गुरु राश्यांतर

Submitted by बन्या on 19 June, 2014 - 05:06

आजपासून गुरु कर्केत येणार आहे,... त्याचे कर्क धरून इतर राशींवर काय बदल होणारेत, त्याबद्दल कोणी माहितीत देऊ शकेल काय?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वृश्चिकेला गुरुबळ लाभेल.......खुप अड्लेली कामे मार्गी लागतील........
कुम्भेला नोकरीत बढ्तीचे योग येतील
मिथुनेला आणि मीनेला पण गुरुबळ लाभेल.
...एवढ मला समजल Happy

Happy माझ्या माहितीप्रमाणे गुरू बदलल्यावर त्याची फळं इतक्या लगेच दिसत नाहीत. काय काय मार्गी लागलंय आणि काय काय चांगलं घडलंय ते प्रत्यक्ष दिसून यायला १ ते ६ महिने लागतात म्हणे.

मग तोवर तर माझी साडेसाती पण संपतिये. मग कळणार कस कि हे गुरु का कियाधरा या फिर शनी कि कृपा? असू दे - अच्छे दिन आयेंगे म्हणत राहायचं.

>>मग तोवर तर माझी साडेसाती पण संपतिये. मग कळणार कस कि हे गुरु का कियाधरा या फिर शनी कि कृपा? असू दे - अच्छे दिन आयेंगे म्हणत राहायचं.

कन्या, चिंता मत करो, अच्छे दिन जरूर आयेंगे ! Happy

कर्केतला गुरू उच्चेचा असतो असे ऐकून आहे.
त्यामुळे कर्क राशीवाल्यांना ह्याचा फायदा होईल असा अंदाज आहे.
अर्थात, हे बर्‍याच घटकांवर अवलंबून असल्याने, जाणकार योग्य ती माहिती देतीलच.

मी कर्क आहे आणि काही फायदा होईल या आशेवर गेली कित्येक वर्षे आहे. जे चाललंय ते फायद्याचंच चाललंय असा विचार करत राहिलं की त्रास कमी होतो हा स्वानुभव..... Happy पण एनीवेज, नोवेंबरपासुन खरेच अच्छे दिन लिहिलेत माझ्यासाठी. अच्छे दिनवाली येती पाच वर्षे आहेत माझ्या राशीत Happy feeling happy..

कर्क राशीसाठी - इंग्रजीतून आहे Proud

You're discovering your own strength, or facing the toughness of the fiber that makes you who you are. Necessity, in the form of quite challenging planetary transits, has not let up on your power of invention in some time. Alas, Jupiter's arrival bodes well for good news, welcome perks, and signs of deliverance. For some Cancer natives, benefits might arise in the form of physical healing, and for others, evocative job offers after months of crippling unemployment. (If you know your rising sign, check which house Jupiter will be transiting for further clues.) The Zodiac's giant summons growth; and while some of it may prove fortunate, as say in an expanded bank account, there are forms of growth that can prove problematic. One of those is seen in a growing waistline or excess body weight. To offset Jupiter's propensity for weight gain, adopt a sensible exercise program. Even by implementing a regular evening or morning walk into your daily regimen, calories will be counteracted. Women of an appropriate age will more easily conceive under Jupiter's direct transit; so take heed if an addition to the family is not desired.

The square from Uranus can be tricky. Since your sign is closely tied to family traditions, you exhibit an unconscious adherence to the past and its protocols. This tenacity can inhibit your capacity to adapt to changing demands, mores, and circumstances. Although you may prefer your comfort zone, it's largely based on yesterday's designs. Meanwhile, Uranus is challenging your status quo by throwing you its twice in 84-year square angle. Like it or not, you are being dislodged from old behaviors and attachments. Uranus does not mean to be cruel. It's just that it's mandated to prompt major discoveries. These are designed to inspire the evolution of mankind, one person at a time. Whatever stands in the way of this vital learning process is apt to get tossed into the junk heap of history (yours or that of the collective). The more you can detach (a premise that's alien to most Cancers), the easier it'll be to deal with whatever it is that Uranus is altering in the blink of a cosmic eye. This passage takes us to Pluto's long-term opposition; and it is a formidable force to reckon with. What Uranus marks for change, Pluto will likely consign to the Cosmos' Demolition Derby. After all, Pluto is profoundly connected to breakdown and eventual rebuilding processes.

