नावाचे लघुरूप आपल्याला आवडत नाही याची मला कल्पना नव्हती. खात्री बाळगा ते मी इतर ठिकाणी पाहूनच अनुकरून केले होते, कोणाला वैयक्तिक त्रास देणे माझ्या तत्वात बसत नाही. यापुढे ते घडणार नाही.
सई आणि पोलकडे येतोच सवडीने पण हा गैरसमज दूर करणे गरजेचे वाटले म्हणून आधी लिहिले.
अवांतर - मा़झे नाव टंकने कठीन असल्याने त्याचे हवे ते सोपे रूप वापरण्याची मुभा मी प्रत्येकाला दिली आहे हे पुन्हा एकदा नमूद करतो. तसेच याचा अर्थ मलाही समोर्च्याच्या नावाची मोडतोड करायचा हक्क आहे असेही समजत नाही.
चेतन आणि ईतर, आपल्यासाठी एक
चेतन आणि ईतर,
आपल्यासाठी एक वेगळे उदाहरण घेतो.
मला बटाट्याची भाजी आवडते. मी त्यावर एक छानसा मनापासून लेख लिहिला. त्यात काही बटाटा न आवडणार्यांनी त्याच्या चवीवरून नकारात्मक भाष्य केले. आता अन्नपदार्थांची चव हि मानवी सौंदर्याप्रमाणेच व्यक्तीसापेक्ष असते हे सर्वच जाणतात. तरीही त्या धाग्यावर बटाटा न आवडणार्यांनी असा काही धूडगुस घातला की बटाटा आवडणार्यांनी तिथे न फिरकणेच योग्य समजले.
बस्स इथे मी एक खेळी केली. बटाटा आवडतो कि नाही यावर पोल काढला.
इथे जर बहुतांश लोकांचे मत नाही आवडत असे आले तरी मी बटाटा खाणे सोडून देणार नव्हतोच.
त्याच प्रमाणे जे बहुतांश लोकांना आवडत नाही ते मला आवडते यात माझी वैयक्तिक हार नव्हतीच.
जरी मी आपणा सर्वांचे मन राखायला येस्स तुम्ही जिंकलात आणि मी हरलो असे लिहून दिले तरी ते ना तार्किक असणार ना प्रामाणिक.
पण मग या पोलचा फायदा काय झाला.
तर बटाटा आवडणारेही बहुसंख्य होते जे त्या धाग्यावर आले नाहीत ते इथे उजेडात आले.
त्याचप्रमाणे बटाटा आवडत असो वा नसो तो आपल्या रोजच्या जेवणाचा अविभाज्य अंग आहे हे देखील त्या पोलच्या निकालावरून समजले.
बस्स हेच सूत्र फिल्मस्टार बाबत लागू होते.
किंबहुना त्यांच्याबाबतीत तर प्रसिद्धी हा मोठा मापदंड असतो.

एखादा हिरो-हिरोईन मला आवड्त नाही असे आपण सांगण्यात जेव्हा उत्सुकता दाखवतो तेव्हा खरे तर आपण त्याचे स्टारडम मान्य केलेले असते.
उदाहरणार्थ - शाहरुख खान.
उद्या मी त्याच्यावर असाच पोल काढला तर असाच काहीसा निकाल तिथेही बघायला मिळेल याची खात्री बाळगा.
याला आवरा
याला आवरा
बस्स इथे मी एक खेळी केली.
बस्स इथे मी एक खेळी केली. बटाटा आवडतो कि नाही यावर पोल काढला.

<<
<<
सई ताम्हणकरची अगदि योग्य तुलना केलीत.
बटाटा
बटाटा

देवा! ऋन्मेष तुला सईशी तुलना
देवा!:फिदी: ऋन्मेष तुला सईशी तुलना करायला सापडुन सापडले कोण तर बटाटा. बघ, आता तूच बघ बाबा, तुला सईला उपमा द्यायला बटाटाच का सापडावा? काकडी, चवळी, शेवगा, फरसबी असे काहीच सापडु नये यातच काय ते आले.:फिदी:
तरी अजून तुला शन्का आहे का की लोकाना सई ताम्हणकर का आवडत नाही?
रश्मी, कारन मला स्वताला
रश्मी,
कारन मला स्वताला बटाट्याची भाजी आवडते, किंबहुना भाजी म्हटले की बटाटाच अन्यथा सरळ शुद्ध मांसाहार
बिचारा बटाटा
बिचारा बटाटा
परंतु अशा प्रकारे मतदानाचा
परंतु अशा प्रकारे मतदानाचा आपल्याला सोयीस्कर असा निष्कर्ष काढणे आपल्या आयडीच्या संकेत स्थळावरील भावी वाटचालीकरिता निश्चितच योग्य नाही.
