bottle feeding sodvnya sathi

Submitted by पूनम पाटिल on 25 August, 2014 - 08:00

mazi mulgi 2 varsh 8 mahinchi ahe...ajun pan tila zoptana bottle lagtech....nahi dili tar far chid chid karate.....diwasa normally glass ne pani dudh pite pan zoptana nahi ekat....kay karta yeil.....kas sodvu tichi savay...pls help me

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तिला, दुसर्‍या कुठल्या तरी गोष्टीत रमवायला हवे ( टिव्ही नको ) बाहेर खेळणे, फिरायला जाणे, घरात दुसरा खेळ खेळत बसणे.. असे करता करता दमून झोपली पाहिजे.

तिच्यासमोर बाटली फेकणे / तोडणे पण करू शकाल. मुलांना शक्यतो तुलना केलेली आवडत नाही पण तिच्याच वयाच्या एखाद्या बाळाचे उदाहरणही देता येईल.

तिच्यासमोर बाटली फेकणे / तोडणे पण करू शकाल.>>> एक गंमत म्हणून सांगते
लहानपणी माझीही बाटलीची सवय जात नव्हती .मावशीच्या मिस्टरांनी माझ्यासमोर अशीच माझी दूधाची बाटली फोडुन टाकली ( मी ३ एक वर्शा.न्ची असेन , त्यामुळे हे आजी कडून ऐकलेले) . त्यानंतर मी दूध पिणच सोडलं, ते जवळ्पास कायमचच. फक्त आता काही वर्शापूर्वी लेकाच्या वेळेला प्रे. असल्यापासून फीडींग चालू असेपर्य.त एक दीड वर्शे प्यायले , आता परत सोडून दिलं.

सांगा सांगा !! अजुन ऊपाय सांगा !!!

मला पण आमच्या चिरंजीवांसाठी कामात येतिल.

thank you everyone.....
sagal karun zal...bottle fekun pan dakhvati.....tari pan zoptana far chidate...radte...ki mala bottle dayvich lagate.

आता आपण मोठे झालो आहोत आपल्याला बाटलीची गरज नाही हे मुलाच्या मनावर बिंबवावे. मग हळूच एक दिवस आता हि बाटली देऊन टाकूयात अशी सुरवात करावी. १-२ दिवस त्याबद्दल बोलावे मुलाची मनाची तयारी करावी आणि मग त्याच्या हातूनच ती बाटली कचरा घेऊन जाणार्‍या माणसाकडे द्यावी. १-२ दिवस नाही दूध प्यायली मुलं तर आभाळ कोसळत नाही. आपण ठाम राहावं. मोठं होण्याचं या वयात कौतुक असतं त्याचा छान वापर करावा. रडली जरा तर रडू द्यावं. जरा कठोर व्हावंच लागतं कधी कधी. हे मुलाच्या भल्यासाठीच आहे हे स्वतःला पक्कं समजावोन सांगावं. जोडीदाराला विश्वासात घ्यावं. नक्की जमेल. ठाम रहा.

अगदी सेम नखरे आमच्याकडे. अगदी आत्ताचा अनुभव आहे माझा. सव्वा दोन वर्षांची झाली आता पण रात्री झोपताना दुधाची बाटली हवीच. नाही दिली कि मोठ्याने आरडाओरड, चिडचीड, भोकांड पसरणे ठरलेले. तिला ८-१० दिवस सतत सांगत रहायचे आता तू मोठी झालीस आता बाटलीने दुध नाही प्यायचे तेव्हा मारे हातवारे करून स्टाईलमध्ये सगळ्यांना सांगायची आता मी मोती जाली बोटलने दुदु नाई पिनाल पण झोपायची वेळ झाली कि रडारड ठरलेली. मग झोपण्याच्या वेळेला गोष्टी सांगायला सुरुवात केली. पहिले २-३ दिवस तरीही दुध हवंच असायचं पण गेले ७-८ दिवस फरक पडतोय. गोष्ट ऐकता-ऐकताच झोपून जातात बाई. पण गोष्टीतली पात्रंसुद्धा तशी रंगवून सांगितली पाहिजेत. उदा. ससा आणि कासवाच्या गोष्टीत ससा बाटलीने दुदु प्यायचा म्हणून शर्यत हरला आणि कासव गुड बॉय बाटलीने दुध पीत नाही म्हणून जिंकला. मात्र रात्री जेवताना सगळं खातेय आणि तिचं पोट भरतंय याकडे कटाक्षाने लक्ष दिलं.

ससा आणि कासवाच्या गोष्टीत ससा बाटलीने दुदु प्यायचा म्हणून शर्यत हरला आणि कासव गुड बॉय बाटलीने दुध पीत नाही म्हणून जिंकला
>>
Lol
Cute!

बाटलीऐवजी सिपरवर शिफ्ट झाले तर चालेल की... हळू हळू सिपरवरून साध्या कपावर/ग्लासात शिफ्ट होता येईल.
किंवा आवडत असेल तर स्ट्रॉ कपात टाकून प्यायचा खेळ खेळा. हळू हळू बरंचसं दूध उरलेलं असतानाच मोठ्यांसारखं प्यायचा आग्रह करा. मुलांना हे साध्या कपातून पिणं सोपं आहे, एवढं कळालं की झालं तुमचं काम.