In facing whatever is passing away, your reflex may be to cling tighter to these elements. Unfortunately, the law of change is no respecter of persons. To every thing there is a time (allotted) and a purpose under heaven. It is not within your will's power to determine the amount of time that will be extended to the key persons, places, and things in your life plan. Whether Pluto brings storm damage to your neighborhood, shutters a factory bound for a foreign destination, or summons the demise of a much-loved relative, you will find solace in accepting that a higher plan is at work. In this way, the natural forces of life, death, and rebirth can be gracefully accepted. In a very real sense, you're facing a bona fide Initiation. It's useful to remember that on spaceship earth, none of us gets out of here alive. In coming to recognize the soul's eternality, you can better embrace the discovery processes yet to come (and grow faith in the process).

मी पण कर्क! पण राशीचा चंद्र माझ्या बाराव्या म्हणजे व्ययस्थानात आहे. मग पहिल्या गुरुचा काही फायदा होईल की नाही?? Uhoh
गेलं वर्ष बेक्कार गेलं, सगळ्याच बाबतीत. अंतर्मुख करणारा पिरियड होता तो.
म्हणुनच कधीपासुन गुरुच्या राशीबदलाची वाट बघत होते. होप काहीतरी चांगलं घडेल या वर्षी! Happy

साडेसातीपेक्षा गुरू, शनी वगैरे महादशा लै डेंजर अस्तात म्हणे... म्हणजे आम्ही साडेसातीत त्रास काढायचा तो काढायचा वर हा सहा सहा महिन्यांचा पण त्रास काढायचा?? Sad कब आयेंगे अच्छे दिन???

तुळेला तर साडेसाती सुरू आहे ना? माझे सासरे सद्या भयंकर त्रासातून जात आहेत. खरं तर ही रास योग्यायोग्यता पडताळून वागत असल्याने शनीची लाडकी रास असते म्हणतात पण अर्थात ज्याचे जसे कर्म तसा त्याला होणारा त्रासही कमी जास्त होतो साडेसातीत असंही म्हणतात

माझी रास सिंह आहे... कुठेही खुट्ट झाले (राश्यांतर, भ्रमण, इतरांची साडेसाती लागणे, दुस-यांची संपणे) की सिंह राशीला लगेच परिणाम होतो व पेपर भर सिंह राशीने जपून रहावे, भांडणे टाळावी (जसे काही आम्ही दिवसरात्र भांडतो), वाद टाळावे, आर्थिक नुकसान, अहंकार दाखवू नये (अगदी जमिनीवर पडून बोलत असलो तरी बर्रका) असे भविष्य असते.
पैसे मिळतील असे एकाही ठिकाणी वाचण्यात आलेले नाही. व्यय टाळावा, आर्थिक नुकसान असे मात्र प्रत्येक वेळेस असते
तेव्हा आता कुणी एक्सपर्टानो सिंह राशीचे सांगा(च).

तुळेला तर साडेसाती सुरू आहे ना? माझे सासरे सद्या भयंकर त्रासातून जात आहेत. खरं तर ही रास योग्यायोग्यता पडताळून वागत असल्याने शनीची लाडकी रास असते म्हणतात पण अर्थात ज्याचे जसे कर्म तसा त्याला होणारा त्रासही कमी जास्त होतो साडेसातीत असंही म्हणतात >>>>>>>>

Happy ड्रीमगर्ल - सासर्‍याला जाम शालजोडीतुन मारताय. आधी सांगीतले की सासरे भयंकर त्रासातुन जात आहेत आणि मग ज्याचे जसे कर्म तसा त्याला त्रास होतो हे स्टेट्मेंट.