>>
केवढं ते डिप्लोमॅटिक वाक्य चेतन.
सई ताम्हणकर आहे तिचं नाव!!!
सई ताम्हणकर आहे तिचं नाव!!! ताम्हाणकर नव्हे!!!
सई ताम्हणकर आहे तिचं नाव!!!
सई ताम्हणकर आहे तिचं नाव!!! ताम्हाणकर नव्हे!!!
>>>>
ड्रिमगर्ल धन्यवाद, यापुढे काळजी घेईन .. ईंग्लिश स्पेलिंगमुळे समजत नाही .. आणि आजवर मी तिला पुर्ण नावाने कधी हाक मारली नाही .. म्हणून हि चूक झाली
मी सगळ्या प्रतिसादाना एक एक
मी सगळ्या प्रतिसादाना एक एक दिलाय कौल
बिच्चार्या सईमावशी.
बिच्चार्या सईमावशी. ऋन्मेऽऽषबाळाला त्यांचं आडनावच माहीत नाही.
भरत मयेकर, मला ऋन्मेषबाळ बोला
भरत मयेकर,
मला ऋन्मेषबाळ बोला वा ऋन्मेष आजोबा, मी कुठल्याही भुमिकेत फिट होईल एवढा मोठा माझा आवाका आहे
पण उगाच सईमावशी वगैरे टिप्पणी टाळा प्लीज हि विनंती विशेष जमल्यास आभारी !
ऋन्मेऽऽष, देव करो आणि
ऋन्मेऽऽष, देव करो आणि तुम्हाला तुमच्या ऑफीसमध्ये मोठ्ठ प्रमोशन मिळो..भरपूर पगारवाढ आणि त्याच बरोबर भरपूर काम (तुमच्या आवडीचं)! इतकं की तुम्हाला मायबोलीवर यायला आजिबात वेळ मिळणार नाही!
आज माझी तशीही चिडचिड होत्येय आणि त्यात तुमचे धागे (I hardly care about Sai Tamhankar's fan following on Maayboli )तुम्ही अथक प्रयत्नांनी सतत पहिल्या पानावर ठेवल्यामुळे अनेक अत्यंत चांगल्या दर्जाचे आणि वाचनीय धागे (नंदिनी ची दरवाजा, कैलासयात्रेचे अनुभव) मागच्या पानावर जात आहेत..दहा मिनिटाचा ब्रेक घेऊन चांगलं काहीतरी वाचायला येणाऱ्या मला तीन पानं मागे जाऊन बघावं लागतं आजकाल!
बरं लिहिता तुम्ही आणि हार्मलेस पण फार annoying आहे तुमचं लॉजिक आणि सतत प्रतिवाद करणं. अतिपरिचयात् अवज्ञा संततगमनात् अनादारो भवती (अर्थ: अति केल्याने लोकं किंमत देईनाशी होतात)एवढं लक्षात ठेवा! दिवसातून एकदा आणि एकच मोठा प्रतिसाद दिलात स्वतःच्या धाग्यावर तर फार बरं होईल! ही कळकळीची विनंती!
बिचारा बटाटा <<+१ मला बटाटा
बिचारा बटाटा
<<+१ मला बटाटा आवडतो. बटाट्याच्या पोल वर १००+ आवडतो म्हणुन यायला हरकत नाही. 
रुन्मेषला नॉनव्हेज आवडतं हे
रुन्मेषला नॉनव्हेज आवडतं हे वाचून तो पुण्याच्या एरंडवण्यातल्या त्या आपल्या अभिषेक हॉटेलमध्ये अंडयाची भुर्जी खातो आहे असं दृश्य डोळ्यांसमोर आलं.
जिज्ञासा, एक सई ताम्हणकर आणि
जिज्ञासा,
एक सई ताम्हणकर आणि तिचा एक धागा इतर सर्व धागे तीन पाने मागे कसे नेतात हे नाही समजले
असो, धाग्याला सतत वर ठेवले आहे ते सई आवडत नाही असा दावा करणार्यांनी.
बाकी सतत प्रतिवाद करणे हा माझा गुणधर्म आहे, त्याचा त्याग केला तर माझे एक साचलेले डबके होईल !
वेदिका एकवीस,
आपला प्रतिसाद फुल्ल बाउन्सर
ऋन्मेऽऽष, दरवेळी जेव्हा
ऋन्मेऽऽष, दरवेळी जेव्हा तुम्ही प्रतिसाद देता तेव्हा तो धागा पहिल्या पानावर येतो (if you haven't noticed the threads on each page are updated based on the last response time) अर्थात बाकीचे सर्व धागे एका नंबराने मागे जातात.