थोडा वेगळा विचार मान्डु का? जर नाहिच सोडली तिने बाटली आता तर असा काय मोठा फरक पडणार आहे? ती काही अगदि मोठी होइस्तोवर बाटलीने दुध पिनार नाही. एक ना एक दिवस स्वतहुन सोदुन देइल....मग कशाला एव्हडा अट्टाहास? मला कधी कधी वटते की आपण फारच मुलन्च्या मागे पडतो. त्यान्ची ती शिकतात मोठ्यन्कदे बघुन....

@dharaa-tila pani dudh sagal yet pita normal cup ni....pan ratri zoptana bottle ch pahije....madhech uthel ratri tari bottle madhe dudh pahije....far hatti halu....me ata bottle madhe pani takun dete...khoop ch radat asel tarch dudh dete...

@-मर्दानी-mala as bhiti vatat ahe ki as dudh pinya mule tiche daat kidnar tar nahit na....mahnun....

tichi open herat surgery zali ahe(TOF)mule...tymule jast ch pamper zali ahe...far hatti zali ahe

दुधाच्या बाटलीत मनुके टाक. आणि बाळाला सांग 'हे बघ यात काय पडलय"..

माझ्या भाचीसाठी हा उपाय कामी आलेला

माझी मुलगी २. ५ वर्षाची आहे . तिला सुद्धा बाटली ने दूध प्यायची सवय आहे काय करू समजत नाही वेगवेगळे पदार्थ खायला केले तरी खात नाही दुधाचं पाहिजे असत मी काय करू डॉक्टर दूध बंद करायला सांगतात

इथे मला असं सुचवावंसं वाटतं की प्रत्येक मूल वेगळं असतं. पण बरीच मुलं एखादी वस्तू किंवा क्रिया त्यांच्या सेक्युरिटीसाठी करत असतात. आणि त्यांच्या उपजत स्वभावाप्रमाणे त्या गोष्टी हळू हळू सोडून देतात. इथे त्यांना चांगल्या सवयी लागणे जितके महत्वाचे आहे तितकेच (किंवा त्याहिपेक्षा जास्त) त्यांना सुरक्षित वाटणे देखील आहे. प्रयत्न चालू ठेवा पण जेव्हा ताण येईल तेव्हा असा विचार करा की आपण ५ वर्षं या वयोगटातील किती मुलांना बाटलीने दूध पिताना आणि डायपर वापरताना बघितलंय? त्यामुळे हळू हळू नक्की सुटेल सवय. Happy

@स्वस्ति यांनी सांगितलेला अनुभव खूप ह्रदयस्पर्शी आहे. सवयी लावण्याच्या/सोडण्याच्या नादात लहान मुलांच्या मनावर कायमचा परिणाम होईल अशी कोणतीही कृती करू नये इतकेच (बाळाच्या समोरच बाटली फोडणे, त्यावरून बाळाला जोरात ओरडणे इत्यादी प्रकार अमानुषच).

दूधात फरक करुन बघावा. सावकाश. म्हणजे साखर कमी कमी करत जावी (साखर घालताय असे गृहीत घरुन) आणि दूधात थोडे थोडे पाणी मिसळत जावे. एकदम केले तर मुलांच्या लक्षात येईल म्हणुन रोज थोडे थोडे करावे साधारण १५ ते २० दिवसात साखर एकदम कमी किवा बंद होईल आणि दूध एकदमच पातळ होईल असे. चव न राहिल्याने बंद करतील पिणे.

दुधाची बाटली सोडण्यासाठी मी तिचा समोर बाटली टाकून दिली होती पण त्यानंतर तिने २-३ दिवस ताप घेतला औषध देऊन सुद्धा कमी येत नव्हता
दुधाची बाटली दिली ताप येणं बंद झालं त्यामुळे असा कोणताही प्रकार मी नाही करू शकत. ती तणाव पूर्ण वातावरण वावरते मग तिला सतत भीती वाटत राहते बाटली फेकलीतर.

दुधाची quantity कमी करा, नेहमीच्या अर्धेच दूध भरा,
बहुतेक वेळेस मुले एक चाळा किंवा इमोशनली secured वाटावे म्हणून बुच चोखत असतात,
दूध कमी कमी करत गेल्यावर एक वेळ येते जेव्हा बाटली 2 मिनिटात काढून घेतली जाते, दूध संपल्यावर बाटली जाते हे डोक्यात फिक्सड प्रोग्रामड असते, त्यामुळे जास्त आरडाओरड होत नाही आणि सवय आपोआप सुटते,
(हा झाला मुलांचे मानस शास्त्र वगैरे ला धरून झालेला प्रतिसाद,
माझी मुलगी रात्री झोपताना आणि एकदा उठून दूध प्यायची, रात्र भरात अर्धा लिटर दुध सहज संपवायची, तिला 2-3 दिवस समजावून सांगितले,
मग एक दिवस खूप खेळून ती खांद्यावरच्या झोपली, त्या रात्री ती उठल्यावर तिला बाटली दिली नाही, थोडी रडारड, आरडाओरड झाली पण ती परत झोपली,
दुसया दिवशी झोपतानाच बाटली मिळणार नाही असा स्टॅन्ड घेतला,
ते 3-4 रात्र स्ट्रेसफुल गेले, पण बाटली सुटली.
I always prefer cold turkey method when it comes to breaking a habit. Even with kids, त्यांना 2-3 दिवस कल्पना द्यावी, आणि मग सवय बंद.

बाटलीच्या निप्पलचा होल एकदमच लहान ठेवा. जेणेकरुन दूध सहज बाहेर येणार नाही. जास्त जोरात ओढावे लागत असेल तर मग मुलं कंटाळून सोडतात बाटली.