तुमचे लग्न होणे आणि सासर्‍यांना साडेसातीचा त्रास होणे ह्याचा काही संबंध आहे का हो?

कर्क आणि सिंह राशींच्या लोकांनी मला काही फायदा झाला नाही अशी ओरड अजिबात करू नये .या राशिंच्या लोकांना मुळात व्यवहार (स्वत:च्या फायद्याचा) कळत नाही .मला कोण चांगलं म्हणेल स्तुति करेल(कशाकरता करताहेत हेपण कळत नाही) इकडे लक्ष जास्त .
४ ,८ ,१२ जलराशीवाले तर कोणी गळ टाकला (=स्तुति)की धावले पकडायला .
मिथुन कन्या मकर आणि कुंभेला गुरुच्या चांगले वाइट राश्यातंर होण्याने काही फरक पडत नाही .ते प्रत्येक गोष्ट तीन वेळा गुणाकार भागाकार केल्याशिवाय करत नाहीत .कुणाकडून पाठ थोपटून घ्यायची त्यांना हौसही नसते (गुरूचे कार्यकत्व).
असो .
सहज सुचलं म्हणून .

"स्थान हानी करोती जीवः " असे एक सुत्र आहे. याचा कोणी ज्योतिषांनी अनुभव घेतला आहे का ? जर हे सुत्र चुकीचे आहे अस असेल तरच इथे प्रतिसाद द्यावा. जर हे बरोबर असेल तर मात्र संपर्कातुनच लिहावे. ज्योतिष न शिकलेले आणि काहीतरी अर्धवट वाचुन डोक्याला ताप करुन घेणारे फार असतात.

खरेच जन्म रास कर्क व लग्न रास तुळ ़ बेकार गेले मागचे वर्ष गुरु महाराज अच्छे दिन आणतील का ? आपल्या दशमस्थानातुन गुरुचे भ्रमण वर्षभर आहे. कामाचा व्याप खुपच वाढेल. दशमातला गुरु धनस्थानावर पंचम दृष्टी टाकेल त्यामुळे पैसे शिलकीत पडणार आहेत. रोख किंवा सहज मोडता येतील ( एफ डी ) इ स्वरुपात पैसे वाढतील. धनस्थानाला कुटुंबस्थान असेही म्हणतात. आपल्या कुटुंबात असलेल्या व्यक्तींची संख्या किमान एकाने नक्की वाढेल.

दशमातला गुरु षष्ठ स्थानावर पण नवम द्रूष्टी टाकतो. गुरुचे कारकत्व वाढ करणे असे असते. दशामातला गुरु व्यावसायीक वाढ देतो तसेच आपले शत्रु ही वाढवतो. गुरु यातुन बरेच शिकवुन आपले नुकसान होउ देत नाही.

२-६-१० या स्थानांना अर्थ त्रिकोण असेही म्हणातात. नविन नोकरी मिळणे, कार्यभार वाढणे इ मुळे उत्पन्नात वाढ होणारच आहे. आपल्या दशमात चंद्र आहे. यावरुन गुरुचे भ्रमण आपल्याला प्रसिध्दी मिळवुन देईल.

चंद्रावरुन होणारे गुरुचे भ्रमण आपले लग्न झाले नसल्यास घडवुन आणेल.

बघा इतक्या चांगल्या गोष्टी होणार असतील तर चांगलेच होणार ना ?

