Submitted by रसप on 17 July, 2014 - 01:00
पर्याय -
१. गझलांसाठी - मी गझला वाचण्यास येतो/ येते.
२. प्रतिसादांसाठी - मी फक्त प्रतिसाद वाचण्यास येतो/ येते. त्यातून काही क्षणांचे फुकट मनोरंजन होते.
३. केवळ श्री. सतीश देवपूरकर ह्यांच्या पोस्ट्ससाठी - कधीही यावं अख्ख्या फोरमभर एकच नाव असते. बाकी काहीही सापडत नाही, दिसत नाही.
४. दुर्लक्षिण्यासाठी - आजकाल मी इथे येणंच कमी केलं आहे. क्वचितच नजर टाकतो/ टाकते.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझे उत्तर - ४.
माझे उत्तर -
४. दुर्लक्षिण्यासाठी - आजकाल मी इथे येणंच कमी केलं आहे. क्वचितच नजर टाकतो.
पर्याय ४. त्याचे कारण पर्याय
पर्याय ४.
त्याचे कारण पर्याय ३.
पर्याय २ थकल्या जीवाला
पर्याय २
थकल्या जीवाला विरंगुळा , मनोरंजन
पुर्वी पर्याय क्र. २ आता
पुर्वी पर्याय क्र. २
आता पर्याय क्र. १
जर एखाद्या गझलकाराच्या गझला आपल्याला वाचायच्या नसतील तर आपण त्याकडे दुर्लक्ष करु शकतो.
पर्याय क्र. १ सविस्तर यथावकाश
पर्याय क्र. १
सविस्तर यथावकाश लिहितो.
"३. केवळ श्री. सतीश देवपूरकर
"३. केवळ श्री. सतीश देवपूरकर ह्यांच्या पोस्ट्ससाठी - कधीही यावं अख्ख्या फोरमभर एकच नाव असते. बाकी काहीही सापडत नाही, दिसत नाही." >>> या विधानात बरेच तथ्य आहे. देवपूरकरांच्या असंख्य गझलांच्या अडथळ्यातून
बाकीच्यांच्या गझला शोधणे कठीणच जाते.
"४. दुर्लक्षिण्यासाठी - आजकाल मी इथे येणंच कमी केलं आहे. क्वचितच नजर टाकतो/ टाकते." >>> एका माणसामुळे पूर्ण गझल विभाग दुर्लक्षिला जाणे हे योग्य नाही.
दुर्लक्षित करायचेच असेल तर त्यांच्या गझला दुर्लक्षित करणे संयुक्तिक ठरेल.
कारण इतक्या प्रमाणात गझलांचा भडिमार करू नका, असे त्यांना अनेकांनी विविध मार्गांनी/पद्धतींनी सांगून, समजावूनही ते आपला हट्ट सोडत नाहीत. त्यामुळे आपल्यालाच त्यांच्या गझलगर्दीतून बाकीच्यांच्या गझला शोधणे क्रमप्राप्त आहे.
४. दुर्लक्षिण्यासाठी - आजकाल
४. दुर्लक्षिण्यासाठी - आजकाल मी इथे येणंच कमी केलं आहे. क्वचितच नजर टाकतो.
तुझ्या प्रश्नाचं उत्तर
तुझ्या प्रश्नाचं उत्तर मुख्यत्त्वे १ आणि सध्या ४.
मोफत सभासदत्व आणि मुक्तपणे व्यक्त व्हायची संधी ह्या दोन प्लस पॉईंट्सचे एवढ्या प्रमाणातले दुष्परिणाम माझ्या पाहण्यात पहिल्यांदाच आले आहेत. (सोशल वेबसाईट्स वरचा माझा कमी वावर हे त्याचं कारण असावं, की हे पहिल्यांदाच बघायला मिळतंय मला). पण जे काही सुरू आहे, ते गझलेवर नितांत प्रेम करणार्यासाठी अतिशय क्लेशदायी आहे. तरीही हे सुरू ठेवण्यामागे मायबोली प्रशासनाची काही कारणं किंवा नाईलाज किंवा भूमिका किंवा धोरणे असतील. अन्यथा हे केव्हाच बंद झालं असतं.
