युएस ओपन - २०१४

Submitted by Adm on 21 August, 2014 - 05:28

वर्षातली शेवटची ग्रँड स्लॅम स्पर्धा युएस ओपन सोमवार दिनांक २५ ऑगस्ट पासून सुरु होते आहे.
त्याबद्दल चर्चा करण्यासाठी हा धागा.

स्पर्धेची वेबसाईट :
http://www.usopen.org/index.htm

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जीतेगा भाई जीतेगा .. Wink

ह्यावेळी फॅब की फँटास्टीक ४ पेक्षा वेगळाच कोणीतरी जिंकणार असं वाटत आहे ..

राफाचे मनगट दुखापतीतून सावरलेले नसल्याने आणि टेन स्पोर्ट्स(इथेच प्रक्षेपण असेल या अंदाजात) सब्स्क्राइब केलेले नसल्याने सध्या पास.
उपान्त्य फेरीच्या वेळी पुनर्विचार केला जाईल.

फ़ेड्याचा दोन पायां मधुन मारलेला फ़टका जबरदस्त!

मास्टोसेविच मारलेला लॉबचा फ़टका परत येणार नाही हे गृहित धरुन पाठ फ़िरवुन परत चालला होता.

दोघांचे ही प्रतिसाद बघण्या सारखे आहेत. मास्टोसेविच चा फ़ेडरर लॉब घेण्यासाठी मागे पळताना आणि रीटर्न मारल्यावर फ़ेडरर चा.

ESPN वर व्ह्डीओ आहे याचा.

सेरेना विल्यम्स जिंकणार असं दिसतय.. यंदा तर तिला हारवायला कोणीच शिल्लक नाहीये. एकतिराना मॅकारोव्हा सेरेनाला हरवेल असे मूळीच वाटत नाही.. आणि वॉझ्नियाकी किंवा पेंग मधे पण सेरेनला हारवण्याची ताकद दिसत नाही..

पुरुषांमध्ये फेडेक्स जोको फायनल..निशिकोरी जबरी खेळतोय. पण त्याला पहिलीच ग्रॅंड स्लॅम सेमी खेळताना दडपण येण्याची शक्यता फारच जास्त आहे.. अगदी फ्री खेळला तर काही सांगता येत नाही पण..

कालची मॅच बघून इथे लिहिले नाही तर पाप लागेल म्हणून धागा खणून काढते आहे. जबरी कमबॅक! मस्त झाली मॅच एकदम. मॉन्फिल्सने एवढे डबल फॉल्ट्स मारले नसते तर कदाचित जिंकला असता मॅच.

कमबॅक जबरीच ..

चौथ्या सेटमध्ये मॅच पॉइंटला असताना आयदर हिज् नर्व्हज् गॉट टू मॉन्फी ( असाच करायचा ना उच्चार?) किंवा मग तुमच्या ग्रेटेस्ट एव्हर ने इतका आत्मविश्वास आणि निर्धार दाखवला की त्याला काही करताच आलं नाही .. आणि मग त्यानंतर त्याचं फायटींग स्पिरीटच संपल्यासारखा खेळला तो ..

जे काय असेल ते असेल कमबॅक भारीच ..

आमच्या घोड्याने निशीकोरी ला मारलं आणि फायनल् ला गेला आणि तुमच्याने सिलीच् ला मारलं तर मज्जा येईल बुवा फायनल बघायला .. रीझल्ट आमच्या बाजूने लागला की मग गंगेत घोडं न्हालं .. Wink

निशिकोरी - जोको मॅच जबरी झाली.. निशिकोरीने काही विनर्स अचाट मारलेत... जोको जागचा हाललाच नाही.. नंतर पाऊस आल्याने पुढच्या मॅचला जागरण न करता झोपलो आणि सकाळी सकाळी फेडेक्स हारल्याची बातमी बघितली.. Sad

किती ढिसाळ मॅच चालू आहे.. दोघींनाही सर्व्हिस राखायला जेमतेम जमतय !
पण एकंदरीत सेरेन जिंकणार असं दिसतय.