नितीनचंद्र _/\_ बरे वाटले जरा वाचुन Happy लग्न होऊन बरीच वरषे झाली त्यामुळे परत ती चुक नको बाबा Happy बाकी पैसे येतात जातात त्याचे काहि नाहि पण मन:शांती गेलीये ती परत येत नाहिये Happy

बाकी सगळं चांगलं आहे हो पण अमक्या ग्रहाने अथवा योगाने घोळ केला असा प्रकार असतो आणि उर्जितावस्था येत नाही किंवा आनंदकारक गोष्टी घडत नाहीत .परंतू हे सांगून नाउमेद केले जात नाही .ज्योतिषशासत्र यांच्यासाठी निरुपयोगी ठरते .महाराज ,संत ,गुरुमंडळी ,देव ?ही काही बदल करू शकत नाही .शर्यत संपल्यावर बुट आणले जातात त्याचा काही उपयोग होत नाही .

टोचा... असेल बहुदा Wink Happy
रच्याकने कन्या राशीला आणि वृश्चिक राशीलाही चालूच्चे की साडेसाती. आता या सगळ्यांच्या राशीला त्रास होणे हे मात्र माझ्या लग्नावर डिपेंड नै बर्का...
टोचण्याचे काम चालूच ठेवा... आता चांगली ट्रेंड झालेय मी Lol

जन्म रास आणि लग्न रास फार कळत नाही... माझी जन्म रास मीन व नवर्‍याची वृश्चिक आहे. या गुरूच्या बदलामुळे या राशींवर काय बरे वाईट परीणाम होतील हे कोणी जाणकार सांगू शकेल का?

ड्रीम ,तुम्हाला शिक्षण अथवा मुलांकडून चांगले जाईल आणि नवरा काही धार्मिक वाचनाकडे वळेल असं दिसतंय .ओमगणेशडॉटकॉम वर (omganesh) तारीख वेळ टाकून एकदा पाहा .एक मिनिटात कळेल .कोणतेही सॉफ्टवेर डाऊनलोड अथवा रेजिस्ट्रेशन नसते .

ओमगणेशडॉटकॉम वर वाचलं नुकतंच... एकामागे एक महादशा आहेत... (मध्ये १ दिवसाचाही अवधी नाही Happy ) काही बर्‍या काही वाईट आहेत... मध्येच काही वर्षांनी साडेसाती आहे... चांगल्या तारखा नोंदून घेतल्या आहेत Happy धन्स Srd

आले आले मी धावत आले, पळ्त आले. यन्दा थोडा फार अभ्यास ( वरवरचा हो) केल्याचा फायदा झाला.:फिदी:

कर्केला गुरु पहिला, त्याची नजर सन्तती, शिक्षण ( ५ वे ), सप्तम ( पत्नी/ पती) आणी भाग्य ( ९ वे) स्थानावर आहे. मज्जानी लाईफ. कर्केचे आरोग्य सुधारेल.

कन्येला ११ वा गुरु भरभरुन देईल, पण साडेसाती नोव्हेम्बर १४ मध्ये सम्पेल.

वृश्चिकेला ९ वा- नोकरी वगैरेत फायदा. प्रवास होतील.

मकरेला ७ वा लाभ आणी प्रथमावर बघतो. वाईट दिवस सम्पतील.

मिथुनेला धनलाभ. तुळेला १० वा गुरु ठीक. नोकरीत बदल शक्यता.

मकरेला लग्नासाठी किवा बाळासाठी(ज्यान्चे लग्न झाले आहे) चान्गले दिवस आहेत..... अर्थात मुळ पत्रिकेत गुरु चान्गला हवा...(अटी लागू ** :P)
गुरु मूळ पत्रिकेत चान्गला असेल तर वर्र्च्या दोन्हीसाठी जबरद्स्त योग आहेत

जन्मरास मिथुन आणि लग्न रास तूळ, बुध महादशा... फार म्हण्जे फार त्रास गेले २-३ वर्ष झालाय..
आता तरी अच्छे दिन आनेवाले है क्या?

गुरु महाराजांनी राश्यांतर केले , बराच उत्साह पसरलेला दिसतोय, काही जणांना 'अच्छे दिन' च्या उकळ्याही फुटायला लागल्या आहेत, काही जण तर 'आता काय रोज रोज केळ्याची शिकरण व मटाराची उसळ' च्या तयारीला लागलेत.