सतीश देवपूरकरांच्या धाग्यावर आवर्जून हजेरी लावून टीआरपी वाढवणार्या सर्वांना माझी कळकळीची विनंती - खरंच तुम्हाला गझलेमध्ये इंटरेस्ट असेल, आणि स्वतःला गझलांचे रसिक मानत असाल, तर मायबोलीवरच खरोखर उत्तमोत्तम गझला आहेत, ज्या (काळाच्या ओघात वगैरे) मागे पडल्या आहेत. तिकडे वळा, त्या वाचा. जुन्या मायबोलीवरही उत्तम गझला सापडतील. (नावं इथे देत नाही, कारण त्यातून मानापमान होतील.)
नुस्तं 'चांगलं लिखाण मागे पडतं', 'गझलांचा पूर असतो' वगैरे तक्रारी करून चालणार नाही. आणि त्यांच्या धाग्यांवरही सतत नकारात्मक प्रतिसाद देऊनही काही उपयोग नाही.
आपण गझलेचे रसिक आहोत तर चांगली गझल आपण शोधली पाहिजे, तिला वर आणलं पाहिजे. नुसतं समोरच्या गझलेला वाईट म्हणून आपण रसिक ठरणार नाही...
पटलं तर घ्या! नाहीतर सोडून द्या...
धन्यवाद!
माझं उत्तर "सुधारित पर्याय
माझं उत्तर "सुधारित पर्याय २"
सुधारित पर्याय २. प्रा. सतीश देवपूरकर ह्यांच्या गझलांवरिल प्रतिसादांसाठी - मी फक्त प्रतिसाद वाचण्यास येतो/ येते. त्यातून काही क्षणांचे फुकट मनोरंजन होते.
गझल विभाग वरिइल सर्व अथवा
गझल विभाग वरिइल सर्व अथवा 'वरिल एकाही नाही' कारणाअसाठी असेल हो पण कॄपया सार्वजनीक करायची सोय नका ठेउ ही अॅड्मिन याना नम्र, कळकळीची विनंती.
खरेतर मायबोलीवर
खरेतर मायबोलीवर गुलमोहर-देवपुरकर विभाग असा एक स्वतंत्र विभाग सुरु झाला पाहिजेल
ही विंनती मी केलेली.....
ही विंनती मी केलेली..... परंतु एका मुळॅ सगळ्यांकडुन सार्वजनिक चा ऑप्शन काढुन घेणे म्हणजे त्यांच्या मुलभुत हक्कावर विनाकारण गदा येते..........असे त्यांचे म्हणने आहे
इतरांच्या सुखानी वाचणयाच्या
इतरांच्या सुखानी वाचणयाच्या हक्काच काय? विभाग ज्याना जे वाचायच त्याना ते वाचता येवो म्हणून आहेत ना. पहिल्या पानावर ८०% गझलांचा रतिब पाहून इतर पान उलटावीशी ही वाटत नाहीत. बरच खरच वाचण्यासारख ( माझ्यापुरत) निसटून जात मग.
अरे पण या देवपुरकरांची मुल
अरे पण या देवपुरकरांची मुल (गझला) बघता बघता इतरांची भुतं होतात त्याचे काय
माझे उत्तर - ४.
माझे उत्तर -
४. दुर्लक्षिण्यासाठी - आजकाल मी इथे येणंच कमी केलं आहे. क्वचितच नजर टाकतो.
त्याचे कारण पर्याय ३.
जीव मेटाकुटीला येणे म्हणजे काय ह्याचे संदर्भा सहीत स्पष्टीकरण होते.
कीव येते आहे रसपच्या
कीव येते आहे रसपच्या दारिद्र्याची!
