फेरफार नक्कल मिळत नाहिये - तक्रार अर्ज

Submitted by LonelyBoy on 28 June, 2014 - 06:03

मागील अनेक महिन्यांपासून आम्ही आमच्या शेतीच्या फेरफार नकला मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहोत, पण तुम्हाला तर माहीतच असेल की सरकारी काम कसे चालते.. इथे मी त्याविषयी एक धागा पण बनविला होता. तर मग मी आता तहसिलदार ला अर्ज करण्याचा विचार करत आहे आणि काम नाही झाल्यास माहिती अधिकार पण वापरणार, पण हे सर्व मी प्रथमच करत आहे त्यामुळे जे काही लिहीन ते बरोबर की चूक याची खात्री पटत नाहीये, कृपया इथे कोणाला याविषयी माहिती असेल तर मार्गदर्शन करा, ड्राफ्ट अर्ज लिहला आहे, इथे अपलोड करत आहे, त्यात काही चुका असल्यास सांगा. आणि त्यात आणखी काही लिहायचे असल्यास ते पण सांगा..

तसेच इथे कुणाला माहिती अधिकारा विषयी माहिती असल्यास मी त्यांना कशा प्रकारे प्रश्न विचारु या विषयी सुचवा

मागितलेले फेरफार नकला या इतक्या जुन्यापण नाहीत. 1990 च्या पुढच्याच असतील.

जुन्या धाग्याची लिँक www.maayboli.com/node/48547

व्यक्तिगत माहीती मुद्दामहून फोटो मध्ये दाखवायची टाळली आहे

Page 1
http://i.imgur.com/ryVdeW5.jpg

Page 2
http://i.imgur.com/4IQrlAK.jpg

Page 3
http://i.imgur.com/RWeeBab.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lonely Boy, तुम्ही तहसिलदार कार्यालयात संबंधीत तलाठ्याची तक्रार करणार आहात हे चांगलेच आहे. पण फक्त तक्रार अर्ज जमा करून येऊ नका त्या तहसिलदाराला तक्रार अर्जासोबत समक्ष भेटा. तुमच्या अर्जाची जी फोटो लिंक दिली आहे ती वाचली त्यात अनेक सुधारणा करता येऊ शकतात, जमल तर नक्की सुचवेन. दुसरी गोष्ट माहिती अधिकार अधिनियम, २००५ नुसार प्रश्नार्थक स्वरूपाची माहिती विचारता येत नाही, त्यामुळे माहितीच्या विषयामध्ये तुमच्या ७/१२ च्या उतार्‍यात असणार्‍या सर्व फेरफार नं. देऊन त्याची कार्यालयातील अभिलेखात असलेल्या नोंदीची छायांकित प्रतीची मागणी करा. आणि माहितीचा कालावधी १९६०-७० ते आजपर्यंत असा तुमच्या सोईप्रमाणे नमुद करा.

धन्यवाद नरेश माने

तुमच्या या प्रतिसादामधुन मला माहिती अधिकारा खाली कशा आधारे आणि कशा प्रकारे लिहून माहिती मिळवावी या विषयी चांगली दिशा मिळाली आहे,

मला तुमचा ई-मेल किँवा फेसबुक आयडी मिळू शकेल काय? म्हणजे तिथे ताबडतोब बातचीत करता येईल.

तुमच्या दुसर्‍या धाग्यावर प्रतिसाद दिलेत लोकांनी.तलाठ्याकडेच काम होईल.तुम्ही तहसीलदाराकडे प्रयत्न कराच पण तलाठ्याची पाठपुरावा करत रहा. फेरफार गहाळ होत नाअहीत हे पुन्हा सांगेन.निदान ७/१२ तरी असतातच.
नवीन धागा काढण्याऐवजी तिकडेच स्कॅन कॉपीज टाकल्या असत्या तर इतरांना सोपं झालं असतं.