फक्त गुरु अमुक तमुक राशीला आला म्हणजे अमुक तमुक फळें असा हिषेब मांडणे म्हणजे पुन्हा एकदा 'राशीभविष्य' पाहणे असे होईल. सर्व जगाच्या लोकसंख्येचे 12 भाग करुन (मेष..... मीन) त्या प्रत्येक भागाला गुरुच्या राश्यांतराचे एक एक ठोकळा छाप भविष्य , 'One size fits all' असे असणार नाही , असत नाही,

गुरु ची किंवा ईतर कोणत्याही ग्रहाची गोचरीची (Transits) फळें तपासायची असतील तर आधी मूळ जन्मकुंडलीचा सखोल अभ्यास करुन मूळ पत्रिकेत काय काय वाढून ठेवलेय ,ज्याला 'Natal Promise' म्हणतात ते पाहायला नको का? मूळात आडातच नसेल तर पोहोर्‍यात कुठून येणार ? मामा काणेंच्या उपहारगृहात चिकन सामोस्याची ऑर्डर नाही देता येणार !

मुळात ग्रहांची ही गोचर भ्रमणे कालनिर्णया 'Timing of Events' साठी एक संप्रेरक (Trigger / Catalyst) म्हणून वापरली जातात ,घटना घडवणारे ग्रह वेगळेच असतात (अर्थात फक्त गोचर भ्रमणांवर आधारित कालनिर्णय करणे चुकीचे / भोळसटपणाचे ठरेल हा भाग वेगळा!) मुळ पत्रिकेत 'विवाहयोग' नसेल तर गुरु महाराज 12 ही राशींना प्रदक्षिणा घालून आले तरी विवाह होणार नाही,

सध्या अनेक बेवसाईट्स वर ,ब्लॉग्जवर आणि चर्चाग्रुप्स वर या गुरु बदलावरच्या लिख़ाणाचे पेव फुटले आहे, काही बाही वाचायला मिळेल पण 'मला गुरु अमका म्हणजे 'अच्छे दिन ' अशा स्वप्नरंजनात राहू नका किंवा काहीतरी अशुभ वाचून काळजीत राहू नका .

सध्या अनेक बेवसाईट्स वर ,ब्लॉग्जवर आणि चर्चाग्रुप्स वर या गुरु बदलावरच्या लिख़ाणाचे पेव फुटले आहे, काही बाही वाचायला मिळेल पण 'मला गुरु अमका म्हणजे 'अच्छे दिन ' अशा स्वप्नरंजनात राहू नका किंवा काहीतरी अशुभ वाचून काळजीत राहू नका . +१

कुणीतरी कर्क राशीच्या लोकांचे वजन वाढणार आहे असे लिहले आहे.

यातली गंमत अशी की राशीतुन ( चंद्र राशीतुन ) गुरुचे भ्रमण झाले की वजन वाढते हा विचार फारसा बरोबर नाही. गुरु चे कारकत्व वाढ करण्याचे आहे हे बरोबर आहे. आपले लग्न ( लग्न रास जर कर्क असेल ) आणि लग्नी गुरु असेल. त्याशिवाय आपल्या शरीराची वजन वाढायची प्रवृत्ती असेल तरच हा फक्त ( इशारा ) म्हणुन घ्यावा.

अश्या अनेक गोष्टी आहेत ज्याचा उलगडा पत्रीका पाहिल्याने जास्त चांगला होतो.

>>कन्येला ११ वा गुरु भरभरुन देईल, पण साडेसाती नोव्हेम्बर १४ मध्ये सम्पेल. Happy

१.
मी असे ऐकले होते की शनि वक्री झाल्यामुळे कन्येच्या साडेसातीचा कालावधी यावेळेस वाढला आहे/होता.
म्हणजे साडेसात वर्षांपेक्षा जास्त काळ असेल, इ. खरे आहे का हे ?
कन्येची साडेसाती तर २००७ च्या मध्यात चालू झाली होती ना ? त्या हिशोबाने साडेसात वर्षांतच संपत आहे.