देणार्याचे हात हजारो दुबळी
देणार्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी.!
हजारो हात "हजारोंचे" असते तर काही अडचण नव्हती, पण इथे "एकालाच" हजार हात आले आहेत, त्यामुळे बहुतेक अडचण झालीये सगळ्यांची.
झाली सुरवात इथ पण
झाली सुरवात इथ पण
एक आयडिया आहे. आपण सर्वांनी
एक आयडिया आहे.
आपण सर्वांनी काँट्रिब्यूशन काढून त्यांना एक रंगीबेरंगी पान विकत घेऊन देऊ.
एक वर्षासाठी.
आणि थोडे एकस्ट्रा पैसे देवून व्यूअरशिप बाय इन्विटेअहन ओन्ली असे ठेवू.
सातीताई, फक्त एक पान, १ कोटी
सातीताई, फक्त एक पान, १ कोटी गझलांचा संकल्प सोडलाय त्यांनी आहात कुठे?
झाली सुरवात इथ पण>>>>>
झाली सुरवात इथ पण>>>>> विचारवंत, रसपनी त्यांच्यासाठी पर्याय कुठे ठेवलाय. मग राग नाही का येणार.
पर्याय क्र. ५ फक्त गझल लिहिण्यासाठी. बाकी मायबोलीकर ह्यात अजुन भर घालतीलच.
देवपूरकरांच्या असंख्य
देवपूरकरांच्या असंख्य गझलांच्या अडथळ्यातून
बाकीच्यांच्या गझला शोधणे कठीणच जाते. <<
बाकीचे काहीही शोधणे कठीण जाते.
गझल विभाग वरिइल सर्व अथवा 'वरिल एकाही नाही' कारणाअसाठी असेल हो पण कॄपया सार्वजनीक करायची सोय नका ठेउ ही अॅड्मिन याना नम्र, कळकळीची विनंती. <<<
याला +१०००००००००००००००००००००००००००००००००००००
मला गझला आवडतात की नाही हे मला मुळात माहिती नाही. म्हणजे एखादी आवडते ती गझल आहे म्हणून की त्याचे काव्य आवडते म्हणून हे मला माहित नाही. त्यामुळे आवर्जून इकडून तिकडून खणून काढून वाचायला मी जातेच असे नाही. सध्या जो काही महापूर समोर दिसतो एकाच व्यक्तीच्या गझलांचा त्याने गझलांबद्दल आवड निर्माण होण्यापेक्षा तिटकाराच उत्पन्न होतोय.
हा देवपुरकर फारच निर्ढावलाय
हा देवपुरकर फारच निर्ढावलाय ,याच्या गझल बल्कमध्ये डीलीट केल्याशिवाय हा ऐकणार नाही.
प्रोफेंचा आयडी पुन्हा एकदा
प्रोफेंचा आयडी पुन्हा एकदा शहिद झालाय का?
नरेंद्र माने, एका पानावर
नरेंद्र माने, एका पानावर कितीही गझला ते लिहू शकतात.
एका माणसासाठी एवढा अट्टाहास ,
एका माणसासाठी एवढा अट्टाहास ,
खरे तर प्रतिसाद दात्यांनी स्वतःला आवरायला हवे
देवपुरकरचा आयडी उडाला.
देवपुरकरचा आयडी उडाला. स्वातंत्र्यदिनाच्या मायबोलीला शुभेच्छा.
देवपुरकरचा आयडी उडाला.
देवपुरकरचा आयडी उडाला. स्वातंत्र्यदिनाच्या मायबोलीला शुभेच्छा.>>
असा आयडी बर्याच वेळा उडालाय, पण नविन अवतार घ्यायला असा किती वेळ लागणार आहे, नेमेची येतो पावसाळा!