ह्या धाग्यावर माझ्या प्रतिसादाआधी आलेल्या १२२ प्रतिसादांपैकी ३० प्रतिसाद तुमचे एकट्याचे आहेत (साधारणतः 24.5901639344%). असे तुम्ही तुमच्या हर एक धाग्यावर करता. आता विचार करा की तुमच्या ह्या प्रतिवादी स्वभावामुळे तुम्ही इतर धागे कसे मागे नेता हे!
एकदा वेळ काढून बाकीच्या धाग्यांवर लेखकाच्या स्वतःच्या प्रतिक्रिया किती आणि इतरांच्या किती याची टक्केवारी काढून बघा. ह्या उप्पर मी समजावू शकत नाही. देव तुम्हाला सद्बुद्धी देवो!
जिज्ञासा, ऋन्मेऽऽष, दरवेळी
जिज्ञासा,
ऋन्मेऽऽष, दरवेळी जेव्हा तुम्ही प्रतिसाद देता तेव्हा तो धागा पहिल्या पानावर येतो (if you haven't noticed the threads on each page are updated based on the last response time) अर्थात बाकीचे सर्व धागे एका नंबराने मागे जातात.
>>>>>>
एक्जॅक्टली, एकाच नंबराने मागे जातात, तीन पान मागे कसे जातात?
ह्या धाग्यावर माझ्या प्रतिसादाआधी आलेल्या १२२ प्रतिसादांपैकी ३० प्रतिसाद तुमचे एकट्याचे आहेत (साधारणतः 24.5901639344%).
>>>>>>>>
अनबिलीवेबल, तुम्ही येथील किती प्रतिसादांपैकी माझे प्रतिसाद किती मोजत आहात हे बघून मला व्यक्त न करणार्या भावना मनात येत आहेत.
असे तुम्ही तुमच्या हर एक धाग्यावर करता.
>>>>>>
याचीही आकडेवारी मिळाल्यास उत्तम. कारण माझ्यामते हे याच धाग्यावर झाले आहे कारण या धाग्याला मी आणि सई विरुद्ध माबोकर असे दुर्दैवी रूप आले आहे.
एकदा वेळ काढून बाकीच्या धाग्यांवर लेखकाच्या स्वतःच्या प्रतिक्रिया किती आणि इतरांच्या किती याची टक्केवारी काढून बघा.
>>>>>>>
हे करण्यात वेळ घालवण्यापेक्षा मी चार धागे आणि चौदा पोस्टी आणखी नाही का टाकणार
हे करण्यात वेळ घालवण्यापेक्षा
हे करण्यात वेळ घालवण्यापेक्षा मी चार धागे आणि चौदा पोस्टी आणखी नाही का टाकणार>>>>>>>>>.. भरपुरच वेळ आहे तुमच्याकडे..... लक्की यु
जिज्ञासा, आता माझ्या एका
जिज्ञासा,
आता माझ्या एका प्रश्नाचे उत्तर द्याल ...
इथे सोनाक्षी सिन्हा फॅन क्लब नावाचाही धागा आहे. माझी तशी ती बया ना विशेष आवडीची ना विशेष नावडीची. पण तो धागा सतत वर येताना बघून तिथेही काहीतरी वाद प्रतिवाद चालू असेल या आशेने एकदा गेलो तर पाहिले तिथे फोटो टाकून नुसत्याच गप्पा चालू होत्या. हा सईचा धागा वाद निवळताच आता दोनेक दिवसांत खाली जाईलच, पण तो मात्र वर येतच राहील. तर तिथे जाऊन आपण कधी सोनाक्षी सिन्हाला वर काढू नका अशी विनंती केली आहे का? नसावी ..
मग हा भेदभाव का?
१) सई आपल्या नावडीची आणि सोनाक्षी आपल्या आवडीची असला प्रकार आहे का?
२) सोनाक्षीचे चाहते आपल्या मित्रपरीवारातील किंवा जुने माबोकर असल्याने तुलनेत नवीन सभासद ऋन्मेषला जाब विचारणे सोपे आहे असे आहे का?
या प्रश्नाचे उत्तर दिलेच पाहिजे असे नाही, कारण हा मी आपल्याला जाब विचारत नाही, पण जमल्यास या अंगानेही विचार करावा अशी विनंती
अनिश्का, प्रायोरीटी आणि टाईम
अनिश्का,
प्रायोरीटी आणि टाईम मॅनेजमेंट !
बाकी वेळ प्रत्येकाकडे दिवसाचे चोवीस तास, तासाचे ६० मिनिटे, आणि मिनिटांची ६० सेकंदे इतकाच असतो.
प्रायोरीटी आणि टाईम मॅनेजमेंट
प्रायोरीटी आणि टाईम मॅनेजमेंट !>>>>>>>>>>>>>>. हे भारी आहे..