२.
११ वा गुरू किती काळ आहे कन्येला ? १२ वा केव्हा सुरू होईल ? तसेच १२ वा गुरू म्हणजे चांगला नसतो का ?

>>काही बाही वाचायला मिळेल पण 'मला गुरु अमका म्हणजे 'अच्छे दिन ' अशा स्वप्नरंजनात राहू नका किंवा काहीतरी अशुभ वाचून काळजीत राहू नका .<<
राहू द्या हो लोकांना स्वप्नरंजनात. अवास्तव काळजी करु नका म्हणजे झाल म्हणाव. शेवटी ज्योतिषाचा उपयोग हा पलभरके लिए कोई हमे प्यार कर दे झूटाही सही असा आहे ना!

>>>> राहू द्या हो लोकांना स्वप्नरंजनात. अवास्तव काळजी करु नका म्हणजे झाल म्हणाव. शेवटी ज्योतिषाचा उपयोग हा पलभरके लिए कोई हमे प्यार कर दे झूटाही सही असा आहे ना! <<<<<<

बाकी प्रकाशजी तुम्ही एका छान गाण्याची आठवण मात्र करुन दिलीत , गुरु जसा राशी बदलतोय तसा देवआनंद पण या खिडकीतून तर कधी त्या खिड्कीतून डोकावतोय, किती खिडक्या बंद करा हा गडी आपला पड्का दात दाखवत दुसरी कडून कुठूनतरी हजर हैच ! गाण्याचे 'पिक्चरायजेशन' का काय म्हणतात ते अप्रतिम आहे , संगीत सुद्धा दगाबाज आहे एका टप्प्यावर गाणे संपले असे वाटते तो परत गिरकी मारुन देवसाब पुढची ओळ म्हणायला सुरवात "पल्भर के प्यार के लिये निसार सारा जीवन .." ह्याच गाण्यात एक ओळ आहे "माना की तू सारें हंसीनोंसे हसीं है , अपनी भी सुरत बुरी तो नहीं है.." या बद्दल शिरीष कणेकर म्हणाले होते "हेमामालिनी सारख्या रुपगर्वितेला असले काही ठणकावून सांगण्याचा अधिकार या आख्ख्या फिल्मी जगात कोणाला जर असेल तर तो फक्त या देवआनंद ला.. आणि याची साक्ष द्यायला एक नाही दोन नाही चक्क तीन तीन पिढ्या पुढे येतील.."

थोडसे विषयांतर झाले नै का पण काही हरकत नाही 'अच्छे दिन आनेवालेच है ना' तो सब चलता हय...

रश्मी ,

>>>वृश्चिकेला ९ वा- नोकरी वगैरेत फायदा. प्रवास होतील.

अभ्यास चांगला झाला आहे तुमचा .
माझी व बायकोची रास वृश्चिक . गेल्या आठवड्यात माझी "चांगली " पगारवाढ अन बायकोला सुरवातीलाच चांगल्या पगाराची नौकरी मिळाली .
गुरु चा प्रभाव खरच अनुभवायला मिळाला तीन महिने झाले बायको प्रयत्न करत होती नौकरीसाठी पण यश मिळत नव्हत अन ३ दिवसापूर्वी हि नौकरी सहज मिळाली.

काही विदयार्थी अभ्यास मन लावून करत आहेत आणि प्रसंगी इतरांच्या मदतीला धावून येत आहेत .व्वा !

कर्केतल्या गुरुचे स्वागत--,मूळ कुंडलीत तर गुरू चांगला हवा ना--इत्यादी .=एक नंबरवर गाडीची वाट पाहताय आणि तीन नंबर फलाटावरून धडाधड फास्ट गाड्या जाताहेत .

Pages