सातीताई मला माहित आहे आपण
सातीताई मला माहित आहे आपण आंतरजालावरील पानाबद्दल बोलत आहात. मी फक्त विनोदासाठी कागदी पानाची कल्पना केली.:)
बहुतेक त्यांचा आयडी पुन्हा
बहुतेक त्यांचा आयडी पुन्हा एकदा प्रतिबंधित केला गेला आहे.
निर्णयाचे मनापासून स्वागत !
मला तांत्रिक बाबी नीटशा कळत नाहीत, पण एक विचारणा. फेसबुकवर जसं आपण कुणालाही ब्लॉक करू शकतो किंवा अन्फॉलो करून त्याच्या पोस्ट्सना न्यूज फीडवरून वगळू शकतो, तसं काही इथे शक्य नाही का ? असे केल्याने, वाचकांना सिलेक्टिव्ह होता येईल व पुन्हा कुणी अश्या प्रकारे फोरम बरबटवणार नाही.
कृपया विचार करावा.
धन्यवाद !
पुढच्या अवताराचं नाव काय
पुढच्या अवताराचं नाव काय असेल्..
हे आत्तापर्यंतचे अवतार, त्यांच्याच शब्दात..
"माझे नाइलाजाने घ्यावे लागलेले आयडी खालीलप्रमाणे
१.सतीश देवपूरकर
२.अनामिक गझलवेडा
३.गझलप्रेमी
४.कर्दनकाळ
५.profspd.
परतोनीआलो असेल आता नवा अवतार
परतोनीआलो असेल आता नवा अवतार

गझलभूत असा पण एक अवतार येऊ
गझलभूत असा पण एक अवतार येऊ शकतो
रणजित, हा धागा काढल्याबद्दल
रणजित,
हा धागा काढल्याबद्दल धन्यवाद.
काल अॅडमिनच्या विपूत मी एका ज्येष्ठ सभासदास याबाबत अनुमोदन दिले होते आणि देवपूरकरांच्या गझल-पूराबाबत आज मीच एक धागा काढून मा. अॅडमिननना जाहीर विनंती करणार होतो. परंतु, त्याआधीच तुझा हा धागा आला.
धन्यवाद
धन्यवाद अॅडमिनजी.
देवपूरकरांनी चालविलेला गझलांचा भडिमार आणि त्यामुळे इतरांचे लेखन झाकले जाते, वाचनात येणे कठीण होते हा आणि इतकाच माझा मुद्दा होता. आपण केलेल्या कारवाईमुळे बाकीच्यांच्या लेखनाला न्याय मिळाला. पुन्हा एकदा धन्यवाद.
अर्थात् याआधीचे अनुभव लक्षात घेतल्यास आयडी ब्लॉक करूनही देवपूरकरजी परत इथे येणार नाहीत याबद्दल शाश्वती देता येणार नाही. "मी राखेतून जन्म घेणारा फिनिक्स आहे" अशा आशयाच्या एखाद्या गझलेतून नव्या आयडीमार्फत ते इथे पुन्हा प्रकट होऊ शकतात.
माझ्या व्यतिरिक्त आणखीही काहीजणांनी त्यांच्या पुनरागमनाच्या शक्यतेची शंका व्यक्त केलेली आहे. त्यामुळे आयडी ब्लॉक करणे हा तात्पुरता उपाय ठरू शकतो. (कायमचा ठरल्यास उत्तमच)
त्यामुळे अशा बाबतीत काही कायमचे उपाय/नियम केले गेले पाहिजेत असे वाटते.
एखादा सभासद अतिरेकी प्रमाणात लेखन प्रकाशित करीत असेल आणि इतर सभासदांनी लेखन-संख्येबाबत आक्षेप घेतला असेल तर त्या सभासदाच्या प्रकाशन संख्येवर मर्यादा घातली जावी.
उदा. एका विभागात एका आठवड्याला फार तर दोन धागे. (हा नियम सर्वांसाठी केला गेला तरी हरकत नसावी, निदान माझी तरी नाही.)
किंवा ऍडमिननेच त्याचे अतिरिक्त धागे अप्रकाशित करावेत असे सुचवावेसे वाटते.
