डरमॅटॉग्लिफीक्स-मल्टिपल इंटेलिजन्स टेस्ट? माहिती हवी आहे.

Submitted by विज्ञानदासू on 26 July, 2014 - 09:25

Dermatoglyphics तंत्राने काही करीअर निश्चित केल्या जाणार्‍या आणि वेगवेगळे कोशन्ट्स् काढल्या जाणार्‍या चाचण्या आहेत.त्याबद्दल माहिती हवी आहे.
१-भारतात अशा चाचण्या होतात का?त्या कोण करतं?
२-त्या चाचण्यांची योग्यता (Accuracy) किती असते?
३-त्यांची पद्धत कोणती असू शकते किंवा असते?
४-इथे अशा चाचण्या कोणी केलेल्या आहेत का?

या विषयावरची इंग्रजी माहिती स्थळे वाचून झालेली आहेत.जर या चाचण्या घेणार्‍या संस्था किंवा इतर माहीती असेल तर सांगावी.स्वतःचे अनुभव किंवा या चाचण्यातल्या दोषांबद्दल,फसव्या चाचण्यांबद्दल माहिती द्या,कृपया.बाहेरच्या देशात या प्रकाराने चाचण्या केल्या जातात.त्याबद्दलही सांगावे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहो, शनिवार, रविवार माबो वर शांतता असते. थोडी वाट पहा Happy

तो पर्यंत हे वाचा. बहुतेक तुम्ही मांडलेल्या विषयाशी संबधित आहे.

http://www.maayboli.com/node/39257

आणि हो हा धागा दिड वर्षे जुना आहे. जगात नविन काहिहि घडले कि माबो वर त्याचे पडसाद असतात....... Happy

अरे!हासुद्धा विषय चर्चिला गेलाच आहे की.धन्य आहे माबो. Happy
धन्यवाद लिंकबद्दल.

त्या धाग्यावरचे प्रतिसाद वाचले.मलाही पुरावेच हवे आहेत.त्याबद्दल्,कुणाकडून काही अनुभव आले असतील तर सांगाच पण गेल्या दिड वर्षात कुठे यात जे काही वास्तव आलं आहे चांगलं वाईट दोन्ही तेही शेअर करा. बालमोहनच्या त्या चाचण्यांचं काय झालं पुढे? इब्लीस त्या धाग्यावर आक्रमक झाले आहेत.पण यात खरोखर सायंटीफिक तथ्य असेल तर कसे,का?प्लीज अशी टेस्ट मनोविश्लेषन करणारे करतात का? या बाजूने परत उत्तरे हवी होती.

पण फिंगरप्रिंट्स आणि मेंदू यांचा संबंध कसा असू शकतो,याचा पुरावा हवा आहे. कारण्,इथेही काही स्थानिक लोक मलेशियावरुन ही टेस्ट करुन देतो म्हणून शाळांना भेटी देत आहेत.जर हा फ्रॉड असेल तर त्यांना तसे सांगता येईल.

ह्म्म...तसंच वाटतंय.ऑथराईज्ड कुठं दिसत नाही याबद्दल.
पण इथे काही प्रतिथयश शाळा आहेत्,तिथे ही लोकं जाऊन प्रचार करतायत.