नमस्कार मायबोलीकर
आत्ता दोन दिवसांपुर्वी बाबांच्या मोबाइलवर असा मेसेज आला
thank you for using your sbi debit card XXXXX for a purchase worth Rs 43350 on POS xxxxxxx at PayTM IN txn#xxxxxxxx
बाबांनी असली काहीही खरेदि केलेली नाहिये,बाबा लगेच बॅन्केत गेलेत्, atm मधे जाउन चेक केले तेव्हा पैसे कापलेले दिसलेत्,बॅन्केच्या अधीकारी लोकांनी हात वर केलेत
PayTM वाले फोन न देत नाहीत(१८००१८००१२३४ वर फक्त मेसेज रेकॉड करता येतो)
care@paytm वर इमेल केली,ते लोक तीन दिवसांनी रिप्लाय देउन बॅन्केचे स्टेट्मेन्ट मागत आहेत्,जे आम्ही आज दिले,तेव्हा अजुन ४२००० रुपये PayTM इथे कापलेले दिसलेत
CCAvenue च्या अकाऊंट मधे पण पैसे कटुन परत पुन्हा वापस दिलेले दिसत आहेत
हा सगळा काय प्रकार आहे ? हॅकींग ? की अपघात?
जर हॅकींग असेल तर , एका ब्लॉग वर वाचले होते की जर २४ तासांच्या आत तुम्ही जर जिथे पैसे कापल्या गेलेत तिथे तक्रार केलीत तर तुम्हाला पैसे परत मिळु शकतात कारण No merchant would like to do business with a stolen card. They will readily block the transaction and revert the amount
पण PayTM वाले फोन न देत नाहीत्,इमेल करावा लागतो,ते लोक इमेल बघणार कधी आणी action घेणार कधी?
आणखी कोणाला असे अनुभव आले आहेत काय? अशावेळी पैसे परत मिळण्याची किती शक्यता असते??
आणी आम्ही आणखी काय करु शकतो??
बापरे!!
बापरे!!
खूप मनस्ताप देणारी गोष्ट आहे
खूप मनस्ताप देणारी गोष्ट आहे ही.रक्कम काहि थोडि नाहिये.पण तरी ही धीराने घ्या.
माझा मते आरटीआय फाइल करा.जाणकारांकडून आधी योग्य तो सला घ्या.तुम्हाला भरपूर विडियो हि मिळतील ह्य बद्दल.
काम खूप कटकटीचे आहे पण धीराने आणि संयमाने घ्या.नक्कि उपयोग होईल.
काळजि करू नका.नक्कि पैसे परत मिळतील
card block kela nahi ka
card block kela nahi ka lagech?
सर्वात आधी बँक अकाऊंट फ्रीझ
सर्वात आधी बँक अकाऊंट फ्रीझ करा. पैसे असतील ते काढून दुसरीकडे भरा. पोलिसांमध्ये तक्रार करून बघा.
सर्वसामान्य हितचिंतक म्हनून
सर्वसामान्य हितचिंतक म्हनून जे काही वाटले ते शेअर करतोय. तज्ञाचा सल्ला जरूर घ्यावा.
१.कुठ अकाउंटला पैसे ट्रान्स्फर झाले त्याचं स्टेटमेण्ट घ्या.
२.स्टेटमेण्टची झेरॉक्स जोडून बँकेच्या शाखेला एक प्रत, ग्रीव्हन्सेस सेलला एक प्रत आणि हेडक्वार्टरला एक प्रत पाठवा. पैसे का ट्रान्स्फर झाले त्याचं कारण विचारा. त्यात तुमची चूक दिसत असल्यास पुन्हा वस्तुस्थिती लक्षात आणून ब्विनंती करा.तुमची चूक नसल्यास भरपाईचा आग्रह धरा.