प्रशासकांचे प्रचंड आभार, आज
प्रशासकांचे प्रचंड आभार,
आज बर्याच कालवधी नंतर (पक्षी: गझल गवत कापल्यागेल्या नंतर) मायबोलीचं 'नविन लेखन' चं पान अतिशय चांगल दिसत आहे.
"समकालीन कवी ज्याची टर उडवतात
"समकालीन कवी ज्याची टर उडवतात तोच कवी महान असतो, मग उद्या येणार्या पिढ्या मात्र त्याला डोक्यावर घेऊन नाचतात." हे सतिश देवपुरकरांच्या डोक्यात घर करून बसलंय.
त्यामुळे ते जाणीवपूर्वक स्वतःला "वादग्रस्त" बनवून घेतात.
"येणार्या पिढ्यांशी बोलतो आम्ही" हीच त्यांच्या जीवनाची कार्यशैली झाली आहे. आणि असे होण्यामागे त्यांची अहंकारी वृती आहे. ज्यामुळे ते स्वतःला कविवर्य स्व. सुरेश भटांचे एकमेव शिष्य म्हणवतात. मात्र ते स्वतःला कविवर्य स्व. सुरेश भटांपेक्षा तसूभरही कमी समजत नाही. कविवर्य स्व. सुरेश भट केवळ मलाच समजले, असा दावा करण्यामागचे कारण इथेच दडले आहे.
त्यांना प्रतिबंधीत करण्यापेक्षा त्यांना वास्तवाचे भान झाले असते आणि आपण स्व. सुरेश भटांच्या पासंगालाही पुरत नाही, एवढी जाणिव त्यांना झाली असती तर ते जास्त परिणामकारक झाले असते.
नवा अवतार घेऊन ते पुन्हा येऊ शकतात. मात्र त्यांचे मतपरिवर्तन कधी ना कधी होईल, अशी आशा मी बाळगून आहे.
*******************
(त्यांच्या नापश्चात मी लिहितो आहे, म्हणून त्यांना आदरयुक्त शब्दात संबोधले आहे. सामोरासामोर आंतरजालावर किंवा प्रत्यक्षात कधी हजारो लोकांत जरी त्यांच्याशी बोलायचा प्रसंग आला तर मी एकेरी भाषेतच संभाषन करणार आहे. त्यांच्याविषयी एकदा निर्णय घेतला तो मी पाळणार आहे.)
मात्र त्यांचे मतपरिवर्तन कधी
मात्र त्यांचे मतपरिवर्तन कधी ना कधी होईल, अशी आशा मी बाळगून आहे.>>.
जबरदस्तं आशावादी आहात तुम्ही!
चारही पर्याय निवडावेत असे
चारही पर्याय निवडावेत असे वाटत आहे
कोणाला बॅन करण्यापेक्षा..जर
कोणाला बॅन करण्यापेक्षा..जर लिमिट ठेवले तर?
आठवड्याला फक्त २ गझला प्रकाशित करता येतील..त्यातही त्या पोस्ट्स मधे किमान ३ दिवस अंतर आवश्यक आहे.
त्यामुळे थोडी शिस्त राहिल आणि इतरांना पण "चान्स" मिळेल.
आठवड्याला फक्त २ गझला
आठवड्याला फक्त २ गझला प्रकाशित करता येतील<<<<<
मग मला वाटतं असं लिमिट सगळ्याच ग्रूप्स साठी लावणं योग्य ठरावं एकट्या गझल ग्रूपने काय गुन्हा केला आहे का
वैवकु, अहो मी गझला प्रकाशित
वैवकु,
अहो मी गझला प्रकाशित करण्यावर मर्यादा ठेवण्याबद्दल बोलत आहे.. कोणाला रोज २/३ गझला होत असतील तर त्यांनी त्या वहीत लिहुन ठेवाव्या आणि दर तीन दिवसांनी एक प्रकाशित करावी. (पण सिरियसली.दिवसाला २/३?? आणि तेही रोज??)
mansmi18 तुमचे मत रास्त आहे
mansmi18
तुमचे मत रास्त आहे पण मी इतकेच म्हणतो आहे की असा एखादा नियम करायचा असेल तर सरसकट सर्व गॄप्सना लागू केला गेला पाहिजे कोणत्याही एखाद दुसर्याच गॄपला तो बंधनकारक करणे अन्यायाचे ठरेल मग गॄप कोणताही का असेना नै का ?