माझी तशी ती बया ना विशेष आवडीची ना विशेष नावडीची.>>>>>>>>>>>> आपली ती सुंदरी दुसर्याची बया.....सई ची तुलना कोणाशीही करु नका.... कहा राजा भोज ( सोनाक्षी असो की कुणी ) कहां गंगु तेली ( सई )
ऋन्मेऽऽष सुटलाय अगदी
ऋन्मेऽऽष सुटलाय अगदी
लोक हो आणि ऋन्मेऽऽष भाऊ, आवरा
लोक हो आणि ऋन्मेऽऽष भाऊ,
आवरा आता !!
ऋन्मेऽऽष भाऊ ला सई आवडते, आवडु द्या !!
इतरांना ती नाही आवडत [मी पण त्यातलाच] ते॑व्हा ऋन्मेऽऽष तू जाउ दे...पण आता थांबवा
सई चा [म्हणजे ह्या मतदानाचा] निक्काल ऑलरेडी लागला आहे.
ऋन्मेऽऽष च्या आवडण्याने आणि आपल्या तमाम लोकांच्या नावडण्याने सई ताम्हणकर ला काही ही फरक पडत नाही, की ह्या मतदाना चा निकाल माझ्या बाजुने लागु दे म्हणुन ती देव ताम्हणात काढुन ठेवत नाही.
ऋन्मेऽऽष मित्रा, तू एक फायनल पोस्ट टाक की ह्या सगळ्या प्रकारात एकंदर मज्जा आली, आपण आपला बहुमुल्य वेळ ईथे दिल्या बद्दल धन्यवाद !!
आणि आता थांबवा प्लीज्ज्ज्ज्ज्ज्ज !!!!
ऋन्मेऽऽष मित्रा, तू एक फायनल
ऋन्मेऽऽष मित्रा, तू एक फायनल पोस्ट टाक की ह्या सगळ्या प्रकारात एकंदर मज्जा आली, आपण आपला बहुमुल्य वेळ ईथे दिल्या बद्दल धन्यवाद !!
>>>>>
इश्श हे काय सांगायची गरज आहे का ...
सर्वांचेच आभार अभिनंदन धन्यवाद !
मी थांबतो
जाऊ द्या. ऋन्मेष आता एक
जाऊ द्या. ऋन्मेष आता एक अजून लास्ट बट नॉट द लिस्ट कारण.
काही काळापूर्वी पुण्यात ( कोथरुड ) रात्री १२ नन्तर ( १२ ते सकाळी ६ दर्म्यान) आपल्या मित्राना-मैत्रिणीना ब्लॉकवर बोलावुन , मग टाकुन ( कोणता पण ब्रॅन्ड असेल तो) भर रस्त्यात/ चौकात धुमाकुळ जिने घातला ती कोण होती ते शोध आता. ( सा न्गायची गरज आहे? तिचेच नाव अग्रगणी घेतलेय लोकानी) पार लोकानी तक्रार करुन पोलीस आले तेव्हा तो आरडा-ओरडा थाम्बला.
हिन्दी नट्या बेताल वागतात त्यात नवल नाही, पण मराठी नट्या जर स्वतःला अती आधूनीक समजून बेताल वागत असतील तर?
ढिन्ग चिका. काडी पडली वाट्ट खाली.
जिज्ञासा मी तुझ्या पोस्टनन्तर खरे तर लिहीणार नव्हते, कारण तू लिहीलेले पटले. पण अगदीच राहवले नाही म्हणून लिहीले, सॉरी.:स्मित:
राहवलं नाही म्हणून एक बिकिनी
राहवलं नाही म्हणून
एक बिकिनी काय घातली म्हणून बोल्ड म्हणून डोक्यावर घेतलेल्या या बयेसाठी दोन दोन धागे निघाले. त्यातला एक पोल कम धागा होता. मग तिच्यापेक्षा बोल्ड असणा-या आणि खुले आम स्विमिंग साठी पाण्यात शिरून बाथसीन देणा-या आणि चेह-यावर जरा सुद्धा भीती, लज्जा असे भाव प्रकट न होऊ देणा-या ख-या-खु-या मिस बोल्ड साठी धागा का नको ? बांधा सई पेक्षा नक्कीच चांगला आहे. रंगाचं काय सांगावं. अगदी नितळ कांती, पाण्यात गेल्यावर जर त्यावर सकाळची सोनेरी किरणं पडली तर कांती झळाळून उठते. खोटं वाटतंय का ? पुरावाच देतो.
फोटो टाकला तर फोटो किंवा आयडी डिलिट होण्याची भीती असल्याने जिज्ञासुंनी या लिंकवर भेट देऊन हा दावा पडताळून घ्यावा.
( दुवा कसा द्यावा हे शिकवल्याबद्दल लिंकन या आयडीचे आभार. आधी चुकून झालेल्या प्रमादाबद्दल क्षमस्व)
Pages