३. वरच्या स्टेपप्रमाणे कारवाई न झाल्यास बँकिंग क्षेत्रात लोकपाल असतो. Ombudsman. RBI च्या साईटवर तुम्हाला डिटेल्स मिळतील. तिथे एके कम्प्लेन फॉर्म असेल तो भरून द्यावा.
४. कुठल्याही स्टेपवर बेंकेच्या अधिका-यांशी व्यवस्थित बोलून घेऊन त्यांना विश्वासात घेऊन सायबर सेलला तक्रार द्यावी.तक्रारीची माहीती बँकेला लिखीत स्वरूपात द्यावी.
५. तुमच हात दगडाखाली अडकले आहेत. ते आधी सोडवून घ्या. सर्वांचे सहकार्य मिळवण्याचा प्रयत्न केल्यास काम लवकर होऊ शकते.
पैसे असतील ते काढून दुसरीकडे
पैसे असतील ते काढून दुसरीकडे भरा. पोलिसांमध्ये तक्रार करून बघा.>>>> खरंय.कस्टमर केयरवर फोन करून कार्ड ब्लॉक करण्यास सांगा. तुमची बँक उद्या बंद असेल तर सोमवारी रिटन कंप्लेंट द्या.त्याची एक कॉपी तुमच्यापाशी असू द्या.
होय,बँक अकाऊंट फ्रीझ
होय,बँक अकाऊंट फ्रीझ केलय्,
धन्यवाद उभारी दिल्याबद्द्ल्,आत्ता पोलीस किंवा सायबर सेल मधे तक्रार सोमवारी करावी लागेल्,आत्तातरी PayTM काय रिप्लाय देते ह्याची वाट बघतोय
सोमवारी तुम्ही लोकांनी सुचवल्याप्रमाणे करु.
धाग्यावर लक्ष ठेऊन आहे, येथील
धाग्यावर लक्ष ठेऊन आहे, येथील योग्य प्रतिसाद सर्वांच्याच कामी येतील.
स्वता तुर्तास आपल्याला अर्धवट आणि अडाणी सल्ला देण्यापेक्षा मनापासून शुभेच्छा देऊ शकतो, त्या देतो.
वृषाली , तुमच डेबिट कार्ड
वृषाली ,
तुमच डेबिट कार्ड हरवले आहे का ? का तुम्ही कार्डाची माहीती कोणाला दिली होती,
ऑन लाईन खरेदी करताना पीन नंबर शिवाय कार्ड वापरता येत नाही, याशिवाय बँकाचे डेबिट कार्ड आता मास्टर आणि व्हीसा कार्ड असतील तर त्यांची सुर क्षा चांगली आहे. वेगळा पासवर्ड देउनच ऑनलाईन खरेदी करता येते,
फक्त दुकानात खरेदी करताना चोरलेले कार्ड वापरता येते आणि ते सुद्धा पीन नंबर माहीती असेल तरच.
काही परिचितांच्या एस बी आय
काही परिचितांच्या एस बी आय कार्ड बाबत असेच घडलेय, काही ठराविक सीरीजची कार्डे compromise झालीत म्हणे!
पैसे परत मिळण्याबाबत अजून काहीही माहिती मिळालेली नाही.
अमेय, ती सीरीज कुठली याबाबत
अमेय, ती सीरीज कुठली याबाबत माहिती कळू शकेल काय? आमच्या घरीही एक नेहेमीच्या वापरातलं एसबीआयचं डेबिट कार्ड आहे. जर अशी कॉम्प्रॉमाईज झालेली कार्डस असतील तर ही माहिती पब्लिक डोमेनमधे आली आहे का? मला वाटतं बॅन्केची जबाबदारी असावी ना ही, की कस्टमर्सना संभाव्य धोका असेल तर कळवायची?
मला फेबुवर ही नोटीस दिसली - याची सत्यासत्यता माहित नाही
https://www.facebook.com/BewareNBeaware/posts/471307956305459
pay tm वाल्यांचा असा मेसेज
pay tm वाल्यांचा असा मेसेज आला आहे
Dear Vasanta,
We are unable to refund the amount as product has been delivered.