>> मग मला वाटतं असं लिमिट
>> मग मला वाटतं असं लिमिट सगळ्याच ग्रूप्स साठी लावणं योग्य ठरावं
गुलमोहरातल्या इतर ग्रूप्समधे एकाच आयडीने दिवसाकाठी दोन किंवा अधिक कलाकृती सातत्याने पोस्ट केल्या असं बघितलं आहे का तुम्ही?
असं बघितलं आहे का तुम्ही?
असं बघितलं आहे का तुम्ही?
<<<<
बघीतलं नाही हे खरय . पण नियम म्हटल्यावर सगळ्यानाच लागू केला गेला पाहिजे ना !. मी काय इतर गॄप्स चा दुशमन वगैरे नाही मी फक्त नियमाच्या सर्वसमावेषकतेचा आग्रह धरला
मी फक्त ह्याच नियमाबाबत नाही तर कोणताही नियम बनवताना असं झालं पाहिजे असं म्हणतोय
१.२.. साठी निर्बंध घातलेले
१.२.. साठी
निर्बंध घातलेले तोडता येतील (जो तोडू इच्छितो त्याला) मल्टीपल आय डी बनवून . त्यामुळे तसे करू नये.
सूज्ञ लोकांना हे कळते असे मला वाटते (मर्यादे पलिकडे फक्त हेतू पुरस्सरच अपलोड केले जाते ही दुःखाची गोष्ट!)
मात्र दुसर्याला अपमानित करणारी भाषा वापरली जाऊ नये.
थोरा मोठ्यांकडून तर होऊच नये असे. नव्या लोकांकडून झाले तर त्यांना मार्ग दाखवावा.
आम्ही नाय सांगणार ...ज्जा !
आम्ही नाय सांगणार ...ज्जा !
गुलमोहरातल्या इतर ग्रूप्समधे
गुलमोहरातल्या इतर ग्रूप्समधे एकाच आयडीने दिवसाकाठी दोन किंवा अधिक कलाकृती सातत्याने पोस्ट केल्या असं बघितलं आहे का तुम्ही?<<<
+१
============================
गझल विभाग कशासाठी आहे?<<<
पर्याय<<<
मला हा धागा पुरेसा खोचकही वाटला नाही व पुरेसा गंभीरही! पण भावना अर्थातच पोचलीच.
येथे देवपूरकर व इतर गझलकार ह्यांच्यातील अनेक प्रकारचे फरक वगैरे दाखवून देवपूरकरच कसे चूक वगैरे सिद्धही करायचे नाही आहे. 'सत्य' इतकेच आहे की गझलतंत्र ही अशी बाब आहे की ती एकदा जमल्यावर खरोखरच वेळ खूप असलेला माणूस इच्छा असल्यास दिवसभरात पन्नास साठ शेरही करू शकेल. पण ते प्रकाशित करावेत का, ते प्रामाणिक अनुभुतीतून'च' आलेले आहेत का, इतर लोक काय म्हणत आहेत ह्यापैकी कशावरही त्यांनी कधीच सकारात्मक विचार केला नाही. तरीही, बाकीचे गझलकार स्वतःच्या वेगाने स्वतःच्या सुंदर गझला प्रकासित करतच होते आणि आहेतही. त्यामुळे 'गझल विभाग कशासाठी' हा प्रश्न किंचित अयोग्य वाटत आहे. (बाकी उर्दू गझलेपासूनची परंपरा पाहिल्यास खिल्ली उडणे हे अजिबातच नवीन नाही व ह्यातून मीर आणि गालिबही सुटलेले नाहीत).
