फ्रेंच ओपन टेनिस - २०१४

Submitted by Adm on 23 May, 2014 - 01:49

यंदाच्या वर्षीच्या क्ले कोर्ट सिझनचा शेवट करणारी आणि उन्हाळ्यातली पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा अर्थात फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा येत्या रविवारी म्हणजे २५ मे रोजी सुरु होत आहे.

पुरूष एकेरीत नेहमीप्रमाणेच नदाल, जोकोविक आणि फेडरर ह्यांच्यात विजेतेपदासाठी चुरस असेल. शिवाय गेल्या वर्षभरात प्रभावी कामगिरी केलेला 'स्टॅन द मॅन' आणि डेव्हिड फेरर कसे खेळतात ह्याकडेही लक्ष ठेवावे लागेल. यंदाचा क्ले सिझन नदाल साठी संमिश्र गेलेला असल्याने नदाल त्याच्या 'घरच्या' कोर्टवर पुन्हा एकदा विजेतेपद मिळवण्यास उत्सुक असेल.

शारापोव्हाने क्ले सिझनमधली एक स्पर्धा जिंकून आशा निर्माण केल्या आहेत. अर्थात सेरेना, ना ली वगैरेंचे कडवे आव्हान तिच्यासमोर असेलच.

मानांकने आणि ड्रॉ आज जाहिर होणार आहेत. ते आले की इथे अपडेट करेन.

स्पर्धेची वेबसाईट : http://www.rolandgarros.com/en_FR/index.html

ह्या स्पर्धेसंबंधी चर्चा करण्यासाठी हा धागा..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मरे काका दुसरी मॅच झंजले पाच सेटपर्यंत..

राफाचे हायलाईट्स पाहिले नाहीत अजून.. आधीच्या मॅचला डाऊन द लाईन फटके फार भारी मारले होते त्याने..

इर्रानी ताई हरल्या.. तिच्यात पोटेंशियल आहे खरं.. फक्त ऐनवेळी नांगी टाकते..

हा बाफ इतका संथ का आहे यावेळेस?सेमिफायनल्स आल्या की.... Happy

गुल्बिस सरप्राईज पॅकेज आहे यावेळेस.. ज्योकोबरोबरच्या मॅचला मजा येणार..

महिलांमध्ये माझा सपोर्ट बुचार्डला...

मयुरेश.. तू येऊन ट्रॅफिक वाढवत जा की... Wink

अरे.. इथे कुठेच टेलिकास्ट नाहीये.. त्यामुळे असेल.. नुसत्या हायलाईट्सवर समाधान मानावं लागतय.. Sad

बुचार्ड चांगली वाटते आहे..

बुचार्ड चांगली वाटते आहे....>> म्हणजे काय? चांगलीच आहे ती Wink

तू येऊन ट्रॅफिक वाढवत जा की...>>> तेच केलय मित्रा... Happy

इथे कुठेच टेलिकास्ट नाहीये.. त्यामुळे असेल.. नुसत्या हायलाईट्सवर समाधान मानावं लागतय....> निओ स्पोर्टसवर आहे टेलीकास्ट, डिशवाल्यांचं अ‍ॅड ऑन पॅकेज घेतलय मी खास त्यासाठी.. फ्रेंच ओपन संपली की डिशवाल्यांना साभार परत करणार आहे मी Proud

हा.. निओवर आहे.. टाटा स्काय वाल्याचं पटत नाही म्हणे निओशी हल्ली..
त्यामुळे तिथे अ‍ॅड ऑन पण नाहीये..

पग्या,हिम्या, पापं कमी करत जा लेको... Proud

यावेळेला महिलांच्या आणि पुरुषांच्या उपांत्यपूर्व फेर्‍या दोन वेगवेगळ्या दिवशी न ठेवता निम्म्या निम्म्या का केल्या काही कळालं नाही.

यूएस ला तसंच असतं ना. म्हणून ह्यांनी पण केलं असेल.. पण हे खरंतर चुकीचं वाटत.. एकाला एका दिवसाची जास्तीची विश्रांती मिळते..

शेरापोव्हाला याच्या आधीच्या एटीपीला हॅलेपने धूळ चारली होती. त्याचा फायदा असा(ही) होऊ शकतो की जर हॅलेप फायनलला असेल तर निदान मारियाच्या टीमला डावपेच लढवता येईल. पण फायनल इज नॉट गोइंग टु बी इजी.

मारीया सलग तिसर्यांदा फायनलं मध्ये :):)

हॅलेप पण चांगली खेळत्ये...तीने ज्यूनिअर रोलंड गॅरॉस जिंकलय....बघू मझ्या मते तिचं हे पहिलंच ग्रॅडस्लॅम असेल जिंकली तर.

या वेळेस विलिय्म्स बघिनी नाहियेत फायनला ते बरयं Happy

मझ्या मते तिचं हे पहिलंच ग्रॅडस्लॅम असेल जिंकली तर. >>>> तुमचं मत काहीही असलं तरी पहिलच असेल तिचं हे ग्रॅंडस्लॅम ती जिंकली तर.. Happy

आजच्या मेन सेमी फायनल पण मस्त होणार.. ! फॅब फोर पैकी एक जण नाही यंदा..

नदालने अगदीच किरकोळीत काढला मर्‍याला..दोन तासांपेक्षा कमी वेळात..
परवाची फायनल चांगली होणार.. आणि उद्याची पण !

हॅलेप ने दूसर्या सेट मध्ये ट्रायब्रेकर खेचून आणला....हॅट्स ऑफ ...

शारापोव्हाच्या हालचाली थोड्या मंदावल्यात.....

Pages