Unfortunately, we can not share the beneficiary details to you unless it is asked by your bank or any cyber cell agency.You can also attach the copy of FIR
आता आम्ही पोलीस तक्रार करणार आहोत
pay tm वाल्यांच कर्तव्य होत ना की आमचा इमेल गेल्यावर त्याच वेळी suspicious transaction थांबण्,तर हे लोक दोन दिवसांनी आम्हाला असे मेसेज करुन राहीलेत ,राग संताप दाटुन आलाय
I am really shocked. My
I am really shocked.
My sympathies with you. Please escalate to the highest level. I wish you justice.
खरच शोकिंग आहे . रक्कम पण
खरच शोकिंग आहे . रक्कम पण थोडीथोडकी नाही .शुभेच्छा
पैसे परत न मिळणे हे धक्कादायक
पैसे परत न मिळणे हे धक्कादायक आहे.... काहीच सुरक्षितता नाही आहे ?
मागच्या महिन्यात माझे विसा कार्ड हॅक झाले होते. अनोळखी नोन्द बघुन तत्काळ बॅन्केला कळवले आणि त्यान्नी कार्ड बन्द केले.
अशा प्रकारान्ना प्रतिबन्ध कसा घालावा ?
वृषाली, काय बोलू? खूपच
वृषाली, काय बोलू? खूपच चिंताजनक गोष्ट. तुमचा राग, संताप समजू शकते. धीराने घ्या!
पेटीम च्या संचालकावर गुन्हा
पेटीम च्या संचालकावर गुन्हा दाखल
http://www.abplive.in/india/2015/05/03/article575526.ece/Paytm-director-...
हे पेटिम विंडोँज स्टॉरला अॅप
हे पेटिम विंडोँज स्टॉरला अॅप आहे रिव्ह्यू :"बकवास" वाचून घेतले नाही.
अटक नाही .. फक्त केस फाईल
अटक नाही .. फक्त केस फाईल केलीय .. काहीही होणार नाही त्यांना ..
भारतात कोणाला इतक्या क्षुल्लक गुन्हा करता अटक ? शिक्षा ?? बस कर यार .. रुलायेगा क्या ?? मोठे मोठे गुन्हे करून मजा करतात लोक इकडे ..हा तर काहीच नाही ..
या असल्या फालतू साईट का वापरतात लोक ? paytm, freecharge तत्सम. आपला डेबिट कार्ड नंबर कुठे हि देऊ नका. कोणी हि कधी हि चुना लावू शकतो. डेबिट कार्ड वरून पैसे गेले कि ते सरळ बँक अकौंट मधून वजा होतात. क्रेडीट कार्ड चे तसे नाहीये. तुम्ही क्रेडीट कार्ड कंपनी ला चार्ज dispute करू शकता. आणि fraud निस्तरण्याची जबाबदारी कार्ड कंपनी ची असते. ( unofficially ) कारण तुम्ही पैसे भरणार नाहीत म्हणून ..
मी तर ऑन्लाइन व्यवहआरच करत
मी तर ऑन्लाइन व्यवहआरच करत नाही
हा बराच जुना धागा
हा बराच जुना धागा दिसतोय.
पुढे काय झाल कस केलत ते सांगू शकाल का वृषाली ताई.? म्हणजे सगळ्यांनाच उपयोग होईल.
मी नियमितपणे payTM वापरतो. माझा अत्तापार्येंतचा अनुभव चांगला आहे.
तुम्हाला केसला त्यांनी क्ष प्रकारे हाताळले हे कळले तर वापरयचे कि नाही ठरवता येईल.
@अभि१ गलतिसे मिस्टेक हो गया.
@अभि१ गलतिसे मिस्टेक हो गया. दोनो धागो पे बदल कियेला हय.
ok !!