दोन अवांतर गंमतीशीर किस्से:
मीर लखनौला गेला असताना तेथे एक मुशायरा असल्याचे समजल्यावर बोलावले नसतानाही तेथे जाऊन पोचला. (तेव्हा संपर्काची साधने असती किंवा मीरसाहेब स्वतः लखनौमध्ये आलेले आहेत हे कळाले असते तर त्यांना पालखीतूनच आणले असते मुशायर्यात, हे वेगळे). तर तेथे तखल्लुस (उपनामावरून) चर्चा निघाली कारण एक कमी प्रतीचा पण मीरच्या आधीपासून गझल रचणारा शायर तेथे होता ज्याने मीरच्याही आधी स्वतःसाठी मीर हे तखल्लुस घेतलेले होते व ते लोकांना ज्ञात होते. कोणीतरी मीरची खोडी काढण्यासाठी सर्वांदेखत त्या शायराला विचारले की अहो मीर तर तुम्ही ना? त्यावर तोही खोचकपणे म्हणाला की 'अहो मी ते तखल्लुस घेतले होते, पण मागाहून समजले की दस्तुरखुद्द मीरसाहेबांनाच ते तखल्लुस इतके आवडलेले आहे की त्यांनी ते स्वतःसाठी घेतले, त्यामुळे मग मी माझा हक्क सोडून दिला. ह्यावर मंडळी हासली. अर्थात, मीरला हे माहीतच नव्हते की ह्या नावाने आधीच एक शायर वावरतो.
असेच गालीबची अतर्क्य कल्पनाशक्ती असलेली पण अत्यंत किचकट भाषेतील गझल ऐकून भर मुशायर्यात एका शायराने त्याच्यावर थट्टात्मक शेर रचला व तेथेच सादरही केला. 'मजा कहनेका जब है, इक कहे और दूसरा समझे...... मगर इनका कहाँ ये आप समझे या खुदा समझे'!
प्रत्यक्ष मुशायर्यात असे होत असते तर आंतरजालावर काय!
असो अवांतर पुरे! क्षमस्व!
मला आणखीन एक मुद्दाही लिहावासा वाटत आहे व तो कोणाही विशिष्ट समुहाला / सदस्याला उद्देशून वगैरे अजिबातच नाही. जसे काहीजणांच्या मते सदस्याने किती लेखन प्रकाशित करावे ह्यावर बंधन असावे तसेच असेही बंधन ठेवावे की महिन्याकाठी एखादा तरी धागा प्रत्येकाने निर्माण करावा. काही लोक नुसतेच येतात, टवाळी करतात आणि मोठे मान्यवर होऊन बसतात. चांगले सोडाच, पण बरे लिहायलाही थोडासा का होईना कस लागतो हे ह्यांना जणू मान्यच नसते.
-'बेफिकीर'!
गुलमोहरातल्या इतर ग्रूप्समधे
गुलमोहरातल्या इतर ग्रूप्समधे एकाच आयडीने दिवसाकाठी दोन किंवा अधिक कलाकृती सातत्याने पोस्ट केल्या असं बघितलं आहे का तुम्ही?<<<
+१
============================
गझल विभाग कशासाठी आहे?<<<
पर्याय<<<
मला हा धागा पुरेसा खोचकही वाटला नाही व पुरेसा गंभीरही! पण भावना अर्थातच पोचलीच.
