जोधा अकबर

Submitted by पलक on 11 June, 2014 - 00:44

Jodha Akabar.jpg

गेले किती दिवस आपण सगळे या मालिकेबद्दल बोलतोय.....मग इतरत्र प्रतिक्रिया मांडण्याऐवजी इथे मांडा....

जोधा अकबर विषयी चर्चा/ गप्पा मारण्यासाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो, महामंगाचं काम छान झालय! रुकैय्याने तिचा तोरा चांगला दाखवलाय!
जलालने फक्त आवाजात मार खाल्लाय!!
संगीत सम्राट तानसेनचं पुढे काय झालं दाखवलच नाही. Uhoh

आमच्या घरचा टिवी ८ वाजता बरोबर झी ला ट्युन होतो. Happy

उद्याच्या भागात जलाल ला कळणार आहे की रुकैय्या नाटक करतेय म्हणून. >> काल प्रोमोमध्ये दाखवलय खर पण आज लगेच तस दाखवणार नाहीत हा माझा अंदाज.

आला का धागा??? वाह वाह. करा काय शेती करायची ती आता Wink

रुकैयाला आता काहीतरी वेगळे डॉयलॉग द्यावेत संवाद लेखकाने Happy

अकबराच्या नवरत्नांमधे तोडरमल, तानसेन, रहिम खानेखाना आणि बिरबल आणि राजा मानसिंग (जोधाच्या भावाचा मुलगा) हे माहित आहेत बाकीचे नाहित.

और जलाल की बचपन की दोस्त है Happy

पण सगळं चांगल चाललेलं असताना अचानक कस्काय जलालला शक आला तिच्यावर आणि त्याने प्रेग्नंसी टेस्ट केली तिची?? Uhoh

पण सगळं चांगल चाललेलं असताना अचानक कस्काय जलालला शक आला तिच्यावर आणि त्याने प्रेग्नंसी टेस्ट केली तिची?? >>>> म्हणुनच म्हटल ना मी कि लगेच आज ती टेस्ट दाखवणार नाहीत... आठवडाभर तरी ताणतील

तेच म्हणतेय मी काल तर तो तिच्या पोटातल्या मुलाशी बोलत काय होता, रडत काय होता Happy बरं त्या बरणीला म्हणजे सैफुद्दिनच्या बायडीला कुठे गायब केलय? ती पण प्रेग्नंट आहे ना?

बरणी... Rofl
पण आता खरं तर जोधा प्रेग्नंट रहायला हवीये. Wink रुकैय्याचं नाटक संपेस्तोवर हा आठवडा घेतील त्यात.

Rofl समीर नाय सलीमचं गं!!
तसं नाही गं, मला आधी वाटलं रुकैय्याबैच्या कोडकौतुकात जोधाचं (खर्रखुर्र) गर्भारपण झाकोळलं जाईल की काय! शुक्र है, तसं काही होत नाहीये.

हायला मी धर्मच बदलला की काय? डोमा: सलीमच Happy
बास आता कौतुक रुकैयाच.जोधा प्रेग्नंट झाल्यावर तिची इथे तिथे तोंड घालायची सवय तरी कमी होईल सगळ्या मुघल सल्तनतची हिलाच चिंता आणि हिची चिंता त्या अकबराला. काही काम धाम करत नाही सारखा ही बेगम नाहीतर ती बेगम. Wink

आठवडाभर नाही ताणणार हे..आता त्या शहेनाझचा बदला पण दाखवायचा आहे ना..
ह्या शुक्रवारच्या प्रोमोत दाखवलंय ती जलालवर हल्ला करणार आहे..!!

Pages