येथे देवपूरकर व इतर गझलकार ह्यांच्यातील अनेक प्रकारचे फरक वगैरे दाखवून देवपूरकरच कसे चूक वगैरे सिद्धही करायचे नाही आहे. 'सत्य' इतकेच आहे की गझलतंत्र ही अशी बाब आहे की ती एकदा जमल्यावर खरोखरच वेळ खूप असलेला माणूस इच्छा असल्यास दिवसभरात पन्नास साठ शेरही करू शकेल. पण ते प्रकाशित करावेत का, ते प्रामाणिक अनुभुतीतून'च' आलेले आहेत का, इतर लोक काय म्हणत आहेत ह्यापैकी कशावरही त्यांनी कधीच सकारात्मक विचार केला नाही. तरीही, बाकीचे गझलकार स्वतःच्या वेगाने स्वतःच्या सुंदर गझला प्रकासित करतच होते आणि आहेतही. त्यामुळे 'गझल विभाग कशासाठी' हा प्रश्न किंचित अयोग्य वाटत आहे. (बाकी उर्दू गझलेपासूनची परंपरा पाहिल्यास खिल्ली उडणे हे अजिबातच नवीन नाही व ह्यातून मीर आणि गालिबही सुटलेले नाहीत).
दोन अवांतर गंमतीशीर किस्से:
मीर लखनौला गेला असताना तेथे एक मुशायरा असल्याचे समजल्यावर बोलावले नसतानाही तेथे जाऊन पोचला. (तेव्हा संपर्काची साधने असती किंवा मीरसाहेब स्वतः लखनौमध्ये आलेले आहेत हे कळाले असते तर त्यांना पालखीतूनच आणले असते मुशायर्यात, हे वेगळे). तर तेथे तखल्लुस (उपनामावरून) चर्चा निघाली कारण एक कमी प्रतीचा पण मीरच्या आधीपासून गझल रचणारा शायर तेथे होता ज्याने मीरच्याही आधी स्वतःसाठी मीर हे तखल्लुस घेतलेले होते व ते लोकांना ज्ञात होते. कोणीतरी मीरची खोडी काढण्यासाठी सर्वांदेखत त्या शायराला विचारले की अहो मीर तर तुम्ही ना? त्यावर तोही खोचकपणे म्हणाला की 'अहो मी ते तखल्लुस घेतले होते, पण मागाहून समजले की दस्तुरखुद्द मीरसाहेबांनाच ते तखल्लुस इतके आवडलेले आहे की त्यांनी ते स्वतःसाठी घेतले, त्यामुळे मग मी माझा हक्क सोडून दिला. ह्यावर मंडळी हासली. अर्थात, मीरला हे माहीतच नव्हते की ह्या नावाने आधीच एक शायर वावरतो.
असेच गालीबची अतर्क्य कल्पनाशक्ती असलेली पण अत्यंत किचकट भाषेतील गझल ऐकून भर मुशायर्यात एका शायराने त्याच्यावर थट्टात्मक शेर रचला व तेथेच सादरही केला. 'मजा कहनेका जब है, इक कहे और दूसरा समझे...... मगर इनका कहाँ ये आप समझे या खुदा समझे'!
प्रत्यक्ष मुशायर्यात असे होत असते तर आंतरजालावर काय!
असो अवांतर पुरे! क्षमस्व!
मला आणखीन एक मुद्दाही लिहावासा वाटत आहे व तो कोणाही विशिष्ट समुहाला / सदस्याला उद्देशून वगैरे अजिबातच नाही. जसे काहीजणांच्या मते सदस्याने किती लेखन प्रकाशित करावे ह्यावर बंधन असावे तसेच असेही बंधन ठेवावे की महिन्याकाठी एखादा तरी धागा प्रत्येकाने निर्माण करावा. काही लोक नुसतेच येतात, टवाळी करतात आणि मोठे मान्यवर होऊन बसतात. चांगले सोडाच, पण बरे लिहायलाही थोडासा का होईना कस लागतो हे ह्यांना जणू मान्यच नसते.
-'बेफिकीर'!
काही हरकत नाही, खिल्ली उडवली
काही हरकत नाही, खिल्ली उडवली जाण्यापुरती तरी मीर / गालीब यांची बरोबरी साधता आली ना, हे ही नसे थोडके.
Pages